अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक

चेतन सुभाष गुगळे's picture
चेतन सुभाष गुगळे in जनातलं, मनातलं
17 Aug 2011 - 10:49 am

नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट हे पुस्तक वाचलं. पाऊलो कोएलो यांच्या पुस्तकाचं जगभरात प्रचंड कौतुक झालेलं असून त्याच्या अनेक भाषांत कोट्यावधी प्रती विकल्या गेल्या आहेत (अशी माहिती सदर पुस्तकाच्या शेवटच्या पृष्ठावर होती).

याचं अजिबात आश्चर्य नाही की अशी पुस्तकं लिहीली जातात. याचं देखील आश्चर्य नाही की अशी पुस्तकं छापली जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक अशी पुस्तकं पैसे (आणि त्याहून ही मुल्यवान असा वेळ) खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर अनेक ठिकाणी छापून आलेल्या या कादंबरीच्या अवास्तव कौतुकाला बळी पडूनच मी या कादंबरीच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला.

आता प्रश्न असा उरतो की हे जे कुणी या कादंबरीच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून इतरांनाही हे पुस्तक वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? (निदान माझ्यासाठी तरी हा नक्कीच अनुत्तरीत प्रश्न आहे)

या पुस्तकातून बरंच काही शिकायला मिळतं असा प्रशंसकांचा सूर आहे. मला तरी संपूर्ण पुस्तक वाचल्यावर "असलं पुस्तक वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही शिकायला मिळालं नाही.

पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी मराठीत एक म्हण आहे. माझ्या वाया गेलेल्या वेळेवरून इतरांनी बोध घ्यावा व आपला बहुमूल्य वेळ वाचवावा अशी त्यांना सावधगिरीची सूचना करण्याकरिताच हा लेखन प्रपंच.

वाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

24 Aug 2011 - 10:55 am | सामान्य वाचक

आणखी एक नाव, रॉबीन शर्मा
फेरारि विकणारा साधू
शब्दांचे बुड्बुडे निव्वळ

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 11:02 am | चेतन सुभाष गुगळे

काही वर्षांपूर्वी मी या पुस्तकाचा दावा ऐकला होता की ज्याने हे वाचलंय तो दुसर्‍याला हे पुस्तक घ्यायला प्रोत्साहित करतो. जर दुसर्‍याला हे पुस्तक आवडलं नाही असं त्यानं सांगितलं तर पहिला त्याला त्या पुस्तकाची किंमत चुकती करतो.

अर्थात मला कोणी प्रोत्साहक देखिल भेटला नाही आणि मी हे पुस्तक वाचलंही नाही हा भाग वेगळा. पण हा दावा खोटा होता तर...

सामान्य वाचक's picture

24 Aug 2011 - 11:36 am | सामान्य वाचक

पन म्या उधार घेवून वाचले होते, ते बरे झाले.

मराठी_माणूस's picture

24 Aug 2011 - 4:34 pm | मराठी_माणूस

अभिनंदन , प्रतिसादांचे शतक गाठल्याबद्दल

शाहिर's picture

24 Aug 2011 - 4:00 pm | शाहिर

अति सामान्य वाचक ..

तुम्हीही तु मच्या मता ला पुष्ट्यर्थ कारणे लिहा

सामान्य वाचक's picture

24 Aug 2011 - 9:03 pm | सामान्य वाचक

करमणुक ही नाही आणि अत्मोन्नती च्या पारड्यात पण काही पडत नाही.

उदाहरणार्थ अरविंद अडिगाचा टायगर.

द व्हाईट टायगर.... असं नावं आहे ते....!!

वाचलय का हो...?

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 2:39 pm | चेतन सुभाष गुगळे

एका मराठी वृत्तपत्रात बरंच चिरफाड करणारं समीक्षण छापून आलं होतं त्यामुळे या पांढर्‍या वाघाला सामोरं जायचा धीर नाही झाला.

म्ह्णजे तुमचं हे मत स्वःताच नै किनई...?

मग या वेळेस फाऊल...!!

