अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक

चेतन सुभाष गुगळे's picture
चेतन सुभाष गुगळे in जनातलं, मनातलं
17 Aug 2011 - 10:49 am

नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट हे पुस्तक वाचलं. पाऊलो कोएलो यांच्या पुस्तकाचं जगभरात प्रचंड कौतुक झालेलं असून त्याच्या अनेक भाषांत कोट्यावधी प्रती विकल्या गेल्या आहेत (अशी माहिती सदर पुस्तकाच्या शेवटच्या पृष्ठावर होती).

याचं अजिबात आश्चर्य नाही की अशी पुस्तकं लिहीली जातात. याचं देखील आश्चर्य नाही की अशी पुस्तकं छापली जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक अशी पुस्तकं पैसे (आणि त्याहून ही मुल्यवान असा वेळ) खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर अनेक ठिकाणी छापून आलेल्या या कादंबरीच्या अवास्तव कौतुकाला बळी पडूनच मी या कादंबरीच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला.

आता प्रश्न असा उरतो की हे जे कुणी या कादंबरीच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून इतरांनाही हे पुस्तक वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? (निदान माझ्यासाठी तरी हा नक्कीच अनुत्तरीत प्रश्न आहे)

या पुस्तकातून बरंच काही शिकायला मिळतं असा प्रशंसकांचा सूर आहे. मला तरी संपूर्ण पुस्तक वाचल्यावर "असलं पुस्तक वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही शिकायला मिळालं नाही.

पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी मराठीत एक म्हण आहे. माझ्या वाया गेलेल्या वेळेवरून इतरांनी बोध घ्यावा व आपला बहुमूल्य वेळ वाचवावा अशी त्यांना सावधगिरीची सूचना करण्याकरिताच हा लेखन प्रपंच.

वाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

मिहिर's picture

17 Aug 2011 - 10:55 am | मिहिर

मला चांगले वाटले. अर्थात पंखा वगैरे नाही झालो, पण वेळ वाया गेल्यासारखे मुळीच वाटले नाही.

sagarparadkar's picture

17 Aug 2011 - 3:11 pm | sagarparadkar

मला पण पुस्तक बरं वाटलं ... अगदी वेडावून जाण्यासारखं नव्हतं हे खरंच .... पण एकूणात छान आहे.

पण माझ्या अनेक परिचितांच्या प्रतिक्रियाही तुमच्यासारख्याच आहेत. त्यांना, खासकरून सॅन्तिआगो ज्या पडक्या चर्चमधून सुरवातीला बाहेर पडलेला असतो नेमका तिथेच परत येवून त्या चर्चच्या 'अल्टर' खाली त्याला मोठा खजिना सापडतो, ही कल्पना काही तितकीशी स्वीकारार्ह वाटली नाही ... त्यामुळे त्यांची खूपच चिडचिड झाली होती. 'तुझे असून तुजपाशी, परि तू जागा चुकलाशी' ह्या मराठी संतवचनाशी साधर्म्य आल्यामुळे (तेसुद्धा एका आंतर्राष्ट्रीय लेखकाच्या लेखनात) त्यांची फारच निराशा झाली होती ... कारण त्यांच्यामते मराठीत काहीच 'आंतर्राष्ट्रीय' वगैरे नसावे ....

अर्थात त्यातील एका वाक्याने अनेकांचा आशावाद जागा राहतो, ते म्हणजे If you really want something, the entire universe conspires to give it to you .... पण प्रत्यक्षात तसं काही अनुभवास येत नाही :) त्यामुळे मग जास्तच राग येतो

मराठी_माणूस's picture

17 Aug 2011 - 10:56 am | मराठी_माणूस

असलं पुस्तक वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये"

असल म्हणजे कसल ? तुम्हाला असे का वाटते, ह्या पुस्तकातील तुम्हाला काय आवडले नाही ?

कसलीही समीक्षा न करता नुसतेच हे पुस्तक वाचु नका म्हणणे योग्य नव्हे

शैलेन्द्र's picture

17 Aug 2011 - 11:02 am | शैलेन्द्र

असहमत..

विजुभाऊ's picture

17 Aug 2011 - 11:15 am | विजुभाऊ

अल्केमिस्ट हे मला तर बॉ बरे वाटले.
त्या लेखकाची पुस्तके ही थोडा वेगळा विचार देणारी असतात.

जाई.'s picture

17 Aug 2011 - 11:21 am | जाई.

मलाही पुस्तक आवडल

एकदा वाचण्यासारख आहे

सोत्रि's picture

17 Aug 2011 - 11:22 am | सोत्रि

@चेतन सुभाष गुगळे,

या कादंबरीच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून इतरांनाही हे पुस्तक वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे

हा तुमचा एकच मुद्दा मान्य.
मलाही हे पुस्तक वाचल्यावर हाच प्रश्न पडला होता. पण आपले मराठी साहित्य किती प्रगल्भ आहे ह्याची ती एक पोच होती ;)

"असलं पुस्तक वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये"

पण हे जरा भडक विधान आहे. त्या पुस्तकातली कथा चांगली आहे. पुस्तक वाचुन वेळ वाया अजिबात जाणार नाही.
फक्त ह्या पुस्तकबद्दल एवढा जो फुगा/बुडबुडा केला गेला आहे, त्याअपेक्षेने पुस्तक जर वाचले तर अपेक्षाभंग पदरी पडु शकतो.

कसलीही समीक्षा न करता नुसतेच हे पुस्तक वाचु नका म्हणणे योग्य नव्हे

100% सहमत. पुस्तकाबद्दल जरा अजुन थोडे लिहीले असते तर लेख आणखी वजनदार झाला असता.

- (अल्केमिस्ट) सोकाजी

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Aug 2011 - 11:37 am | चेतन सुभाष गुगळे

तुम्हाला मुद्दा मान्य आहे हे वाचून बरे वाटले.

<< त्या पुस्तकातली कथा चांगली आहे. >>

ती कथा दोन पानांतही आटोपता येईल. त्याकरिता इतका फापटपसारा कशाला? यापेक्षा उत्तम परीकथा अरेबियन नाईट्स मध्ये आहेत. इतक्या वेळेत तिथल्या शंभर कथा वाचून होतील.

<< कसलीही समीक्षा न करता नुसतेच हे पुस्तक वाचु नका म्हणणे योग्य नव्हे >>

भंपक या एका शब्दातच सर्व पुस्तकाची समीक्षा केली आहे. अजून वेगळे काय लिहायचे?

सोत्रि's picture

17 Aug 2011 - 12:57 pm | सोत्रि

प्रकाटाआ

- (अनुल्लेखाने मारणारा) सोकाजी

Nile's picture

26 Aug 2011 - 5:31 am | Nile

अतीक्षय गाजलेला भंपक धागा* असे रुपांतर झालेले दिसते. चालूद्या. **

(उल्लेखाने मारणारा) निळोजी

*सूचना:मंद लोकांनी जास्ती स्पष्टीकरण मागू नये, दिले जाणार नाही. खूलासा संपला.
**सदर प्रतिसाद धाग्याला आहे, उपप्रतिसाद नाही याची नोंद, आतापावेतो कळलं नसल्यास, घेणे.

चेतन सुभाष गुगळे's picture

26 Aug 2011 - 8:19 am | चेतन सुभाष गुगळे

<<अतीक्षय गाजलेला भंपक धागा* असे रुपांतर झालेले दिसते.>>

आपल्याला असे वाटणे शक्य आहे. असे रूपांतर झालेले दिसते म्हणजे मूळात तो धागा असा नव्हता असा अर्थ त्यातून निघतो.

<< सदर प्रतिसाद धाग्याला आहे, उपप्रतिसाद नाही याची नोंद, आतापावेतो कळलं नसल्यास, घेणे. >>

मूळात तो धागा असा नसेल तर तो कुणाच्या तरी प्रतिसाद - उपप्रतिसाद यामूळेच असा झाला (गाजला) असणार ना? तेव्हा सदर धाग्याला असा प्रतिसाद देऊन काही उपयोग नाही.

*मंद लोकांकडे कोणी जास्ती स्पष्टीकरण कशाला मागेल. ते देऊ शकणार का? तेवढी त्यांची कुवत तरी कुठून असणार?

परिकथेतील राजकुमार's picture

17 Aug 2011 - 12:28 pm | परिकथेतील राजकुमार

सोत्रेंशी थोडाफार सहमत आहे.

या पुस्तकातून बरंच काही शिकायला मिळतं असा प्रशंसकांचा सूर आहे. मला तरी संपूर्ण पुस्तक वाचल्यावर "असलं पुस्तक वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही शिकायला मिळालं नाही.

एखाद्या पुस्तकाचे अथवा चित्रपटाचे रसग्रहण, परिक्षण टाकताना आपल्याला काय आवडले आणि काय आवडले नाही हे लोकांसमोर आणणे जास्ती महत्वाचे असते. नुसते वाचा - बघा / वाचू नका - बघू नका अशी विधाने करणे अयोग्य वाटते.

