✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गणप्या भाग-५

प
पियुशा यांनी
Wed, 08/24/2011 - 16:54  ·  लेख
लेख
गणप्या भाग - ४ गणप्या भाग - ३ गणप्या भाग - २ गणप्या
गणप्या भाग-५
गणप्याची १० वीतल्या आषाढी -एकादशीच्या नेमाने केलेल्या वार्या बघून - बघून त्येच्या बान त्याची शाळा बंद करून त्याला म्हशी वळायचं काम दिल हुत "जिथ आडातच न्हाई तिथ पोहर्यात कुठून येणार हुत म्हणा ?" हिकड बकुळीची (गणप्याची गर्लफिरेंड) बी तीच गत ! साळा हुती तव्हा रोज रोज भेटन न्हाई ,पण ,बकुळीचा सोन्यासारखा चेहरा तरी दिसायचा वाईस बर वाटायचं ! आता हि कबुतरांची जोडी ७-८ दिसातून नेमान भेटायची कधी पाणवठ्यावर ,कधी शेतात ,कधी महादेवाच्या मंदिरात कधी ,पडक्या वाड्यात . बबन्या ,हनम्या ,शकी लई कामी पडायचे भेटीगाठी घालून देण्यासाठी . पण आज १०-१५ दिस झाल गनप्याला बकुळी भेटली तर न्हाई पण सादी दिसली बी नव्हती त्यामुळ गणप्याचा आंब्याच्या झाडाखाली ,हाताची उशी करून वाळलेली काडी चावत कसला तरी इचार चालू हुता. हनम्या :” ए भो गणप्या,कसला इचार चालला कवाधारण ?” म्या कित्ती येळाचा बघतुया तुझ ध्यानाच न्हाई म्या काय बोलतु त्येज्यावर? कुठ समाधी लावलीसा म्हाराज? आम्हाला बी कळून द्या कि ? गणप्या : -आर काय सांगू हणम्या? १०-१५ दिस झाल राव बकुळीच त्वांड बी न्हाई दिसलं बोलायचं लांब बघन बी मुश्कील झालाय राव ! लई अवघड झाल राव आन त्यात मागल्या हप्त्यात बकुळीला मागण आल हुत ,पाव्हन बघून गेल्यात तिला ,शकी सांगत हुती मला ! तवापासून तहानभूक, झोप समद उडलाय भो आपलं श्या ....कशातच विंटरेष्ट नाही राह्यला भो आपल्याला ! माझी बकुळी दिसायला कशी ग्वाड हाये कुणाच्या बी मनात भरण लगीच म्हणून नुसत धाकधुक हुतय मला ! कस भेटाव बकुळीला ? हाच इचार कर्तुय मगापासुन . बबन्या : - "हात्तीच्या अस हाय व्हाय, आम्ही हावोत कि राव राघू - मैना ची भेट घडवाया , आप फकस्त हुकुम करो .. गणप्या : -" आर बबन्या ,जव्हा बघावं तवा तिची टम्मन आत्या तिच्याबरुबरच असतीया आन तिच्या समोर म्या तोंडातून ब जरी काढला तरी मला एका गुच्चीत गार करीन ती ! पैलवानच हाय त्यो नववारीतला ! बबन्या :- काय कराव मंग ?