आठवणी
जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतं
या आठवणींत बुडुन जाताना
आजचं नाही उरत भान
क्षण ते परत ना येतील आता
तीच होती सुखाची खाण
आठवणी असतात अनेकांच्या
तुमच्या, माझ्या, सर्वांच्या
प्रत्येकाची असते एकतरी आठवण
दु:खाची अथवा सुखाची साठवण
माझ्याही आहेत अशाच आठवणी
पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या
जीवन झाल्या त्याच आठवणी
सुवर्णरुपी गतकाळाच्या
ह्रुदयात या रुजुनि गेल्या
काही त्यातल्या बुजुनही गेल्या
मनात काहींनी घर केले
पण...
क्षण आता ते उडुन गेले
आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात
(आठवणीत हरवून गेलेला) अथांग सागर
प्रतिक्रिया
24 Jun 2008 - 10:58 am | चेतन
आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात
हे मस्तचं
पुलेशु
आठवणित रमणारा चेतन
24 Jun 2008 - 1:37 pm | अनिल हटेला
छान कविता !!
ह्रुदयात या रुजुनि गेल्या
काही त्यातल्या बुजुनही गेल्या
मनात काहींनी घर केले
पण...
क्षण आता ते उडुन गेले.................
माझ्याही आठवणी जाग्या केल्यास....
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
24 Jun 2008 - 5:28 pm | विसोबा खेचर
जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतं
ह्या ओळी अतिशय सुरेख..!
तात्या.
24 Jun 2008 - 5:36 pm | शितल
कविता आवडली.
आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात
हे तर एकदम मस्त
24 Jun 2008 - 6:37 pm | कौस्तुभ
मस्तच आहे कवीता!
24 Jun 2008 - 6:43 pm | मनस्वी
सुंदर ओळी अथांग सागर!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
23 Jul 2008 - 12:53 am | अथांग सागर
मनापासून धन्यवाद...
-अथांग सागर
23 Jul 2008 - 1:09 am | प्राजु
एकदम आठवणींमध्ये नेणारी.
जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतं
हे मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/