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 2:57 pm | चेतन सुभाष गुगळे

पण मग मी पुढच्यास ठेच मागचा शहाणा ही म्हण काय उगाच वापरलीय म्हणता? दरवेळी मी स्वत:च ठेचा खाव्यात काय? दुसर्‍याने खाल्लेल्या ठेचेवरून शहाणा व्हायला नको का?

पंगा's picture

24 Aug 2011 - 4:25 pm | पंगा

परदेशी पुरस्कार मिळविणारी भारतीय लेखकांची पुस्तके अशीच असतात.

सरसकटीकरणाशी असहमत.

उदाहरणार्थ अरविंद अडिगाचा टायगर.

पुन्हा असहमत. अडिगांचा टायगर (फॉर अ चेंज) बरा वाटला होता.

विकाल's picture

24 Aug 2011 - 7:33 pm | विकाल

पंगाजी,

त्यांनी ते पुस्तक वाचलचं नै... !

नाव ही नीट माहीत नै... कुणाला तरी ठेच लागली म्ह्णून यांनी पट्टी बांधलीय हो..!!!

सविता's picture

24 Aug 2011 - 1:02 pm | सविता

प्रकाटाआ

अजिबात नाही... हे पुस्तक मला तरी खूप आवडले. सुरुवात संथ आहे पण एकदा पकड घेतली की पुर्ण केल्याशिवाय ठेववत नाही.

अरुंधती रॉय तिच्या बाकीच्या शहाणपणा मुळे डोक्यात जाते हा भाग अलहिदा... पण पुस्तक वाचनीय आहे यात काही वाद नाही.

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2011 - 11:18 am | नगरीनिरंजन

या धाग्यावर ९२ प्रतिसाद आले. यावरून एखादं पुस्तक खरंच भंपक असूनही गाजलं तर त्यात आश्चर्य वाटायचं कारण नाही हेच सिद्ध होतं. :)

मराठी_माणूस's picture

24 Aug 2011 - 4:37 pm | मराठी_माणूस

गुगळेंचे अभिनंदन , प्रतिसादांचे शतक गाठल्याबद्दल

आत्मशून्य's picture

24 Aug 2011 - 7:23 pm | आत्मशून्य

बहूतांश मराठी मध्यमवर्गीय माणसे चिकटून असलेल्या संकूचित प्रवृत्तीवर जहाल पण अप्रत्यक्ष टीका करणारे व आयूष्यात कधी हार मानू नये, प्रयत्नांना शीथीलता येऊ देऊ नये व कोणत्याही परीस्थीतीत आपले जे लक्ष आहे त्याच्याकडे मार्गक्रमण करत रहावे, तूटपूज्यां व अपेक्शीत नसलेल्या सूखामधे स्वतःला कूजवू नये, इतका साधा सोपा संदेश देणारं पूस्तक आवडलं नसेल तर. आयूष्यात काय उरतं काय ? केवळ कम्यूनीझम ? हे जाणून घेण्यास उत्सूक. तूम्हाला त्यातलं काय आवडलं नाही याचा १ मूद्दा जरी सांगीतला तरी मी तूम्ही कीती चूकत आहात हे आपल्याला सहजी निदर्शनास आणू म्हणतो.

चेतन सुभाष गुगळे's picture

24 Aug 2011 - 10:34 pm | चेतन सुभाष गुगळे

आत्मशून्य साहेब,

<< तूम्हाला त्यातलं काय आवडलं नाही याचा १ मूद्दा जरी सांगीतला तरी मी तूम्ही कीती चूकत आहात हे आपल्याला सहजी निदर्शनास आणू म्हणतो. >>

मी सुरूवातीला एक ओळीत पुस्तकाची समीक्षा केली हे खरं पण त्यानंतर सर्वांच्या मताला मान देत मी पुन्हा तपशीलवार समीक्षा केलीय ती आपण वाचलीच नाही का?

पुन्हा वाचा. सारे मुद्दे सापडतील.

