आभाळभर रडून सुद्धा मी थोडी उरले
एवढ होऊन ही एका श्वासासाठी अडले
वाटल होत तुझ्या विना एक क्षणही जगणार नाही
आणि तुझ्या वाचून माझ अस्तित्वही उरणार नाही
पांढर्या चादरीत झाकला देह सामोरी जेव्हा आला
वाटले आता तुझ्या बरोबर माझाही बहर संपला
हिरवे गोंदण देहावरले चुम्बिणाऱ्या मधुरश्या रात्री
खूप एकट वाटल्यावर तु आहेस ही मनाला खात्री
आता वाटले झोकून द्यावे मृत्युच्या कभिन्न डोहात
तुझ्यासवे मिठीत येयून व्हावे अंतर्धान दिगंतात
पण सख्या वास्तवात असे काहीच घडले नाही
आठवण तुझी तीव्र खरी पण मृत्यूला भिडले नाही
दिवसामागून दिवस तुझ्या विनाच सरत गेले
तुझ्या शिवायच जगायची सवय मी लावत गेले
कधी वादळा सारखी मध्येच सय तुझी यायची
विलंबित ख्याला नंतरची जणू ठुमरीच भासायची
अग्नीला साक्षी ठेवून आज दुसर्याची होते आहे
खर सांगू सख्या तुझी फक्त आठवणच होते आहे
आहेस तु अवती भवती पण तितका तीव्र नाही
वेढतो आहेस अजूनही पण ती ओढ आता नाही
आता सख्या आयुष्याचे खरे मर्म अलगद उलगडले आहे
"मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे "
अनुजा(स्वप्नजा)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2804
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरोखर
सहमत अमोल
In reply to खरोखर by Dipa Patil
सुंदर
आभार सर्वन्चे
भिडणारी,खोलवर जाणारी.......
ह्यालाच जीवन असे नाव ! !
आभार .......
छान