ओंकाराची नाडीपरिक्षा

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
3 Apr 2010 - 4:52 pm

मिसळपाववर सध्या नाडीचे प्रस्थ वाढत आहे. वेळोवेळी त्याचा प्रतिवाद केला आहे. वाद प्रतिवाद चालुच असतात. आम्ही ज्या ओंकार पाटील यांचा संदर्भ दिला होता तो लेख संपुर्णपणे टंकणे शक्य नसल्याने तो पीडीएफ स्वरुपातील आमच्या फलज्योतिष चिकित्सा मंडळाच्या डिजिटल ग्रंथालयातील प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा या पुस्तकात आहे .तेवढ्याच लेखाचा संदर्भ खाली देत आहे.
श्री. ओंकार पाटील हे एक बीएसएनएल मधील अधिकारी आहेत. त्यांनी स्वत: चेन्नईच्या आसपासच्या नाडीकेंद्रांना भेटी देऊन तिथल्या कार्यपद्धतीचा तटस्थ पणे अनुभव घेतला आहे व तो किर्लोस्कर मासिकाच्या दिवाळी (१९९६) अंकात प्रसिद्ध केला आहे तसेच अं.नि.स.ने प्रकाशित केलेल्या प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा या यातही त्याचा समावेश केला आहे. त्यांचा तो लेख मुळातूनच वाचला पाहिजे. नाडी-पट्टी शोधून काढण्याच्या बहाण्याने पृच्छकाला अक्षरश: शेकडो प्रश्न विचारून त्याच्याकडून सर्व माहिती काढून घ्यायची आणि नंतर नाडी-पट्टी वाचण्याचा देखावा करीत तीच माहिती त्याला ऐकवायची असा प्रकार इथे चालतो. ओंकार पाटलांच्याकडून त्यांची जन्म-वेळ अशीच त्या नाडीवाचकाने त्यांच्याकडून काढून घेतली आणि तिच्यावरून तामिळी पद्धतीची कुंडली बनवून त्यांना दिली पण भासवले मात्र असे की ती कुंडली पट्टीतच लिहिलेली होती. ( १७०० वर्षापूर्वीच्या ज्योतिषाला विसाव्या शतकातल्या कुंडल्या कशा बनवता आल्या हा तांत्रिक प्रश्न ओकांना व त्यांच्या साथीदारांना जिथे समजणेच शक्य नाही तिथे त्यातली लबाडी कुठून कळणार ? ) त्यांना एकूण दोनशे साठ प्रश्न विचारले गेले. त्यांनी पॉकेट रेकॉर्डर हळूच खिशात ठेवला होता म्हणुन हा लेख त्यांना लिहिता आला.

Fasve Nadi Jyotisha

प्रवासज्योतिषविचारअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

3 Apr 2010 - 5:27 pm | राजेश घासकडवी

हा लेख वाचूनही नाडीवर विश्वास ठेवणारे असतील तर त्यांना अंधश्रद्ध म्हणावं नाही तर काय म्हणावं?

राजेश

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Apr 2010 - 5:56 pm | बिपिन कार्यकर्ते

आता काय म्हणायचं तुम्हाला? अगदीच अवैज्ञानिक ब्वॉ तुम्ही... किती नीट आणी वैज्ञानिक पद्धतीने भविष्य सांगितले जाते बघा... आणि तुमच्यासारखे लोक त्यात खोट काढत बसता.

बिपिन कार्यकर्ते

राजेश घासकडवी's picture

4 Apr 2010 - 10:49 am | राजेश घासकडवी

मी फक्त एक प्रश्न विचारला. त्याचं एका ओळीत इतकं समर्पक उत्तर देऊन तुम्ही माझं तोंड बंद करण्याची गरज होती का?

राजेश

चक्रमकैलास's picture

3 Apr 2010 - 6:22 pm | चक्रमकैलास

घाटपांडे साहेब्,तुम्ही नाडीवाल्यान्ची नाडी ढीली करून त्यांची चड्डी काढली आहे...!!!

--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

नितिन थत्ते's picture

3 Apr 2010 - 10:00 pm | नितिन थत्ते

आणि चड्डी काढून ** आवळल्या आहेत.

तरी बरे. त्यांनी दोन केंद्रांचा अनुभव सांगितला आहे. नाहीतर ओकांनी "त्या विशिष्ट नाडीकेंद्रावर असे होत असेल" अशी सारवासारव केली असती.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

प्रकाश घाटपांडे's picture

5 Apr 2010 - 10:18 am | प्रकाश घाटपांडे

नाहीतर ओकांनी "त्या विशिष्ट नाडीकेंद्रावर असे होत असेल" अशी सारवासारव केली असती.

तसेही बोध अंधश्रध्देचा मधे ओकांनीच ज्या पट्टीत जातकाची नांवे कोरलेली नाहीत त्या बद्दल माझी नाडी भविष्याची मते लागू नाहीत असे पृ.१३९ वर सांगितले आहे. त्यामुळे नाडीपट्टीत नाव कोरुन आलेले नसेल तर त्यांच युक्तिवाद अशा नाड्यांना लागु होत नाहीत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

नंदू's picture

3 Apr 2010 - 9:43 pm | नंदू

ओक साहेबांच्या नाडी शास्त्राला जवळ जवळ सर्वच जण विरोध करताहेत आणि या विरोधकांच्या bandwagon मध्ये फलज्योतिषवाले देखिल सामिल आहेत. हे फलज्योतिष तरी शास्त्र आहे का?

शास्त्राचा मूळ निकष म्हणजे कुठलीही गोष्ट ही नियमां मध्ये अथवा सूत्रांमध्ये बांधलेली असावी आणि repeatable असावी. उदाहरणार्थ झाडावरुन पडणारं सफरचंद हे प्रत्येकवेळी खालीच पडणार.

मलातरी दोन्ही थोतांडच वाटतात.