अल्केमिस्टच्या वाचकांची अशीच फरफट होते ती यात मांडलेल्या प्रचंड तत्वज्ञानामुळे. हे अतिप्रचंड तत्वज्ञान ज्या कथेच्या मानगुटीवर चढविण्यात आलंय ती अतिशय तकलादू आहे. तिला हे तत्वज्ञान अजिबात पेलवत नाही.

हॅ हाहा....

या पुस्तकातली काही सिद्धांत एकमेकांशी अजिबात जुळत नाहीत. जसे की हे दोन -

"आपल्या आयुष्यात कुठल्यातरी क्षणी असं होतं की सर्व घडामोडींवरचा आपला ताबा सुटतो. आणि आपलं आयुष्य मग दैव नियंत्रीत करतं. हेच ते जगातील सर्वात मोठं असत्य आहे."

यात चूक काय आहे ?

"ती अशी शक्ती आहे जी वरकरणी तुम्हाला नकारात्मक वाटु शकते. पण प्रत्यक्षात मात्र ती तुम्हाला तुमचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग दाखवते. त्यासाठी ती तुमच्या अंतरात्म्याला-अंतर्मनाला, तुमच्या इच्छाशक्तीला तयार करते. याचं कारण म्हणजे जगातलं एक फार थोर वैश्वीकसत्य: तुम्ही कुणीही असा किंवा तुम्ही काहीही करत असा, जेव्हा तुम्हाला मनापासुन जे काही करावंसं वाटतं ते तुम्ही करावं अशी इच्छा विश्वाच्याच अंतरात्म्यात उगम पावलेली असते. ते करण्यासाठीच पृथ्वीवर तुमचं अस्तित्व असतं."

"प्रिन्सीपल ओफ फेवर वा बिगीनर्स लक" बाबत मी यावर भाष्य केलयं अपेक्षा आहे आपल्याला पटेल.

तशीच ही दोन -

"आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असते, तेव्हा सगळं जगच तुमच्या मदतीला ती साध्य करण्यासाठी धावुन येतं."

- गाढवासारखं भाषांतर होय. मूळ वाक्य असं आहे "when you want something, all the universe conspires in helping you to achieve it." म्हणजेच तूम्हा हवी असलेली गोश्ट मिळण्यासाठी विश्वाकडून मदत येऊ लागते... अथवा तशा घटना घडायला सूरूवात होते, म्हणूनच जे पाहीजे ते मिळवणेच हे तूम्ही ठरवता, तूमचं नशीब न्हवे.

"तुमच्याजवळ जेव्हा सर्वोत्तम खजिना असतो आणि तुम्ही लोकांना तसं सांगायचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. "

काय चूक आहे यात ? हाताची बोटे समान नसतात लोकांची मतेही समान नसतात.

काही न पटणारी वाक्यं -

"जेव्हा आपल्याला नशिबाची साथ असते, तेव्हा त्याचा फायदा घेतलाच पाहिजे. एका अर्थानं हा आपण नशिबाला दिलेला प्रतिसादच असतो. यालाच ’अनुकूलतेचा सिद्धांत’ किंवा ’नवख्याचे नशीब’ म्हणतात. "

"प्रिन्सीपल ओफ फेवर वा बिगीनर्स लक" अत्यंत बरोबर विषद केलयं. जरा सिंहावलोकन करा आपण जे काही बनायची इच्छा ठेवतो/ बनलेलो असतो/ वा त्या प्रवासात असतो, त्यात कूठे तरी एकदा आपण "लिफ्ट" झालेलो असतोच आणी हे लिफ्ट होणे आपण नियंत्रीत करत नाही. उदा y2k प्रोब्लेम सॉल्व करायला अत्यंत ऑऊटडेटेड लॅग्वेजचा सर्वात जास्त उपयोग झाला. केवळ कोबोल सारखी "फडतूस" लँग्वेज येते म्हणून अनेक मतीमंद लोक अमेरीकेत त्याकाळी जॉब मीळवू शकले जे त्या काळच्या बर्‍याच बूध्दीवान लोकांना जमले न्हवते. आणी एकदा तिकडे गेल्यावर जेव्हां कोबोलची मागणी ओसरली तोपर्यंत मंद लोकाना पूरेसा वेळ सराव व इतर अडव्हांटेज मीळाले होते इतर लँग्वेज शीकून त्यात नोकरी टीकवायला... कोणीही परत आलं नाही. यालाच म्हणतात "प्रिन्सीपल ओफ फेवर वा बिगीनर्स लक". तूमच्या इच्छा तूम्ही ठरवता.. व त्या पूर्‍या करायला universe conspire करते ते हेच. म्हणूनच सर्वात वर दीलेली दोन वाक्ये हीसूध्दा अजिबात विरूध्दार्थी नाहीत.

