इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
1 Aug 2010 - 5:26 pm

टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.)
http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!

राजकारणप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

19 Feb 2013 - 3:00 am | आजानुकर्ण

माझा वाटा अगदी खारीचाच आहे!

हीना रब्बानी खार?

सुधीर काळे's picture

21 Feb 2013 - 2:14 pm | सुधीर काळे

आजानुकर्णसाहेब, उगीच माझ्यावर "खार" नका हं खाऊ!

पैसा's picture

14 Feb 2013 - 4:56 pm | पैसा

http://www.rediff.com/news/report/chidambaram-cuts-rs-14k-cr-from-defenc...

भारताचे संरक्षण बजेट १४००० कोटी रुपये कमी केले. याचा अर्थ सगळीकडे शांतता नांदू लागली काय?

दादा कोंडके's picture

14 Feb 2013 - 6:04 pm | दादा कोंडके

माय फादर ऑल्वेज सेड, 'पीस मिन्स हॅविंग बिगर स्टीक दॅन युअर एनिमी हॅझ'- टोनी स्टार्क

पुण्याचे वटवाघूळ's picture

17 Feb 2013 - 6:46 pm | पुण्याचे वटवाघूळ

अफझलला फाशी दिल्यानंतर काश्मीर खोर्‍यात लागू केलेली संचारबंदी काल उठविण्यात आली आहे असे बातम्यांमध्ये बघितले.वास्तविक बरेच पत्रकार अफझलला फाशी दिल्यास मकबूल बटप्रमाणे तो 'हुतात्मा' होईल आणि काश्मीरी युवक यातून अजून दुरावला जाईल असे म्हटले होते.मुळात अफझल हा मकबूल बटप्रमाणे 'नेता' नव्हताच.त्याला फाशीची शिक्षा ठोठावून ६ वर्षे उलटून गेली होती तरी काश्मीरात त्याविरूध्द फारसा विरोध झालेला नव्हता.इतकेच काय तर २००८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काश्मीरी जनतेने मोठ्या प्रमाणावर भाग घेऊन आपला लोकशाही प्रक्रीयेवरच विश्वास आहे हे दाखवून दिले होते. तरीही अरूंधती रॉय, प्रफुल बिडवाई आणि इतर महामूर्ख विचारजंत/पत्रकार स्वतःचे दुकान चालवायला या अफझलल्याला उगीचच मोठे करायचा विनाकारण प्रयत्न करत होते.यांना माहित आहे की भारतात लोकशाही आहे आणि त्याच लोकशाहीने यांना वाटेल ते बरळायचा अधिकारही दिला आहे.मग आहे काय आणी नाही काय? सोडा तोंडाचा पट्टा, भले अफझल्ल्याचा हात संसदेवरील हल्ल्यात असेल, भले त्याने भारतीय लोकशाहीच्या मुळावर घाला घालायचा प्रयत्न केला असेल यांच्या बापाचे काही जात नव्हते.असल्या महामूर्खांना शक्य झाल्यास कायमचे चंद्रावर का पाठवत नाहीत हेच समजत नाही.

पुण्याचे ववा-साहेब,
अगदी खरे आहे आपले म्हणणे. इथे जकार्तात आमच्या संकुलात तीन वाहिन्या पहायला मिळतात (१) झी न्यूज, (२) NDTV India (३) NDTV 24x7. तीन्ही वाहिन्यांवर या फाशीच्या शिक्षेनंतर जी चर्चासत्रे दाखविली गेली त्यात "अफजल गुरू एक देशद्रोही व्यक्ती होती" हा मुद्दा अधोरेखित झालाच नाहीं. सगळे विद्वान लोक-अगदी 'फाशीची शिक्षाच रद्द करावी'पासून त्याच्या तारखेबद्दलच्या माहितीपर्यंतच्या-कमी महत्वाच्या मुद्द्यांनाच महत्व देताना दिसले. अर्थातच त्यात सरकारने एक मोठी चूक केली होती ती म्हणजे फाशीच्या वेळेबद्दलची माहिती अफजलच्या पत्नीला 'स्पीडपोस्ट'ने कळविणे (काय हा विश्वास आपल्याच स्पीडपोस्ट संस्थेवर!) दुसरी चूक झाली ओमार अब्दुल्लांची. त्यांना आदले दिवशी रात्री आठ वाजता ही माहिती समजल्यावर त्यांनी अफजलच्या पत्नीला कळविण्यात आले आहे काय याची चौकशीच केली नाहीं व स्वतःहूनही त्याच्या पत्नीला फोन केला नाही! एवढे करायला हवे होते.
ओमार अब्दुल्लांचा एक मुद्दा मात्र मला पटला. पूर्वी जेंव्हां राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना फाशी द्यायची वेळ आली तेंव्हां तामिळनाडूच्या नेत्यांनी ती शिक्षा न देण्याबद्दल उच्च न्यायालयात (सर्वोच्च नव्हे) अर्ज केला व त्यानुसार त्या शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर पडली. त्यावेळी ओमार म्हणाले होते कीं हेच जर आम्ही (काश्मिरींनी) अफजल गुरूबाबत केले असते तर सार्‍या देशाने काश्मिरींवर ठपका ठेवला असता, पण तामिळनाडूच्या सरकारवर अथवा तिथल्या जनतेवर कुणीच तोंडसुख घेतले नाहीं. तीच कथा बेआंत सिंग यांच्या खुन्याबद्दल. तिथेही अकाली दलाने रदबदली केली व फाशीची तारीख पुढे ढकलली. त्याबद्दलही कुणी अकाली दलावर ठपका ठेवला नाहीं! ओमार म्हणाले की अफजल गुरूला झटपट फाशी दिल्याची घटना एक अपवाद (exception) होता कामा नये. इतर लोकांनासुद्धा राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज नामंजूर केल्याबरोबर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हायला हवी. अफजल गुरूला जशी ताबडतोब फाशी दिली गेली तशी राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना, वीराप्पनच्या सहकार्‍यांना व बेआंत सिंग यांच्या खुन्यालाही झाली पाहिजे असे त्यांना सुचवायचे होते.
ओमार अब्दुल्लांचे हे म्हणणे मला तंतोतंत पटते.
आता अफजल गुरूचे पार्थीव त्याच्या कुटुंबियांना देण्याबाबतही 'कब्बड्डी-कब्बड्डी' सुरू झाली आहे. बघू पुढे काय होते ते!