नंदू

तिमा's picture

4 Apr 2010 - 10:27 am | तिमा

प्रत्येकाचे आयुष्य हा एक विधात्याच्या कथेवर बेतलेला सिनेमा आहे. त्यामुळे तो जसा दिसेल तसा बघावा. आधीच पुढची स्टोरी जाणण्याचा प्रयत्न करु नये. त्यामुळे नाडी, फलज्योतिष हे खरे असेल वा थोतांड. आपले विधिलिखित आपण बदलू शकत नाही तर कशाला हा खटाटोप ?

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2010 - 11:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपले विधिलिखित आपण बदलू शकत नाही तर कशाला हा खटाटोप ?

अगदी मनातलं बोललात...!

बाकी श्री घाटपांडे विरुद्ध ओक...वैचारिक सामने रंगतदार होत आहेत.
थांबवू नका चालू ठेवा...! :)

-दिलीप बिरुटे
[काठावर बसलेला]

पाषाणभेद's picture

4 Apr 2010 - 10:58 am | पाषाणभेद

फलज्योतिषाचा विषय काढून उगाचच मुख्य चर्चा भरकटू देवू नका.
फलज्योतिष (?) साठी वेगळा धागा आधीच निघालेला असेल.

बाकी नाडीवाल्यांनी आता त्याच्या नाड्या आवळून वरती विज्ञानाचा पट्टा आवळावा.

घाटपांडे काकांचा प्रयत्न स्पृहणीय आहे. आता हे नाडीवाले नाडी पहायला येणार्‍यांना "तुम्ही नाडी सोडून विवस्त्र नाडी पहायला यावे" असे म्हणायला सुरूवात करतील बघा. किमानपक्षी त्यांची झडती तरी होईल किंवा आमच्या महर्षींना हे मान्य नाही असे म्हणतील.

हे एक पोट भरण्याचे साधन आहे हे का मान्य करत नाही.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

नावातकायआहे's picture

4 Apr 2010 - 10:46 pm | नावातकायआहे

>> बाकी श्री घाटपांडे विरुद्ध ओक...वैचारिक सामने रंगतदार होत आहेत

सहमत...सामना निश्चितच रंगला आहे

श्री घाटपांडे यांनी 'पाट' काढला आहे...आता 'पलटी' होते का 'चितपट ' :?

पै. नाडीरत्न: आवळे-सोडे

jaypal's picture

4 Apr 2010 - 10:59 pm | jaypal


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

शशिकांत ओक's picture

5 Apr 2010 - 3:16 pm | शशिकांत ओक

ओकाची नाडी ग्रंथ परीक्षा ?

नुकताच ओंकार पाटलांच्या नाडी परीक्षेचा लेख पुन्हा वाचनात आला. खरेतर यावर त्यांच्या लेखातील फोलपणा दाखवून देणारा लेख मी पुर्वीच प्रकाशित केला आहे. तरीही काही नव्या वाचक लोकांच्या समाधानासाठी खालील विचार व्यक्त करत आहे.

ओंकारांनी नाडी ग्रंथांना खोटे ठरवायला काय परीक्षा केली ?

१) तांबरमच्या नाडीकेंद्रात जाऊन एक टेप रेकॉरेडर लपवून नाडी पट्टीच्या अगदी पहिल्या विचारणेपासून रेकॉर्ड केलेले संभाषण लेखाच्या रुपात सादर केले.
२) त्या विचारणेतून मिळालेल्या माहितीतील माहितीच पुन्हा आपणांस एका विशिष्ठ ताडपट्टीतून आली आहे असे भासवून सांगण्यात आले, असा त्यांचा दावा आहे.
३) शिवाय गिंडीतील एका केंद्रातील माहितीतून त्यांना नाडीग्रंथांबद्दल काय वाटले ते त्यांनी शेवटी सादर केले

आपल्या लेखात ओंकारांनी वाचकांना काय काय उल्लेखले नाही

* नाडी वाचकाबरोबर झालेले सर्व संभाषण 'चोरून' टेप करायची काही गरज नव्हती. कारण त्यांच्या टेबलावर टेप रेकॉर्डर सदैव असतोच. तोच त्यांना पहिल्यापासून चालू ठेवायला विनंती करून टेपरेकॉर्डिंगचे काम करता आले असते का नाही?
* त्यांना त्यांची पट्टी सापडली म्हटल्यावर त्यांच्यासाठीचा ताडपट्टीतून लिहून आलेला मजकूर एका ४० पानी वही दिला होता का नाही?.
* त्यानंतर एक भाषांतर केलेली टेपही नंतर दिली गेली होती की नाही?.
त्या टेपमधील मजकुरात, पट्टी शोधायला विचारलेल्या प्रश्नातून मिळालेल्या माहिती शिवाय आणखी काय माहिती पट्टीतून आली हे जाणता आले असते की नाही?.
* ओंकारांनी जो नाडीग्रंथाना खोटे ठरवण्यासाठीचा पुरावा मिळवला होता, त्याची शहानिशा तेथल्या तेथेच करून पहाता आली असती कि नाही?
ओकांना प्रत्यक्ष समोर असताना देखील भेटण्याचे टाळावे असा त्यांच्या सल्लागारांचा मानस असल्याने टाळले गेले की नाही?

* आता जे ओंकारांनी केले ते ओकांनी केले काय़?

* हो. असे संपुर्ण टेप ओकांनी अनेकदा केले होते. नव्हे तो त्यांचा आग्रह असे. नंतर त्यातील फोलपणा लक्षात आल्यावर ते टेप नंतर इतर कामाला वापरले गेले.

जे शोधकार्य ओंकारांनी केले नाही वा फक्त करावे असे सुचवले ते ओकांना केले काय?

