एक उनाड दिवस
चल सख्या घालवूया,
नको काटे घड्याळाचे
राना- वनात फिरूया!
एक उनाड दिवस
घालू पाखरांना साद,
जरा अंगणात त्यांच्या
चल रमूया निवांत!
एक उनाड दिवस
नको पैसा व्यवहार,
मन रिक्त होता थोडे
येते नात्यांस बहार..
एक उनाड दिवस
नको कर्तव्य नि पाश
मागे टा़कू कवडसे
पाहू मोकळे आकाश!!
अश्या उनाड दिवशी
भर उन्हात भटकू,
मृगजळे दिसताच
थोडे फसू, थोडे हसू!
पाहू सांज कलंडती
रंग जुनेच नव्याने,
येवो मन मोहरून
मरगळ विझल्याने!
असे मनाजोगा वेळ
मग हळूच सरावा,
चित्त, पुन्हा ताजे होता
नवा दिवस गुंफावा!
नवा दिवस गुंफावा...
-वेणू
ब्लॉगः वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/
प्रतिक्रिया
27 Apr 2012 - 3:55 pm | मुक्त विहारि
सुंदर झाली आहे कविता....
27 Apr 2012 - 4:09 pm | प्यारे१
बहोत खुब ....!
27 Apr 2012 - 4:12 pm | परिकथेतील राजकुमार
अध्ये मध्ये इतरांचे लेखन वाचायला आणि प्रतिसाद द्यायला पण येत चला मिपावर.
27 Apr 2012 - 4:15 pm | यकु
छानसहित अगदी हेच आणि असंच!
27 Apr 2012 - 4:39 pm | प्रचेतस
अप्रतिम.
27 Apr 2012 - 4:42 pm | अत्रुप्त आत्मा
:-)
27 Apr 2012 - 4:53 pm | चित्रगुप्त
सुंदर कविता....काही चित्रमय प्रतिसादः
एक उनाड दिवस


चल सख्या घालवूया,
नको काटे घड्याळाचे
राना- वनात फिरूया!
अश्या उनाड दिवशी



भर उन्हात भटकू,
मृगजळे दिसताच
थोडे फसू, थोडे हसू!
एक उनाड दिवस
नको कर्तव्य नि पाश
मागे टा़कू कवडसे
पाहू मोकळे आकाश!!
पाहू सांज कलंडती


रंग जुनेच नव्याने,
येवो मन मोहरून
मरगळ विझल्याने!
28 Apr 2012 - 1:20 pm | अमृत
_/\_ खूपच बोलकी चित्रं अगदी समर्पक..
अमृत
27 Apr 2012 - 5:00 pm | वेणू
वाह चित्रगुप्त, अगदी उत्स्फुर्त टाळी दिल्याचा भास झाला! :)
सर्वांची आभारी आहे!
अध्ये मध्ये इतरांचे लेखन वाचायला आणि प्रतिसाद द्यायला पण येत चला मिपावर.>> नक्कीच सर. :)
28 Apr 2012 - 12:04 pm | अमृत
मस्तच...
अमृत
28 Apr 2012 - 3:09 pm | जयवी
खूप छान :)
28 Apr 2012 - 3:12 pm | मनीषा
कविता सुरेख आहे. अगदी सगळ्यांच्या मनातली ..
30 Apr 2012 - 6:46 pm | चौकटराजा
वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
या बालपणीच्या कवितेची आठवण या निमिताने आली. आपली कविता सलग सुंदर झाली आहे त्यास श्री चित्रगुप्त यानी मांडलेले चित्र गुफ्तगू पण
लय भारी ! उनाड दिवस म्हटल्याने आणखी काही मस्ती अपेक्षित होती.अर्थात आपण स्त्री असल्याने आपल्या कवितेतील उनाडपणा सुद्धा कसा
हळूवार आहे.
पुकशु
चौ रा.