Skip to main content

अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 17/08/2011 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट हे पुस्तक वाचलं. पाऊलो कोएलो यांच्या पुस्तकाचं जगभरात प्रचंड कौतुक झालेलं असून त्याच्या अनेक भाषांत कोट्यावधी प्रती विकल्या गेल्या आहेत (अशी माहिती सदर पुस्तकाच्या शेवटच्या पृष्ठावर होती). याचं अजिबात आश्चर्य नाही की अशी पुस्तकं लिहीली जातात. याचं देखील आश्चर्य नाही की अशी पुस्तकं छापली जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक अशी पुस्तकं पैसे (आणि त्याहून ही मुल्यवान असा वेळ) खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर अनेक ठिकाणी छापून आलेल्या या कादंबरीच्या अवास्तव कौतुकाला बळी पडूनच मी या कादंबरीच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला. आता प्रश्न असा उरतो की हे जे कुणी या कादंबरीच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून इतरांनाही हे पुस्तक वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? (निदान माझ्यासाठी तरी हा नक्कीच अनुत्तरीत प्रश्न आहे) या पुस्तकातून बरंच काही शिकायला मिळतं असा प्रशंसकांचा सूर आहे. मला तरी संपूर्ण पुस्तक वाचल्यावर "असलं पुस्तक वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही शिकायला मिळालं नाही. पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी मराठीत एक म्हण आहे. माझ्या वाया गेलेल्या वेळेवरून इतरांनी बोध घ्यावा व आपला बहुमूल्य वेळ वाचवावा अशी त्यांना सावधगिरीची सूचना करण्याकरिताच हा लेखन प्रपंच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 38178
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

माझ्या दोन मित्रांच्या आग्रहाने मी हे पुस्तक वाचले व माझे मतही अगदी गुगळेसाहेबांच्यासारखेच झाले! माझ्या मते अगदीच सुमार पुस्तक आहे. फक्त ओयॅसिसमधील जीवनाचे वर्णन मी प्रथमच वाचले ते मात्र लक्षात राहिले!

In reply to by सुधीर काळे

काळेसाहेब, आपल्यालाही अगदी माझ्यासारखाच अनुभव आला आणि तो आपण इथे शेअर केला याबद्दल आपले आभार. सहसा गाजलेल्या कलाकृतींपासून निराशाजनक अनुभव आला तरी तो कोणी उघडपणे कबूल करीत नाही (जसे की, चढ्या किंमतीला विकली जाणारी एम. एफ़. हूसेन यांची अतिसुमार चित्रे). उलट ती कलाकृती किती अत्युच्च पातळीवरची आहे आणि सामान्यांना ती समजावी अशी त्यांची लायकी नाही वगैरे पोपटपंची केली / लिहीली / छापली जाते. राजाचं वस्त्र तलम आहे असंच सगळे म्हणतात. राजा नग्न आहे हे दिसत असूनही तसं सांगायचं धैर्य कोणी दाखवित नाही. मी तसा प्रयत्न केला तर अनेक जण माझ्यावर तुटून पडले. अशावेळी पाठिंबा देणारे मत प्रदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. बाकी कादंबरीतील ओऍसिसचे वर्णन सुंदर आहे या आपल्या मताशी पूर्ण सहमत.

मी बर्‍याच आधि हे पुस्तक वाचले आहे. मला ते आवडले होते

जसे अणा हजारे यांच्या लढ्याचे तरुण मनावर किमया करण्याच सामर्थ्य आहे तसेच अल-केमिस्ट चे ही वाचकावर किमया करण्याचे सामर्थ्य आहे. सामर्थ्य .... आशावादी भाषेचे. "जेव्हा तुम्हाला मनापासून जे काही करावंसे वाटते ते तुम्ही करावे अशी इच्छा विश्वाच्या अंतर-आत्म्यात उगम पावलेली असते." "जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून पाहीजे असते, तेव्हा सगळं जगचं तुमच्या मदतीला ती साध्य करण्यासाठी धावून येतं.." "खजूराच्या झाडाचे सौंदर्य माणसाला कळावं यासाठीच परमेश्वराने वाळवंट तयार केलेलं असावे" जगाविषयी अन जगण्याविषयी नकारात्मक बाळगू नये अन त्याचा धिक्कारच करावा असे सांगता सांगता हे पुस्तक कुठेतरी तुमची इच्छा तीव्र असेल तर तुम्हाला मदत करणारी माणसं मिळत जातील अन गोष्टी आपोआप घडून येतील या सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देते वर आत्मशुन्य ने सांगितल्या प्रमाणे ओम शांती ओम चा डायलौग ही असेच काहीसे सांगतो इतनी शिद्दद्त से मैने तुम्हे पाने कि कोशिश कि है, कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने कि साजीश कि है. कहते है अगर किसी चीज को पुरे दिलसे चाहो तो, पुरी कायनात उसे तुमसे मिलाने कोशिश में लग जाती है ! ही कहाणी एक फेबल (रूपककथा) आहे. अशा कहाण्यांमध्ये जीवनविषयक तत्त्वज्ञान, अगदी ठासून भरलेली असतात. या पुस्तकात 'अल्केमिस्ट'ला मुलगा विचारतो, 'अनेकजण परिस शोधत होते. पण तो तुलाच कसा सापडला?' त्यावर 'अल्केमिस्ट' सांगतो, 'इतरजण केवळ धनपरिस शोधत होते. त्यांना नशिबात असलेली गोष्ट केवळ शोधायची होती, त्याप्रमाणे जगायचं नव्हतं', 'ज्याच्या हृदयात आनंद असतो, तोच खरा आनंदी असतो', 'खरं सुख प्रवासात, धडपडीत असतं', 'आपण जसे विचार करतो तसे आपण बनतो'- असे अनेक छोटेमोठे धडे पानोपानी 'अल्केमिस्ट'मधील हिरो सान्तियागोला मिळत जातात 'अल्केमिस्ट' म्हणजे जो स्वत:च्या आत्म्यापर्यंत पोहचू शकतो, असा माणूस ! अल्केमिस्ट म्हणजे किमयागार ! येथे ते एक प्रतिक आहे.एखादं भव्य स्वप्न साकार करण्याच्या दिशेने जेव्हा विचार होत जातात तेव्हाच ती प्रक्रिया होऊ शकते . . तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येक माणसाला स्वप्नाळू होण्याचा हक्क आहे. अन ती स्वप्ने सत्यात उतरवण्याचा ही , अश्याच एका स्वप्नाळू सांतियोगोचा हा प्रवास आहे. त्याला भटकंतीची ओढ आहे वरकरणी जरी ती निरुद्देश्य भासली तरी ती तशी नाही त्यात बरेच अर्थ दडले आहेत या प्रवासात त्याला कित्येक माणसं भेटतात. ती त्याला काहीतरी देऊन जातात. कधी एखादा उपदेश, तर कधी जगण्यातलं सौंदर्य दाखवतात. कधी त्यांच्याबरोबर तो एखादा अनुभव घेतो हे पुस्तक माझ्य़ा एका मित्राने मला भेट म्हणून दिले होते त्यावेळी मी The Indian Hotels Company (IHCL) मध्ये सिस्टीम एनालिस्ट म्हणून काम करित असे. होटेल ताज- महेल व ताज-प्रेसिडेंट मध्ये रोजचेच जाणेयेणे होते. तेही जग एक स्वप्नाळूच होते. पण एका घरंदाज मुलीने होटेल इंडस्ट्रीत काम करणे हे बर्याच जणांना रुचत नसे. अन ते संशयीत नजरेने माझ्याकडे पहात पण अम्मी माझ्य़ापाठी खंबिर होती. मला लोकांच्या नजरा बोचकरायच्या म्हणून मी ही नोकरी सोडायची हाही निर्णय घेऊन टाकला होता. हि गोष्ट कित्येकदा खुपदा माझ्या मित्र मैत्रिणींना बोलून दाखविली , त्यावेळी तारिक नावाच्या माझ्य़ा एका मित्राने मला हे पुस्तक भेट दिले. यापुस्तका बरोबर मला खालील कविताही त्याने पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहून दिली YOU SET YOUR STANDARDS HIGH YOU DESERVE THE BEST TRY FOR WHAT YOU WANT AND NEVER SETTLE FOR LESS BELIEVE IN YOURSELF NO MATTER WHAT YOU CHOOSE KEEP A WINNING ATTUTIDE AND YOU CAN NEVER LOSE THINK ABOUT YOU DESINATION BUT DON'T WORRY IF YOU STRAY BECAUSE THATS MOST IMPORTANT THING IS WHAT YOUV'E LEARNED ALONG THE WAY TAKE ALL YOU'VE BECOME TO BE ALL YOU CAN BE SOAR ABOVE THE CLOUDS AND LET YOUR DREAMS SET FREE आता माझॆही जग खुप बदलेले आहे मी ही थोडीफ़ार निराशावादी झाले. पण कुठेतरी वरिल कवितेवर अन अलकेमिस्ट पुस्तकातील या किमयागारावर माझा अजूनही अतूट विश्वास आहे !

