Skip to main content

" चार चारोळ्या - "

लेखक विदेश यांनी मंगळवार, 13/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
खांदा देण्या कितिदा गेलो इतक्या वेळा मी गेलो - आपल्यासाठी उरले कोणी ... पहावयाचे विसरून गेलो ! |१| एक तारखेची गंमत असते आमच्या प्रेमा भरती येते - माझ्या नयनीं पत्नी असते तिचिया नयनीं वेतन असते ! |२| कचरामुक्त जगास बघावे ध्यास मनीं जरि धरतो - अशक्य मजला परि वाटते, जोवर मी लेखन करतो ! |३| सावलीतही गॉगल लावून हीरो बनण्या गेलो , ' डोळे नाहीत आले- ' सांगत घामाघूम झालो ! |४| (पूर्व प्रसिद्धी: हास्यगाssरवा २०१२)

वाचने 1880
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

कचरामुक्त जगास बघावे ध्यास मनीं जरि धरतो - अशक्य मजला परि वाटते, जोवर मी लेखन करतो
हे विशेष आवडलं.