प्रत्येकाची आवड आणि आवाका वेगवेगळा असल्याने कोणाला काय आवडावे हे आपण ठरवू नये. आपण आपले प्रामाणिक मत मांडून निर्णय वाचकांवर सोडावा.

नुकतेच मिपावर देल्ही-बेली च्या संदर्भात काही धागे आले होते. त्या सर्वच धाग्यात परस्पराविरोधी सूर उमटले होते, मात्र हा बघा किंवा बघू नका असे सल्ले कोणीच कोणाला देत नव्हते हे जास्ती महत्वाचे.

अर्थात सदर पुस्तकाच्या लेखकाला अनावृत्त पत्र लिहायला तुम्ही मोकळे आहातच.

पराशेठशी सहमत !!!

प्रत्येकाची आवड आणि आवाका वेगवेगळा असल्याने कोणाला काय आवडावे हे आपण ठरवू नये. आपण आपले प्रामाणिक मत मांडून निर्णय वाचकांवर सोडावा.

अगदी अगदी.
आम्ही पसायदान जितक्या आत्मियतेने ऐकतो तेव्हढयाच चवीन अल्ताफ राजाची गाणी सुद्धा ऐकतो. शेवटी काय तर प्रत्येकाची आवड आणि आवाका वेगवेगळा असतो :)

Nile's picture

17 Aug 2011 - 10:52 pm | Nile

हाफिसात बसून कामं कराल तर देशाचं काहीतरी भलं होईल!!! पुस्तकं वाचताहेत लेकाचे.. ;-)

आम्हाला हाफीसात जाण्याचेच पैसे मिळतात. हाफीसात केलेल्या कामाचेच पैसे मिळू लागले तर बाईकचं पेट्रोलही परवडणार नाही ;)

आणि देशाचं भलं करण्याचा ठेका तिकडे क्रांती हवी असणार्‍यांनी घेतलाच आहे. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा आणि लोकांना शांतपणे पुस्तके वाचू दया. लोकांनी पुस्तके वाचली तरच त्यावर ती पुस्तके भंपक आहेत की नाही यावर साधकबाधक चर्चा होईल आणि या चर्चेतूनच विचारमंथन होऊन देश प्रगतीपथावर जाईल.

स्वैर परी's picture

18 Aug 2011 - 8:05 pm | स्वैर परी

आम्हाला हाफीसात जाण्याचेच पैसे मिळतात. हाफीसात केलेल्या कामाचेच पैसे मिळू लागले तर बाईकचं पेट्रोलही परवडणार नाही

अगदी अगदी!

बाकि, हे पुस्तक बघुनच वाचावस वाटत नाहि.. काय माहित का ते! :|
काहितरी भयंकर फिलॉसॉफिकल लिहिले असावे अशी शंका येते!

बाकि, हे पुस्तक बघुनच वाचावस वाटत नाहि.. काय माहित का ते!
काहितरी भयंकर फिलॉसॉफिकल लिहिले असावे अशी शंका येते!

पुस्तक थोडं फार फिलॉसॉफीकल आहे. नाही असं नाही. निदान पुस्तकातून मिळणारा संदेशतरी फिलॉसॉफीकल आहे. काहीसा "तुझे आहे तुजपाशी, परी तू दुनिया फिरतोशी" असा.

पण पुस्तक इतकंही चांगलं नाही जितका त्याचा उदो उदो केला गेला आणि ईतकंही वाईट नाही की कुणी त्याला "भंपक" म्हणावं.

असो. अंदाज अपना अपना. :)

आत्मशून्य's picture

21 Aug 2011 - 2:20 pm | आत्मशून्य

नेवर गिव्हप संदेश देणारे आहे असं वाटलं होतं.

या कादंबरीच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून इतरांनाही हे पुस्तक वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे

- सहमत

कसलीही समीक्षा न करता नुसतेच हे पुस्तक वाचु नका म्हणणे योग्य नव्हे

- डब्बल सहमत!!!!

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2011 - 11:25 am | नगरीनिरंजन

तुमचा लेख वाचला. ते पुस्तक वाचले आहे.
टुकार आहे हे माहिती असूनही मिळेल ते वाचायची सवय असल्यावर काय करणार?
असो. ह.घ्या. आणि सोडून द्या. आपल्याला जे टुकार वाटेल ते दुसर्‍याला वाटेलच असे नाही.

विजुभाऊ's picture

17 Aug 2011 - 11:47 am | विजुभाऊ

ती कथा दोन पानांतही आटोपता येईल
जगातील प्रत्येक कथेचे असेच असते.
महाभारतालादेखील वन लायनर असतेच
एकश्लोकी रामायण उपलब्ध आहे.

तिमा's picture

17 Aug 2011 - 7:18 pm | तिमा

मला ते पुस्तक आवडले असे म्हणता नाही आले, तरी वेळ वाया गेला असे वाटले नाही.
अवांतर : महाभारताचा वन लायनर काय आहे ते वाचण्याची उत्सुकता आहे.
मी ऐकलेला : महाभारत ही एक अक्करमाशांची कहाणी आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Aug 2011 - 8:40 am | ज्ञानोबाचे पैजार

आदौ पाण्डववधार्तराष्ट्रजननं लाक्षागृहे दाहनं
द्यूते श्रीहरणं वने विहरणं मत्स्यालये वर्धनम् ।
लीलागोग्रहणं रणे वितरणं सन्धिक्रियाजृम्भणं
भीष्मद्रोणसुयोधनादिमथनं एतन्महाभारतम् ॥

एक श्लोकी रामायण
आदौ रामतपोवनाभिगमनं हत्व मृगं काञ्चनं
वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् ।
वालीनिग्रहणं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं
पश्चाद्रावणकुम्भकर्णहननं एतद्धि रामायणम्

एक श्लोकी भागवत

आदौ देवकिदेविगर्भजननं गोपीगृहे वर्धनं
मायापूतनिजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणम् ।
कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीजसत्पालनं
श्रीमद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम् ॥

अरे वा...

आम्ही शाळेत असताना गावात कुणाकडे पूजा (ती सत्यनारायणाचीच असणार) असली की जेवणाच्या पंक्ती उठायच्या. त्यावेळी मग श्लोक म्हणण्याची चढाओढ लागायची. आणि हे तिन्ही श्लोक आम्ही न चुकता म्हनत असू.

आता गावी यातलं काहीच होत नाही. कालाय तस्मै नमः :(

वपाडाव's picture

22 Aug 2011 - 10:10 am | वपाडाव

आता गावी यातलं काहीच होत नाही. कालाय तस्मै नमः

अम्रिकेत न जाता गावात हेच केले असते तर आत्म्याला थोडी का होइना शांती लाभली असती....
बाकी कुणी काय करावे हे ज्याचे त्याचे मत, मी आपले न्रिक्षण नोंद्विले....

मराठी_माणूस's picture

17 Aug 2011 - 12:10 pm | मराठी_माणूस

ती फुलराणी , हे एक गाजलेले भंपक नाटक आहे . ह्या नाटकाचे सार खालील ४ ओळीत.

एक प्राध्यापक आपल्या मित्राशी , एका अडाणी फुल विकणार्‍या मुली संबधात खालील पैज मारतो
"मि ह्या मुलिला सर्व रीतीरीवाज शीकवुन एका उच्चभ्रु लोकांच्या मेजवानीत नेईन आणि कोणाला कसलाही संशय येणार नाही"
आणि तो ती पैज जिंकतो.

(अवांतर : मुळ इंग्लीश नाटक मराठीत आणण्याचा उपद्व्याप पुलंनी का केला ते समजत नाही)

एवढे एकच ओळी मधे सार असताना एवढया ( भंपक) कथा का लिहिल्या गेल्या ??

शाहिर's picture

17 Aug 2011 - 12:10 pm | शाहिर

का ??
हे समिक्षा करताना सांगायला हवे ..
उगीच मल वाटले भंपक म्हणून भंपक असे नको ...

नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट हा धागा वाचला .चेतन सुभाष गुगळे यांच्या धाब्याची मिसल पाव मधे प्रचंड कौतुक झालेलं असून त्याच्या २२७ वाचने झालि आहेत (अशी माहिती सदर धाग्याच्या शेवटी होती).

याचं अजिबात आश्चर्य नाही की अशे धागे काढले जातात. याचं देखील आश्चर्य नाही की अशे धागे वाचले जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक अशे धागे मुल्यवान असा वेळ खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर जिलेबी घातलेल्या या धाग्याच्या मि पा वरील स्थानाला बळी पडूनच मी या धाग्याच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला.