In reply to by वाहीदा

वाहीदाजी, तुमची इच्छा तीव्र असेल तर तुम्हाला मदत करणारी माणसं मिळत जातील अन गोष्टी आपोआप घडून येतील या सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देते >> ही वाक्ये माणसाला वेडी आशा लावतात असे मला वाटते. मी निराशावादी व्हा असे म्हणणार नाही, पण व्यवहारी व्हा इतके नक्कीच सांगेन. आपले ध्येय साध्य करणे हे केवळ आपल्याच मर्जीवर अवलंबून नसते. आपल्यासारखेच इतरही अनेक जण त्या ध्येयाची आशा लावून असतात. त्यापैकी कुणाला तरी एकालाच हे साध्य होणार असते. इतरांनी त्यासाठी प्रयत्न जरूर करावे पण वेडे होऊ नये असे वाटते कारण जर ध्येयपूर्ती झाली नाही तर जो नैराश्याचा झटका येतो तो अधिक वाईट असतो. त्यामुळे सुरूवातीपासून नकारात्मक शक्यतेचा देखील विचार करावा (जे की अल्केमिस्ट पुस्तक विचारात घेत नाही). HOPE FOR THE BEST, BUT (ALWAYS) PREPARE FOR THE WORST अधिक माहितीकरिता शनिवार २० ऑगस्ट २०१२ च्या लोकसत्तातील संपादकीय अग्रलेख जरूर वाचा. जमल्यास २००० सालचा धडकन चित्रपट (सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी, महिमा चौधरी व अक्षय कुमार) देखील पाहा. अल्केमिस्ट स्वप्नाळू आहे तर मी उल्लेख केलेला अग्रलेख आणि चित्रपट वास्तवाशी इमान राखणारे आहेत.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

तुम्ही हे पुस्तक मराठीत वाचले आहे का ? I feel you have failed to related this book with your own life that's why you have not understood it . तुम्ही त्याचा अर्थ समजावून घेतला नाही. हे मराठी डबिंग सारखे झाले कृपया हे पुस्तक ईंग्रजीतच वाचा. मी आधीच सांगीतले ही कहाणी एक फेबल (रूपककथा) आहे. स्वप्न ही पहायची असतात पण व्यवहारी होऊनच अपयशाने होरपळून ही जाऊ नये अन यशाने हुरळूनही जाऊ नये ! जेव्हा आमची अम्मी आम्हाला लहान असताना 'मुझे चांद चाहिये' ही कथा सांगायची याचा अर्थ खरोखरच्या चंद्रावर स्वारी करायची नसते तर तुमच्या आवाक्यातील चंद्राच्या कसे जवळ जाता येईल हे पहायचे असते. अहो ताटावर बसायचे म्हणजे वाटीत येऊन बसायचे नसते अन घरावरुन जायचे म्हणजे छपरावरुन चालायचे नसते. ;-) हे सर्व वाचकांना समजावून सांगीतले नाही याचा अर्थ वाचकांना ते माहीत आहे हे गृहीत धरलेले असते असो हे पुस्तक कृपया इंग्रजी भाषेतच वाचा ! :-) जाता जाता : २० ऑगस्ट २०१२ अजून उजाडायचे आहे अन त्या दिवशी सोमवार आहे शनिवार नव्हे ! ;-)

In reply to by वाहीदा

२० ऑगस्ट २०१२ अजून उजाडायचे आहे अन त्या दिवशी सोमवार आहे शनिवार नव्हे !
तुम्ही या कादंबरीतील विधानांशी सहमत आहात ना वाहीदाजी, मग त्यातच जे सांगितले आहे अन आत्मशुन्याने उल्लेखले आहे.... की "तुम किसि चिज को........ कायनात" वेग्रे वेग्रे !!! त्याचप्रमाणे, जर गुगळेंनी अशी इच्छा केली असावी की २० ऑगस्ट २०१२ला शन्वार यावा.... अन ते घडणार असावे.... मग त्यात वाईट ते काय? तुम्ही याला नाकारु तर नाही ना शकत...

