झिरो व्हैली- अरुणाचल प्रदेश

विश्वास कल्याणकर's picture
विश्वास कल्याणकर in जनातलं, मनातलं
20 Aug 2011 - 11:53 am

नहरलगुन येथे मुक्कामास असतांना मला एक सुखद धक्का बसला तो श्री अविनाशजी बिनीवाले यांचे भेटीने. अकाउंट्स च्या कामासाठी मला अरुणाचलमधील पासीघाट येथे जाण्याचा योग आला. तेथे सियांग नदिच्या विशाल पात्रावर तेव्हढाच विशाल पुल बांधण्यात आला आहे. पासीघाट हे अरुणाचल मधील सर्वात जुने शहर आहे. नहरलगुन हुन बस ने इथे पोचण्यास सुमारे ५ तास लागतात अर्थात च आसाम मधुन जावे लागते. इशान्य भारतातील कुठल्याही एका राज्यातुन दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी आसाम मधुन जावेच लागते. पासीघाट ला संस्थेच्या गाडीने प्रवास झाला असल्याने अरुणाचलच्या खेड्याना भेटी देता आल्या व तेथील अंतरंगाची ओळख झाली. एक दिवस मुक्काम करुन आम्ही दुसरे दिवशी संध्याकाळी नहर लगुन ला परतलो.

पासीघाट चे फोटो.

सियांग नदिवरील राजीव गांधी पुलावरुन दिसणारे दृश्य




पासीघाट येथील आमचे यजमान एक अरुणाचली कुटुंब

अविनाशजी बिनीवाले नहरलगुन येथे मुलांचे इंग्लीश स्पिकींग चे वर्ग घेत असत. नहरलगुन ला दोन ठीकाणचे १५ दिवसांचे वर्ग आटोपुन ते पासीघाट व झ्रिरो ला जाणार होते. नहरलगुन चे मुक्कामात त्यांच्याशी त्यांच्या अनुभवांच्यास गप्पा ऐकणे हा एक सुखद व माहितीपुर्ण कार्यक्रम असावयाचा. दरम्यान च्या काळात मी ५ दिवसासाठी झिरो येथे विद्याभारतीच्या शाळेच्या कामासाठी जाउन आलो. झिरो म्हणजे सभोवती डोंगरांच्या रांगा व त्यात वसलेले हे शहर भाताच्या पेरण्या नुकत्याच आटोपल्या असल्याने निळ्या डोंगरांच्या प्रुष्टभागावर हे धानाची हिरवी गार शेते म्हणजे डोळ्यांना मेजवानीच होती.

अरुणाचल प्रदेशातील लोअर सुबानसिरी जिल्ह्यातील अत्यंत सुरेख थंड हवेच्या ठीकाणापैकी एक असलेले शहर म्हणजे "झिरो" समुद्र सपाटी पासुन सुमारे ५७०० फुटावर हे ठीकाण आहे. हे शहर ओल्ड व न्यु झीरो अशा दोन भागात विभागले असुन या दोन ठीकाणामधील अंतर ५ कि.मी इतके आहे.आपातानी जमातीचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जात असलेले हे शहर पाइन व बांबुंच्या जंगलानी वेढलेले असुन धानाच्या शेतांनी सुशोभित केलेले दिसते. कृषि व मासेमारी हे येथील प्रमुख उपजीविकेचे साधन असल्याने धानाची शेते व मासेमारीसाठी ठिकठीकाणी तळे हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे. आपातानी या जनजातीचे वैशिष्ट्य असलेल्या खास डिझाइन असलेल्या शाली तयार करणे हे देखीलयेथील प्रमुख आकर्षण आहे.
झिरो येथील फोटो.


.
झिरो येथील शाळेची इमारत

शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसोबत अस्मादीक.

२००४ मध्ये एका स्थानीक ट्रायबलला एक विशाल झाड तोडत असतांना त्या झाडाच्या पलिकडे एक विशाल शिवलीगाच्या आकाराचा खडक दिसला तेथेच बाजुला गणपतीची आक्रुती असलेला एक लहान खडक आढळला. लगेचे ही बातमी वार्‍यासारखी सर्वदुर पोचली. मला देखील तेथे जाउन फोटो काढण्याची इच्छा होती. मी शाळेच्या मुख्याध्यापकासोबत मोटारसायकल्ने त्या दुर्गम भागाला भेट दिली व तेथील फोटो घेतले. अरुणाचलच्या बहुतेक वरिष्ठ अधिकायांनी येथे भेट दिली असुन येथे नित्य पुजा होत असते. हा भाग विकसीत करुन येथे एक विशाल शिवमंदिर बांधावयाचा मानस असुन त्या संबधात स्थानीक बाहेरच्या धनिकांनी देणग्या देण्यास सुरुवात ही केली आहे. २ वर्षात येथे विशाल मंदिर होईल यात शंका नाही. मंदिरापर्यंत जाण्यासाठी सिमेंटच्या पायर्या करुन हा प्रवास सोपा केल्या गेला आहे.

विशाल शिवलींग व परिसर



गणपतीचा आकार असलेला खडक


शिवलींगाकडे जाणारी वाट

समाजअनुभव

प्रतिक्रिया

शाहिर's picture

20 Aug 2011 - 11:58 am | शाहिर

विशेष असे काहीच वाटले नाही ..
प्रयत्न कारीत रहा !!

( मत परखड वाटल्यास ..वाटु दे ..अम्ही खर्र तेच बोलणार)

मदनबाण's picture

20 Aug 2011 - 12:07 pm | मदनबाण

छान माहिती आणि फोटु...
उगाच नाही चीन या भूभागावर डोळे लावुन बसलाय ते ! :(
कारगिल सारखी परिस्थीती निर्माण झाली आहे म्हणे तिथे !!!
(संदर्भ :--- http://www.indianexpress.com/news/arunachal-minister-cautions-against-ka... )
चीन-हिंदुस्थान युद्ध होईल तेव्हा... चीनचा पहिला घास अरुणाचल प्रदेश आणि आसाम असेल असं वाटतय... :(

जाई.'s picture

20 Aug 2011 - 12:16 pm | जाई.

उत्तम माहिती आणि फोटो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Aug 2011 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो आणि माहिती छान.

-दिलीप बिरुटे

तिमा's picture

20 Aug 2011 - 5:01 pm | तिमा

फोटो व माहिती आवडली.

इशान्य भारतातील कुठल्याही एका राज्यातुन दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी आसाम मधुन जावेच लागते.

हे नव्यानेच कळले.