अवांतर : अल्केमिस्ट वाचु नका .. वेळ वाया जातो असा एका ओळी मध्ये का नाही ओ लिहिला तुम्ही

सोत्रि's picture

17 Aug 2011 - 12:55 pm | सोत्रि

अवांतर : अल्केमिस्ट वाचु नका .. वेळ वाया जातो असा एका ओळी मध्ये का नाही ओ लिहिला तुम्ही

_/\_

- (एका ओळीत आणि एकाच चिन्हाने प्रतिसाद दिलेला) सोकाजी

स्पा's picture

17 Aug 2011 - 12:26 pm | स्पा

श्रीयुत गुगळे
स्वत कधी मिसळपाव वर दिसत नाहीत
कधी आलेच तर कुंथून कुंथून जिलब्या टाकायला.. बाकी नाहीच

त्यांनी कधी दुसर्यांच्या धाग्यावर प्रतिक्रिया दिलेल्या मला आठवत नाहीत
स्वतःचा धागा खाली जाऊ नये म्हणून प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देण्याची आणि वाद घालण्याची हातोटी वाखाणण्याजोगीच :)

सलाम गुगळे साहेब
पु जी शु

स्मिता.'s picture

17 Aug 2011 - 1:07 pm | स्मिता.

अल्केमिस्ट या पुस्तकातली कथा मला तरी आवडली... मध्येच जरा रटाळ झाली असली तरी रंजक आहे.
पण ते पुस्तक वाचून पैसे आणि वेळ वाया गेलेत असे अजिबात वाटले नाही.

कदाचित ते पुस्तक मित्राचं होतं आणि माझ्याजवळ खूपच वेळ मोकळा होता त्यामुळे ही जाणीव झाली नसावी.

रमताराम's picture

17 Aug 2011 - 1:56 pm | रमताराम

पुस्तक भंपक आहे याबाबत सहमत. इतरांनी वाचावे की वाचू नये हा अनाहुत सल्ला मात्र देणार नाही. ज्याचा त्याचा प्रश्न!

Nile's picture

17 Aug 2011 - 10:42 pm | Nile

आजोबांशी सहमत आहे.

भंपक म्हणता आहात पण का ते हि लिहा ना.
तुम्हाला भंपक वाटले म्हणुन प्रत्येकालाच तसे वाटेल असे नाही. जर तुम्ही इथे त्या पुस्तकाची समिक्षा / परिक्षण लिहिले असते तर तुमच्या मताचे कदाचित स्वागत झाले असते. पण तसे न केल्याने तुमच्या ह्या धाग्याला भंपक म्हणावे असे वाटत आहे.

गणेशा's picture

17 Aug 2011 - 4:07 pm | गणेशा

प्र.का.टा.आ.

उदय के&#039;सागर's picture

17 Aug 2011 - 5:42 pm | उदय के'सागर

प्र का टा आ म्हणजे काय?

प्रतिसाद काढून टाकला आहे (कधी संपादकांनी तर कधी प्रतिसाद देणार्‍यानेच :) )

उदय के&#039;सागर's picture

18 Aug 2011 - 11:12 am | उदय के'सागर

धन्यवाद, धनाजीराव वाकडे ! :)

प्रतिसाद काढून टाकला आहे (कधी संपादकांनी तर कधी प्रतिसाद देणार्‍यानेच Smile )
संपादक पूर्ण प्रतिसादच उडवतात. ते त्यानंतर प्र का टा आ असा खुलासाअ देत बसत नाहीत

संपादक फक्त प्रतिसाद लाल करतात .. कानाखाली लाल करणे या धर्तीवर वाचावे: ;-)

धमाल मुलगा's picture

17 Aug 2011 - 2:56 pm | धमाल मुलगा

लोक एव्हढे वेळ, इंटरनेटचं बील खर्च करुन भंपक धागे वाचतातच की. त्यात एखाद्या पुस्तकाची भर!
हाय काय नाय काय?

-(अल्केमिस्ट आणि भंपक धागे न वाचलेला) ध.

ह्येच म्हणतो.

(अल्केमिस्ट न वाचलेला पण भंपक धागे वाचलेला) प्र.

रमताराम's picture

18 Aug 2011 - 8:57 pm | रमताराम

ध नि प्र शी शमत हाय.

(भंपक अल्केमिस्ट नि भंपक धागे दोन्ही वाचलेला) र.

मेघवेडा's picture

22 Aug 2011 - 2:17 pm | मेघवेडा

(धागा न वाचता वरचे तीन-चार भंपक प्रतिसाद वाचलेला) ढ

विशाखा राऊत's picture

17 Aug 2011 - 4:37 pm | विशाखा राऊत

मी वाचले आहे आणि मला आवडले आहे.
इतके भडक विधान करायची गरज नाही..

अनुरोध's picture

17 Aug 2011 - 4:39 pm | अनुरोध

.
.
.

राजेश घासकडवी's picture

17 Aug 2011 - 4:59 pm | राजेश घासकडवी

माझ्या मते एखाद्या पुस्तकाला भंपक म्हणायला काहीच हरकत नाही. वाचू नका, वेळ फुकट जाईल असंही सांगायला हरकत नाही. माझा वेळ फुकट गेला तेव्हा तुमचाही जाईल, हे सांगणं पुस्तकाच्या भंपकपणाविषयीच सांगणं असतं. 'हा चित्रपट पाहायलाच हवा' असं सांगून लोकांना चित्रपट पहायला उद्युक्त करणं आणि 'भंपक' म्हणून एखादं पुस्तक वाचण्यापासून परावृत्त करणं हे समीक्षेत यायला हवं.

पण मुळात समीक्षा यायला हवी. नाहीतर ती केवळ मताची पिंक यापलिकडे काही रहात नाही. चेतन यांनी कथानकाची थोडीशी झलक दाखवून त्यातली अ-सौंदर्यस्थळं दाखवून दिली असती तर त्यांचं मत अधिक गंभीरपणे घेतलं जाईल.

Nile's picture

17 Aug 2011 - 10:45 pm | Nile

त्यात एखाद्याने किलो दोन किलोची समीक्षा लिहलीच तर ती भंपक आहे असे म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाही असे आमचे मत आहे. ;-)

रमताराम's picture

18 Aug 2011 - 9:01 pm | रमताराम

नायल्याशी सहमत आहे. (बघ रे बाबा, तुझ्या सहमतीची परतफेड केली आहे.)

(नुकतीच जीएंच्या कथांची भंपक समीक्षा वाचून समीक्षकाला कुठे टांगावे या विचारात पडलेला) रमताराम

"कहते है अगर किसी चीज को दिलसे चाहो तो पूरी कायना उसे सच करन मे जूट जाती है.. अथवा इतनी शिद्दत से मैने तूम्हे पानेकी कोशीश की है के हर जर्रे ने मूझे तूमसे मिलानेकी साजीश की है" वगैरे जसेच्या तसे उचलून ओम शांति ओम नावाचा रद्दड पण ब्लॉकबस्टर शिणूमा निघू र्‍हायला.. आनं लोकंबी त्ये पूस्तक कसं भंपकच हाये याव्हर जिलब्या बी पाडू र्‍हायले....:(

चेतन साहेब आपल्या लिखाणाबद्दल मला पराकोटीचा आदर होता, पण आज आपणं कोणतीही कारणी मिमांसा न देता जे बोलले आहे त्यामूळे दोन गोश्टीच मनात येतात.

१) त्याच लेखकाचं ब्रिडा हे पूस्तक इंग्रजीतून वाचून काढा.
२) टीका करताना आपल्या लेखनाचा बाज "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" असा होणार नाही याची काळजी घ्या.

मालोजीराव's picture

17 Aug 2011 - 6:04 pm | मालोजीराव

पुस्तकाचं मुखपृष्ठ आवडलं,पाब्लो पिकासो च्या मॉडर्न आर्ट ची झलक दिसल्यासारखी झाली !
का वाचावं हा प्रश्न पडल्याने वाचू शकलो नाही !

- मालोजीराव

मी परवाच पाहीलं हे पुस्तक आणि ते विकत घ्यायचा मोह झाला. पण वरवर चाळता, "फिक्शन" प्रकारात मोडत असल्यासारखे वाटल्याने घेतले नाही.

'अ‍ॅल्केमिस्ट' चांगलं आहे...गोष्ट तरी रंजक आहे .पण पाऊलो कोहेलोचंच 'झहीर' मात्र अतिशय पीळ आहे....कझाकस्तान आणि मंगोलियाच्या गवताळ टेकड्यांसारखंच न संपणारं!

अनिवासि's picture

17 Aug 2011 - 6:40 pm | अनिवासि

पु ल नी हा उपद्व्याप का केला?

अरसिकेषु कवित्व निवेदनम--------------

बिचारे पु ल!

अविनाशकुलकर्णी's picture

17 Aug 2011 - 7:05 pm | अविनाशकुलकर्णी

कायना नाहि कायनात...
चुभुदेघे

पल्लवी's picture

17 Aug 2011 - 7:35 pm | पल्लवी

बर्..बर !

मलाही आवडले नव्हते.

