Skip to main content

इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 01/08/2010 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा. मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.) http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात! असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल! या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा! राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in जय हिंद!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 215081
प्रतिक्रिया 474

प्रतिक्रिया

चांगला ११ किलोमीटर एलओसी च्या आत आला होता. व एक दिवस मुक्काम केला होता. त्याच वेळी आपल्या जागृत(?)सैनिकानी त्याला यमसदनी धाडला असता तर कारगिल झाले नसते.

In reply to by नितिन थत्ते

नितिन, मोदी येणे शक्य नाहीं कारण आजच्या 'भाजपा पक्षा'त पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल एकमत होणे शक्य नाहीं आणि NDA ला बहुमत मिळाले आणि मोदींबद्दल एकमत झाले नाहीं तर पंतप्रधानपदाची जयमाला गळ्यात घालून घ्यायला "विंगे"त आडवानीजी 'तय्यार' उभेच आहेत मान झुकवून! पण 'लाल'कृष्णजींच्या हस्ते एकदा तरी 'लाल' किल्ल्यावर तिरंगा फडकवला जावा असे मात्र मलाही वाटते....!

ए ऽ ऽ धत्तड तत्तड ४०० झाले रे प्रतिसाद!!!! ५०० आणि १००० करून या धाग्याला एकहजारी मनसबदारी बहाल केल्या जाऊन मिपाच्या हॉल ऑफ फेम मध्ये हा शानसे लागावा अशी अरजी मिपास्वामींचे चरणी दाखल करत आहोत. - सेवेचे ठायी तत्पर. वेनकुलोद्भव ब्रूसाजी बिन थॉमसाजी निरंतर.

आजच टाईम्स नाऊ वर बघितले की हुरियत कॉन्फरन्सचा नेता यासीन मलिक पाकिस्तानात जाऊन २६/११ चा मास्टरमाईंड हाफिझ सईदला जाऊन भेटला.या कृत्याला देशद्रोही कृत्य का म्हणू नये आणि त्याच्यावर कारवाई का करू नये? याविषयी आपले मत काय?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

यासिन मलिक जम्मु काश्मीर लिबरेशन फ्रंटचा संस्थापक नेता आहे. त्याने (अंदाजे) दोन दशकांपूर्वी शस्त्रे ठेवली असली तरी त्यानंतरही अनेकदा त्याने तुरूंगाची हवा खाल्लेली आहे. काही वर्षांपूर्वीच त्याने पाकिस्तानी स्त्रीबरोबर विवाह केला असल्याने पाकिस्तानी व्हिसावर तो तिकडल्या वार्‍या करत असतो. त्याने नेहमीच स्वतःत्र काश्मीरचा पुरस्कार केलेला आहे. या कृत्याबद्दल त्याच्यावर भारत सरकारने कायदेशीर कारवाई केल्यास नेमके हाती काय लागेल?

In reply to by श्रीरंग_जोशी

त्याने नेहमीच स्वतःत्र काश्मीरचा पुरस्कार केलेला आहे. या कृत्याबद्दल त्याच्यावर भारत सरकारने कायदेशीर कारवाई केल्यास नेमके हाती काय लागेल?
स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार करत असेल तर (एक वेळ) समजण्यासारखे आहे पण २६/११ च्या सूत्रधाराबरोबर स्टेज शेअर करणे कसे समर्थनीय आहे? पण त्याच्या स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार करायच्या अधिकाराबरोबरच हाफिज सईदच्या २६/११ करायचा अधिकारही मान्य केला नाही तर स्वतःला मानवतावादी म्हणवत नसावे अरूंधती रॉय आणि त्या पठडीतल्या इतरांना.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

कारवाई केल्याने यासीन मलिक बदलणार की त्याच्या समर्थकांना जरब बसणार? काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांनी यापूर्वीही पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानचे दौरे केले आहेत व त्यामध्ये भारतावर केल्या जाणाऱ्या सूत्रधारांना भेटले नाहीत असा दावा कुणीच करू शकत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