बकुळा वाहिनीला भेटल्या बिगर कस समजल काय मामला हाय त्यो? काय तरी डोस्क चालवू कि "अस म्हणत तीघ बी आयड्या शोधाया लागले . हणम्या आंब्याच्या झाडाच्या फांदीकड एक डोळा बारीक़ करून वर बघत हाताची घडी घालून ,एक बोट आपल्याच हनुवटीवर सारख सारख मारून इचार कराया लागला बबन्या : वर काय बघतुस माकडा? "आयड्या काय फांदीला लटकली हाये ? येड कुठच " पाचेक मिनिट झाल तसा हनाम्या : “आयड्या गावली “! गणप्या आन बबन्या त्वांड वासून हनाम्याकड बघाया लागले तस हनाम्या चाचरत म्हणाला " आस का बघताय भो ? नाही म्हंजी मला बी डोक हाय " बबन्या :- आस्स , अय भाऊ लय शैनिंग मारायचं काम न्हाई लवकर बोल काय आयड्या हाय ती ? हनाम्या :- ऐका मंग फुडल्या मंगळवारी जत्रा हाय शेजारल्या वाडीची ,तिथ भेटाव म्हणतु म्या, बेस आयड्या हाय, कस्स, ? हाय कि न्हाई मंग ..........?. गणप्या ( प्रेमाने) : हनाम्या आर लांब का उभा हैस असा? जवळ ये कि काय भारी आयड्या हाये, तसा हनम्या ऐटीत मानला झटका देऊन जवळ आला गणप्या :- “ए बबन्या जरा त्ये टीपरु घे रे याच्या बुडावर बसवतो दोन तीन ,त्याच्याशिवाय डोस्क ठिकाणावर न्हाई यायचं याच ! हिथ तिला एकटीला भेटायचं तरी बी बोबडी वळतिया माझी आन तू जत्रेत घिऊन जायला सांगतो ? आईशान तिज्या बापाला जर कळल ना ,तर माझ मडक आताच फोडीन , बारा गावाचे बारा लोक येतीन तिथ कुणी वळखील म्हणजे "बाराच्या भावात का ? हनम्या :- आर बाबानो ऐकून तर घ्यावा फुडल्या मंगळवारी आपल्या वाडीत पारायण आहे टेकडी वरल्या साधू बाबाच ! कुणी बी न्हाई मोकळ तिकड, जत्रात यायला समजल ,समदी वाडी हिकडच बीजी हाय गावाचा कार्यकर्म सोडून जत्रा फिरायला कोण जातय? बबन्या : - वा र गड्या ,ह्ये तर ध्यानातच न्हाई आल बघ, बेस आयड्या हाय गणप्या काय म्हणतु ? गणप्या :- पण बकुळीला कस जमल ? तिचा खवीस बाप असा कसा सोडीन तिला दिसभर ?लय चांभार चौकश्या करीन तिला ! बबन्या :- आर मंग शकी काय कामाची (बबन्याची आयटम) ती बकुळीची मैत्रीण हाये करतो म्या समद यवस्थित तू काय बी काळजी नको करू झाल... गणप्या समदा आठवडाभर मंगळावर कधी उजाडलं याची वाट पाहत बसला गणप्यान मनातल्या मनात लई भारी प्लानिंग करून ठेवल हुत बकुळी माझ्या बरुबर त्ये बी अक्खा दिस काय मज्जा येईल तिचा गोरा हात माझ्या हातात ,मी हे करिन , मी ते करिन , ह्ये असले विचार करून करून गनप्याला स्वप्नात बी जत्राच दिसायची शेवटी मंगळवार उजाडला एकदाचा , गनप्यान आंघोळ केली ,सायकल भी धुवून पुसून रेडी चकाचक ! न्हाव्याकडून आदल्या दिवशीच खरडून घेतली हुती आधीच एव्हढा (?) उजळ वर्ण होता त्यावर क्रीम आन पाऊनडर लावल्यामुळ गणप्या एकदम खारा शेंगदाणा दिसत हुता नवीन फुलाफुलांचा सदरा अन ,काळा गॉगल, केसांची ( कोंबडा छाप) ष्टाईल ! असा गनप्याचा थाट बघून बबन्या म्हणाला " हल्ले काय दिसतो रे बाप्पा . डीकटू अजय देवगण " गणप्या हवेत ,गणप्या लाजला, गणप्यान लगेच मानेला झटका देऊन कोंबडा हलवला तीघ बी पटापट गावाच्या खालच्या रस्त्यानी येशिजवळ पोचले , बकुळा आन शाकी आधीच येऊन पोचल्यात बी , बकुळिला पाहून गणप्या बेशुद्ध व्हायचाच राह्यला होता मायला गोरी ठेंगणी बकुळी ,काय दिसत हुती लाल साडीत ! गणप्याच्या अंगावर सरकन काटा आला आज फकस्त मी अन बकुळा ना तिच्या बापाचा धाक , ना हनम्या आन बबन्याच लेन्डार माग ,मी अन माझी बकुळा फकस्त ! बकुळा पण आधीच लय खुशीत होती ,गणप्या बरुबर जत्रेत फिरायचा एव्हढा भारी चानस मिळाला होता म्हणून गणप्या नुसता बकुळीकड बघत हुता "मला जत्रेत शिनेमा दाखवशीन ? मला बांगड्या ,टिकल्या ,लाली पावडर घेऊन देशीन? हे करशीन त्ये करशीन ? मला ह्ये अन मला त्ये ,बकुळीच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला बकुळीचा शंबर साठ शर्तीना बैलागत मान डोलावत गणप्या हा हा म्हणत होता गणप्या : हा हा देईन तुला जे पाहिजे त्ये घिऊन देईन आधी मला सांग तुझा बाप तुला नवरदेव शोध्तुया अस ऐकल म्या म्हणजी तू ?म्हणजे अस ?म्हणजे तु लगिन करणार? बकुळा :- शोधू दे कि म्या थोडीच करणार हाये तुझ्या शिवाय तुला "नदीवरच्या पाणवठ्यावर ,महादेवाच्या मंदिरा बाहेरच्या आंब्याच्या झाडाखाली प्रामीस केल ना तुला मी मंग ? गणप्या :- पण तुला बघाया कुणी पाहून आल हुत त्येच काय ? बकुला : - त्ये एड व्हय " एक डोळा हेकणा आन किधर भी देखणा" माझ्या बापालाच न्हाई आवडला त्यो ! आन तसा बी कुणी मला दमात घेतली तर सरळ बाड बिस्तरा घेऊन तुझ घर गाठीन मी समजल का ? आस म्हणत बकुळा सायकलच्या फुडल्या नळीवर बसली तसा गणप्या गडबडला सायकल बी गडबडली कशी बशी सावरत गणप्यान सायकल हाकायला सुरुवात केली , "कित्ती कित्ती गुणाची हाय माझी बकुळी हा वाईस थोडी डांबराट हाये अन थोडी भांडकुदळ बी पण चालून जातंय " गणप्या मनातल्या मनात हवेत उडत होता ,गालातल्या गालात लाजत हुता आण हसत हुता बकुळेचे भुरे केस गणप्याच्या नाकात जात होते ,गुद्-गुल्या करीत होते बकुळी गान गुणगुणत हुती ,असा सोन्याचा दिस सम्पु न्हाई अस राहुन राहुन गण्प्याला वाट्त होत्, काय ती बकुळी ,काय तिचे मोठे मोठे काळे टपोरे डोळे काय तिचा रंग ,काय तीच धारदार नाक अगदी हिरोईन हाय माझी बकुळी ! अस मनातल्या मनात म्हनत गनप्या लाजला . :) क्रमश :