परंतु ते लोकांना का आवडते, आणि मला का आवडत नाही, याबाबत विश्लेषण करणे म्हणजे (माझ्याकरिता) निव्वळ निरुपयोगी नव्हे. परंतु असे विश्लेषण करून सांगोपांग लिहायला माझ्यापाशी सध्या वेळ नाही.

थोडक्यात मला त्या पुस्तकातील "व्यक्तीचे उपजत उज्ज्वल दैव विरुद्ध समाज" या वादात घेतलेली भूमिका पटलेली नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार मी करतो तो करतोच, पण या पुस्तकात व्यक्तीमाहात्म्याच्या स्तोमाकरिता समाजाबाबत जी एका प्रकारची तुच्छता दाखवली आहे, ती मला योग्य वाटत नाही.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे बायबलमधली रूपके मला पुष्कळदा कंटाळवाणी वाटतात. (नेहमीच नाही. काही वेळा समर्थही असू शकतात.) लहानपणापासून बायबल वाचत आलेल्या लोकांना त्या रूपकांतून अधिक काही मिळत असेल, हे खरे. पण मला (या पुस्तकात वापरलेली तरी) बायबलमधली रूपके उथळ वाटतात.

क्षमस्व. अधिक सखोल लिहायला वेळ नाही.

- - -

चर्चाप्रस्तावकाने "भंपक" ही एका शब्दात केलेली समीक्षा अपुरी वाटते. एक तर मला "भंपक" शब्दाचा अर्थ नीट कळत नाही. "दिखाऊ आणि ढोंगी" असा काहीसा अर्थ आहे काय?

हे पुस्तक निरर्थक पण झगमगीत मजकूर असल्यामुळे "दिखाऊ" असेल, तर चर्चाप्रस्तावकाने अधिक सांगावे. या पुस्तकात एका प्रकारची नैतिकता मोठ्याने सांगितली असली, तरी खरे वागणे उलट असल्याचे "ढोंग" दिसत असल्यास, तेसुद्धा अधिक विवरण करून सांगावे.

फक्त एका शब्दाच्या समीक्षेने चर्चाप्रस्ताव चालवणे मला(ही) पटत नाही.

मला ते साईन्स् ऑफ युनिव्हर्स वाचून वाचून इतका कंटाळा आला की साईन्स् ऑफ लास्ट पेज केव्हा येतं असं झालं होतं. त्यानंतर कोहलोच जहीर हे पुस्तक आम्ही नावडत्या लोकांना गिफ्ट म्हणून देत असू. ;-)

रमताराम's picture

18 Aug 2011 - 9:06 pm | रमताराम

त्यानंतर कोहलोच जहीर हे पुस्तक आम्ही नावडत्या लोकांना गिफ्ट म्हणून देत असू.
असाच प्रयोग आमच्या एका मित्राने आमच्यावर करण्याचे योजले होते, तो डाव आम्ही उधळून लावला. बिचार्‍याने मारे भरपूर पैसे खर्च करून 'शांताराम' आणले (घरी आणण्यासाठी हमाल बरोबर घेतला होता का हा तपशील विसरलो आहे) नि पहिल्या काही पानात वैतागला. आता पैसे घालवलेच आहेत तर निदान भेट दिल्याचे पुण्य पदरी पडावे म्हणून आम्हाला देऊ पहात होता. आमच्याकडे हमाली देण्यास पैसे नसल्याने आम्ही अर्थातच नकार दिला हेवे.सां.न.ल.
(हा मित्र मिपाकरच आहे नि लवकरच आमची साग्रसंगीत उत्तरपूजा बांधणार आहे हे कोणत्याही कुंडली, नाडीपट्टी वा पाश्चात्त्य भविष्यशास्त्राविना आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो.)

सिद्धार्थ ४'s picture

23 Aug 2011 - 1:04 am | सिद्धार्थ ४

काय 'शांताराम' आवडले नाही?

असो ज्याची त्याची आवड... :)

रमताराम's picture

18 Aug 2011 - 9:18 pm | रमताराम

थोडक्यात मला त्या पुस्तकातील "व्यक्तीचे उपजत उज्ज्वल दैव विरुद्ध समाज" या वादात घेतलेली भूमिका पटलेली नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार मी करतो तो करतोच, पण या पुस्तकात व्यक्तीमाहात्म्याच्या स्तोमाकरिता समाजाबाबत जी एका प्रकारची तुच्छता दाखवली आहे, ती मला योग्य वाटत नाही.

+१००. अगदी आमच्या मनातलं बोललात मालक. याहुन अधिक म्हणजे इतका पराकोटीचा दैववाद 'मोटिवेटिंग' वगैरे म्हणणे मला तरी पचले नाही. आकाशातल्या बापावर भिस्त ठेवून जगणार्‍यांना तो तसा वाटणं कदाचित शक्य आहे.

हे विशेषण प्रथम बहुधा टाईम्सच्या परीक्षणात वापरले गेले असावे नि मग सारे टाईम्स संस्कृतीचे लोक (टाईम्सची टॉप १० पुस्तके/सीडी अल्बम वाचून/ऐकून किंवा तसे भासवण्यासाठी बरोबर घेऊन हिंडणारे नि त्या त्या परीक्षणापलिकडे काही फारसे बोलू न शकणारे, किंवा एकमेकाशी 'दोनच' शब्द बोलून आपणसुद्धा वाचले/ऐकले आहे बरं का असे भासवणारे) त्याची री ओढू लागले असावेत असा आमचा एक अंदाज आहे.

पुस्तक भंपक आहे हे मान्य पण ते तसं का याचि कारणमिमांसा जरुरीची होती, किमान सखाराम गटणे स्टाईल ' पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, अनुवादकाचे नाव, किति पाने आहेत, कथावस्तु कशी आहे, विषय कसा आहे, असे प्रश्न आणि त्याची उत्तरे तरी हवी होती,

असो, पण एका बाबतीत सहमत, हे पुस्तक वाचुन लोकांची जिवनं वैग्रे बदलत असतील तर त्या लोकांच्या जिवनाला हे पुस्तक वाचण्याआधी काही विशेष अर्थ नसावा आणि नंतर सुद्धा काही आला नसावा असं वाटतं, जिवनावर किंवा जगण्याच्या पद्धतीवर खोलवर परिणाम करावं असं हे पुस्तक निश्चितच नाही, असा परिणाम पोरांच्या प्रगतिपुस्तक किंवा बँकेच्या खातेपुस्तकाने निश्चित होउ शकतो, पण हल्ली दोन्ही मिळत नाहीत, आता रिपोर्ट कार्ड असतं आणि अकाउंट स्टेटमेंट असतं. जाउ दे.

यकु's picture

18 Aug 2011 - 6:08 am | यकु

असो, पण एका बाबतीत सहमत, हे पुस्तक वाचुन लोकांची जिवनं वैग्रे बदलत असतील तर त्या लोकांच्या जिवनाला हे पुस्तक वाचण्याआधी काही विशेष अर्थ नसावा आणि नंतर सुद्धा काही आला नसावा असं वाटतं,

ख्या: ख्या: ख्या:.. ही: हा: हा: हा: !!!!

अल्केमिस्ट वाचले नाही, वाचणार नाही.

@ चेतन गुगळे
पुस्तक घेण्यापूर्वी / वाचण्यापूर्वी त्याच्या मलपृष्टावर पाच मिनिटे खर्च केल्यास असा त्रास टळेल.

नगरीनिरंजन's picture

18 Aug 2011 - 6:14 am | नगरीनिरंजन

लै भारी!

विजुभाऊ's picture

18 Aug 2011 - 8:05 am | विजुभाऊ

यापेक्षाही एक अतीशय भंपक पुस्तक आहे " साधनामस्त" .
मात्र हे पुस्तक जरूर वाचा असेच म्हणेन.
"बाकी शून्य" या पुस्तकाचे नाव त्या पुस्तकास अतीशय साजेसे आहे

सामान्य वाचक's picture

23 Aug 2011 - 6:03 pm | सामान्य वाचक

पण काही पुस्तकांना लोकांमधे नावे ठेवायची सोय नसते हो.

शाहिर's picture

18 Aug 2011 - 10:44 am | शाहिर

हे गुगळे पन आत्म संतुष्ट प्रकारा मधील आहेत ...लेख लिहिला ना मि ..झाला तर ..त्यवर चर्चा नको ...लोकांनी मारलि तर ??

शुद्ध पळ्पुटेपणा आहे हा

स्पावड्याने बरोबर ओळखाला होता

चेतन सुभाष गुगळे's picture

20 Aug 2011 - 11:14 am | चेतन सुभाष गुगळे

अल्केमिस्ट पुस्तकाला भंपक असं विशेषण मी वापरल्याचं काहींना पटलेलं नाहीय. काही वाचकांनी हे पुस्तक वाचलंय आणि त्यांना ते आवडलंय. इतर काहींनी ते वाचलेलं नाहीय, तर काहींनी ते वाचलंय आणि त्यांना ते आवडलेलं नाहीय.

