खांदा देण्या कितिदा गेलो
इतक्या वेळा मी गेलो -
आपल्यासाठी उरले कोणी
... पहावयाचे विसरून गेलो ! |१|
एक तारखेची गंमत असते
आमच्या प्रेमा भरती येते -
माझ्या नयनीं पत्नी असते
तिचिया नयनीं वेतन असते ! |२|
कचरामुक्त जगास बघावे
ध्यास मनीं जरि धरतो -
अशक्य मजला परि वाटते,
जोवर मी लेखन करतो ! |३|
सावलीतही गॉगल लावून
हीरो बनण्या गेलो ,
' डोळे नाहीत आले- '
सांगत घामाघूम झालो ! |४|
(पूर्व प्रसिद्धी: हास्यगाssरवा २०१२)
प्रतिक्रिया
13 Mar 2012 - 6:51 pm | पक पक पक
मस्त आहेत चारोळ्या.... :) आवड्ल्या...
13 Mar 2012 - 8:07 pm | तर्री
थोडा विनाद थोडे वास्तव.
13 Mar 2012 - 10:47 pm | रघु सावंत
आयुश्याच्या प्रत्येक साच्यात डोकावलात कि हो साहेब.छान वाटले.
13 Mar 2012 - 10:52 pm | पैसा
हे विशेष आवडलं.