In reply to by वपाडाव

''त्याचप्रमाणे, जर गुगळेंनी अशी इच्छा केली असावी की २० ऑगस्ट २०१२ला शन्वार यावा.... अन ते घडणार असावे.... मग त्यात वाईट ते काय'''' माझी एक अ‍ॅडिशन या इच्छेत तो शनिवार सेकंड किंवा फोर्थ असावा आणि त्यादिवशी खुप पाउस नसावा, आपला भुरभुर पाउस बरोबर छान मैत्रिण आणि ती भजी करतेय आपण खातोय,

In reply to by ५० फक्त

माझी एक अ‍ॅडिशन या इच्छेत तो शनिवार सेकंड किंवा फोर्थ असावा आणि त्यादिवशी खुप पाउस नसावा, आपला भुरभुर पाउस बरोबर छान मैत्रिण आणि ती भजी करतेय आपण खातोय,
त्रिवार निषेध !!! निषेध !!! निषेध !!!! हा केवळ अत्याचार आहे.... गुगळेंसारख्या महान जिलब्याकार सोबत असतना सुद्धा त्या मुलीला स्वतःच जर भजी पाडावे लागत असतील तर त्या सारखा दुसरा उपमर्द होणे नाही... गुगळे त्यांना माफ करा, अति घाई अन संकटात नेइ असं झालंय त्यांच..... पण तुम्ही साचे विकु नका.... जगाच्या अंतापर्यंत जिलेब्या पाडत चला....

In reply to by वाहीदा

होय मी ते मराठीतच (अनुवाद : नितीन कोत्तापल्ले) वाचले आहे. त्यामुळे काही फरक पडायला नको. असे असेल तर अनुवाद केले जाणारच नाहीत. शिवाय मूळ पुस्तकाची भावना पोचविण्यात अनुवाद कुठे कमी पडत असेल तर त्या पुस्तकाचे पंचावन्न भाषेत अनुवाद झाल्याचे त्यांनी अभिमानाने छापले आहे त्याचे काय? २० ऑगस्ट २०१२ अजून उजाडायचे आहे अन त्या दिवशी सोमवार आहे शनिवार नव्हे ! >> ते चूकून झाले आहे. (अशा चूका कुणाकडूनही होऊ शकतात. आपणही वर लिहीले आहे I feel you have failed to related this book with your own life >> जे की I feel you have failed to relate this book with your own life असे असायला हवे होते. असो, मी माझे जीवन त्या पुस्तकासोबत तपासले आणि म्हणूनच ते (म्हणजे माझे जीवन नव्हे तर पुस्तकातील तत्वज्ञान) मला अधिकच चूकीचे वाटले. अर्थात व्यक्तिगत आयुष्याविषयी इथे चर्चा नको म्हणून अधिक तपशील देत नाही. २० ऑगस्ट २०११ असे वाचावे, व अग्रलेखही जरूर वाचावा. आपले शोधकार्य सुलभ व्हावे याकरिता या आशादायी नैराश्य नावाच्या लेखाची लिंक देत आहे - http://epaper.loksatta.com/10197/indian-express/20-08-2011#p=page:n=9:z… तसेच, तुमची इच्छा तीव्र असेल तर तुम्हाला मदत करणारी माणसं मिळत जातील अन गोष्टी आपोआप घडून येतील या सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देते >> या वाक्यावरचा माझा आक्षेप इथे पुन्हा एकदा नोंदवतो. या वाक्याच्या नेमका उलटा सिद्धांत "छोटीसी बात" या चित्रपटात मांडलात. नायक (अमोल पालेकर) ध्येय साध्य करण्याकरिता गुरू (अशोक कुमार) ची मदत घ्यायला जातो तेव्हा ते त्याला विचारतात, "तुम्हारा दुष्मन कौन है?" तो उत्तरतो, "मेरा दुष्मन कौन हो सकता है? कोईभी नही।" त्यावर गुरू म्हणतात, "गलत। तूम छोडके सभी तुम्हारे दुष्मन है।" हाच अनुभव आपल्यालाही येतो. आपल्या ध्येयपूर्तीत पदोपदी अडथळे आणणारे अनेक असतात. त्यांचे उपद्रवमूल्य देखील विचारात घ्यावेच लागते (म्हणजे एक तर तुम्ही प्रतिबंधक उपाय योजू शकता किंवा ते शक्य नसेल तर तुमचे ध्येय तरी बदलू शकता). स्वत:चा मतलब साध्य होत असल्याखेरीज आपल्याला आपल्या ध्येयपूर्तीकरिता निरपेक्ष भावनेने मदत करणारी व्यक्ती आजच्या गळेकापू स्पर्धेच्या जमान्यात (काही सन्माननीय अपवाद वगळता) भेटणे अवघडच तेव्हा अल्केमिस्ट च्या सिद्धांतापेक्षा छोटीसी बात मधला सिद्धांतच जास्त बरोबर वाटतो.