अर्थात बहुतेक प्रतिसाद कर्त्यांचे मत असे आहे की पुस्तकाची भंपक या एका शब्दात समीक्षा करण्यापेक्षा "ते भंपक का आहे" याविषयी मी अधिक विवेचन करावं. त्याशिवाय काहींनी भंपक या शब्दातून मला नेमकं काय अभिप्रेत आहे अशीही विचारणा केलीय. तेव्हा या सर्व प्रतिसादकर्त्यांच्या समाधानाकरिता हे तपशीलवार स्पष्टीकरण.

भंपक हा शब्द मी सहावीत असताना वाचला तो "भंपकराव बाताडे" या पुस्तकात. यातलं भंपकराव हे पात्र मोठमोठ्या गप्पा मारतं आणि प्रत्यक्षात कर्तृत्व शून्य. तेव्हापासून भंपक हा शब्द दिखाऊ, फुगून बैलाएवढा होऊ पाहणारा बेडूक अशा अर्थाने मी तरी वापरतो.

अल्केमिस्ट पुस्तकाला हे विशेषण वापरण्याचं कारण म्हणजे या पुस्तकाचं जे काही कौतूक छापून आणलं गेलंय त्यात मुख्यत्वे असा दावा करण्यात आलाय की - "जागतीक पातळीवर गाजलेलं असं हे पुस्तक आहे. वाचणार्‍याला ते नुसतच भावनावश किंवा अंतर्मुख करत नाही तर, त्याचं संपुर्ण जीवनच बदलुन टाकतं." प्रत्यक्षात असं काही जीवन बदलून टाकणं तर सोडाच पण चार घटका मनोरंजन करण्याची साधी अपेक्षाही हे पुस्तक पूर्ण करू शकत नाही.

एखाद्या जीपमध्ये तीनशे किग्रॅ ओझं टाकणं आणि एखाद्या सायकलवर तीनशे किग्रॅ ओझं लादणं यात काही फरक आहे की नाही? निश्चितच आहे. जीप तीनशे किलो ओझ्यासह देखील आरामात ५० / ६० किमी प्रति तास या वेगाने आरामात प्रवास करू शकेल. घाट, वळणे, चढ, उतार, गर्दी अशा कुठल्याही प्रसंगी तिला फारशी अडचण जाणवणार नाही. याउलट सायकलीवर तीनशे किग्रॅ चा बोजा असेल तर चढ आणि घाट तर दूरच राहिले परंतू सपाट रस्त्यावरही सायकलस्वाराची दमछाक होईल आणि उतारावर ब्रेक न लागल्याने सायकल नियंत्रणातच राहणार नाही.

अल्केमिस्टच्या वाचकांची अशीच फरफट होते ती यात मांडलेल्या प्रचंड तत्वज्ञानामुळे. हे अतिप्रचंड तत्वज्ञान ज्या कथेच्या मानगुटीवर चढविण्यात आलंय ती अतिशय तकलादू आहे. तिला हे तत्वज्ञान अजिबात पेलवत नाही.

या पुस्तकातली काही सिद्धांत एकमेकांशी अजिबात जुळत नाहीत. जसे की हे दोन -

"आपल्या आयुष्यात कुठल्यातरी क्षणी असं होतं की सर्व घडामोडींवरचा आपला ताबा सुटतो. आणि आपलं आयुष्य मग दैव नियंत्रीत करतं. हेच ते जगातील सर्वात मोठं असत्य आहे."

"ती अशी शक्ती आहे जी वरकरणी तुम्हाला नकारात्मक वाटु शकते. पण प्रत्यक्षात मात्र ती तुम्हाला तुमचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग दाखवते. त्यासाठी ती तुमच्या अंतरात्म्याला-अंतर्मनाला, तुमच्या इच्छाशक्तीला तयार करते. याचं कारण म्हणजे जगातलं एक फार थोर वैश्वीकसत्य: तुम्ही कुणीही असा किंवा तुम्ही काहीही करत असा, जेव्हा तुम्हाला मनापासुन जे काही करावंसं वाटतं ते तुम्ही करावं अशी इच्छा विश्वाच्याच अंतरात्म्यात उगम पावलेली असते. ते करण्यासाठीच पृथ्वीवर तुमचं अस्तित्व असतं."

तशीच ही दोन -

"आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असते, तेव्हा सगळं जगच तुमच्या मदतीला ती साध्य करण्यासाठी धावुन येतं."

"तुमच्याजवळ जेव्हा सर्वोत्तम खजिना असतो आणि तुम्ही लोकांना तसं सांगायचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. "

काही न पटणारी वाक्यं -

"जेव्हा आपल्याला नशिबाची साथ असते, तेव्हा त्याचा फायदा घेतलाच पाहिजे. एका अर्थानं हा आपण नशिबाला दिलेला प्रतिसादच असतो. यालाच ’अनुकूलतेचा सिद्धांत’ किंवा ’नवख्याचे नशीब’ म्हणतात. "

"प्रत्येक शोध मोहिमेची सुरुवात नवख्याच्या नशिबानंच होते. पण प्रत्येक शोध मोहिम विजेत्याच्या कठीण परिक्षेनंच संपते."

"तुमचं भवितव्य तुम्ही साध्य करावं यासाठी कार्यरत असणारी एक शक्ती अस्तित्वात असते. यशाची चव देऊन ती तुमच्या भुकेमध्ये वाढच करत असते. "

मद्याच्या समर्थनार्थ वापरलेलं हे वाक्य - "माणसाच्या तोंडात जाणारी कुठलीही गोष्ट कधीच वाईट नसते. वाईट असतं त्याच्या तोंडातुन जे बाहेर पडतं ते."

अजून एक अर्थहीन वाक्य - "पाण्याचा प्रवाह खजिन्याला उघडा पाडतो आणि तो प्रवाह त्याला पुरुनसुद्धा टाकतो. "

आता ह्या तली मूळ कथा जर एखाद्या समुहाच्या स्वातंत्र्यलढ्याची किंवा अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या एकजुटीची असती तरी तिला हा तत्वज्ञानाचा डोलारा कदाचित पेलवलाही असता. परंतू ही तर एका व्यक्तिची कथा आहे. स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याची ही कथा लिहीताना लेखकाने नायकाला पडलेले स्वप्न खरे करण्याचा प्रवास दाखविलाय. पडलेले स्वप्न आणि पाहिले गेलेले स्वप्न यात फरक असतो. माणूस स्वप्न पाहतो तेव्हा त्यात काहीतरी भव्य, दिव्य, उदात्त असे असते. तर पडलेल्या स्वप्नांवर आपले नियंत्रण नसते आणि सहसा अशी स्वप्ने असंबद्ध असतात. जीवनाचा आनंद मिळविण्याकरिता अशा स्वप्नांची पूर्तता करण्यात काही च अर्थ नसतो.

सुरूवातीला जेव्हा आपण वाचतो की १६ व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलेला नायक धर्मगुरू व्हायचे नाकारून प्रवासातला आनंद लुटण्याकरिता मेंढपाळ व्हायचे ठरवितो आणि त्याचे वडील त्याला परवानगी व मेंढ्या खरेदी करिता भांडवलही देतात तेव्हा नायक खरंच जीवनातला अलौकिक आनंद मिळविणार अशी शक्यता वाटू लागते. पुढे नायक मेंढ्या विकून सरळ खजिन्याच्या शोधार्थ प्रयत्न करतो तेव्हा प्रयत्नवादी वाचकाची नक्कीच निराशा होते. दैववादी लोकांना कदाचित यात आनंदच वाटत असेल.

शेवटी जरी नायकाला खजिना न मिळता पुन्हा मेंढपाळाचे जीवन जगायला लागून त्यातच खर्‍या आनंदाचा ठेवा सापडतो असे दाखविले असते तरी मनाला समाधान वाटले असते. परंतू लेखकाने असे न करता नायकाला खजिना मिळाल्याचे दाखवून अंधश्रद्धेला खतपाणीच घातले आहे.

सर्व वाक्यांचा अर्थ सरळ धोपटपणे लावणे चुकिचे आहे ...
काही वाक्य रुपक म्हणुन वापरली जातात ..

पाण्याचा प्रवाह खजिन्याला उघडा पाडतो आणि तो प्रवाह त्याला पुरुनसुद्धा टाकतो.

ह्याला एखाद्या लेखकाने भावनांच्या ओघाशी जोडले तर या रुपकाचा अर्थ "भावनांचा उद्रेक किंवा ओघ एखाद्य माणसाचे चांगले गुण झाकुन टाकतो किन्वा तोच ओघ (जिद्द) त्याचे चांगले गुण बाहेर आणतो" ..

"आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असते, तेव्हा सगळं जगच तुमच्या मदतीला ती साध्य करण्यासाठी धावुन येतं."

आता अण्णांचच बघा कि त्यांनि उभारलेल्या छोट्या चळ्वळीला जग धावुन आलेच कि ..