1. होय. नाडीपट्टीतील मजकूर वहीत उतरवून घेतला गेल्याची प्रत्यक्ष खात्री झाल्यावर ती वही त्याच व अन्य नाडीकेंद्रातील इतर अनेक वाचकांकडून वाचवून घेतली गेला. त्यांनी तो जशाचा तसा वाचून दाखवला.
2. त्यातऱ्हेच्या अनेक लिखित वह्या नंतर अनेक नाडी ग्रंथांशी मुळीच संबंध नसलेल्या तमिळजाणकारांना दाखवून त्याचे भाषांतर करून घेतले.
3. नाडी केंद्रचालकांच्या सहकार्याने नाडीग्रंथ पट्ट्यांच्या फोटोतून दिसणारा मजकूर व वहीतील मजकूर यांची खात्री केली.
4. नाडीपट्ट्यात जन्मकालच्या ग्रहपरिस्थिचे वर्णन खरोखर कसे केलेले असते का ? अंगठ्यांच्या ठशांचे वर्णन कसे दिलेले असते का? आदीचे पुरावे शोधले गेले.
5. आपल्याकडून माहिती काढून तीच आपल्याला सांगितली जाते हे वरवर तसे 'दिसत' असले तरी तसे नाही कारण नाडी वाचक ताडपट्टीतील मजकूर वहीत लिहून घेऊन 'वाचत' असतो. तो ती पट्टीतून 'वाचतोय' का आधीची मिळवलेली माहिती लक्षात ठेऊन 'सांगतोय' याची पक्की खात्री न करताच फक्त एका व्यक्तीच्या एका ताडपट्टी शोधाच्या ' टेपच्या अनुभवावरून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्यात अपप्रचार जास्त व शोधाची तळमळ कमी असे चित्र प्रकट होते.
6. ओंकारांच्या लेखातील मुख्य मुद्याला तो खरा आहे असे मानून हवाईदलातील काही लोकांच्या समावेत एकदा एक प्रात्यक्षिक केले गेले. ओकांनी ते सर्व प्रश्न एका मागून एक (हिंदीतून) वाचले. काहींना त्यातील उत्तरे लिहून नोंद करायला सांगितली तर काहींना नुसतीच आठवणीत ठेवायला सांगितली. त्यातील आलेला निष्कर्ष असा होता - सतत प्रश्नांचा भडिमार करून कोणत्या प्रश्नाला नक्की हो व कोणत्याला नाही म्हटले गेले यातून विचारून मिळवलेली माहिती इतक्या अचुकपणे नुसती लक्षात ठेऊन पुन्हा सांगणे शक्य नाही. तो संपुर्ण प्रात्यक्षिकाचा पुरावा व त्यांच्या विवेचनातून ओंकार वाचकांची दिशाभूल कशी न कळत वा कळत करतात, हे ओकांनी "बोध अंधश्रद्धेचा" पुस्तकातील लेखातून सादर केला आहे.
7. त्यामुळे हा लेख फक्त वाचकांना त्यांनी काढलेल्या निश्कर्षांवर विचार करायला जरूर उद्युक्त करतो. मात्र प्रत्यक्षात नाडी पट्ट्या्वरील शोधकार्य न केले गेल्याने तसा निरुपद्रवी वाटतो आहे.
8. ओंकारांनी कूटलिपीची ढाल करून ही नावे ताडपट्टीत आहेत असे सांगायचा 'गोलमाल करायला' वाव आहे म्हणून भांडारकर सारख्या प्राच्यसंस्थेतील तज्ञांकरवी त्याची तपासणी व्हावी. तशी ती ओकांनी चेन्नईतील प्राच्य संस्थाकेंद्रातून केली आहे. एका फोटोतील 'शशिकांत' हे नाव कसे कोरून लिहिलेले आहे याचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. धनंजय व हैयोहैयैयोंनी त्यावर आपले सकारात्मक मत नोंदले आहे.
9. हैयोहैयैयोंनी तमिळकुटलिपीवर आधारित लेखातून नाडीपट्टयातील लिपीचा उलगडा करता येतो. ती नाडीवाचकांच्या व्यतिरिक्त ही वाचायला येईल असे सुचवले आहे. ओकांनी त्यांना सवडीने कूटलिपीवर मराठी वाचकांसाठी मिपावरून जास्त प्रकाश टाकावा असे आवाहन केले आहे.
10. ओंकारांनी काही मजकूर, शब्द, नोकरी-व्यवसाय वा अन्य सध्याच्या प्रचलित नवे शब्द संस्कृत मधून आहेत असे भासवून ग्राहकाला प्रभावित केले जात असावे, असा नाडीशब्दांचा एक शब्दकोश तयार करण्याची सुरवात झाली आहे. नाडीतील शंभर तमिळ शब्दांचा एका नमुना कोश २००७साली इन्स्टियुट ऑफ एशियन स्टडीजचे डायरेक्टर ड़ॉ.जी.जॉन सॅमियएल यांच्या हस्ते वितरित केला गेला.
11. ओंकारांनी नाडी ग्रंथात व्यक्तीच्या जन्मदिनांकाचे, जन्मकाळच्या ग्रहस्थितीचे वर्णन नसावे असा त्यांनी कयास बांधला. तो तसा असतो हे सोदाहरण दाखवून देण्यासाठी १७ डिसंबर२००९च्या कथनातील भाग मिपावर सादर केला गेला आहे.
यावरून सुज्ञ वाचकांनी योग्य तो निष्कर्ष काढावा ही विनंती.

नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी
http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Apr 2010 - 4:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सदर प्रतिसादाचा विषय आवडला: "ओकाची नाडी"

बाकी चालू द्या.

अदिती

नितिन थत्ते's picture

5 Apr 2010 - 10:37 pm | नितिन थत्ते

प्रतिसाद वाचून ह ह पु वा.

>>१. होय. नाडीपट्टीतील मजकूर वहीत उतरवून घेतला गेल्याची प्रत्यक्ष खात्री झाल्यावर ती वही त्याच व अन्य नाडीकेंद्रातील इतर अनेक वाचकांकडून वाचवून घेतली गेला. त्यांनी तो जशाचा तसा वाचून दाखवला.
नाडीपट्टीतील मजकूरच वहीत लिहिला आहे का? याची शहानिशा दहा लोकांकडून (नाडीकेंद्रा बाहेरच्या) करून घ्यायला हवी होती.

>>2. त्यातऱ्हेच्या अनेक लिखित वह्या नंतर अनेक नाडी ग्रंथांशी मुळीच संबंध नसलेल्या तमिळजाणकारांना दाखवून त्याचे भाषांतर करून घेतले.
पुन्हा वह्यांचे भाषांतर कशाला? त्या वह्यांमध्ये नाडीपट्टीवरचा मजकूरच होता हे कोण तपासणार?