In reply to by वाहीदा

मला या पुस्तकात नमूद केल्यापेक्षा वेगळा अनुभव येऊ शकत नाही का? आणि तसा वेगळा अनुभव मला आला तर मी अयशस्वी कसा काय ठरतो? उदाहरण म्हणून नजीकचीच घटना सांगतो. आमचे कला केंद्र दरवर्षी नाटक सादर करीत असते. प्रत्येक वर्षी आदल्या वर्षीपेक्षा जास्त अडचणी येत असतात. मुख्य अडचण कलाकारांची उपलब्धी हेच असते (कारण सगळा हौशेचा मामला, यात पैसा मिळत नाही). त्यामुळे कमी पात्र असलेले नाटक निवडावे लागते. मागच्या वर्षी असेच एक नाटक निवडले, जे मला बिलकूल आवडले नाही. तरीही इतर कलाकारांची निराशा होऊ नये (कारण नाटक सादर करणे हे सर्वांचेच स्वप्न होते) म्हणून मी त्यात काम केले, परंतू माझे मत देखील नोंदविले. त्यावर इतर कलाकारांनी ज्यात फारसे पात्र लागणार नाही असे नाटक लिहीण्यास मला सूचविले. तेव्हा माझ्या मनात एक कल्पना घोळू लागली. कथानक मनात तयार झाले पण वर्षभरात त्यावर नाटक लिहीणे जमले नाही. त्यानंतर पुन्हा यावर्षी आम्ही एकत्र जमलो तेव्हा मी माझ्या मनात असलेल्या नाटकाविषयी बोललो. सर्वांनी मला नाटक कुठे आहे असे विचारले. त्यावर मी उत्तरलो की नाटक माझ्यापाशी तयार नाही परंतू मी थोडक्यात कथासूत्र सांगेल. ते जर सर्वांना आवडले तरच मी ते लिहीन. अन्यथा माझी मेहनत फुकट जाणार. यावर सर्वांनी कथानक ऐकले. कथानक सर्वांना आवडले व त्यांनी मला लगेचच त्यावर नाटक लिहीण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी एका दिवसात नाटक लिहीले (जे चतुर्भुज नावाने या संकेतस्थळावर देखील प्रकाशित केले आहे). पुढे हे नाटक बसविले गेले परंतू त्यात एका पात्राचे संवाद जास्त असल्याने (तसे करणे गरजेचे होते कारण पात्रांची संख्या मर्यादित ठेवण्याचे बंधन होते) व त्या कलाकाराला तेवढे पाठांतर होत नसल्याने त्यात काटछाट करण्यात आली व त्या नाटकाचा २७ जुलै २०११ रोजी प्रयोग झाला. अर्थातच मला अपेक्षित असलेल्या नाटकापेक्षा या नाटकातली संहिता बदलली गेली असल्याने मी नाराज होतो. त्यानंतर जालवाणी या जालीय ध्वनी अंकाची घोषणा झाली. या अंकात प्रकाशित करण्याकरिता नाटकाचे वाचन ध्वनिमुद्रण करण्याचा प्रस्ताव मी मांडला ज्याला सर्व कलाकारांनी मान्यता दिली. ध्वनिमुद्रण करताना संहिता समोर ठेवायची असल्याने ज्या पात्राचे संवाद जास्त होते त्यानेही आक्षेप घेतला नाही व मूळ संहितेप्रमाणेच संवादाचे ध्वनिमुद्रण करण्यास मान्यता दिली. आता सर्व गोष्टी जुळून आल्या तर नवीच अडचण निर्माण झाली - ध्वनिमुद्रण जिथे करायचे असे ठरले होते त्या परिसरात रोज सायंकाळी (सर्व कलाकारांकरिता सायंकाळचीच वेळ सोयीची होती) वाद्यांच्या सरावाचा आवाज होऊ लागला. त्यामूळे ध्वनिमुद्रण करणे लांबत गेले. त्या दरम्यान आमच्या संचातील मी व अजून एक कलाकार सर्दी, खोकला, घसा दुखणे या विकारांनी ग्रस्त झालो. सदर ध्वनिमुद्रण करण्याकरिता बाहेरून कोणी कलाकार मिळू शकतील का याची चाचपणी करण्याकरिता तसा प्रस्ताव ही जालावर प्रसिद्धीस देण्यात आला (ज्याच्या प्रतिसादात आपण स्वत:ही माझ्याशी संपर्क साधला होता). पण तरीही हे नाटक ठरलेल्या मुदतीत (१२ ऑगस्ट २०११) ध्वनिमुद्रित होऊ शकलेच नाही. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात मी जेवढे प्रयत्न हे नाटक मूळ स्वरूपात प्रदर्शित व्हावे या करिता केले तेवढे क्वचितच कधी केले असतील. असे असूनही माझे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाहीच. अर्थात हे असे चालायचेच. कारण माझ्या ह्या स्वप्नपूर्तीकरिता माझ्या एकट्याची इच्छा (कितीही उत्कट असली तरीही) असून कसे चालेल? इतरांनाही तशी इच्छा व्हायला हवी ना. हे नाटक (मूळ रूपात) प्रदर्शित झाले नाही म्हणजे सारे काही संपले असा विचार मी करीत नाही. कारण कुठलेच स्वप्न इतके मोठे नसते की ज्यापुढे आपले आयुष्य दुय्यम वाटावे. आयुष्य पुढे चालु राहिले तर अजून स्वप्ने पाहता येतील. स्वप्नपूर्तीच्या अनेक कथा वाचल्या असतील, चित्रपट पाहिले असतील, पण ज्यात स्वप्नभंग होऊनही जीवनभंग झाला नाही असे धडकन, कभी हा कभी ना या सारखे चित्रपट पाहा. अशी कथानके जास्त motivate करतात.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

तुम्हाला समजवता समजवता माझा क्लायंट आमच्या ग्रुपची तक्रार डिलेवरी हेड कडे करेल हो अन तो ही वैतागेल.. क्लायंट जाईल तो जाईल डिलेवरी हेड ची ही माझ्याबध्दल घोर निराशा होईल त्याचे काय ? असो तुम्ही लवकरात लवकर आशावादी व्हावे ही इच्छा, असे बोलून मी माझे दोन शब्द संपवते . शेवटी काय व्यवहार ! व्यवहार! जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय क्लायंट ! (आलाच माझ्या डिलेवरी हेडचा फोन ... ) बाकी नंतर ..