आणि पडलेले स्वप्न खरे कारण्या साठी केलेले प्रयत्न हे कल्पना विलासा चे स्वातंत्र्य मानता येइल ..कथे मधुन बोध घे ण्या सार ख्या अनेक गोष्ट्री आहेत ..

असो !

तुम्ही तुमचा द्रूष्टीकोन सांगितलात .. मिपाकरांना अपेक्षित अस लेली समिक्षा लिहिलित ..धन्यवाद !
तुमच्या स्वतंत्र विचारांचे स्वागत (माझ्या कडुन).... पुढील ले़खनासाठी शुभेच्छा !

माझ्या दोन मित्रांच्या आग्रहाने मी हे पुस्तक वाचले व माझे मतही अगदी गुगळेसाहेबांच्यासारखेच झाले! माझ्या मते अगदीच सुमार पुस्तक आहे. फक्त ओयॅसिसमधील जीवनाचे वर्णन मी प्रथमच वाचले ते मात्र लक्षात राहिले!

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Aug 2011 - 9:26 am | चेतन सुभाष गुगळे

काळेसाहेब,

आपल्यालाही अगदी माझ्यासारखाच अनुभव आला आणि तो आपण इथे शेअर केला याबद्दल आपले आभार. सहसा गाजलेल्या कलाकृतींपासून निराशाजनक अनुभव आला तरी तो कोणी उघडपणे कबूल करीत नाही (जसे की, चढ्या किंमतीला विकली जाणारी एम. एफ़. हूसेन यांची अतिसुमार चित्रे). उलट ती कलाकृती किती अत्युच्च पातळीवरची आहे आणि सामान्यांना ती समजावी अशी त्यांची लायकी नाही वगैरे पोपटपंची केली / लिहीली / छापली जाते. राजाचं वस्त्र तलम आहे असंच सगळे म्हणतात. राजा नग्न आहे हे दिसत असूनही तसं सांगायचं धैर्य कोणी दाखवित नाही. मी तसा प्रयत्न केला तर अनेक जण माझ्यावर तुटून पडले. अशावेळी पाठिंबा देणारे मत प्रदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.

बाकी कादंबरीतील ओऍसिसचे वर्णन सुंदर आहे या आपल्या मताशी पूर्ण सहमत.

ऋषिकेश's picture

21 Aug 2011 - 11:28 am | ऋषिकेश

मी बर्‍याच आधि हे पुस्तक वाचले आहे. मला ते आवडले होते

जसे अणा हजारे यांच्या लढ्याचे तरुण मनावर किमया करण्याच सामर्थ्य आहे तसेच अल-केमिस्ट चे ही वाचकावर किमया करण्याचे सामर्थ्य आहे. सामर्थ्य .... आशावादी भाषेचे. "जेव्हा तुम्हाला मनापासून जे काही करावंसे वाटते ते तुम्ही करावे अशी इच्छा विश्वाच्या अंतर-आत्म्यात उगम पावलेली असते." "जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून पाहीजे असते, तेव्हा सगळं जगचं तुमच्या मदतीला ती साध्य करण्यासाठी धावून येतं.."

"खजूराच्या झाडाचे सौंदर्य माणसाला कळावं यासाठीच परमेश्वराने वाळवंट तयार केलेलं असावे"
जगाविषयी अन जगण्याविषयी नकारात्मक बाळगू नये अन त्याचा धिक्कारच करावा असे सांगता सांगता हे पुस्तक कुठेतरी तुमची इच्छा तीव्र असेल तर तुम्हाला मदत करणारी माणसं मिळत जातील अन गोष्टी आपोआप घडून येतील या सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देते

वर आत्मशुन्य ने सांगितल्या प्रमाणे ओम शांती ओम चा डायलौग ही असेच काहीसे सांगतो
इतनी शिद्दद्त से मैने तुम्हे पाने कि कोशिश कि है, कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने कि साजीश कि है. कहते है अगर किसी चीज को पुरे दिलसे चाहो तो, पुरी कायनात उसे तुमसे मिलाने कोशिश में लग जाती है !

ही कहाणी एक फेबल (रूपककथा) आहे. अशा कहाण्यांमध्ये जीवनविषयक तत्त्वज्ञान, अगदी ठासून भरलेली असतात.
या पुस्तकात 'अल्केमिस्ट'ला मुलगा विचारतो, 'अनेकजण परिस शोधत होते. पण तो तुलाच कसा सापडला?' त्यावर 'अल्केमिस्ट' सांगतो, 'इतरजण केवळ धनपरिस शोधत होते. त्यांना नशिबात असलेली गोष्ट केवळ शोधायची होती, त्याप्रमाणे जगायचं नव्हतं', 'ज्याच्या हृदयात आनंद असतो, तोच खरा आनंदी असतो', 'खरं सुख प्रवासात, धडपडीत असतं', 'आपण जसे विचार करतो तसे आपण बनतो'- असे अनेक छोटेमोठे धडे पानोपानी 'अल्केमिस्ट'मधील हिरो सान्तियागोला मिळत जातात

'अल्केमिस्ट' म्हणजे जो स्वत:च्या आत्म्यापर्यंत पोहचू शकतो, असा माणूस ! अल्केमिस्ट म्हणजे किमयागार ! येथे ते एक प्रतिक आहे.एखादं भव्य स्वप्न साकार करण्याच्या दिशेने जेव्हा विचार होत जातात तेव्हाच ती प्रक्रिया होऊ शकते .
.
तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येक माणसाला स्वप्नाळू होण्याचा हक्क आहे. अन ती स्वप्ने सत्यात उतरवण्याचा ही , अश्याच एका स्वप्नाळू सांतियोगोचा हा प्रवास आहे. त्याला भटकंतीची ओढ आहे वरकरणी जरी ती निरुद्देश्य भासली तरी ती तशी नाही त्यात बरेच अर्थ दडले आहेत
या प्रवासात त्याला कित्येक माणसं भेटतात. ती त्याला काहीतरी देऊन जातात. कधी एखादा उपदेश, तर कधी जगण्यातलं सौंदर्य दाखवतात. कधी त्यांच्याबरोबर तो एखादा अनुभव घेतो

हे पुस्तक माझ्य़ा एका मित्राने मला भेट म्हणून दिले होते

त्यावेळी मी The Indian Hotels Company (IHCL) मध्ये सिस्टीम एनालिस्ट म्हणून काम करित असे. होटेल ताज- महेल व ताज-प्रेसिडेंट मध्ये रोजचेच जाणेयेणे होते. तेही जग एक स्वप्नाळूच होते. पण एका घरंदाज मुलीने होटेल इंडस्ट्रीत काम करणे हे बर्याच जणांना रुचत नसे. अन ते संशयीत नजरेने माझ्याकडे पहात पण अम्मी माझ्य़ापाठी खंबिर होती. मला लोकांच्या नजरा बोचकरायच्या म्हणून मी ही नोकरी सोडायची हाही निर्णय घेऊन टाकला होता. हि गोष्ट कित्येकदा खुपदा माझ्या मित्र मैत्रिणींना बोलून दाखविली , त्यावेळी तारिक नावाच्या माझ्य़ा एका मित्राने मला हे पुस्तक भेट दिले.

यापुस्तका बरोबर मला खालील कविताही त्याने पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहून दिली

YOU SET YOUR STANDARDS HIGH
YOU DESERVE THE BEST
TRY FOR WHAT YOU WANT
AND NEVER SETTLE FOR LESS

BELIEVE IN YOURSELF
NO MATTER WHAT YOU CHOOSE
KEEP A WINNING ATTUTIDE
AND YOU CAN NEVER LOSE

THINK ABOUT YOU DESINATION
BUT DON'T WORRY IF YOU STRAY
BECAUSE THATS MOST IMPORTANT THING
IS WHAT YOUV'E LEARNED ALONG THE WAY

TAKE ALL YOU'VE BECOME
TO BE ALL YOU CAN BE
SOAR ABOVE THE CLOUDS
AND LET YOUR DREAMS SET FREE

आता माझॆही जग खुप बदलेले आहे मी ही थोडीफ़ार निराशावादी झाले. पण कुठेतरी वरिल कवितेवर अन अलकेमिस्ट पुस्तकातील या किमयागारावर माझा अजूनही अतूट विश्वास आहे !

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Aug 2011 - 9:18 am | चेतन सुभाष गुगळे

वाहीदाजी,

<< तुमची इच्छा तीव्र असेल तर तुम्हाला मदत करणारी माणसं मिळत जातील अन गोष्टी आपोआप घडून येतील या सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देते >>

ही वाक्ये माणसाला वेडी आशा लावतात असे मला वाटते. मी निराशावादी व्हा असे म्हणणार नाही, पण व्यवहारी व्हा इतके नक्कीच सांगेन.

