Skip to main content

एक उनाड दिवस... (अष्टाक्षरी)

लेखक वेणू
शुक्रवार, 27/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
एक उनाड दिवस चल सख्या घालवूया, नको काटे घड्याळाचे राना- वनात फिरूया! एक उनाड दिवस घालू पाखरांना साद, जरा अंगणात त्यांच्या चल रमूया निवांत! एक उनाड दिवस नको पैसा व्यवहार, मन रिक्त होता थोडे येते नात्यांस बहार.. एक उनाड दिवस नको कर्तव्य नि पाश मागे टा़कू कवडसे पाहू मोकळे आकाश!! अश्या उनाड दिवशी भर उन्हात भटकू, मृगजळे दिसताच थोडे फसू, थोडे हसू! पाहू सांज कलंडती रंग जुनेच नव्याने, येवो मन मोहरून मरगळ विझल्याने! असे मनाजोगा वेळ मग हळूच सरावा, चित्त, पुन्हा ताजे होता नवा दिवस गुंफावा! नवा दिवस गुंफावा... -वेणू ब्लॉगः वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/
लेखनविषय:

वाचने 5285
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

अध्ये मध्ये इतरांचे लेखन वाचायला आणि प्रतिसाद द्यायला पण येत चला मिपावर.

In reply to by परिकथेतील राजकुमार

छानसहित अगदी हेच आणि असंच!

:-)

सुंदर कविता....काही चित्रमय प्रतिसादः एक उनाड दिवस चल सख्या घालवूया, नको काटे घड्याळाचे राना- वनात फिरूया! अश्या उनाड दिवशी भर उन्हात भटकू, मृगजळे दिसताच थोडे फसू, थोडे हसू! एक उनाड दिवस नको कर्तव्य नि पाश मागे टा़कू कवडसे पाहू मोकळे आकाश!! पाहू सांज कलंडती रंग जुनेच नव्याने, येवो मन मोहरून मरगळ विझल्याने!

वाह चित्रगुप्त, अगदी उत्स्फुर्त टाळी दिल्याचा भास झाला! :) सर्वांची आभारी आहे! अध्ये मध्ये इतरांचे लेखन वाचायला आणि प्रतिसाद द्यायला पण येत चला मिपावर.>> नक्कीच सर. :)

वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे या बालपणीच्या कवितेची आठवण या निमिताने आली. आपली कविता सलग सुंदर झाली आहे त्यास श्री चित्रगुप्त यानी मांडलेले चित्र गुफ्तगू पण लय भारी ! उनाड दिवस म्हटल्याने आणखी काही मस्ती अपेक्षित होती.अर्थात आपण स्त्री असल्याने आपल्या कवितेतील उनाडपणा सुद्धा कसा हळूवार आहे. पुकशु चौ रा.