In reply to by वाहीदा

वर शाहिरने एका प्रतिसादात स्वप्नपूर्ती आणि जगाकडून मिळणारी मदत याच्या पुष्ट्यर्थ अण्णांच्या आंदोलनाचं उदाहरण दिलंय. परंतू अण्णांच्या आंदोलनावर मार्मिक भाष्य करणारा तात्याचा याच संकेतस्थळावरील धागा आणि त्यावरील माझी प्रतिक्रिया ही वाचा. याशिवाय मी उल्लेख केलेला शनिवारचा संपादकीय अग्रलेख ही जरूर वाचा. वेडी आशा लावणार्‍या च्या तूलनेत छुप्या निराशावादी नेत्याचीच आजच्या वादळी परिस्थितीत देशाला गरज आहे. निराशावादी माणूस धोके पटकन ओळखतो तर फाजील उत्साही माणूस अशा धोक्यांकडे पाहूच शकत नाही हे आणि असं बरंच काही त्या लेखात लिहीलंय. कम्युनिस्ट निराशावादीच असतात आणि म्हणूनच उपेक्षितांचं सारं जग त्यांच्या कडे मोठया आशेनं पाहतं. तूर्तास हे गाणं पाहा / ऐका : - http://www.youtube.com/watch?v=u1iCCeSZi_E

In reply to by चेतन सुभाष गुगळे

>>>>कम्युनिस्ट निराशावादीच असतात आणि म्हणूनच उपेक्षितांचं सारं जग त्यांच्या कडे मोठया आशेनं पाहतं. आत्ता लक्षात आलं. चालू द्या. आमची सपशेल माघार आहे आपल्यापुढे. यापूर्वी कळत नकळत, जाणता अजाणता आपला काही उपमर्द करण्याचा प्रयत्न आमच्याकडून झाला त्याबद्दल तहे दिलसे माफी मागतो आणि यापुढे 'आजाबात' आपल्या वाटेला जाणार नाही (जाऊ शकत नाहीच म्हणा) असे जाहिर आश्वासन देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.

हे पुस्तक ना धड करमणूक करते ना धड तथाकथित 'दिव्यत्वाची अनुभुती' देते. वेळ वाया गेला असेच वाटले पुस्तक वाचून.

In reply to by मराठी_माणूस

परदेशी पुरस्कार मिळविणारी भारतीय लेखकांची पुस्तके अशीच असतात. उदाहरणार्थ अरविंद अडिगाचा टायगर.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आणखी एक नाव, रॉबीन शर्मा फेरारि विकणारा साधू शब्दांचे बुड्बुडे निव्वळ

In reply to by सामान्य वाचक

काही वर्षांपूर्वी मी या पुस्तकाचा दावा ऐकला होता की ज्याने हे वाचलंय तो दुसर्‍याला हे पुस्तक घ्यायला प्रोत्साहित करतो. जर दुसर्‍याला हे पुस्तक आवडलं नाही असं त्यानं सांगितलं तर पहिला त्याला त्या पुस्तकाची किंमत चुकती करतो. अर्थात मला कोणी प्रोत्साहक देखिल भेटला नाही आणि मी हे पुस्तक वाचलंही नाही हा भाग वेगळा. पण हा दावा खोटा होता तर...

In reply to by सामान्य वाचक

अति सामान्य वाचक .. तुम्हीही तु मच्या मता ला पुष्ट्यर्थ कारणे लिहा

In reply to by शाहिर

करमणुक ही नाही आणि अत्मोन्नती च्या पारड्यात पण काही पडत नाही.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

उदाहरणार्थ अरविंद अडिगाचा टायगर. द व्हाईट टायगर.... असं नावं आहे ते....!! वाचलय का हो...?

In reply to by विकाल

एका मराठी वृत्तपत्रात बरंच चिरफाड करणारं समीक्षण छापून आलं होतं त्यामुळे या पांढर्‍या वाघाला सामोरं जायचा धीर नाही झाला.

In reply to by विकाल

पण मग मी पुढच्यास ठेच मागचा शहाणा ही म्हण काय उगाच वापरलीय म्हणता? दरवेळी मी स्वत:च ठेचा खाव्यात काय? दुसर्‍याने खाल्लेल्या ठेचेवरून शहाणा व्हायला नको का?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

परदेशी पुरस्कार मिळविणारी भारतीय लेखकांची पुस्तके अशीच असतात.
सरसकटीकरणाशी असहमत.
उदाहरणार्थ अरविंद अडिगाचा टायगर.
पुन्हा असहमत. अडिगांचा टायगर (फॉर अ चेंज) बरा वाटला होता.

In reply to by पंगा

पंगाजी, त्यांनी ते पुस्तक वाचलचं नै... ! नाव ही नीट माहीत नै... कुणाला तरी ठेच लागली म्ह्णून यांनी पट्टी बांधलीय हो..!!!

In reply to by मराठी_माणूस

अजिबात नाही... हे पुस्तक मला तरी खूप आवडले. सुरुवात संथ आहे पण एकदा पकड घेतली की पुर्ण केल्याशिवाय ठेववत नाही. अरुंधती रॉय तिच्या बाकीच्या शहाणपणा मुळे डोक्यात जाते हा भाग अलहिदा... पण पुस्तक वाचनीय आहे यात काही वाद नाही.

या धाग्यावर ९२ प्रतिसाद आले. यावरून एखादं पुस्तक खरंच भंपक असूनही गाजलं तर त्यात आश्चर्य वाटायचं कारण नाही हेच सिद्ध होतं. :)

बहूतांश मराठी मध्यमवर्गीय माणसे चिकटून असलेल्या संकूचित प्रवृत्तीवर जहाल पण अप्रत्यक्ष टीका करणारे व आयूष्यात कधी हार मानू नये, प्रयत्नांना शीथीलता येऊ देऊ नये व कोणत्याही परीस्थीतीत आपले जे लक्ष आहे त्याच्याकडे मार्गक्रमण करत रहावे, तूटपूज्यां व अपेक्शीत नसलेल्या सूखामधे स्वतःला कूजवू नये, इतका साधा सोपा संदेश देणारं पूस्तक आवडलं नसेल तर. आयूष्यात काय उरतं काय ? केवळ कम्यूनीझम ? हे जाणून घेण्यास उत्सूक. तूम्हाला त्यातलं काय आवडलं नाही याचा १ मूद्दा जरी सांगीतला तरी मी तूम्ही कीती चूकत आहात हे आपल्याला सहजी निदर्शनास आणू म्हणतो.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य साहेब, तूम्हाला त्यातलं काय आवडलं नाही याचा १ मूद्दा जरी सांगीतला तरी मी तूम्ही कीती चूकत आहात हे आपल्याला सहजी निदर्शनास आणू म्हणतो. >> मी सुरूवातीला एक ओळीत पुस्तकाची समीक्षा केली हे खरं पण त्यानंतर सर्वांच्या मताला मान देत मी पुन्हा तपशीलवार समीक्षा केलीय ती आपण वाचलीच नाही का? पुन्हा वाचा. सारे मुद्दे सापडतील.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