यासीन मलिक नक्कीच बदलणार नाही. पण एक देश म्हणून या बाबतीत आपला काही स्टॅन्ड आहे की नाही? भारतावर उघड-उघड हल्ला करणार्‍याला, दोनशे भारतीयांना ठार मारणार्‍या माणसाला भेटून यासीन मलिकने त्याला भारताविषयी काही वाटत नाही हे अगदी सिध्द केले आहे.मग अशाला भारतात का म्हणून ठेऊन घ्यायचे? १९४७ मध्ये एक फाळणी झाली ती चूक परत करता कामा नये.इतर कोणाला भारतात राहायचे नसेल तर अशांनी पाकिस्तानात खुशाल चालते व्हावे पण या देशाची टाचणीच्या टोकावर मावेल इतकीही जमीन तुम्हाला मिळणार नाही असे आपण ठणकावून सांगणार की नाही? की दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेले लोक कधीच न दिसणार्‍या पण कोर्टाने रितसर दोषी ठरविलेल्यांना फाशी दिले की मग नक्राश्रू ढाळणार्‍या ढोंगी मानवाधिकार वाल्यांचे पित्ते भारत सरकार आहे असे मानायचे का? आणि कारवाई करून नक्की काय होणार हा प्रश्न २६/११ मध्ये बळी पडलेल्या कोणाच्या बायकामुलांपुढे जाऊन विचारायचे धैर्य आहे का तुमच्यामध्ये?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

अशा बाबतीत अतिउत्साह अडचणीत आणत असतो. आपल्याला जे साध्य करायचे आहे ते असे रुसवे फुगवे दाखवून होणार नाही. हे काही नळावरचे भांडण नाहीये. या इथे मराठी आंतरजालावर अनेक जालकंटक मोठ्या मोठ्या डौलाने मिरवत असतात. त्यांना इशारे दिल्याने, कारवाई केल्याने त्यांचे कारनामे थांबले आहेत का?

In reply to by बॅटमॅन

भारत सरकारची कृती विचारपूर्वक व परिणामकारकच असावी. भारत सरकारकडून काही आगळीक व्हावी यासाठीच मलिक व हुरियतवाल्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात की जेणेकरून तेथील नव्या पिढीला भारताविरुद्ध भडकवता यावे. सौ सुनारकी एक लोहारकी हे धोरणच योग्य ठरेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

काश्मीर खोरे हा (बहुदा) एकमेव प्रांत आहे जिथे हिंदू-मुस्लिम दंगली कधीच झाल्या नव्हत्या.काश्मीरी लोकांना जर वेळीच नोकर्‍या,शिक्षणव्यवस्था,रस्ते,पाणी,वीज इत्यादी दिले गेले असते तर काश्मीरी युवक कधीच चुकीच्या वाटेला गेला नसता. पण अब्दुल्ला कुटुंबियांनी (आणि इतरही राज्यकर्त्यांनी) अत्यंत ढिसाळ प्रशासनाचा नमुना दिला आणि त्यातून काश्मीरी युवक एलिनेट झाला. अजूनही काश्मीरात या मूलभूत गोष्टी दिल्या तर यासीन मलिकवर कितीही कारवाई केली तरी काश्मीरी लोक त्यामुळे काडीमात्र भडकावले जाणार नाहीत.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

इतर ठिकाणांसारख्या दंगली झाल्या नसतील पण ८९-९० मध्ये मशीदीमधून निर्वाणीचे इशारे देऊन व अनेक हिंदूचे प्राण घेऊन त्यांना काश्मीरमधून हुसकावण्यात आले होते. त्यातले अनेक आजही जम्मूतील किंवा दिल्लीमधील निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहत आहेत. फार पूर्वीचे माहीत नाही पण गेल्या काही वर्षांत तेथील पायाभूत सुविधांमध्ये कमालीची सुधारणा झालेली आहे. काही महिन्यांपूर्वीच मी काश्मीरमध्ये जाऊन आलोय. लहानसहान खेड्यांमध्ये सुद्धा शाळेत जाणारे विद्यार्थी बहुसंख्येने दिसत होते. या सर्व सकारात्मक बाबी आहेतच त्यामुळे भारत सरकारने थोडा अधिक संयम दाखवून पुढची पायरी गाठावी हि अपेक्षा आहे.