आपले ध्येय साध्य करणे हे केवळ आपल्याच मर्जीवर अवलंबून नसते. आपल्यासारखेच इतरही अनेक जण त्या ध्येयाची आशा लावून असतात. त्यापैकी कुणाला तरी एकालाच हे साध्य होणार असते. इतरांनी त्यासाठी प्रयत्न जरूर करावे पण वेडे होऊ नये असे वाटते कारण जर ध्येयपूर्ती झाली नाही तर जो नैराश्याचा झटका येतो तो अधिक वाईट असतो. त्यामुळे सुरूवातीपासून नकारात्मक शक्यतेचा देखील विचार करावा (जे की अल्केमिस्ट पुस्तक विचारात घेत नाही).

HOPE FOR THE BEST, BUT (ALWAYS) PREPARE FOR THE WORST

अधिक माहितीकरिता शनिवार २० ऑगस्ट २०१२ च्या लोकसत्तातील संपादकीय अग्रलेख जरूर वाचा. जमल्यास २००० सालचा धडकन चित्रपट (सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी, महिमा चौधरी व अक्षय कुमार) देखील पाहा. अल्केमिस्ट स्वप्नाळू आहे तर मी उल्लेख केलेला अग्रलेख आणि चित्रपट वास्तवाशी इमान राखणारे आहेत.

तुम्ही हे पुस्तक मराठीत वाचले आहे का ? I feel you have failed to related this book with your own life that's why you have not understood it .

तुम्ही त्याचा अर्थ समजावून घेतला नाही. हे मराठी डबिंग सारखे झाले कृपया हे पुस्तक ईंग्रजीतच वाचा.

मी आधीच सांगीतले ही कहाणी एक फेबल (रूपककथा) आहे.
स्वप्न ही पहायची असतात पण व्यवहारी होऊनच
अपयशाने होरपळून ही जाऊ नये अन यशाने हुरळूनही जाऊ नये !

जेव्हा आमची अम्मी आम्हाला लहान असताना 'मुझे चांद चाहिये' ही कथा सांगायची याचा अर्थ खरोखरच्या चंद्रावर स्वारी करायची नसते तर तुमच्या आवाक्यातील चंद्राच्या कसे जवळ जाता येईल हे पहायचे असते.

अहो ताटावर बसायचे म्हणजे वाटीत येऊन बसायचे नसते अन घरावरुन जायचे म्हणजे छपरावरुन चालायचे नसते. ;-) हे सर्व वाचकांना समजावून सांगीतले नाही याचा अर्थ वाचकांना ते माहीत आहे हे गृहीत धरलेले असते

असो हे पुस्तक कृपया इंग्रजी भाषेतच वाचा ! :-)
जाता जाता : २० ऑगस्ट २०१२ अजून उजाडायचे आहे अन त्या दिवशी सोमवार आहे शनिवार नव्हे ! ;-)

२० ऑगस्ट २०१२ अजून उजाडायचे आहे अन त्या दिवशी सोमवार आहे शनिवार नव्हे !

तुम्ही या कादंबरीतील विधानांशी सहमत आहात ना वाहीदाजी,
मग त्यातच जे सांगितले आहे अन आत्मशुन्याने उल्लेखले आहे....
की "तुम किसि चिज को........ कायनात" वेग्रे वेग्रे !!!
त्याचप्रमाणे, जर गुगळेंनी अशी इच्छा केली असावी की २० ऑगस्ट २०१२ला शन्वार यावा....
अन ते घडणार असावे....
मग त्यात वाईट ते काय?
तुम्ही याला नाकारु तर नाही ना शकत...

''त्याचप्रमाणे, जर गुगळेंनी अशी इच्छा केली असावी की २० ऑगस्ट २०१२ला शन्वार यावा....
अन ते घडणार असावे....
मग त्यात वाईट ते काय''''

माझी एक अ‍ॅडिशन या इच्छेत तो शनिवार सेकंड किंवा फोर्थ असावा आणि त्यादिवशी खुप पाउस नसावा, आपला भुरभुर पाउस बरोबर छान मैत्रिण आणि ती भजी करतेय आपण खातोय,

माझी एक अ‍ॅडिशन या इच्छेत तो शनिवार सेकंड किंवा फोर्थ असावा आणि त्यादिवशी खुप पाउस नसावा, आपला भुरभुर पाउस बरोबर छान मैत्रिण आणि ती भजी करतेय आपण खातोय,

त्रिवार निषेध !!! निषेध !!! निषेध !!!!
हा केवळ अत्याचार आहे....
गुगळेंसारख्या महान जिलब्याकार सोबत असतना सुद्धा त्या मुलीला स्वतःच जर भजी पाडावे लागत असतील तर त्या सारखा दुसरा उपमर्द होणे नाही...

गुगळे त्यांना माफ करा, अति घाई अन संकटात नेइ असं झालंय त्यांच.....
पण तुम्ही साचे विकु नका....
जगाच्या अंतापर्यंत जिलेब्या पाडत चला....

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Aug 2011 - 11:48 am | चेतन सुभाष गुगळे

होय मी ते मराठीतच (अनुवाद : नितीन कोत्तापल्ले) वाचले आहे. त्यामुळे काही फरक पडायला नको. असे असेल तर अनुवाद केले जाणारच नाहीत. शिवाय मूळ पुस्तकाची भावना पोचविण्यात अनुवाद कुठे कमी पडत असेल तर त्या पुस्तकाचे पंचावन्न भाषेत अनुवाद झाल्याचे त्यांनी अभिमानाने छापले आहे त्याचे काय?

<< २० ऑगस्ट २०१२ अजून उजाडायचे आहे अन त्या दिवशी सोमवार आहे शनिवार नव्हे ! >>

ते चूकून झाले आहे. (अशा चूका कुणाकडूनही होऊ शकतात. आपणही वर लिहीले आहे

<< I feel you have failed to related this book with your own life >>

जे की I feel you have failed to relate this book with your own life असे असायला हवे होते. असो, मी माझे जीवन त्या पुस्तकासोबत तपासले आणि म्हणूनच ते (म्हणजे माझे जीवन नव्हे तर पुस्तकातील तत्वज्ञान) मला अधिकच चूकीचे वाटले. अर्थात व्यक्तिगत आयुष्याविषयी इथे चर्चा नको म्हणून अधिक तपशील देत नाही.

२० ऑगस्ट २०११ असे वाचावे, व अग्रलेखही जरूर वाचावा. आपले शोधकार्य सुलभ व्हावे याकरिता या आशादायी नैराश्य नावाच्या लेखाची लिंक देत आहे - http://epaper.loksatta.com/10197/indian-express/20-08-2011#p=page:n=9:z=2

तसेच,

<< तुमची इच्छा तीव्र असेल तर तुम्हाला मदत करणारी माणसं मिळत जातील अन गोष्टी आपोआप घडून येतील या सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देते >>

या वाक्यावरचा माझा आक्षेप इथे पुन्हा एकदा नोंदवतो. या वाक्याच्या नेमका उलटा सिद्धांत "छोटीसी बात" या चित्रपटात मांडलात. नायक (अमोल पालेकर) ध्येय साध्य करण्याकरिता गुरू (अशोक कुमार) ची मदत घ्यायला जातो तेव्हा ते त्याला विचारतात, "तुम्हारा दुष्मन कौन है?" तो उत्तरतो, "मेरा दुष्मन कौन हो सकता है? कोईभी नही।" त्यावर गुरू म्हणतात, "गलत। तूम छोडके सभी तुम्हारे दुष्मन है।"

हाच अनुभव आपल्यालाही येतो. आपल्या ध्येयपूर्तीत पदोपदी अडथळे आणणारे अनेक असतात. त्यांचे उपद्रवमूल्य देखील विचारात घ्यावेच लागते (म्हणजे एक तर तुम्ही प्रतिबंधक उपाय योजू शकता किंवा ते शक्य नसेल तर तुमचे ध्येय तरी बदलू शकता). स्वत:चा मतलब साध्य होत असल्याखेरीज आपल्याला आपल्या ध्येयपूर्तीकरिता निरपेक्ष भावनेने मदत करणारी व्यक्ती आजच्या गळेकापू स्पर्धेच्या जमान्यात (काही सन्माननीय अपवाद वगळता) भेटणे अवघडच तेव्हा अल्केमिस्ट च्या सिद्धांतापेक्षा छोटीसी बात मधला सिद्धांतच जास्त बरोबर वाटतो.

वाहीदा's picture

22 Aug 2011 - 12:19 pm | वाहीदा

बरे,

I feel, you have failed to relate this book with your own life ! या मतावर मी कायम आहे !

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Aug 2011 - 12:55 pm | चेतन सुभाष गुगळे

मला या पुस्तकात नमूद केल्यापेक्षा वेगळा अनुभव येऊ शकत नाही का?