अल्केमिस्टच्या वाचकांची अशीच फरफट होते ती यात मांडलेल्या प्रचंड तत्वज्ञानामुळे. हे अतिप्रचंड तत्वज्ञान ज्या कथेच्या मानगुटीवर चढविण्यात आलंय ती अतिशय तकलादू आहे. तिला हे तत्वज्ञान अजिबात पेलवत नाही.
हॅ हाहा....
या पुस्तकातली काही सिद्धांत एकमेकांशी अजिबात जुळत नाहीत. जसे की हे दोन - "आपल्या आयुष्यात कुठल्यातरी क्षणी असं होतं की सर्व घडामोडींवरचा आपला ताबा सुटतो. आणि आपलं आयुष्य मग दैव नियंत्रीत करतं. हेच ते जगातील सर्वात मोठं असत्य आहे."
यात चूक काय आहे ?
"ती अशी शक्ती आहे जी वरकरणी तुम्हाला नकारात्मक वाटु शकते. पण प्रत्यक्षात मात्र ती तुम्हाला तुमचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग दाखवते. त्यासाठी ती तुमच्या अंतरात्म्याला-अंतर्मनाला, तुमच्या इच्छाशक्तीला तयार करते. याचं कारण म्हणजे जगातलं एक फार थोर वैश्वीकसत्य: तुम्ही कुणीही असा किंवा तुम्ही काहीही करत असा, जेव्हा तुम्हाला मनापासुन जे काही करावंसं वाटतं ते तुम्ही करावं अशी इच्छा विश्वाच्याच अंतरात्म्यात उगम पावलेली असते. ते करण्यासाठीच पृथ्वीवर तुमचं अस्तित्व असतं."
"प्रिन्सीपल ओफ फेवर वा बिगीनर्स लक" बाबत मी यावर भाष्य केलयं अपेक्षा आहे आपल्याला पटेल. तशीच ही दोन -
"आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असते, तेव्हा सगळं जगच तुमच्या मदतीला ती साध्य करण्यासाठी धावुन येतं."
- गाढवासारखं भाषांतर होय. मूळ वाक्य असं आहे "when you want something, all the universe conspires in helping you to achieve it." म्हणजेच तूम्हा हवी असलेली गोश्ट मिळण्यासाठी विश्वाकडून मदत येऊ लागते... अथवा तशा घटना घडायला सूरूवात होते, म्हणूनच जे पाहीजे ते मिळवणेच हे तूम्ही ठरवता, तूमचं नशीब न्हवे.
"तुमच्याजवळ जेव्हा सर्वोत्तम खजिना असतो आणि तुम्ही लोकांना तसं सांगायचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. "
काय चूक आहे यात ? हाताची बोटे समान नसतात लोकांची मतेही समान नसतात. काही न पटणारी वाक्यं -
"जेव्हा आपल्याला नशिबाची साथ असते, तेव्हा त्याचा फायदा घेतलाच पाहिजे. एका अर्थानं हा आपण नशिबाला दिलेला प्रतिसादच असतो. यालाच ’अनुकूलतेचा सिद्धांत’ किंवा ’नवख्याचे नशीब’ म्हणतात. "
"प्रिन्सीपल ओफ फेवर वा बिगीनर्स लक" अत्यंत बरोबर विषद केलयं. जरा सिंहावलोकन करा आपण जे काही बनायची इच्छा ठेवतो/ बनलेलो असतो/ वा त्या प्रवासात असतो, त्यात कूठे तरी एकदा आपण "लिफ्ट" झालेलो असतोच आणी हे लिफ्ट होणे आपण नियंत्रीत करत नाही. उदा y2k प्रोब्लेम सॉल्व करायला अत्यंत ऑऊटडेटेड लॅग्वेजचा सर्वात जास्त उपयोग झाला. केवळ कोबोल सारखी "फडतूस" लँग्वेज येते म्हणून अनेक मतीमंद लोक अमेरीकेत त्याकाळी जॉब मीळवू शकले जे त्या काळच्या बर्‍याच बूध्दीवान लोकांना जमले न्हवते. आणी एकदा तिकडे गेल्यावर जेव्हां कोबोलची मागणी ओसरली तोपर्यंत मंद लोकाना पूरेसा वेळ सराव व इतर अडव्हांटेज मीळाले होते इतर लँग्वेज शीकून त्यात नोकरी टीकवायला... कोणीही परत आलं नाही. यालाच म्हणतात "प्रिन्सीपल ओफ फेवर वा बिगीनर्स लक". तूमच्या इच्छा तूम्ही ठरवता.. व त्या पूर्‍या करायला universe conspire करते ते हेच. म्हणूनच सर्वात वर दीलेली दोन वाक्ये हीसूध्दा अजिबात विरूध्दार्थी नाहीत.
"प्रत्येक शोध मोहिमेची सुरुवात नवख्याच्या नशिबानंच होते. पण प्रत्येक शोध मोहिम विजेत्याच्या कठीण परिक्षेनंच संपते."
बरोबर. कोणी जन्मजात अंबानीचा मूलगा असतो तर कोणी "धनाजीराव वाकडे" सारखा कर्तूत्ववान गूणी मीपाकर. सूरूवात नशिबानंच होते व शेवट विजेत्याला सर्वप्रकारे पारखण्यात (आयूष्यातील बर्‍यावाइट अनूभवांच्या कसोटीवर जोखण्यात). काही मंद लोक मधेच थांबतात, तेव्हां काय घडते त्यांचे फार सूंदर वर्णन ओअ‍ॅसीसमधे जेव्हां मेंढपाळाला स्त्रि, पैसा व मानसन्मान मीळतो व तो खजीना शोधायचा विचार सोडून देणार असतो तेव्हां केलेलं आहे.
"तुमचं भवितव्य तुम्ही साध्य करावं यासाठी कार्यरत असणारी एक शक्ती अस्तित्वात असते. यशाची चव देऊन ती तुमच्या भुकेमध्ये वाढच करत असते. "
खरयं यशासरखी नशा नायं.
मद्याच्या समर्थनार्थ वापरलेलं हे वाक्य - "माणसाच्या तोंडात जाणारी कुठलीही गोष्ट कधीच वाईट नसते. वाईट असतं त्याच्या तोंडातुन जे बाहेर पडतं ते."
मद्याच्या का शेणाच्या की सामानाच्या समर्थनार्थ हे आहे ज्याचं त्यानं ठरवावं. लेखकाला असले फाटेफोड अपेक्षीत नाही मूद्दा जे वाइट बाहेर पडत (outcome) त्यावरती फोकस करणे हा आहे, आणी ते म्हणजे ढोसल्यानंतर जे आपण बरळतो ते होय.
अजून एक अर्थहीन वाक्य - "पाण्याचा प्रवाह खजिन्याला उघडा पाडतो आणि तो प्रवाह त्याला पुरुनसुद्धा टाकतो. "
ते वाळवंट आहे तीथे हे घडणे शक्य आहे.
आता ह्या तली मूळ कथा जर एखाद्या समुहाच्या स्वातंत्र्यलढ्याची किंवा अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या एकजुटीची असती तरी तिला हा तत्वज्ञानाचा डोलारा कदाचित पेलवलाही असता. परंतू ही तर एका व्यक्तिची कथा आहे. स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याची ही कथा लिहीताना लेखकाने नायकाला पडलेले स्वप्न खरे करण्याचा प्रवास दाखविलाय. पडलेले स्वप्न आणि पाहिले गेलेले स्वप्न यात फरक असतो. माणूस स्वप्न पाहतो तेव्हा त्यात काहीतरी भव्य, दिव्य, उदात्त असे असते. तर पडलेल्या स्वप्नांवर आपले नियंत्रण नसते आणि सहसा अशी स्वप्ने असंबद्ध असतात. जीवनाचा आनंद मिळविण्याकरिता अशा स्वप्नांची पूर्तता करण्यात काही च अर्थ नसतो.
लेखक तूमच्या स्वप्नांवर मग भलेही ती अशक्यप्राय वाटो तूम्ही कीती विश्वास ठेवता याचा परामर्श घेतोय, बाकी काही नाही.
सुरूवातीला जेव्हा आपण वाचतो की १६ व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलेला नायक धर्मगुरू व्हायचे नाकारून प्रवासातला आनंद लुटण्याकरिता मेंढपाळ व्हायचे ठरवितो आणि त्याचे वडील त्याला परवानगी व मेंढ्या खरेदी करिता भांडवलही देतात तेव्हा नायक खरंच जीवनातला अलौकिक आनंद मिळविणार अशी शक्यता वाटू लागते. पुढे नायक मेंढ्या विकून सरळ खजिन्याच्या शोधार्थ प्रयत्न करतो तेव्हा प्रयत्नवादी वाचकाची नक्कीच निराशा होते. दैववादी लोकांना कदाचित यात आनंदच वाटत असेल.
पूस्तक नीट वाचावे. तो ते का करतो हे फार व्यवस्थीत लिहलयं.
शेवटी जरी नायकाला खजिना न मिळता पुन्हा मेंढपाळाचे जीवन जगायला लागून त्यातच खर्‍या आनंदाचा ठेवा सापडतो असे दाखविले असते तरी मनाला समाधान वाटले असते. परंतू लेखकाने असे न करता नायकाला खजिना मिळाल्याचे दाखवून अंधश्रद्धेला खतपाणीच घातले आहे.
असे करणे कोषीश करने वालोंकी हार होती है असा संदेश दील्या सारख वाटत नाही काय ? किंबहूना मूलासोबत एक अल्केमेस्टही असतो ज्याला सोनं तयार करतायेत नसतं. तो दूसर्‍या अल्केमीस्टला भेटायला त्या मेंढपाळा इतकाच प्रवास करतो कश्ट करतो. व जेव्हां तो प्रत्यक्ष भेटतो तेव्हां दूसरा अल्केमीस्ट ज्याला सोनं तयार करता येतं असतं तो फक्त एव्हडच सांगतो की तूझ्याकडे असलेल्या पूस्तकात काहीही चूक नाही, तू फक्त पून्हा व्यवस्थीत प्रयत्न करं (प्रोसेस फोलो कर).... खरेतर मग मूलासोबतच्या अल्केमीस्टने निराशच व्हायला हवे होते.. पण त्याचा उत्साह प्रत्यक्षात दूणावतो व तो पून्हा पहील्या पासून तयारीला लागतो.. याला तूम्ही दैववाद म्हणाल की प्रयत्नवाद ?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतीक्रीया न वाचता प्रतीसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तूम्ही जोन्रावांच टॉप उघडं असलेलं फटू चिकटवलं असतं तर अजून मज्या आली अस्ती या धाग्यावर. काय म्हंता ?