आजानुकर्ण's picture

19 Feb 2013 - 2:58 am | आजानुकर्ण

453 वा प्रतिसादः

(२) NDTV India (३) NDTV 24x7.

या दोन्ही वाहिन्या वेगवेगळ्या असून एकाच विषयावर वेगवेगळी चर्चासत्रे दाखवतात काय? की रिपीट टेलिकास्ट असते?

वीरप्पनच्या सहकाऱ्यांची शिक्षा दोनचार दिवसांनी उशीरा होणार असल्याचे वाचले. सर्वांनीच इसकाळ वर वाचले असेलच त्यामुळे दुवे देत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

19 Feb 2013 - 3:16 am | श्रीरंग_जोशी

NDTV India हिंदी आहे व NDTV 24x7 इंग्रजी. चर्चासत्रांचे बरेच विषय सारखे असले तरी सामील होणारी मंडळी वेगवेगळी असतात.

आजानुकर्ण's picture

20 Feb 2013 - 2:04 am | आजानुकर्ण

माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद.

(इंच इंच लढवू)

श्रीरंग_जोशी's picture

21 Feb 2013 - 1:44 am | श्रीरंग_जोशी

नजिकच्या भविष्यात अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यावर काश्मीर प्रश्नावर होणारे परिणाम यावर काळेकाकांचे व निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांची मते जाणून घेण्यास उत्सुक आहे...

प्रसाद१९७१'s picture

21 Feb 2013 - 6:04 pm | प्रसाद१९७१

ऱोज १ मिटर नी माघार घेतली तरी पाकिस्तान बाँबे पर्यंत पोहचायला ५४०० वर्ष लागतील.
रोज १०० मिटर नी माघार घेतली भारतानी तरी आपली काही हरकत नाही.

नाना चेंगट's picture

21 Feb 2013 - 10:52 pm | नाना चेंगट

४६२.

थोडं राहिलं आता.. ३८ दिवस ३८ प्रतिसाद.. होउन जाईल ५०० आरामात हाकानाका

यशोधन वाळिंबे's picture

23 Feb 2013 - 6:44 pm | यशोधन वाळिंबे

अंधार होत चाललाय दिवा पाहिजे | या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे ॥ नेते झाले अफ़जलखान,काश्मिरचे झाले स्मशान। शायिस्तेखानची बोटे तोडण्यासयुवा पाहिजे। या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे..॥

नितिन थत्ते's picture

23 Feb 2013 - 7:51 pm | नितिन थत्ते

यशोधन वाळिंब्यांवरच आता भिस्त आहे.

नाना चेंगट's picture

23 Feb 2013 - 11:24 pm | नाना चेंगट

असे हातपाय गाळू नका तुम्ही सुद्धा काहीतरी भरीव करु शकता.

(वाढतोय आकडा)

अर्धवटराव's picture

26 Feb 2013 - 1:41 am | अर्धवटराव

=))
"गळालेले हातपाय" आणि "भरीव" कामगिरी यावर दादा कोंडके स्टाईल हुच्च कोटी इमॅजीन केली =))

अर्धवटाराव

यशोधन वाळिंबे's picture

26 Feb 2013 - 5:32 pm | यशोधन वाळिंबे

आजपर्यंत एक म्हण खटकत होती,

"शिवाजी जन्मो पण शेजारच्या घरात" अस कोणी कस म्हणु शकेल ??
असो आज खात्री पटली..

प्यारे१'s picture

23 Feb 2013 - 8:10 pm | प्यारे१

मी अजून एकही प्रतिसाद दिला नाही ह्या धाग्यावर... स्वारी शक्तीमान!

आपल्याला ह्याच्यातलं काय कळत न्हाय द्येवा! :)

धन्या's picture

26 Feb 2013 - 1:50 am | धन्या

काही कळत नाही म्हणत एक प्रतिसाद तुम्हीही दिलातच की.

(असं म्हणून मी ही एक प्रतिसाद दिला. एकदाचे पाचशे पुर्ण होऊद्या. म्हणजे काहीतरी टाईमपास प्रतिसाद देऊन धागा वर आणला जाणार नाही.)

प्यारे१'s picture

26 Feb 2013 - 6:34 pm | प्यारे१

अहो एवढ्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही असा कसा काय टाईमपास करु शकता धनाजीराव????

आम्ही आपलं प्रांजळपणे कबूल केलं झालं तुम्हाला असं काहीही कसं वाटतं?
टाईमपास करायचाच झाला तर तुम्ही तुमच्या सखूला बोलवा परत एकदा.

आजानुकर्ण's picture

26 Feb 2013 - 6:53 pm | आजानुकर्ण

सहमत आहे (४७२)

नाना चेंगट's picture

27 Feb 2013 - 11:30 pm | नाना चेंगट

अनुमोदन (४७३)

नितिन थत्ते's picture

28 Feb 2013 - 9:32 am | नितिन थत्ते

असेच म्हणतो. (४७४)