झुंज

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
18 Jun 2008 - 11:46 am

महासागरी उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी
विजय ललाटी असो नसो वा, जिद्द ठेवतो जिंकण्याची.

कधी वाटते थिटा पडे मी, कधी वादळा पुरुन उरतो
कधी लाटंचा जबर तडाखा, कधी तयांवर स्वारी करतो.

जरी जिंकतो डाव कधी मी, त्वेष आतुनी हो न कमी
ओढ नव्या क्षितीजांची मजला, नकळत धरतो खडःग करी.

लढण्यासाठी जन्म आपुला, हेच मजला ठाव असे
हार्-जीत तर चालायाचीच, मजला त्याचे गम्य नसे.

संकटांना झेलण्याचा, छंद माझा आगळा
भय कुणाचे कधीच नाही, मी सर्वांहुन वेगळा.

चाकोरीत राहुनी मी, डाव कधी ना मांडला
फेकले तिथेच फासे जेथे, अद्द्याप कुणी ना जिंकला.

वळुनी मागे अतीत बघता, माझेच मजला वाटते भय
फिरुनी आगीत चाललो मी, आगीचीच मला सवय.

गझल

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

18 Jun 2008 - 11:51 am | अमोल केळकर

स्फुर्तीदायी काव्य -

लहरोंसे लढकर नौका पार नही होती
कोशिश करने वालोंकी हार नही होती.
या धर्तीची रचना

अमोल केळकर's picture

18 Jun 2008 - 11:55 am | अमोल केळकर

लहरोंसे डरकर असे वाचावे

विसोबा खेचर's picture

18 Jun 2008 - 11:52 am | विसोबा खेचर

केवळ अप्रतीम काव्य! अन्य शब्द नाहीत...!

एकन् एक ओळ आवडली.

संग्राह्य कविता....!

आपला,
(आंतरजालीय झुंजार) तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Jun 2008 - 8:51 pm | llपुण्याचे पेशवेll

ओळन् ओळ संग्राह्य... छान काव्य..
पुण्याचे पेशवे

अरुण मनोहर's picture

18 Jun 2008 - 1:52 pm | अरुण मनोहर

कधी वाटते थिटा पडे मी, कधी वादळा पुरुन उरतो
कधी लाटंचा जबर तडाखा, कधी तयांवर स्वारी करतो.

वादळाच्या आणि लाटांच्या थपडा खाऊन देखील त्यांच्यावर मात करायची उम्मीद! ही लढाउ वृत्ती भावली.

िमसळपाव's picture

18 Jun 2008 - 4:35 pm | िमसळपाव

चाणक्य, पिह्ली दोन कडवी वाचल्यावर पटकन हे िशवाजीमहाराजांवर कवन आहे असं वाटलं. ओळन््ओळ लागू पडते त्याना.

दोन िदवसांपूर्वी पुष्कराजची आिण आज ही. व्वा!

धमाल मुलगा's picture

18 Jun 2008 - 4:37 pm | धमाल मुलगा

आर्य चाणक्य,

यार कवितेतलं काय झेपत नाही बघ, मला गाढवाला :(
पण तुझं चालू दे!!!!

काही गद्य लिहिलंस तर सांगेन बाबा, छान की उत्तम ते :)

बाकी, कविता एकदम सकारात्मक दृष्टीकोन असलेल्या लढवय्याची दिसत्ये :)

शितल's picture

18 Jun 2008 - 6:03 pm | शितल

काव्य वाचुन एकदम स्फुरण चढते.
मस्त.
अजुन येऊ द्या. वाचायला आवडेल.

चेतन's picture

18 Jun 2008 - 7:26 pm | चेतन

जरी जिंकतो डाव कधी मी, त्वेष आतुनी हो न कमी
ओढ नव्या क्षितीजांची मजला, नकळत धरतो खडःग करी.

एकदम सही..

संकटांना झेलण्याचा, छंद माझा आगळा
भय कुणाचे कधीच नाही, मी सर्वांहुन वेगळा.

अप्रतिम लिहलयं राव तुम्ही

वेगळा चेतन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jun 2008 - 9:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

वरदा's picture

18 Jun 2008 - 10:36 pm | वरदा

मस्त आहे आवडली कविता

प्राजु's picture

18 Jun 2008 - 11:20 pm | प्राजु

संपूर्ण कविता वाचल्यावर शंभर हत्तीचं बळ यावं अंगात ....या धाटणीची कविता आहे..

महासागरी उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी
विजय ललाटी असो नसो वा, जिद्द ठेवतो जिंकण्याची.

कधी वाटते थिटा पडे मी, कधी वादळा पुरुन उरतो
कधी लाटंचा जबर तडाखा, कधी तयांवर स्वारी करतो.
या ओळी खास कोलंबससाठी लिहिल्यासारख्या वाटल्या..

अभिनंदन उत्तम काव्याबद्दल.- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चाणक्य's picture

19 Jun 2008 - 9:03 am | चाणक्य

अमोल, तात्या, पेशवे, अरुण, मिसळपाव, धमाल मुला, शितल, वरदा, डॉ. बिरुटे, प्राजु आपल्या प्रतिसादा बद्दल आपले आभार...!

चाणक्य's picture

19 Jun 2008 - 9:06 am | चाणक्य

वरील प्रमाणे

II राजे II's picture

19 Jun 2008 - 9:20 am | II राजे II (not verified)

संकटांना झेलण्याचा, छंद माझा आगळा
भय कुणाचे कधीच नाही, मी सर्वांहुन वेगळा.

वा वा !!! क्या बात है !!!!

छान!!!

राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

अनिल हटेला's picture

19 Jun 2008 - 9:47 am | अनिल हटेला

सुन्दर कविता !!!

लगे रहो !!!!!!!!!!!!!!!!!!!

चाणक्य's picture

20 Jun 2008 - 9:01 am | चाणक्य

राजे, आन्या प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद

चिनू's picture

20 Jun 2008 - 4:23 pm | चिनू

खुप्च चान