>>3. नाडी केंद्रचालकांच्या सहकार्याने नाडीग्रंथ पट्ट्यांच्या फोटोतून दिसणारा मजकूर व वहीतील मजकूर यांची खात्री केली.
ओके. पण नाडीपट्ट्या प्रत्यक्ष पाहिल्या का?

>>4. नाडीपट्ट्यात जन्मकालच्या ग्रहपरिस्थिचे वर्णन खरोखर कसे केलेले असते का ? अंगठ्यांच्या ठशांचे वर्णन कसे दिलेले असते का? आदीचे पुरावे शोधले गेले.
कसे शोधले?

>>5. आपल्याकडून माहिती काढून तीच आपल्याला सांगितली जाते हे वरवर तसे 'दिसत' असले तरी तसे नाही कारण नाडी वाचक ताडपट्टीतील मजकूर वहीत लिहून घेऊन 'वाचत' असतो. तो ती पट्टीतून 'वाचतोय' का आधीची मिळवलेली माहिती लक्षात ठेऊन 'सांगतोय' याची पक्की खात्री न करताच फक्त एका व्यक्तीच्या एका ताडपट्टी शोधाच्या ' टेपच्या अनुभवावरून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्यात अपप्रचार जास्त व शोधाची तळमळ कमी असे चित्र प्रकट होते.
जेव्हा आपणच दिलेल्या माहितीव्यतिरिक्त काहीही माहिती मिळाली नाही असे दिसते तेव्हा आणखी काय समजायचे?
एक अनुभव नसून दोन अनुभव आहेत.

>>6. ओंकारांच्या लेखातील मुख्य मुद्याला तो खरा आहे असे मानून हवाईदलातील काही लोकांच्या समावेत एकदा एक प्रात्यक्षिक केले गेले. ओकांनी ते सर्व प्रश्न एका मागून एक (हिंदीतून) वाचले. काहींना त्यातील उत्तरे लिहून नोंद करायला सांगितली तर काहींना नुसतीच आठवणीत ठेवायला सांगितली. त्यातील आलेला निष्कर्ष असा होता - सतत प्रश्नांचा भडिमार करून कोणत्या प्रश्नाला नक्की हो व कोणत्याला नाही म्हटले गेले यातून विचारून मिळवलेली माहिती इतक्या अचुकपणे नुसती लक्षात ठेऊन पुन्हा सांगणे शक्य नाही. तो संपुर्ण प्रात्यक्षिकाचा पुरावा व त्यांच्या विवेचनातून ओंकार वाचकांची दिशाभूल कशी न कळत वा कळत करतात, हे ओकांनी "बोध अंधश्रद्धेचा" पुस्तकातील लेखातून सादर केला आहे.
सर्वसामान्य लोकांना लक्षात ठेवता येणे आणि विशिष्ट प्रकारे ट्रेन झालेल्याला लक्षात राहणे हे वेगळे नाही का?
जसे हॉटेलातल्या कोणत्या टेबलावरील कोणत्या व्यक्तीने कायकाय ऑर्डर दिली त्यातले काय काय देऊन झाले आणि काय राहिले हे वेटरच्या लक्षात राहते. तुम्हाला एखादे दिवशी असे हॉटेलात सोडले तर तुमच्या ते लक्षात राहणार नाही. म्हणजे ते लक्षात ठेवता येत नाही असे नाही.

>>7. त्यामुळे हा लेख फक्त वाचकांना त्यांनी काढलेल्या निश्कर्षांवर विचार करायला जरूर उद्युक्त करतो.
मात्र प्रत्यक्षात नाडी पट्ट्या्वरील शोधकार्य न केले गेल्याने तसा निरुपद्रवी वाटतो आहे.
तुम्हाला ते नाडीपट्टीवाले पट्ट्या दाखवायला तयार असतात असे दिसते. म्हणून तुम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन केले असता तुम्ही ते नाकारल्याचे स्मरते.

>>8. ओंकारांनी कूटलिपीची ढाल करून ही नावे ताडपट्टीत आहेत असे सांगायचा 'गोलमाल करायला' वाव आहे म्हणून भांडारकर सारख्या प्राच्यसंस्थेतील तज्ञांकरवी त्याची तपासणी व्हावी. तशी ती ओकांनी चेन्नईतील प्राच्य संस्थाकेंद्रातून केली आहे. एका फोटोतील 'शशिकांत' हे नाव कसे कोरून लिहिलेले आहे याचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. धनंजय व हैयोहैयैयोंनी त्यावर आपले सकारात्मक मत नोंदले आहे.
फोटोत शशिकांत लिहिलेल्या पट्टीवरील मजकूर हजारो वर्षांपूर्वी कोरलेला होता की त्याच वेळी (ओकांना पट्टी दाखवण्यापूर्वी ) कोरला होता हे ओकांनी कसे तपासले?

>>9. हैयोहैयैयोंनी तमिळकुटलिपीवर आधारित लेखातून नाडीपट्टयातील लिपीचा उलगडा करता येतो. ती नाडीवाचकांच्या व्यतिरिक्त ही वाचायला येईल असे सुचवले आहे. ओकांनी त्यांना सवडीने कूटलिपीवर मराठी वाचकांसाठी मिपावरून जास्त प्रकाश टाकावा असे आवाहन केले आहे.

>>10. ओंकारांनी काही मजकूर, शब्द, नोकरी-व्यवसाय वा अन्य सध्याच्या प्रचलित नवे शब्द संस्कृत मधून आहेत असे भासवून ग्राहकाला प्रभावित केले जात असावे, असा नाडीशब्दांचा एक शब्दकोश तयार करण्याची सुरवात झाली आहे. नाडीतील शंभर तमिळ शब्दांचा एका नमुना कोश २००७साली इन्स्टियुट ऑफ एशियन स्टडीजचे डायरेक्टर ड़ॉ.जी.जॉन सॅमियएल यांच्या हस्ते वितरित केला गेला.
हा मुद्दा काय हे कळले नाही.