In reply to by आत्मशून्य

मी प्रतिक्रिया एकदा वाचल्यावर नंतर ती कशाला अपडेट करायला पाहिजे? म्हणून बूच मारलं. इथे जॉन*चा काय संबंध? *हा आमचा जॉन, आमचा त्याच्यावर भारी जीव.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आँ तूमी अख्खी प्रतीक्रीया वाचली ? खरचं ? Laughing 2 मला वाटलं होत केवळ साइज पाहूनच फटू चिकटवून दीलात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही लिहू शकता आम्ही वाचूही नये काय?
हे स्टेटमेंट लिंगभेदासंदर्भात नाही असा समज झाल्याने त्याला उत्तर द्यायचे नाही असे ठरवले आहे. ;)

In reply to by आत्मशून्य

तुम्ही असा आदरार्थी उल्लेख उपरोधानेही होऊ शकतो की बा आत्मशून्या! असो. नकारात्मक तरीही अतिशय उत्तम समीक्षा कशी असावी याचं एक उदाहरण नुकतंच वाचनात आलं. ही समीक्षा वाचूनही (सदर विषयात रस असल्यामुळे असेल कदाचित) पुस्तक वाचावसं वाटलं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खाडिलकरांची समीक्षा वाचून मलादेखील आमची ही https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2… समीक्षा आठवली.