पण एक देश म्हणून या बाबतीत आपला काही स्टॅन्ड आहे की नाही? भारतावर उघड-उघड हल्ला करणार्‍याला, दोनशे भारतीयांना ठार मारणार्‍या माणसाला भेटून यासीन मलिकने त्याला भारताविषयी काही वाटत नाही हे अगदी सिध्द केले आहे.

मुशर्रफ साहेब राहुन गेले काश्मीरात LOC ओलांडुन आणि ती सुद्धा हेलिकॉप्टर ने. मस्त एक दिवस राहिले आणि परत गेले. मग अतिरेक्यांना पाठवले कार्गील ची शिखरे ताब्यात घ्यायला. अपनी मर्जी आये, अपनी मर्जी चले गये. आणि इथे आपण इंच इंच माघारी बद्दल बोलत आहोत.

या सगळ्या मागे आपल ढिसाळ सरकार आहे..एक अनुबॉम्ब टाकला तर गायब होतील पाकडे.. सीमेवर तर वाद आहेतच शिवाय भारतात राहून हिन्दू ना १५ मिनीटात सम्पवन्याच्या गोष्टी होतात हा कीती मोठा अपमान :(

In reply to by सुपरमॅन

असा एक भाग असतो. एक बाँब टाकला तर! तो काय दिवाळीचा अ‍ॅटम बाँब वाटला का तुम्हाला? कराचीवर बाँब टाकला, तर मुंबई अन त्या आधी अहमदाबाद अन सुरत मधे रेडिओ अ‍ॅक्टिव्ह धूळ येऊन क्षक्ष लागेल याची कल्पना आहे का तुम्हाला? अभ्यास तरी करा हो किमान ७वीच्या भौतिक अन रसायन शास्त्राचा. गेला बाजार गूगल आहे बोटाखाली? राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, इ.इ. काही असते हे ठाऊक करून घ्यायची गरज आपल्याला नसतेच. "उठला" झोपेतून की चाल्ला बाँब टाकायला पाकिस्तानावर. चौथी ड च्या वर्गात 'मला पंतप्रधान केला तर' असा निभंद लिव्ताय काय हो तुम्ही??

In reply to by आनंदी गोपाळ

जाऊ द्या हो ...उत्साहाच्या भरात म्हणाले असतील ते ! तो अकबर्या ओवेसी जर उत्साहाच्या भरात १०० कोटी हिंदूंना मारायची भाषा करत असेल ते पण लाखभर लोकांसमोर तर हे मिपाकर मिपा च्या व्यासपीठावरून अणु बॉम्ब फोडायची भाषा करू देत कि, आपण त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा प्रोत्साहन द्यायला हवे...कि अणुबॉम्ब कशाला आपण हायड्रोजन बॉम्ब पण वापरूया वगैरे वगैरे.

In reply to by सुपरमॅन

गाडगे बाबा तरीच सांगत होते गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. कराचीवर अणुबाँब टाकला तर त्याचे इफेक्ट हे अहमदाबाद मुंबै पर्यंत यायचे तर.त्याच न्यायाने हिरोशीमा नागासाकी वर अमेरीकेने टाकलेल्या अणुबॉम्ब ने तर दोघ कोरीया ने तर अकार्यक्षम व्हायला हवे

४४४

In reply to by नाना चेंगट

445!

इंच इंच हा आणि तो राष्ट्रपिता हे दोन्ही धागे वज्रचुडेमंडित अखंड सौभाग्यवती कॅटेगरीतले आहेत. यांचे सौभाग्य अक्षय्य आहे/असो.

In reply to by राही

राहीसाहेब/राहीमॅडम, अगदी खरे आहे आपले म्हणणे! हा विषयच इतका काळजाला हात घालणारा आहे कीं त्याला 'मिपा'करांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिले यात नवल ते काय? हा धागा मी सुरू केला त्यावेळी माझ्या स्वप्नातही नव्हते कीं हा धागा प्रथम क्रमांकावर येईल. या धग्यावर खूप लोकांनी मौल्यवान भर भर घातली त्यात सुनील-जींचा वाटा मोठा आहे! त्याबद्दल त्यांचे खास आभार! या विक्रमी घाग्याच्या बाबतीत मी केवळ निमित्तमात्र आहे. त्याला विक्रमी बनविण्यात इतरांनीच खूप योगदान केलेले आहे! माझा वाटा अगदी खारीचाच आहे!