>>11. ओंकारांनी नाडी ग्रंथात व्यक्तीच्या जन्मदिनांकाचे, जन्मकाळच्या ग्रहस्थितीचे वर्णन नसावे असा त्यांनी कयास बांधला. तो तसा असतो हे सोदाहरण दाखवून देण्यासाठी १७ डिसंबर२००९च्या कथनातील भाग मिपावर सादर केला गेला आहे.
हे पुन्हा वाचून पाहीन.

>>यावरून सुज्ञ वाचकांनी योग्य तो निष्कर्ष काढावा ही विनंती.
असेच म्हणतो.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

मिपा वर नाडीसंबंधी उलटसुलट चर्चा व एकमेकांवर गरळ ओकत राहणे, यातून काहीही साध्य होणार नाही. नाडीसंबंधाने अरुंधती यांनी सुचवलेले मुद्दे जरी योग्य असले, तरी तश्या प्रकारचा अभ्यास मुळात हा सर्व बनवाबनवीचा प्रकार नाही, हे (मिपाकरांनी विविध नाडीकेंद्रांना स्वतः भेटी देऊन तेथील संभाषण टेप करून) सिद्ध झाले, तरच करणे योग्य व गरजेचे असेल.

या विषयी मिपा सदस्यांना खालील प्रमाणे कार्य करता यावे:

१. यात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत असलेल्या सदस्यांची यादी (संपर्क क्रमांक व गावाचे नाव यासह) बनवणे.

२. त्याप्रमाणे कोणकोणत्या नाडीकेंद्रांना भेट देणे सोयीचे होईल, याची यादी बनवणे (तिथले पत्ते, फोन, फी, वगैरे माहितीसह). यात श्री. ओकांचे सहकार्य मोलाचे आहे.

३. जे सदस्य स्वतः नाडीकेंद्रांना भेट देऊ शकत नाहीत, परंतु काही सहभाग देउ शकतात, त्यांनी ते काय करू शकतात, हे कळवावे. उदाहरणार्थ टेप रेकॊर्डर्स ची वा वाहनाची सोय करणे, गरज असल्यास आर्थिक भार उचलणे, नाडी केन्द्रांना फोन करणे, एकंदरीत या प्रकल्पाचे नियोजन, को-ऒर्डीनेशन करणे, वगैरे.

४. नाडी वाचनाचे वेळी व्हिडियो शूटिंग व ऒडियो रेकॊर्डिंग करणे शक्य आहे का, नाडी केन्द्रवाले तसे करू देतील का, हे श्री. ओक यांनी सांगावे. ते तसे करू देत नसल्यास गुप्तपणे करणे भाग आहे. श्री. ओकांनी उल्लेख केलेला केन्द्रवाल्यांचा टेपरेकॊर्डर हा नाडी वाचनाचे वेळी सुरू केला जात असेल. त्यापूर्वी पट्टी शोधताना विचारल्या जाणा‍र्‍या प्रश्नांचे व जातकाने दिलेल्या उत्तरांचे रेकॊर्डिंग केले जाते का (जसे श्री ओंकार पाटील यांनी केले आहे), हे श्री ओक यांनी स्पष्ट केलेले नाही. आपल्या संशोधनाचे दॄष्टीने, तेच जास्त महत्वाचे आहे.

५. त्यानंतर प्रत्यक्ष नाडीकेंद्रांना भेटी देऊन आपापल्या पट्ट्या काढवून त्या संपूर्ण प्रसंगाचे रेकॊर्डिंग करणे. यात काही जातकांना तुमची पट्टी मिळत नाही, असे सांगितले जाईल, तरीही काय संभाषण झाले, याची नोंद करावी.

६. आपण या प्रकाराची चिकित्सकपणे तपासणी करायला आलेलो आहोत, असे नाडीकेंद्र वाल्यांना वाटले, तर ते तुमची पट्टी मिळत नाही, असे सांगून वाटेला लावतील, अशी बरीच शक्यता वाटते, तरी आपण खरोखरच संकटात सापडलेले आहोत, व पट्टीत पापक्षालनार्थ सांगून येणारी धार्मिक कॄत्ये करण्यास उत्सुक आहोत, असा अविर्भाव असावा.

हल्ली मिळणारे अगदी लहान, खिश्यात पेन सारखे अडकवता येणारे रेकॉर्डर्स खूपच सोयिस्कर पडतील. मुख्य म्हणजे यात डिजिटल फ़ाईल्स च्या स्वरूपात रेकॉर्डिंग होत असल्याने ते मिपावर सर्वांना ऐकता येइल.

सहज सुचलेले मुद्दे वर लिहिले आहेत, सर्वच मिपाकर अतिशय सूज्ञ, बुद्धिमान व कर्तबगार असल्याने या विषयी अजून जास्त चांगले नियोजन करून प्रत्यक्ष कार्यास सुरुवात करता येईल.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Apr 2010 - 8:47 pm | प्रकाश घाटपांडे

घटं भिंद्यात, पटं छिंद्यात, कुर्यातरासभरोहणं,
येनकेनप्रकारेण, प्रसिध्द: पुरुषो भवेत।
आम्ही पुण्यात हे प्रकरण १९९४ पासुन पहात आहोत. त्यावेळी नाडी केंद्रे पुण्यात नव्हती. माध्यमातुन या प्रकरणाचा बराच गवगवा झाला होता. खरतर मिपाचा नाडी आखाडा होउ नये असे आम्हाला वाटत असल्याने फारसा प्रतिसादा आम्ही देत नाही/ नव्हतो. तरी पण नवीन आलेल्या लोकांसाठी काही बाबी. यात पुनरावृत्तीचा दोष/ गुण आहे. या मुळे या विषयाला विनाकारण प्रसिद्धी मिळत आहे हे माहित असुन देखील हे आम्ही लिहित आहोत. कारण यातुन काही श्रद्धाळु लोकांचा नकळत बळी जाईल.
आमचा प्रयोग

आम्ही या विषयावर पत्रकार परिषद घेउन एक आवाहन केले होते ते येणे प्रमाणे

पाच हजार वर्षापूर्वी अगस्त्य ऋषिंनी लिहिले आहे असे सांगितले जाणाऱ्या नाडी भविष्याचा पडताळा घेण्याचा प्रयोग

