मरे एक त्याचा दुजा शोक वाहे .......

झुम्बर's picture
झुम्बर in जे न देखे रवी...
16 Apr 2010 - 4:27 pm

आभाळभर रडून सुद्धा मी थोडी उरले
एवढ होऊन ही एका श्वासासाठी अडले

वाटल होत तुझ्या विना एक क्षणही जगणार नाही
आणि तुझ्या वाचून माझ अस्तित्वही उरणार नाही

पांढर्या चादरीत झाकला देह सामोरी जेव्हा आला
वाटले आता तुझ्या बरोबर माझाही बहर संपला

हिरवे गोंदण देहावरले चुम्बिणाऱ्या मधुरश्या रात्री
खूप एकट वाटल्यावर तु आहेस ही मनाला खात्री

आता वाटले झोकून द्यावे मृत्युच्या कभिन्न डोहात
तुझ्यासवे मिठीत येयून व्हावे अंतर्धान दिगंतात

पण सख्या वास्तवात असे काहीच घडले नाही
आठवण तुझी तीव्र खरी पण मृत्यूला भिडले नाही

दिवसामागून दिवस तुझ्या विनाच सरत गेले
तुझ्या शिवायच जगायची सवय मी लावत गेले

कधी वादळा सारखी मध्येच सय तुझी यायची
विलंबित ख्याला नंतरची जणू ठुमरीच भासायची

अग्नीला साक्षी ठेवून आज दुसर्याची होते आहे
खर सांगू सख्या तुझी फक्त आठवणच होते आहे

आहेस तु अवती भवती पण तितका तीव्र नाही
वेढतो आहेस अजूनही पण ती ओढ आता नाही

आता सख्या आयुष्याचे खरे मर्म अलगद उलगडले आहे
"मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे "

अनुजा(स्वप्नजा)

करुणकविता

प्रतिक्रिया

Dipa Patil's picture

16 Apr 2010 - 4:42 pm | Dipa Patil

खरोखर आयुष्याचे खरे मर्म अलगद उलगडले आहे

अमोल केळकर's picture

16 Apr 2010 - 5:28 pm | अमोल केळकर

सहमत

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मदनबाण's picture

16 Apr 2010 - 5:31 pm | मदनबाण

सुंदर कविता...
मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

झुम्बर's picture

16 Apr 2010 - 5:59 pm | झुम्बर

O:) आभारी आहे .....

डावखुरा's picture

16 Apr 2010 - 6:18 pm | डावखुरा

चर्रकन सुरी फिरल्यासारखं वाट्लं................ :(

"राजे!"

निरन्जन वहालेकर's picture

17 Apr 2010 - 7:10 am | निरन्जन वहालेकर

ह्यालाच जिवन असे नाव ! !

" कधी वादळा सारखी मध्येच सय तुझी यायची
विलंबित ख्याला नंतरची जणू ठुमरीच भासायची "

व्वा ! क्या बात है ! सुन्दर ! !

निरन्जन

झुम्बर's picture

17 Apr 2010 - 11:35 am | झुम्बर

आभार .......

अरुंधती's picture

17 Apr 2010 - 1:28 pm | अरुंधती

छान कविता....
जीवनातील सत्य...

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/