"प्रत्येक शोध मोहिमेची सुरुवात नवख्याच्या नशिबानंच होते. पण प्रत्येक शोध मोहिम विजेत्याच्या कठीण परिक्षेनंच संपते."

बरोबर. कोणी जन्मजात अंबानीचा मूलगा असतो तर कोणी "धनाजीराव वाकडे" सारखा कर्तूत्ववान गूणी मीपाकर. सूरूवात नशिबानंच होते व शेवट विजेत्याला सर्वप्रकारे पारखण्यात (आयूष्यातील बर्‍यावाइट अनूभवांच्या कसोटीवर जोखण्यात). काही मंद लोक मधेच थांबतात, तेव्हां काय घडते त्यांचे फार सूंदर वर्णन ओअ‍ॅसीसमधे जेव्हां मेंढपाळाला स्त्रि, पैसा व मानसन्मान मीळतो व तो खजीना शोधायचा विचार सोडून देणार असतो तेव्हां केलेलं आहे.

"तुमचं भवितव्य तुम्ही साध्य करावं यासाठी कार्यरत असणारी एक शक्ती अस्तित्वात असते. यशाची चव देऊन ती तुमच्या भुकेमध्ये वाढच करत असते. "

खरयं यशासरखी नशा नायं.

मद्याच्या समर्थनार्थ वापरलेलं हे वाक्य - "माणसाच्या तोंडात जाणारी कुठलीही गोष्ट कधीच वाईट नसते. वाईट असतं त्याच्या तोंडातुन जे बाहेर पडतं ते."

मद्याच्या का शेणाच्या की सामानाच्या समर्थनार्थ हे आहे ज्याचं त्यानं ठरवावं. लेखकाला असले फाटेफोड अपेक्षीत नाही मूद्दा जे वाइट बाहेर पडत (outcome) त्यावरती फोकस करणे हा आहे, आणी ते म्हणजे ढोसल्यानंतर जे आपण बरळतो ते होय.

अजून एक अर्थहीन वाक्य - "पाण्याचा प्रवाह खजिन्याला उघडा पाडतो आणि तो प्रवाह त्याला पुरुनसुद्धा टाकतो. "

ते वाळवंट आहे तीथे हे घडणे शक्य आहे.

आता ह्या तली मूळ कथा जर एखाद्या समुहाच्या स्वातंत्र्यलढ्याची किंवा अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या एकजुटीची असती तरी तिला हा तत्वज्ञानाचा डोलारा कदाचित पेलवलाही असता. परंतू ही तर एका व्यक्तिची कथा आहे. स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याची ही कथा लिहीताना लेखकाने नायकाला पडलेले स्वप्न खरे करण्याचा प्रवास दाखविलाय. पडलेले स्वप्न आणि पाहिले गेलेले स्वप्न यात फरक असतो. माणूस स्वप्न पाहतो तेव्हा त्यात काहीतरी भव्य, दिव्य, उदात्त असे असते. तर पडलेल्या स्वप्नांवर आपले नियंत्रण नसते आणि सहसा अशी स्वप्ने असंबद्ध असतात. जीवनाचा आनंद मिळविण्याकरिता अशा स्वप्नांची पूर्तता करण्यात काही च अर्थ नसतो.