फलज्योतिष चिकित्सा मंडळ हे फलज्योतिषाची चिकित्सा करणाऱ्या मंडळींचा एक अनौपचारिक ग्रुप आहे. मंडळातर्फे नाडी भविष्य या ज्योतिष पध्दतीचा अभ्यासप्रकल्प जनहितार्थ हाती घेण्यात आला आहे. या विषयाच्या अनुषंगाने सर्व वाचन साहित्य मंडळाकडे विनामूल्य उपलब्ध आहे.या विषयावरील लोकांचे विविध अनुभव व मते जाणून घेण्याकरिता मंडळाने दि. १-४-२००१ रोजी खुल्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात पूर्वदूषितग्रह न बाळगता सत्यासत्यता तपासावी असा सूर होता.
उपलब्ध माहितीनुसार गेल्या एक वर्षात दक्षिणेकडून आलेली अशी चार केंद्रे पुण्यात कार्यान्वित झाली आहेत. तेथील माहितीपत्रकानुसार अंगठयाचा ठसा वा पत्रिकेवरुन नाडी पटटी शोधून व्यक्तीचे नांव, आईवडिलांचे नांव, पति/पत्नी, व्यवसाय, भावंड, संतती इ. खुलासा केला जातो. प्रत्यक्षात संबंधिताने अंगठयाचा ठसा दिल्यावर त्याच्याकडूनच अनेक प्रश्न विचारुन ही माहिती काढून घेतली जाते याची आम्ही खात्री केली आहे. नाडी पट्टीतील मजकुर हा कूट तामिळ लिपीत असतो असे तेथे सांगितले जाते. त्यावरुन ते हिंदीत प्रश्न विचारतात. नाडीपट्टी शोधण्यासाठी असे प्रश्न विचारावे लागतात असे नाडीवाचक सांगतात. सर्वांच्याच पटटया सापडतात असे नाही असे नाडी केन्द्राने अगोदरच सांगितले आहे. पट्टी सापडल्यास वाचनाचे रूपये तीनशे आकारले जातात.
आम्ही असे म्हणतो की, पोलीस खात्याच्या अंगुलीमुद्रा तज्ज्ञांच्या मते अंगठयाचा प्रत्येक व्यक्तिचा ठसा हा 'युनिक` असतो. त्या ठशाचे पॅरामिटर्स पुन्हा कधीही रिपीट होत नाही. तसे नसते तर अंगुलीमुद्राशास्त्र केव्हाच मोडीत निघाले असते. चोर सोडून संन्याशाला फाशी बसली असती. मग व्यक्तीचे नांव आणि ठसा हे दोन्ही पॅरामीटर्स अन्य कुणातरी व्यक्तीचे बाबत जुळतील अशी शक्यताच नाही हे ठामपणे म्हणता येते. मग या दोन पॅरामीटर्सच्या आधारे त्यांना व्यक्तीची पट्टी निश्चित करण्यासाठी कुठलीच अडचण येता कामा नये. तरीही पटटी हुडकून काढण्यासाठी सोपे पडावे म्हणून हे दोन घटक कमी आहेत असे घटकाभर मानू. जन्मसाल व पित्याचे नांव हे अजून क्ल्यू देउ. स्वत:चे नांव व ठसा या 'नेसेसरी कण्डीशन` झाल्या. अंगठयाचा ठसा, स्वत:चे नांव, पित्याचे नांव व जन्मसाल या 'सफिशंट कण्डीशन` झाल्या. असे करत करत व्यक्तीच्या ठशाबरोबर व्यक्तीचे नांव, व्यक्तीचे जन्मसाल, महिना, आठवडा, व्यक्तीच्या आईचे नांव, वडिलांचे नाव, पती/ पत्नीचे नांव, स्वत:चा व्यवसाय, शिक्षण, भावंडाची माहिती, संततीची माहिती तयार देउ व मोअर दॅन सफिशंट या कण्डीशनपाशी येवून ठेपू. याआधारे आम्ही नाडी केन्द्राला खालील प्रयोग सुचवला आहे.
मंडळाचे सदस्य मा. श्री. रिसबूड यांनी नाडी केन्द्राला एक रजिस्टर्ड पत्र पाठविले असून त्यात संशोधनासाठी हा प्रयोग करण्याचे आवाहन केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, आम्ही आपणास जन्मतारीख व वेळ सोडून वरील सर्व माहिती देउ. सोबत सील केलेली कुंडली देउ. ठसा व माहितीवरून नाडीपटटीतील कुंडली केंद्राने शोधावी. ती जर सील केलेल्या कुंडलीशी जुळली तर आपल्या नेहमीच्या फीच्या दुप्पट फी आम्ही देउ. पत्राला त्यांनी लेखी उत्तर दिले नाही. परंतु रिसबूडांनी फोनवर विचारणा केली असता आपण हा प्रयोग दि.१३ एप्रिल २००१ रोजी सायंकाळी पाच वाजता करु असे तोंडी सांगितले आहे.
या पत्रकाद्वारे मंडळ पत्रकारांना असे आवाहन करिते की, त्यांनी सदर प्रयोगाचे वेळी प्रत्यक्ष उपस्थित रहावे प्रसंगी स्वत:च्या अंगठयाचा ठसा देउन कुंडली शोधण्यास नाडी केन्द्रास उद्युक्त करावे व नाडी भविष्याची सत्यासत्यता पडताळून जनतेसमोर आणावी. त्यासाठी पत्रकारांना पत्रकार भवन येथून नाडीकेंद्रापर्यंत नेण्याआणण्याची सोय फलज्योतिष चिकित्सा मंडळातर्फे करण्यात येत आहे. तरी सर्वांनी दि.१३.४.२००१ रोजी सायं. ५.०० वा. पत्रकार भवन, नवी पेठ, या ठिकाणी उपस्थित रहावे.
=============================================================
वरील प्रयोगाला पत्रकार आले नाहीत. पण आम्ही दोन तीन लोक सोबत घेउन सिंहगड रोड च्या नाडीकेंद्रात ठरल्याप्रमाणे गेलो. प्रत्यक्ष प्रयोगात तुमची माहिती तुमच्या जवळच ठेवा आम्हाला तिची गरज नाही असे सांगून तुमचे फक्त ठसे आम्ही घेतो असे सांगितले. आम्ही तिघांचेही ठसे त्याला दिले. आता पट्टी सापडेपर्यंत थांबा असे त्याने आम्हाला सांगितले. दरम्यानच्या काळात मुंबईहून आलेल्या एका दांपत्याची नाडीपट्टीही सापडली व नाडीवाचनही झाले. अर्ध्या तासानंतर तुम्हा तिघांच्याही नाडी पट्टया या केंद्रात नाहीत. आम्ही त्या मद्रासवरुन मागवून घेउ व तुम्हाला फोन करु असे सांगून आम्हास वाटेला लावले. त्यानंतर आजतागायत अनेकदा फोन करुनही आमच्या पट्टया सापडल्या नाहीत यावरुन सूज्ञ वाचक काय ते समजून घेतील.
त्याअगोदर एकदा माझी पत्नी मंजिरी ता. २३-२-२००१ रोजी श्री रिसबूड व श्री प्रकाश पेंडसे यांच्या समवेत पुण्यातल्या नाडी-केंद्रात गेली. तिने तिच्या अंगठयाचा ठसा, पूर्ण नाव व जन्मतारीख सांगितली पण जन्मवेळ मात्र माहीत नाही असे सांगितले. काही काळानतंर ज्योतिष्याने नाडी-बंडलातली एकेक पट्टी भराभर उलटत तिला बरेच प्रश्न विचारले. तिची रास धनू आहे हे दरम्यानच्या काळात तिच्या जन्मतारखेवरून पंचांगातून त्याने काढले असावे, म्हणून एक पट्टी समोर धरून व तिच्यात वाचल्यासारखे करून त्याने तिला विचारले की तुमची रास धनू आहे का ? मंजिरी म्हणाली की तिला माहीत नाही. श्री. रिसबूड शेजारीच बसले होते, त्यांनी त्याला विचारले की पट्टीवर धनू रास लिहिली आहे काय ? तो होय म्हणाला. त्यावर रिसबुडांनी म्हटले की मग त्या पट्टीत लग्न कोणते लिहिले आहे ते सांगा. तो जरासा घुटमळला व म्हणाला की ते आत्ता कळणार नाही, वो तो बाद मे आयेगा. आणखी काही प्रश्न विचारून झाल्यावर त्याने सांगितले की तुमची पट्टी सापडत नाही. हा त्याचा हुकुमी एक्का होता. पट्टी सापडत नाही असे म्हटले की खेळ खलास. पट्टी सापडली असे म्हणायची सोय नव्हती कारण जन्मवेळ दिलेली नसल्यामुळे लग्न-रास काढता येत नव्हती, ती काय सांगायची हा पेच त्याला पडला असता. त्यातून त्याने अशी सुटका करून घेतली.
एक नाडीज्योतिषी भोंदु निघाला म्हणुन सर्व तसेच असतात काय? असे म्हणुन एक नाडीचक्र किंवा चरक चालु होतो. अनुभव घेण्या अगोदर तर्कबुद्धीच्या पातळीवर् दावे तपासता येतात.

