"गणप्या "

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
24 Nov 2010 - 3:29 pm

मी पियुषा , बालपणीच्या कथा झाल्या आता वेगळा खरडते भाषा पचवा

"गणप्या "
तस आमच गणप्या लई अवखळ पण बेन हुशार हाई ,मुक्काम पोस्ट "नरसोबाची वाडी " साळा आपली चवथीपोतूर!
तिच्यात आमच गणप्या यत्ता चवथीमंदी शिकत हुत !
तस बेन लय भारी डोक्यान, पण अभ्यासात मार खातय...
हु ,तर काय सांगत हुतो तुमास्नी एकदा आमच्या गणप्याची साळा भरली शाळेत एकच मास्तर समद त्योच शिकवतोय पार भूगोलापासून विंग्रजीपर्यंत !
असाच एक दिवशी मास्तर वर्गात आल्याबरुबर पोरास्नी मनला "पोराणु आज आपण
निबंध लिवायचा तो बी ईंग्रजीमधून !" मास्तरांनी जणू बॉम्बच टाकला हाय अस सर्वे इद्यार्थ्यान वाटलय, गणप्या
मनला हन्म्याला बगा मास्तुर हिकडे आपले मऱ्हाटी लीवन्याच वांद , अन त्यात निभंद त्यो बी विंग्रजीतून

मास्तरास्नी पिसाळ चावलाय जणू!
मास्तर नि फर्मान सोडले तमाखू खाल्ली
हम्म "मधल्या
सुट्टी पोतूर निबंद व्हाया पाहिजे बर का? तवा लिवा आता बिगी बिगी इशय दिला "my dear friend "

गणप्या मनला मास्तराचा काय जातंय सांगायला, मधली सुट्टी झाली पण गन् प्याचा निबंद च नाही झाला आन मास्तर तरी कूट आलाय मधल्या येळत (खेड्यातली शाळा कारभारी मास्तरच , मनाला वाटन तेव्हा सुट्टी मास्तरची !)चला आज वाच्लोय उद्याच उद्या !
पण हनम्या म्हनला निबंद व्हाया च पाहिजे नाहीतर उद्या मास्तर बुड शेकून काढीन गणप्या आन हनम्या रात्री निबंद लिवायला बसला चवथी व्हत

पण अ ब क द येत नावात लिहिता आता काय करायचा र गणप्या? हनम्या मनला ,तू गप रे मी करतोय न इचार ह्ये बघ हनम्या आपुन निबंद म्हराठीतूनच लिवायचं असा "माय डीअर फिरेन्ड" मास्तरास्नी निस्ता वाचून दाखवू त्येला काय कळतंय कनच्या भाशत लिव् लाय त्यो?
निबंद झाला तो असा

"माय डीअर फिरेन्ड"
माय नेम इज गणप्या,
आय ह्याव सो मेनी फिरेन्ड बट तुकाराम इज माय बेस्ट फिरेन्ड
वुई आर प्लेयिंग कबड्डी इन ऑवर पटांगण टिंब टिंब टिंब .............. इति ,

निबंद झाला एकदाचा

दोग बी एकदम खुश ,
दुसरया दिवशी साळा भरली मास्तर आल तोंडात ह्यो बकाणा तमाखुचा! हिथ तिथ पिचकारया
मारीत म्हनल निबंद दिला हुता my dear father झालाय का समद्याचा?
पोर टकामका हिकड तिकड बघू लागली घुबडागत
अरे तिच्या मारी मास्तर भनजाळल !
टकूर फोडाया पाहिजे मास्तराच !
काल म्हनला हुता माय डीअर फिरेन्ड आन
आज मनतुया "माय डीअर फादर !"
तिच्यामारी झाली
का गोची काय करावा? हनम्या तर रडाया च लागला हुता पण गणप्या मनला जरा थांब इचार करून दे खूप इचार झाल्यावर गणप्या म्हनला बेस आयड्या, फिरेन्ड च्या जागी फकस्त फादर टाकयच, आर वा झाला कि निबंद काय लागतंय लिवायला
दोगांनी बी शेम टू शेम लिवला.

निबंद तयार मास्तुर मनाल आण हिकड वह्या

मास्तरांनी गणप्या ची वही घेतली आन जोरजोरात वाचू लागला

" माय नेम इज गणप्या "

आई ह्याव सो मेनी फादर बट माय फेवरेट इज तुकाराम,
वुई आर पिलेयिंग कबड्डी इन ऑवर पटांगण ...........................

मास्तर निबंद वाचून हबकला काय लिवतो र "गणप्या एकदम झकास लई भारी एक नंबर ,

हनम्या चा बी शेम to शेम तस्साच!

मास्तर जाम खुष झाला " दोघांच बी निबंद मास्तरांनी

तालुक्याच्या स्पर्धेला पाठवले आन त्यांना लगोलग बोलावण बी आल .गणप्या ,हनम्या आन मास्तर तालुक्याच्या गावी गेल स्पर्धेला मास्तरांनी इशय सांगितला हुता "माझा पहिला बस प्रवास" दोगांनी बी लई तयारी केली हुती !