लेखक तूमच्या स्वप्नांवर मग भलेही ती अशक्यप्राय वाटो तूम्ही कीती विश्वास ठेवता याचा परामर्श घेतोय, बाकी काही नाही.

सुरूवातीला जेव्हा आपण वाचतो की १६ व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलेला नायक धर्मगुरू व्हायचे नाकारून प्रवासातला आनंद लुटण्याकरिता मेंढपाळ व्हायचे ठरवितो आणि त्याचे वडील त्याला परवानगी व मेंढ्या खरेदी करिता भांडवलही देतात तेव्हा नायक खरंच जीवनातला अलौकिक आनंद मिळविणार अशी शक्यता वाटू लागते. पुढे नायक मेंढ्या विकून सरळ खजिन्याच्या शोधार्थ प्रयत्न करतो तेव्हा प्रयत्नवादी वाचकाची नक्कीच निराशा होते. दैववादी लोकांना कदाचित यात आनंदच वाटत असेल.

पूस्तक नीट वाचावे. तो ते का करतो हे फार व्यवस्थीत लिहलयं.

शेवटी जरी नायकाला खजिना न मिळता पुन्हा मेंढपाळाचे जीवन जगायला लागून त्यातच खर्‍या आनंदाचा ठेवा सापडतो असे दाखविले असते तरी मनाला समाधान वाटले असते. परंतू लेखकाने असे न करता नायकाला खजिना मिळाल्याचे दाखवून अंधश्रद्धेला खतपाणीच घातले आहे.

असे करणे कोषीश करने वालोंकी हार होती है असा संदेश दील्या सारख वाटत नाही काय ? किंबहूना मूलासोबत एक अल्केमेस्टही असतो ज्याला सोनं तयार करतायेत नसतं. तो दूसर्‍या अल्केमीस्टला भेटायला त्या मेंढपाळा इतकाच प्रवास करतो कश्ट करतो. व जेव्हां तो प्रत्यक्ष भेटतो तेव्हां दूसरा अल्केमीस्ट ज्याला सोनं तयार करता येतं असतं तो फक्त एव्हडच सांगतो की तूझ्याकडे असलेल्या पूस्तकात काहीही चूक नाही, तू फक्त पून्हा व्यवस्थीत प्रयत्न करं (प्रोसेस फोलो कर).... खरेतर मग मूलासोबतच्या अल्केमीस्टने निराशच व्हायला हवे होते.. पण त्याचा उत्साह प्रत्यक्षात दूणावतो व तो पून्हा पहील्या पासून तयारीला लागतो.. याला तूम्ही दैववाद म्हणाल की प्रयत्नवाद ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2011 - 12:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्मशून्य's picture

25 Aug 2011 - 12:59 am | आत्मशून्य

प्रतीक्रीया न वाचता प्रतीसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तूम्ही जोन्रावांच टॉप उघडं असलेलं फटू चिकटवलं असतं तर अजून मज्या आली अस्ती या धाग्यावर. काय म्हंता ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2011 - 1:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी प्रतिक्रिया एकदा वाचल्यावर नंतर ती कशाला अपडेट करायला पाहिजे? म्हणून बूच मारलं. इथे जॉन*चा काय संबंध?

*हा आमचा जॉन, आमचा त्याच्यावर भारी जीव.

आत्मशून्य's picture

25 Aug 2011 - 1:12 am | आत्मशून्य

आँ तूमी अख्खी प्रतीक्रीया वाचली ? खरचं ?
Laughing 2

मला वाटलं होत केवळ साइज पाहूनच फटू चिकटवून दीलात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2011 - 2:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आयला, तुम्ही लिहू शकता आम्ही वाचूही नये काय?

तुम्ही लिहू शकता आम्ही वाचूही नये काय?

हे स्टेटमेंट लिंगभेदासंदर्भात नाही असा समज झाल्याने त्याला उत्तर द्यायचे नाही असे ठरवले आहे. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2011 - 6:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही असा आदरार्थी उल्लेख उपरोधानेही होऊ शकतो की बाळ आत्मशून्या!

