हा आयटिच्या सर्व मुलांचा दोष असावा

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
7 Aug 2010 - 8:22 am

आमची प्रेरणा हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा

हा आयटिच्या सर्व मुलांचा दोष असावा
सैपाकाचा वर्थ कसा त्यांना उमजावा

कधीतरी भेंडीची भाजी मला जमावी
कधीतरी मज भात मसालेही समजावा

घर-ऑफिस ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये
सैपाकाचा वेळ कसा सांगा बसवावा

युगे बदलली काळ बदलला किती बघा हा
पतीपत्नी संवाद ट्विटरनेच घडावा

करू कशाला घरी परतल्यावर मी कामे
पती कामसू आणिक सुग्रण मज लाभावा

उगाच चर्चा तू तेव्हा केली तायांशी
राग तुझ्यावर घरातला सगळा काढावा

अता तरी संपावी इतिहासाची चर्चा
धाग्यांमधला लोकांचा दंगा थांबावा

अजून किती मी घासू "केसु" गुर्जी सांगा
कसा लेख शतकी एखादा मी खरडावा

विडंबन

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

7 Aug 2010 - 9:03 am | शिल्पा ब

पुरे आता...फार झालं

राजेश घासकडवी's picture

7 Aug 2010 - 10:40 am | राजेश घासकडवी

अजून किती मी घासू "केसु" गुर्जी सांगा
कसा लेख शतकी एखादा मी खरडावा

मरे हुए को क्यो मारते हो? प्रायश्चित्त म्हणून स्वत:चंच विडंबन देखील लिहिलं. आणखीन काय करू सांगा की...
त्यात मी आयटीचा पण नाही...

केशवसुमार's picture

7 Aug 2010 - 5:44 pm | केशवसुमार

अस काय म्हणता गुर्जी.. तुम्हीच नाही का म्हणाला होता.. वाहत्या गंगेत आपण ही हात धूवावा..;)
(स्मरणशील)केशवसुमार

आय टी हा शब्द मिपावर निषिद्ध करावा असे वाटते...

अनिल हटेला's picture

7 Aug 2010 - 6:02 pm | अनिल हटेला

ईथुन पूढे आय टी चा अर्थ
इंटरनॅशनल टेररीस्ट असा च घ्यावा !!

;)

इंटरनेटस्नेही's picture

7 Aug 2010 - 2:23 pm | इंटरनेटस्नेही

छाण!