स्पर्धेला पोहचल तर इशय हुता "माझा पहिला विमानप्रवास" गणप्या एकदम
गप -गार ,इमान कस असतया आपल्या बापाला बी नाही माहित लिवनार कस?
तिज्या मायला मास्तर काय ढोसून आला व्हता का ?बेन कदी बी चुकीचच सांगतया, मास्तरास्नी कोपरयात घेऊन चांगले बोकलाव नाहीतर मास्तरच नरड दाबून टाकावं अस दोगांना बी वाटल !
लई इचार झाल्यावर गणप्या नि ठरवलं बसच्या जागी इमान करायचं बास .............................
न लीवताच गेलो तर चव जाईन साळाची
निबंद लिवला

"माझा पहिला इमान प्रवास"

म्या आन माझी आई मामाच्या गावाला निगलो हुतो इमान stand वर लई गर्दी हुती ,च्या मारी हुभ राह्यला बी जागा नाही ,
थोड्या ऐलान लालपिवळ इमान आल इमानाच ड्रायवर खाली उतरला आन मनला चला चला वाडी वाडी वाडी ,नरसोबाची वाडी बसा लवकर !
मी आन आई चढलो इमानात पटकन ,आर तिच्या मारी इमान फुल भरलं हुत ,कशीबशी आयला जागा मिळाली मी मधच हुभ राहिलो तर ड्रायवर मणाल "पोरास्नी मांडीवर घेवा अक्का अडचण हुतीय जायला यायला ",म्या मांडीवर बसलो
इमानात लय गर्दी माणसाना हुभ राहायला जागा न्हाई ,वरतून त्यांची बोच्कीबाच्की , लई येळ झाला तरी इमान ढळायाचा नाव घेईना मंग आमची आय ड्रायवरला म्हन् लि " अयं भाऊ आता इमान हलवायचं काय घीणार" ? उशीर होतुया ड्रायवर मनाल, थांब जरा अक्का ५-६ भरू दे कि मन्गच हलन इमान
शेवटी ईमान एवढ खचाखच भरल, एवढी गर्दी अबाबा ,
काही लोक इमानाच्या
पायारयावर हुभी ,काही इमानाच्या टपावर तर काही इमानाला पाठीमाग लोंबकळली हुती, काही जन आतमधी इमानाच्या इंजिनवर बी बसली हुती मंग इमानाच कंडक्टर आल तिकीट तिकीट तिकीट करत बेन सुट्ट्या पैशावरून लय डाफरायचा एकेकावर ! जणू इमान त्येच्या बाचच हुत ,आता इमान धक्के धुक्के खात चालल हुत बिरेक मारला कि शेवटच पॅसिंजर फूडच्याच्या पायावर लोटांगण घालीत व्हते,इमानाच्या खिडक्यातून गार गार हवा येत हुती काही जन तमाखू खाऊन पिचकाऱ्या मारीत हुते तर काही जन बिड्या - काड्या फुकीत व्हते ,काही पेंगत हुती ,मधीच एका stand वर इमान थांबल लगीच खार शेंग दानवाला पेरुवाला ,चीक्कीवाला,पेपरवाला ,आतमधी शिरली चला चीक्क्की चीक्क्की चीक्क्की आठ आणे! म्या बी घेतली एक
इमान हालल तस पटापट उतरले समदे,
आता इमान येगान चालल हुत काहीना इमान लागतया (मळ-मळतया) म्हणून लेमन गोळ्या चघळत होती तर काही नाकाला लिंबू लावून बसली हुती माझी माय पेंगुळली हुती आन कंडक्टर चिल्लर मोजत हुता
आणि इमान चालले व्हत डूगुडूगु नरसोबाच्या वाडीला मामाच्या गावाला !

क्रम् शः
(विशेष आभार कोष्टी साहेब )

विडंबन

प्रतिक्रिया

स्वानन्द's picture

24 Nov 2010 - 3:48 pm | स्वानन्द

छान... बाकी कोष्टी साहेब आणि त्यांच्या गण्याची ष्टाईल एकदम मस्त उचलली आहे.

स्पा's picture

24 Nov 2010 - 3:57 pm | स्पा

झक्कास.........

मस्त एकदम ...
विमान प्रवास वाचताना तर खुप हसु आले .. मस्त जमले आहे एकदम

लिहित रहा ... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

पिंगू's picture

24 Nov 2010 - 7:01 pm | पिंगू

झक्कास.. हसून हसून वाट लागली...

- पिंगू

स्पंदना's picture

25 Nov 2010 - 9:30 am | स्पंदना

आयला पियु? आग काय काय खाल्ल्ल्स? येकदम भाषा बदलुन अगदी गणप्याच्या चालिवर्....त्यान कसा फिरेन्ड चा फादर केला तस्सा कि ग बाय?

भारी भारी लय भारी. झकास !

प्रशांतकवळे's picture

25 Nov 2010 - 10:11 am | प्रशांतकवळे

मी आठवीला असताना आळीतले २ मित्र पण आठवीला होते.. निबंध आला होता "my Friend"; एकाने लिहिला my farmer आणी दुसर्‍याने my father...

प्रशांत

अविनाशकुलकर्णी's picture

25 Nov 2010 - 12:56 pm | अविनाशकुलकर्णी

खुप छान..मजा आली वाचताना..आणखी येवु द्यात

राजेश घासकडवी's picture

25 Nov 2010 - 1:06 pm | राजेश घासकडवी

अजून येऊ द्यात.

चिगो's picture

27 Nov 2010 - 1:08 pm | चिगो

येकदम झ्याक जमलिया...

प्रकाश१११'s picture

8 Dec 2010 - 9:43 pm | प्रकाश१११

खरेच छान लिहिता .भाशाशैलीपण छान आहे .

शब्दांना चांगली लय आहे. आवडले लिहिता हात समजून येतो खूप शुभेच्छा !!

मेघवेडा's picture

9 Dec 2010 - 12:05 am | मेघवेडा

आरतिच्यामारी.. =)) =))

काय हे.. लै लै भारी! अजून येऊ द्या!