कै. रिसबुडांविषयी माहिती माधव रिसबुड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक
प्रकाश घाटपांडे

अरुंधती's picture

5 Apr 2010 - 7:18 pm | अरुंधती

अन्य काही मुद्दे :
१] प्राप्तीकरविषयक अटी, हिशेब, पावत्या, करभरणी इ. इ. पूर्तता नाडीग्रंथवाचक करतात काय? की करचुकवेगिरी करतात?
२] नाडीग्रंथातील स्वतःची पट्टी बघायला आलेला व फी भरून नाडीपट्टी वाचन करवून घेणारा माणूस भारतीय ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत येतात काय?
३] माहिती अधिकाराखाली ह्या सर्व व्यवसायाची पाळेमुळे खणून काढणे अशक्य आहे काय?
४] त्यांच्या 'उपाया'मध्ये जारण, मारण नसते तर मंत्र, तंत्र, उपचार, यंत्र इ. गोष्टी असतात ह्याकडे आपण लक्ष दिले आहेत काय?
५] नाडीवाचनाचा जर ''प्लासिबो'' इफेक्ट येणार असेल व त्याने वाचन करवून घेणार्‍यास मानसिक फायदा होणार असेल तर त्याला 'सायको थेरपी' म्हणावे काय?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

5 Apr 2010 - 8:51 pm | प्रकाश घाटपांडे

(अंध) श्रद्धेपुढे वरील सर्व प्रश्न व्यर्थ असतात. अगतिक माणसांना दिलासा हवा असतो. तो नाडीतुन मिळतो.

प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अरुंधती's picture

6 Apr 2010 - 2:03 pm | अरुंधती

जर असे म्हणत असाल तर मग मुद्देच संपले.... अंधश्रध्दा ही अनादि कालापासून चालत आली आहे.... अनादी कालापर्यंत चालत राहील. कदाचित स्वरूप बदलेल, संकल्पना बदलतील पण अंधश्रध्दा चालूच.... मग असे असेल तर कशापायी तिचे निर्मूलन करण्याचा ध्यास? राहू देत लोकांना अज्ञानाच्या खाईत? उपस्थित केलेल्या प्रश्नांना वा मुद्द्यांना केवळ ' श्रध्देपुढे सर्व प्रश्न व्यर्थ असतात' म्हणून तुम्ही बगल देऊ शकत नाही. एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करावाच लागतो. अन्यथा तुम्ही त्या संदर्भात करत असलेले कार्य अपुरे राहते.

एकीकडे तुम्ही नाडीग्रंथ थोतांड आहे ही भाषा करत आहात, लोकांना अंधश्रध्देपासून परावृत्त करायचे म्हणत आहात, तर त्याच वेळी कायद्याच्या क्षेत्रात राहूनही तुम्ही असे कसे म्हणू शकता?