आणि तसा वेगळा अनुभव मला आला तर मी अयशस्वी कसा काय ठरतो? उदाहरण म्हणून नजीकचीच घटना सांगतो. आमचे कला केंद्र दरवर्षी नाटक सादर करीत असते. प्रत्येक वर्षी आदल्या वर्षीपेक्षा जास्त अडचणी येत असतात. मुख्य अडचण कलाकारांची उपलब्धी हेच असते (कारण सगळा हौशेचा मामला, यात पैसा मिळत नाही). त्यामुळे कमी पात्र असलेले नाटक निवडावे लागते. मागच्या वर्षी असेच एक नाटक निवडले, जे मला बिलकूल आवडले नाही. तरीही इतर कलाकारांची निराशा होऊ नये (कारण नाटक सादर करणे हे सर्वांचेच स्वप्न होते) म्हणून मी त्यात काम केले, परंतू माझे मत देखील नोंदविले.

त्यावर इतर कलाकारांनी ज्यात फारसे पात्र लागणार नाही असे नाटक लिहीण्यास मला सूचविले. तेव्हा माझ्या मनात एक कल्पना घोळू लागली. कथानक मनात तयार झाले पण वर्षभरात त्यावर नाटक लिहीणे जमले नाही. त्यानंतर पुन्हा यावर्षी आम्ही एकत्र जमलो तेव्हा मी माझ्या मनात असलेल्या नाटकाविषयी बोललो. सर्वांनी मला नाटक कुठे आहे असे विचारले. त्यावर मी उत्तरलो की नाटक माझ्यापाशी तयार नाही परंतू मी थोडक्यात कथासूत्र सांगेल. ते जर सर्वांना आवडले तरच मी ते लिहीन. अन्यथा माझी मेहनत फुकट जाणार. यावर सर्वांनी कथानक ऐकले. कथानक सर्वांना आवडले व त्यांनी मला लगेचच त्यावर नाटक लिहीण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी एका दिवसात नाटक लिहीले (जे चतुर्भुज नावाने या संकेतस्थळावर देखील प्रकाशित केले आहे). पुढे हे नाटक बसविले गेले परंतू त्यात एका पात्राचे संवाद जास्त असल्याने (तसे करणे गरजेचे होते कारण पात्रांची संख्या मर्यादित ठेवण्याचे बंधन होते) व त्या कलाकाराला तेवढे पाठांतर होत नसल्याने त्यात काटछाट करण्यात आली व त्या नाटकाचा २७ जुलै २०११ रोजी प्रयोग झाला. अर्थातच मला अपेक्षित असलेल्या नाटकापेक्षा या नाटकातली संहिता बदलली गेली असल्याने मी नाराज होतो.

त्यानंतर जालवाणी या जालीय ध्वनी अंकाची घोषणा झाली. या अंकात प्रकाशित करण्याकरिता नाटकाचे वाचन ध्वनिमुद्रण करण्याचा प्रस्ताव मी मांडला ज्याला सर्व कलाकारांनी मान्यता दिली. ध्वनिमुद्रण करताना संहिता समोर ठेवायची असल्याने ज्या पात्राचे संवाद जास्त होते त्यानेही आक्षेप घेतला नाही व मूळ संहितेप्रमाणेच संवादाचे ध्वनिमुद्रण करण्यास मान्यता दिली. आता सर्व गोष्टी जुळून आल्या तर नवीच अडचण निर्माण झाली - ध्वनिमुद्रण जिथे करायचे असे ठरले होते त्या परिसरात रोज सायंकाळी (सर्व कलाकारांकरिता सायंकाळचीच वेळ सोयीची होती) वाद्यांच्या सरावाचा आवाज होऊ लागला. त्यामूळे ध्वनिमुद्रण करणे लांबत गेले.

त्या दरम्यान आमच्या संचातील मी व अजून एक कलाकार सर्दी, खोकला, घसा दुखणे या विकारांनी ग्रस्त झालो. सदर ध्वनिमुद्रण करण्याकरिता बाहेरून कोणी कलाकार मिळू शकतील का याची चाचपणी करण्याकरिता तसा प्रस्ताव ही जालावर प्रसिद्धीस देण्यात आला (ज्याच्या प्रतिसादात आपण स्वत:ही माझ्याशी संपर्क साधला होता).

पण तरीही हे नाटक ठरलेल्या मुदतीत (१२ ऑगस्ट २०११) ध्वनिमुद्रित होऊ शकलेच नाही. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात मी जेवढे प्रयत्न हे नाटक मूळ स्वरूपात प्रदर्शित व्हावे या करिता केले तेवढे क्वचितच कधी केले असतील. असे असूनही माझे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाहीच.

अर्थात हे असे चालायचेच. कारण माझ्या ह्या स्वप्नपूर्तीकरिता माझ्या एकट्याची इच्छा (कितीही उत्कट असली तरीही) असून कसे चालेल? इतरांनाही तशी इच्छा व्हायला हवी ना.

हे नाटक (मूळ रूपात) प्रदर्शित झाले नाही म्हणजे सारे काही संपले असा विचार मी करीत नाही. कारण कुठलेच स्वप्न इतके मोठे नसते की ज्यापुढे आपले आयुष्य दुय्यम वाटावे. आयुष्य पुढे चालु राहिले तर अजून स्वप्ने पाहता येतील.

स्वप्नपूर्तीच्या अनेक कथा वाचल्या असतील, चित्रपट पाहिले असतील, पण ज्यात स्वप्नभंग होऊनही जीवनभंग झाला नाही असे धडकन, कभी हा कभी ना या सारखे चित्रपट पाहा. अशी कथानके जास्त motivate करतात.

तुम्हाला समजवता समजवता माझा क्लायंट आमच्या ग्रुपची तक्रार डिलेवरी हेड कडे करेल हो अन तो ही वैतागेल.. क्लायंट जाईल तो जाईल डिलेवरी हेड ची ही माझ्याबध्दल घोर निराशा होईल त्याचे काय ?

असो तुम्ही लवकरात लवकर आशावादी व्हावे ही इच्छा, असे बोलून मी माझे दोन शब्द संपवते .
शेवटी काय व्यवहार ! व्यवहार!

जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय क्लायंट ! (आलाच माझ्या डिलेवरी हेडचा फोन ... )
बाकी नंतर ..

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Aug 2011 - 1:23 pm | चेतन सुभाष गुगळे

वर शाहिरने एका प्रतिसादात स्वप्नपूर्ती आणि जगाकडून मिळणारी मदत याच्या पुष्ट्यर्थ अण्णांच्या आंदोलनाचं उदाहरण दिलंय.

परंतू अण्णांच्या आंदोलनावर मार्मिक भाष्य करणारा तात्याचा याच संकेतस्थळावरील धागा आणि त्यावरील माझी प्रतिक्रिया ही वाचा.

याशिवाय मी उल्लेख केलेला शनिवारचा संपादकीय अग्रलेख ही जरूर वाचा. वेडी आशा लावणार्‍या च्या तूलनेत छुप्या निराशावादी नेत्याचीच आजच्या वादळी परिस्थितीत देशाला गरज आहे.

निराशावादी माणूस धोके पटकन ओळखतो तर फाजील उत्साही माणूस अशा धोक्यांकडे पाहूच शकत नाही हे आणि असं बरंच काही त्या लेखात लिहीलंय. कम्युनिस्ट निराशावादीच असतात आणि म्हणूनच उपेक्षितांचं सारं जग त्यांच्या कडे मोठया आशेनं पाहतं.

तूर्तास हे गाणं पाहा / ऐका : -

http://www.youtube.com/watch?v=u1iCCeSZi_E

प्यारे१'s picture

22 Aug 2011 - 2:20 pm | प्यारे१

>>>>कम्युनिस्ट निराशावादीच असतात आणि म्हणूनच उपेक्षितांचं सारं जग त्यांच्या कडे मोठया आशेनं पाहतं.<<<<

आत्ता लक्षात आलं. चालू द्या. आमची सपशेल माघार आहे आपल्यापुढे.
यापूर्वी कळत नकळत, जाणता अजाणता आपला काही उपमर्द करण्याचा प्रयत्न आमच्याकडून झाला त्याबद्दल तहे दिलसे माफी मागतो आणि यापुढे 'आजाबात' आपल्या वाटेला जाणार नाही (जाऊ शकत नाहीच म्हणा) असे जाहिर आश्वासन देतो आणि आपली रजा घेतो.
धन्यवाद.

पल्लवी's picture

22 Aug 2011 - 2:25 pm | पल्लवी

:D

सामान्य वाचक's picture

24 Aug 2011 - 10:25 am | सामान्य वाचक

हे पुस्तक ना धड करमणूक करते ना धड तथाकथित 'दिव्यत्वाची अनुभुती' देते.

वेळ वाया गेला असेच वाटले पुस्तक वाचून.

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 10:30 am | चेतन सुभाष गुगळे

असाच अनुभव माझाही आहे. मतप्रदर्शन करून पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.

मराठी_माणूस's picture

24 Aug 2011 - 10:33 am | मराठी_माणूस

अजुन एन भंपक पुस्तक: अरुंधती रॉय चे "गॉड ऑफ स्मॉल थिंग्स"

परदेशी पुरस्कार मिळविणारी भारतीय लेखकांची पुस्तके अशीच असतात. उदाहरणार्थ अरविंद अडिगाचा टायगर.