एक उनाड दिवस
चल सख्या घालवूया,
नको काटे घड्याळाचे
राना- वनात फिरूया!
एक उनाड दिवस
घालू पाखरांना साद,
जरा अंगणात त्यांच्या
चल रमूया निवांत!
एक उनाड दिवस
नको पैसा व्यवहार,
मन रिक्त होता थोडे
येते नात्यांस बहार..
एक उनाड दिवस
नको कर्तव्य नि पाश
मागे टा़कू कवडसे
पाहू मोकळे आकाश!!
अश्या उनाड दिवशी
भर उन्हात भटकू,
मृगजळे दिसताच
थोडे फसू, थोडे हसू!
पाहू सांज कलंडती
रंग जुनेच नव्याने,
येवो मन मोहरून
मरगळ विझल्याने!
असे मनाजोगा वेळ
मग हळूच सरावा,
चित्त, पुन्हा ताजे होता
नवा दिवस गुंफावा!
नवा दिवस गुंफावा...
-वेणू
ब्लॉगः वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5285
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा ! मस्तच.....
बहोत खुब ....!
छान !
+1
In reply to छान ! by परिकथेतील राजकुमार
अप्रतिम.
(No subject)
सुंदर कविता
आमच्याकडून आपणाला
In reply to सुंदर कविता by चित्रगुप्त
वाह चित्रगुप्त, अगदी
नेहमीप्रमाणे
खूप छान
कविता सुरेख आहे. अगदी
लहान पणची कवितेची आठवण