असो. नकारात्मक तरीही अतिशय उत्तम समीक्षा कशी असावी याचं एक उदाहरण नुकतंच वाचनात आलं. ही समीक्षा वाचूनही (सदर विषयात रस असल्यामुळे असेल कदाचित) पुस्तक वाचावसं वाटलं.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 Aug 2011 - 9:35 am | चेतन सुभाष गुगळे

खाडिलकरांची समीक्षा वाचून मलादेखील आमची ही https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h... समीक्षा आठवली.

अर्धवट's picture

25 Aug 2011 - 9:50 am | अर्धवट

लवकर बरे व्हा..

चेतन सुभाष गुगळे's picture

25 Aug 2011 - 9:54 am | चेतन सुभाष गुगळे

बरा कशाला होऊ? मी उत्तम आहे. तुम्ही पूर्ण व्हा. अर्धवटांशी जास्त काय संवाद साधणार? बाय द वे तुम्ही अर्धवट म्हणजे वरचे अर्धे की खालचे अर्धे?

अर्धवट's picture

25 Aug 2011 - 10:06 am | अर्धवट

>>तुम्ही पूर्ण व्हा.
माझाही पुर्ण व्हायचा प्रयत्न चालू आहेच, बघूया कसं जमतं ते..

>>अर्धवटांशी जास्त काय संवाद साधणार?
म्हणूनच तुम्हाला लवकर बरे व्हा म्हणलं होतं मी

>>बाय द वे तुम्ही अर्धवट म्हणजे वरचे अर्धे की खालचे अर्धे?
तुम्हाला काय अपेक्षीत आहे?

>>अर्धवटांशी जास्त काय संवाद साधणार?
<< म्हणूनच तुम्हाला लवकर बरे व्हा म्हणलं होतं मी >>

बरी माणसं अर्धवटांशी संवाद साधतात होय? मला ठाऊकच नव्हतं?

>>बाय द वे तुम्ही अर्धवट म्हणजे वरचे अर्धे की खालचे अर्धे?
<<तुम्हाला काय अपेक्षीत आहे>>

मला तुम्ही पूर्ण होणं अपेक्षित आहे. ज्या अर्ध्या भागात कमतरता त्याची आपण कृत्रिम सोय करू यात की. जयपूरफुट वगैरे कुठून तरी अनुदानित तत्वावर एखाद्या सामाजिक संस्थेकडून मिळविता येईल.

>>बरी माणसं अर्धवटांशी संवाद साधतात होय? मला ठाऊकच नव्हतं?

:)

>>मला तुम्ही पूर्ण होणं अपेक्षित आहे.
शुभेच्छेबद्दल धन्यवाद

>>ज्या अर्ध्या भागात कमतरता त्याची आपण कृत्रिम सोय करू यात की. जयपूरफुट वगैरे कुठून तरी अनुदानित तत्वावर एखाद्या सामाजिक संस्थेकडून मिळविता येईल.

हा भाग वैयक्तीक होत आहे म्हणून दूर्लक्ष केले आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 Aug 2011 - 11:50 am | चेतन सुभाष गुगळे

<<हा भाग वैयक्तीक होत आहे म्हणून दूर्लक्ष केले आहे.>>

मला बरे व्हा अशी आज्ञा करून (छुप्या अर्थानं मी बरा नाही असं सूचित करून) वैयक्तिक शेर्‍यांना तुम्हीच तर सुरूवात केलीत. अन्यथा इतर अनेक प्रतिसाद पाहा. त्यांनी मी लिहीलेल्या समीक्षेवर बरीच टीका केली आहे पण मी त्यांच्यावर असा प्रतिहल्ला करीत बसलो नाही कारण त्यांनी ही माझ्यावर वैयक्तिक वार केला नाहीय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2011 - 7:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असो. ही लिंक दिल्याचा अर्धवटशेटना फायदा झाल्याचे दिसते.

आत्मशून्य's picture

25 Aug 2011 - 9:32 pm | आत्मशून्य

तुम्ही असा आदरार्थी उल्लेख उपरोधानेही होऊ शकतो की बाळ आत्मशून्या!