Book traversal links for गणप्या भाग-५

  • ‹ गनप्या (भाग-४)
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा

प्रतिक्रिया द्या
4379 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

गुनाची पियु गं ती !!

पल्लवी
Wed, 08/24/2011 - 17:20 नवीन
टम्मन काय, गुच्ची काय, खारा शेंगदाना काय... :D ले भारी.. धरून फट्य्य्य्याक लिवलयं बया !
  • Log in or register to post comments

मस्त .. पुन्हा लिहित्या

गणेशा
Wed, 08/24/2011 - 17:36 नवीन
मस्त .. पुन्हा लिहित्या झाल्याचं पाहुन छान वाटलं ... वाईच मागच्या भागांची लींक पण द्यायची की पण..
  • Log in or register to post comments

.

नन्दादीप
Wed, 08/24/2011 - 17:42 नवीन
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

बर्याच दिवसानी गनप्याचा भाग

पियुशा
गुरुवार, 08/25/2011 - 10:42 नवीन
बर्याच दिवसानी गनप्याचा भाग लिहिला तेव्हा लिन्क देण महत्वाच आहेच पण कुनी मला सान्गाल का प्लिज जुन्या भागान्ची लिन्क कशी द्यावी? ,मला जमत नाहिये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

:)

आत्मशून्य
Wed, 08/24/2011 - 17:39 नवीन
मस्त लिहलयं. तेच तेच वाटतयं पण कंटाळा येत नाही वाचायचा.
  • Log in or register to post comments

गनप्या इज ब्यॅक.. - पिंगू

पिंगू
Wed, 08/24/2011 - 20:17 नवीन
गनप्या इज ब्यॅक.. - पिंगू
  • Log in or register to post comments

<<पैलवानच हाय त्यो नववारीतला

स्पंदना
गुरुवार, 08/25/2011 - 06:57 नवीन
<<पैलवानच हाय त्यो नववारीतला >> >>गणप्या एकदम खारा शेंगदाणा दिसत >> >>बकुळीचा शंबर साठ शर्तीना बैलागत मान डोलावत गणप्या हा हा म्हणत होता >> >> एक डोळा हेकणा आन किधर भी देखणा>> धमाल डायलॉग पियु. मस्त. आता पुढचा भाग लवकर टाक, स्मरणशक्तीला फार ताण द्यावा लागला शीर्षक वाचल्यावर, पण कथा वाचायला लागल्या बरोबर लिंक लागली.
  • Log in or register to post comments

छान! छान!

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 08/25/2011 - 07:07 नवीन
उत्तम! चांगलं लिहिलं आहेस! फक्त, (जमल्यास) अजुन थोडं शुद्ध लिही बघु बाळ! ;) :P
  • Log in or register to post comments

जरा वेळानंच लिंक लागली, आणि

५० फक्त
गुरुवार, 08/25/2011 - 07:38 नवीन
जरा वेळानंच लिंक लागली, आणि मध्ये मध्ये धनाजीरावांच्या कथेला समांतर चाललो होतो, पण बाज एकदम मस्त. काही डायलाक तर लइ झ्याक. एवढं छान छान लिहिताय मग कशाला उगा जिलब्या पाडताय खाली उजव्या काल्मात वर डाव्या काल्मात्च दावेदारि टाका की.
  • Log in or register to post comments

+१

स्पा
गुरुवार, 08/25/2011 - 10:35 नवीन
धमाल आली वाचताना मस्त लीव्लयेस
  • Log in or register to post comments

भाषेचा बाज पाहून नगरकरांच्या

गवि
गुरुवार, 08/25/2011 - 10:41 नवीन
भाषेचा बाज पाहून नगरकरांच्या "रामनगरी"ची आठवण झाली. तो भन्नाट मनुष्य असेच लिहायचा. सगळे भाग लिहून झाले की एकसंध करुन पुस्तक काढा.
  • Log in or register to post comments

छान लिहीलय

जाई.
गुरुवार, 08/25/2011 - 12:02 नवीन
मस्त :)
  • Log in or register to post comments

@ गवि भाषेचा बाज पाहून

पियुशा
गुरुवार, 08/25/2011 - 14:53 नवीन
@ गवि भाषेचा बाज पाहून नगरकरांच्या "रामनगरी"ची आठवण झाली. तो भन्नाट मनुष्य असेच लिहायचा. सगळे भाग लिहून झाले की एकसंध करुन पुस्तक काढा. आपली प्रती.वाचुन कॉलर ताठ झालिये ,धन्स हो :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा