नाच नाचूनी नाचू मी किती

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
9 Apr 2010 - 6:12 am

नाच नाचूनी नाचू मी किती

पैंजण वाजे छुम छुम छननन | नाचतांना गेले भान हरपून ||
थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ||

सुरूवातीला राही अवखळ अदा | मीच झाले माझ्यावर फिदा ||
नाचण्याचा छंद लागूनी | जडली वेडी प्रिती || ||१||

काळी चंद्रकळा आली नेसून | खडी त्यावरी चमके चमचम ||
मिलन होता जगदिशाशी | तुझी अन माझी एकच मिती || ||२||

थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ||
----------------------------------------------------------------------------------------------------------

*****************************
(पैंजण वाजे छुम छुम छननन | नाचतांना गेले भान हरपून ||
काळाचे चक्र चालू आहे. त्यात सेकंदा सेकंदाची भर पडत आहे. | "नाचतांना" म्हणजे जीवन जगतांना भान हरपून गेले ||

थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ||
हे सगळे थांबायची (शेवटाची) भिती मला वाटते आहे. | असे असतांना मी जीवन जगू किती? ||

सुरूवातीला राही अवखळ अदा | मीच झाले माझ्यावर फिदा ||
बालपण/ तरूणपणी मी अवखळ होतो. | मी माझ्याच गुर्मीत होतो. ||

नाचण्याचा छंद लागूनी | जडली वेडी प्रिती || ||१||
जीवन जगण्याचा छंद लागला | तेच मला आवडू लागले. ||

काळी चंद्रकळा आली नेसून | खडी त्यावरी चमके चमचम ||
जन्मा आलो ते मरण (काळी चंद्रकळा) घेवून | जन्मानंतर फक्त जगण्याचा आनंद होता ||

मिलन होता जगदिशाशी | तुझी अन माझी एकच मिती || ||२||
मरणानंतर मी जगदिशाशी एकरूप झालो | त्याची अन माझी मिती एकच झाली (One Dimension)||

थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ||
हे सगळे थांबायची (शेवटची) भिती मला वाटते आहे. | असे असतांना मी जीवन जगू किती? || )
*****************************

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/०४/२०१०

अद्भुतरसशांतरसप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

9 Apr 2010 - 12:44 pm | पाषाणभेद

काळाचे चक्र चालू आहे. त्यात सेकंदा सेकंदाची भर पडत आहे. "नाचतांना" म्हणजे जीवन जगतांना भान हरपून गेले.
हे सगळे थांबायची (शेवटाची) भिती मला वाटते आहे. असे असतांना मी जीवन जगू किती?
बालपण / तरूणपणी मी अवखळ होतो. मी माझ्याच गुर्मीत होतो.
जीवन जगण्याचा छंद लागला. तेच मला आवडू लागले.
जन्मा आलो ते मरण (काळी चंद्रकळा) घेवून. जन्मानंतर फक्त जगण्याचा आनंद होता.
मरणानंतर मी जगदिशाशी एकरूप झालो. त्याची अन माझी मिती एकच झाली (One Dimension).
हे सगळे थांबायची (शेवटची) भिती मला वाटते आहे. असे असतांना मी जीवन जगू किती?