माय फादर ऑल्वेज सेड, 'पीस मिन्स हॅविंग बिगर स्टीक दॅन युअर एनिमी हॅझ'- टोनी स्टार्क

अफझलला फाशी दिल्यानंतर काश्मीर खोर्‍यात लागू केलेली संचारबंदी काल उठविण्यात आली आहे असे बातम्यांमध्ये बघितले.वास्तविक बरेच पत्रकार अफझलला फाशी दिल्यास मकबूल बटप्रमाणे तो 'हुतात्मा' होईल आणि काश्मीरी युवक यातून अजून दुरावला जाईल असे म्हटले होते.मुळात अफझल हा मकबूल बटप्रमाणे 'नेता' नव्हताच.त्याला फाशीची शिक्षा ठोठावून ६ वर्षे उलटून गेली होती तरी काश्मीरात त्याविरूध्द फारसा विरोध झालेला नव्हता.इतकेच काय तर २००८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काश्मीरी जनतेने मोठ्या प्रमाणावर भाग घेऊन आपला लोकशाही प्रक्रीयेवरच विश्वास आहे हे दाखवून दिले होते. तरीही अरूंधती रॉय, प्रफुल बिडवाई आणि इतर महामूर्ख विचारजंत/पत्रकार स्वतःचे दुकान चालवायला या अफझलल्याला उगीचच मोठे करायचा विनाकारण प्रयत्न करत होते.यांना माहित आहे की भारतात लोकशाही आहे आणि त्याच लोकशाहीने यांना वाटेल ते बरळायचा अधिकारही दिला आहे.मग आहे काय आणी नाही काय? सोडा तोंडाचा पट्टा, भले अफझल्ल्याचा हात संसदेवरील हल्ल्यात असेल, भले त्याने भारतीय लोकशाहीच्या मुळावर घाला घालायचा प्रयत्न केला असेल यांच्या बापाचे काही जात नव्हते.असल्या महामूर्खांना शक्य झाल्यास कायमचे चंद्रावर का पाठवत नाहीत हेच समजत नाही.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

पुण्याचे ववा-साहेब, अगदी खरे आहे आपले म्हणणे. इथे जकार्तात आमच्या संकुलात तीन वाहिन्या पहायला मिळतात (१) झी न्यूज, (२) NDTV India (३) NDTV 24x7. तीन्ही वाहिन्यांवर या फाशीच्या शिक्षेनंतर जी चर्चासत्रे दाखविली गेली त्यात "अफजल गुरू एक देशद्रोही व्यक्ती होती" हा मुद्दा अधोरेखित झालाच नाहीं. सगळे विद्वान लोक-अगदी 'फाशीची शिक्षाच रद्द करावी'पासून त्याच्या तारखेबद्दलच्या माहितीपर्यंतच्या-कमी महत्वाच्या मुद्द्यांनाच महत्व देताना दिसले. अर्थातच त्यात सरकारने एक मोठी चूक केली होती ती म्हणजे फाशीच्या वेळेबद्दलची माहिती अफजलच्या पत्नीला 'स्पीडपोस्ट'ने कळविणे (काय हा विश्वास आपल्याच स्पीडपोस्ट संस्थेवर!) दुसरी चूक झाली ओमार अब्दुल्लांची. त्यांना आदले दिवशी रात्री आठ वाजता ही माहिती समजल्यावर त्यांनी अफजलच्या पत्नीला कळविण्यात आले आहे काय याची चौकशीच केली नाहीं व स्वतःहूनही त्याच्या पत्नीला फोन केला नाही! एवढे करायला हवे होते. ओमार अब्दुल्लांचा एक मुद्दा मात्र मला पटला. पूर्वी जेंव्हां राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना फाशी द्यायची वेळ आली तेंव्हां तामिळनाडूच्या नेत्यांनी ती शिक्षा न देण्याबद्दल उच्च न्यायालयात (सर्वोच्च नव्हे) अर्ज केला व त्यानुसार त्या शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर पडली. त्यावेळी ओमार म्हणाले होते कीं हेच जर आम्ही (काश्मिरींनी) अफजल गुरूबाबत केले असते तर सार्‍या देशाने काश्मिरींवर ठपका ठेवला असता, पण तामिळनाडूच्या सरकारवर अथवा तिथल्या जनतेवर कुणीच तोंडसुख घेतले नाहीं. तीच कथा बेआंत सिंग यांच्या खुन्याबद्दल. तिथेही अकाली दलाने रदबदली केली व फाशीची तारीख पुढे ढकलली. त्याबद्दलही कुणी अकाली दलावर ठपका ठेवला नाहीं! ओमार म्हणाले की अफजल गुरूला झटपट फाशी दिल्याची घटना एक अपवाद (exception) होता कामा नये. इतर लोकांनासुद्धा राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज नामंजूर केल्याबरोबर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हायला हवी. अफजल गुरूला जशी ताबडतोब फाशी दिली गेली तशी राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना, वीराप्पनच्या सहकार्‍यांना व बेआंत सिंग यांच्या खुन्यालाही झाली पाहिजे असे त्यांना सुचवायचे होते. ओमार अब्दुल्लांचे हे म्हणणे मला तंतोतंत पटते. आता अफजल गुरूचे पार्थीव त्याच्या कुटुंबियांना देण्याबाबतही 'कब्बड्डी-कब्बड्डी' सुरू झाली आहे. बघू पुढे काय होते ते!

