Skip to main content

हा आयटिच्या सर्व मुलांचा दोष असावा

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 07/08/2010 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा हा आयटिच्या सर्व मुलांचा दोष असावा सैपाकाचा वर्थ कसा त्यांना उमजावा कधीतरी भेंडीची भाजी मला जमावी कधीतरी मज भात मसालेही समजावा घर-ऑफिस ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये सैपाकाचा वेळ कसा सांगा बसवावा युगे बदलली काळ बदलला किती बघा हा पतीपत्नी संवाद ट्विटरनेच घडावा करू कशाला घरी परतल्यावर मी कामे पती कामसू आणिक सुग्रण मज लाभावा उगाच चर्चा तू तेव्हा केली तायांशी राग तुझ्यावर घरातला सगळा काढावा अता तरी संपावी इतिहासाची चर्चा धाग्यांमधला लोकांचा दंगा थांबावा अजून किती मी घासू "केसु" गुर्जी सांगा कसा लेख शतकी एखादा मी खरडावा
लेखनविषय:

वाचने 1676
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

अजून किती मी घासू "केसु" गुर्जी सांगा कसा लेख शतकी एखादा मी खरडावा
मरे हुए को क्यो मारते हो? प्रायश्चित्त म्हणून स्वत:चंच विडंबन देखील लिहिलं. आणखीन काय करू सांगा की... त्यात मी आयटीचा पण नाही...

In reply to by राजेश घासकडवी

अस काय म्हणता गुर्जी.. तुम्हीच नाही का म्हणाला होता.. वाहत्या गंगेत आपण ही हात धूवावा..;) (स्मरणशील)केशवसुमार

छाण!