कूत्र्याच शेपूट वाकडं ते वाकडंच, कारलं साखरेत......... हे करा ते करा आणखी काही करा तरी कडू ते कडूच. या दोन म्हणींचा प्रत्यय आला बघा.... चालूदे चालूदे... तूम्ही एकेरीच उल्लेख करा हो. बरं वाटतं.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 Aug 2011 - 11:24 pm | चेतन सुभाष गुगळे

आत्मशून्यजी,

तुम्ही ज्यांच्याकरिता या ईमानदार प्राण्याचा उल्लेख केलात त्यांचा या जालावरचा वावर पाहिला असता त्यांच्याबद्दल उल्लेख केल्यामुळे कुत्र्यालाही वाईट वाटेल.

आत्मशून्य's picture

26 Aug 2011 - 1:02 am | आत्मशून्य

गूगळे साहेब, आपल्यात भलेही (तात्वीक)मतभेद आहेत व कदाचीत पूढे रहातीलही, पण आपण प्रदर्शीत करत असलेल्या विवीध मतांबद्दल असलेल्या आपल्या आत्मविश्वासाला माझा नम्र दंडवत इथं नमूद करतो.

मराठी_माणूस's picture

25 Aug 2011 - 9:20 am | मराठी_माणूस

कोबोल सारखी "फडतूस" लँग्वेज येते म्हणून अनेक मतीमंद लोक

काहीही. तोंडाला येईल ते बरळु नका (हाताला येईल ते टंकु नका). तुम्हाला बर्‍याच गोष्टी माहीत नाही असे वाटते.
पुस्तकाला भंपक ठरवणे आणि तुमचा वरील प्रतीसाद एकाच दर्जाचे आहेत.

आत्मशून्य's picture

25 Aug 2011 - 9:18 pm | आत्मशून्य

प्रतीसादाबद्दल धन्यवाद. वाटलच होतं कोनतरी यामूद्यावर तीर्क्यात शीरणार. :) मधूनच जरा फिरकी घ्यायची हूक्कि येते हो, फार गांभिर्याने नका घेऊ. बाकी माझा प्रतीसाद भंपक आहे असं आपण म्हणताय म्हणजे त्यात तथ्य असलचं पाहीजे नाही का ? असो. आपल्याशी सहमत.

वपाडाव's picture

25 Aug 2011 - 4:12 pm | वपाडाव

केवळ कोबोल सारखी "फडतूस" लँग्वेज येते म्हणून अनेक मतीमंद लोक अमेरीकेत त्याकाळी जॉब मीळवू शकले......
एकदा तिकडे गेल्यावर जेव्हां कोबोलची मागणी ओसरली तोपर्यंत मंद लोकाना पूरेसा वेळ सराव व इतर अडव्हांटेज मीळाले होते

सर्व अम्रिकनांची सरसकट फरफट केल्याबद्दल तीव्र णीशेढ.....
मंद म्हणाल्यामुळे अतितीव्र णीशेढ....
अम्रिकनांना न्याय मिळालाच पाहिजे......

(गुगळे तुमचा धागा दिड किंवा द्विशतकी होणार आहे.... माझ्या पुढील धाग्यावर ५ प्रतिक्रिया तरी यायला हव्यात...)

अबे कोणीतरी प्रिन्सीपल ओफ फेवर आणी बिगीनर्स लक फिलोसोफी बद्दल चर्चा झोडा :( ज्याला त्याला अनिवासी भारतीयांचीच काळजी राव... पावलो कोल्हो राहीलो बाजूलाच... :p

कोणीतरी प्रिन्सीपल ओफ फेवर आणी बिगीनर्स लक फिलोसोफी बद्दल चर्चा झोडा

आम्हाले चपातीबरोबर काय खातात हे नीट माहीत नाही....
अन ह्या काय बड्या-बड्या गोष्टी करुन र्‍हायले तुमी....
बाकी, आमचा जीव लैच तुटतो बघा या अम्रिकनांसाठी....