In reply to by सुधीर काळे

453 वा प्रतिसादः
(२) NDTV India (३) NDTV 24x7.
या दोन्ही वाहिन्या वेगवेगळ्या असून एकाच विषयावर वेगवेगळी चर्चासत्रे दाखवतात काय? की रिपीट टेलिकास्ट असते? वीरप्पनच्या सहकाऱ्यांची शिक्षा दोनचार दिवसांनी उशीरा होणार असल्याचे वाचले. सर्वांनीच इसकाळ वर वाचले असेलच त्यामुळे दुवे देत नाही.

नजिकच्या भविष्यात अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यावर काश्मीर प्रश्नावर होणारे परिणाम यावर काळेकाकांचे व निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांची मते जाणून घेण्यास उत्सुक आहे...

ऱोज १ मिटर नी माघार घेतली तरी पाकिस्तान बाँबे पर्यंत पोहचायला ५४०० वर्ष लागतील. रोज १०० मिटर नी माघार घेतली भारतानी तरी आपली काही हरकत नाही.

४६२. थोडं राहिलं आता.. ३८ दिवस ३८ प्रतिसाद.. होउन जाईल ५०० आरामात हाकानाका

अंधार होत चाललाय दिवा पाहिजे | या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे ॥ नेते झाले अफ़जलखान,काश्मिरचे झाले स्मशान। शायिस्तेखानची बोटे तोडण्यासयुवा पाहिजे। या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे..॥

In reply to by नितिन थत्ते

आजपर्यंत एक म्हण खटकत होती, "शिवाजी जन्मो पण शेजारच्या घरात" अस कोणी कस म्हणु शकेल ?? असो आज खात्री पटली..

मी अजून एकही प्रतिसाद दिला नाही ह्या धाग्यावर... स्वारी शक्तीमान! आपल्याला ह्याच्यातलं काय कळत न्हाय द्येवा! :)

In reply to by प्यारे१

काही कळत नाही म्हणत एक प्रतिसाद तुम्हीही दिलातच की. (असं म्हणून मी ही एक प्रतिसाद दिला. एकदाचे पाचशे पुर्ण होऊद्या. म्हणजे काहीतरी टाईमपास प्रतिसाद देऊन धागा वर आणला जाणार नाही.)

In reply to by धन्या

अहो एवढ्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही असा कसा काय टाईमपास करु शकता धनाजीराव???? आम्ही आपलं प्रांजळपणे कबूल केलं झालं तुम्हाला असं काहीही कसं वाटतं? टाईमपास करायचाच झाला तर तुम्ही तुमच्या सखूला बोलवा परत एकदा.