In reply to by अर्धवट

बरा कशाला होऊ? मी उत्तम आहे. तुम्ही पूर्ण व्हा. अर्धवटांशी जास्त काय संवाद साधणार? बाय द वे तुम्ही अर्धवट म्हणजे वरचे अर्धे की खालचे अर्धे?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

>>तुम्ही पूर्ण व्हा. माझाही पुर्ण व्हायचा प्रयत्न चालू आहेच, बघूया कसं जमतं ते.. >>अर्धवटांशी जास्त काय संवाद साधणार? म्हणूनच तुम्हाला लवकर बरे व्हा म्हणलं होतं मी >>बाय द वे तुम्ही अर्धवट म्हणजे वरचे अर्धे की खालचे अर्धे? तुम्हाला काय अपेक्षीत आहे?

In reply to by अर्धवट

>>अर्धवटांशी जास्त काय संवाद साधणार? म्हणूनच तुम्हाला लवकर बरे व्हा म्हणलं होतं मी >> बरी माणसं अर्धवटांशी संवाद साधतात होय? मला ठाऊकच नव्हतं? >>बाय द वे तुम्ही अर्धवट म्हणजे वरचे अर्धे की खालचे अर्धे? तुम्हाला काय अपेक्षीत आहे>> मला तुम्ही पूर्ण होणं अपेक्षित आहे. ज्या अर्ध्या भागात कमतरता त्याची आपण कृत्रिम सोय करू यात की. जयपूरफुट वगैरे कुठून तरी अनुदानित तत्वावर एखाद्या सामाजिक संस्थेकडून मिळविता येईल.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

>>बरी माणसं अर्धवटांशी संवाद साधतात होय? मला ठाऊकच नव्हतं? :) >>मला तुम्ही पूर्ण होणं अपेक्षित आहे. शुभेच्छेबद्दल धन्यवाद >>ज्या अर्ध्या भागात कमतरता त्याची आपण कृत्रिम सोय करू यात की. जयपूरफुट वगैरे कुठून तरी अनुदानित तत्वावर एखाद्या सामाजिक संस्थेकडून मिळविता येईल. हा भाग वैयक्तीक होत आहे म्हणून दूर्लक्ष केले आहे.

In reply to by अर्धवट

हा भाग वैयक्तीक होत आहे म्हणून दूर्लक्ष केले आहे.>> मला बरे व्हा अशी आज्ञा करून (छुप्या अर्थानं मी बरा नाही असं सूचित करून) वैयक्तिक शेर्‍यांना तुम्हीच तर सुरूवात केलीत. अन्यथा इतर अनेक प्रतिसाद पाहा. त्यांनी मी लिहीलेल्या समीक्षेवर बरीच टीका केली आहे पण मी त्यांच्यावर असा प्रतिहल्ला करीत बसलो नाही कारण त्यांनी ही माझ्यावर वैयक्तिक वार केला नाहीय.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही असा आदरार्थी उल्लेख उपरोधानेही होऊ शकतो की बाळ आत्मशून्या!
कूत्र्याच शेपूट वाकडं ते वाकडंच, कारलं साखरेत......... हे करा ते करा आणखी काही करा तरी कडू ते कडूच. या दोन म्हणींचा प्रत्यय आला बघा.... चालूदे चालूदे... तूम्ही एकेरीच उल्लेख करा हो. बरं वाटतं.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्यजी, तुम्ही ज्यांच्याकरिता या ईमानदार प्राण्याचा उल्लेख केलात त्यांचा या जालावरचा वावर पाहिला असता त्यांच्याबद्दल उल्लेख केल्यामुळे कुत्र्यालाही वाईट वाटेल.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

गूगळे साहेब, आपल्यात भलेही (तात्वीक)मतभेद आहेत व कदाचीत पूढे रहातीलही, पण आपण प्रदर्शीत करत असलेल्या विवीध मतांबद्दल असलेल्या आपल्या आत्मविश्वासाला माझा नम्र दंडवत इथं नमूद करतो.

In reply to by आत्मशून्य

कोबोल सारखी "फडतूस" लँग्वेज येते म्हणून अनेक मतीमंद लोक काहीही. तोंडाला येईल ते बरळु नका (हाताला येईल ते टंकु नका). तुम्हाला बर्‍याच गोष्टी माहीत नाही असे वाटते. पुस्तकाला भंपक ठरवणे आणि तुमचा वरील प्रतीसाद एकाच दर्जाचे आहेत.

In reply to by मराठी_माणूस

प्रतीसादाबद्दल धन्यवाद. वाटलच होतं कोनतरी यामूद्यावर तीर्क्यात शीरणार. :) मधूनच जरा फिरकी घ्यायची हूक्कि येते हो, फार गांभिर्याने नका घेऊ. बाकी माझा प्रतीसाद भंपक आहे असं आपण म्हणताय म्हणजे त्यात तथ्य असलचं पाहीजे नाही का ? असो. आपल्याशी सहमत.

In reply to by आत्मशून्य

केवळ कोबोल सारखी "फडतूस" लँग्वेज येते म्हणून अनेक मतीमंद लोक अमेरीकेत त्याकाळी जॉब मीळवू शकले...... एकदा तिकडे गेल्यावर जेव्हां कोबोलची मागणी ओसरली तोपर्यंत मंद लोकाना पूरेसा वेळ सराव व इतर अडव्हांटेज मीळाले होते
सर्व अम्रिकनांची सरसकट फरफट केल्याबद्दल तीव्र णीशेढ..... मंद म्हणाल्यामुळे अतितीव्र णीशेढ.... अम्रिकनांना न्याय मिळालाच पाहिजे...... (गुगळे तुमचा धागा दिड किंवा द्विशतकी होणार आहे.... माझ्या पुढील धाग्यावर ५ प्रतिक्रिया तरी यायला हव्यात...)

In reply to by वपाडाव

अबे कोणीतरी प्रिन्सीपल ओफ फेवर आणी बिगीनर्स लक फिलोसोफी बद्दल चर्चा झोडा :( ज्याला त्याला अनिवासी भारतीयांचीच काळजी राव... पावलो कोल्हो राहीलो बाजूलाच... :p

In reply to by आत्मशून्य

कोणीतरी प्रिन्सीपल ओफ फेवर आणी बिगीनर्स लक फिलोसोफी बद्दल चर्चा झोडा
आम्हाले चपातीबरोबर काय खातात हे नीट माहीत नाही.... अन ह्या काय बड्या-बड्या गोष्टी करुन र्‍हायले तुमी.... बाकी, आमचा जीव लैच तुटतो बघा या अम्रिकनांसाठी....