प्राप्तिकरविषयक, ग्राहक संरक्षण विषयक तसेच माहिती अधिकारातून पुढे आलेल्या माहिती विषयक मी विचारलेल्या प्रश्नांना कृपया उत्तरे द्यावीत ही नम्र विनंती. आपल्याकडे त्याविषयी माहिती नसल्यास कृपया तसे कळवावे.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Apr 2010 - 2:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरूंधतीताई, माझ्या मते प्रकाशकाकांचा प्रतिसाद हा नाडीकेंद्रं कशी चालतात किंवा कराच्या कचाट्यातून सुटत असतील तर का, अशा प्रश्नांच्या रोखाने होता.

"श्रध्देपुढे सर्व प्रश्न व्यर्थ असतात" याचा रोख बहुदा नाडीसमर्थकांकडे असावा, नाडीबाबत अश्रद्ध किंवा साशंक लोकांकडे नाही.

अदिती

राजेश घासकडवी's picture

6 Apr 2010 - 2:33 pm | राजेश घासकडवी

तुम्ही मांडलेले मुद्दे सुजाण ग्राहकासाठी लागू आहेत. अगतिक भक्तांसाठी नाहीत. नाडीकडे वळणारे कदाचित अगतिक ग्राहक असतील, पण जर त्यांना चमत्काराची 'खात्री' देऊन भक्त बनवलं तर मग हे प्रश्न मिटतात. सुजाण ग्राहकांची नाडी बहुधा सापडत नसावी.

प्रकाशकाकांसाठी प्रश्न - देशातली अगतिकता कमी केली तर अंधश्रद्धा कमी होईल का? (अगतिकता - प्रश्न, दु:खं आहेत, उपाय नाहीत ही स्थिती. ती कमी करणं म्हणजे दु:खांची काही मुळं - गरीबी, रोगराई, अपत्यमृत्यू, नैराश्य, अशिक्षितता, अन्याय कमी करणं, व उपाय वाढवणं म्हणजे स्वातंत्र्यं, संधी, समृद्धी वाढवणं...) याबाबत तुमची मतं जाणून घ्यायला आवडेल.

राजेश

प्रकाश घाटपांडे's picture

6 Apr 2010 - 2:54 pm | प्रकाश घाटपांडे

देशातली अगतिकता कमी केली तर अंधश्रद्धा कमी होईल का?

सरकारी नोकरांचे पगार वाढवले तर भ्रष्टाचार कमी होईल का? इतकाच अवघड आहे. अज्ञानातुन निर्माण होणार्‍या अंधश्रद्धा या प्रबोधन ज्ञानप्रसार यातुन कमी होतील ही पण अगतिकतेतुन निर्माण होणार्‍या अंधश्रद्धाचे काय? हा प्रश्न आहेच. मूळात श्रद्धा अंधश्रद्धा मधील सीमारेषा पुसट आहे. आमच्या मते प्रत्येक श्रद्धा ही अंधच असते. अंधश्रद्धा म्हणणे म्हणजे पिवळा पितांबर म्हणल्यासारखे आहे. श्रद्धांचे उपयुक्तता मुल्य किती व उपद्रवी मुल्य किती व कोणास? हा खरा प्रश्न आहे. तरी पण अगतिकता कमी झाली तर अंधश्रद्धांची किमान तीव्रता तर कमी होईल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अरुंधती's picture

6 Apr 2010 - 3:58 pm | अरुंधती

<<आमच्या मते प्रत्येक श्रद्धा ही अंधच असते>>

मग माणुसकीवरच्या, ईमानदारीवरच्या, नेकी, चांगुलपणा, सत्यावरच्या श्रध्देबद्दलही तसेच म्हणाल काय? देशाबद्दलच्या श्रध्दाभावाविषयीही असेच म्हणाल काय?

श्रध्दाविषयक अंधश्रध्दा?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

6 Apr 2010 - 4:24 pm | प्रकाश घाटपांडे

श्रद्धा -अंधश्रद्धा यांचा विचार करताना खरा प्रश्न येतो ते विधायक अथवा विघातक श्रद्धा याचा. ज्या श्रद्धा बाळगल्याने समाजाचे काही नुकसान होत नाही अशा श्रद्धा बाळगल्यास त्यास हरकत नसते. (अर्थात तात्विक पातळीवर वाद-संवाद घडताना त्याला देखील हरकत असते असे मात्र आढळते). धनलालसेने नरबळी, नवसापोटी प्राणीहत्या, धार्मिक श्रद्धेतुन केलेले शोषण या विघातक श्रद्धेपोटी घडलेल्या गोष्टी मात्र समाजाला मागे नेणार्‍या असतात. सश्रद्ध माणुस म्हणेल कि माझी देवावर श्रद्धा आहे.देवाला वाईट गोष्टी आवडत नाही म्हणुन मी ते करणार नाही. अश्रद्ध / नास्तिक म्हणेल वाईट गोष्टी करणे माझ्या विवेकात बसत नाही म्हणून मी ते करणार नाही. दोन्ही लोकांनी केलेली / न केलेली कृती एकच असु शकते.
काही माहिती अंनिस व धर्मश्रद्धा
आम्हीच खरे धर्मश्रद्धा हा नरेंद्र दाभोलकरांचा लेख इथेच वाचा
या पुर्वी या विषयावर् प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे उपक्रमावर झालेल्या काही चर्चा
१) धर्म देवाने निर्माण केला काय?
२) विवेकवाद
३) विज्ञानाबाबत माझी पुर्वपीठिका
४) विचार आणि चमत्कार

५) श्रद्धेचे मार्केटिंग
६) नवा ब्रिटिश कायदा

प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अरुंधती's picture

6 Apr 2010 - 5:11 pm | अरुंधती

<< श्रद्धा -अंधश्रद्धा यांचा विचार करताना खरा प्रश्न येतो ते विधायक अथवा विघातक श्रद्धा याचा. ज्या श्रद्धा बाळगल्याने समाजाचे काही नुकसान होत नाही अशा श्रद्धा बाळगल्यास त्यास हरकत नसते. (अर्थात तात्विक पातळीवर वाद-संवाद घडताना त्याला देखील हरकत असते असे मात्र आढळते) >>

ही हरकत कोणाची? भारतीय संविधानाची? कायद्याची? की अजून कोणाची?

हे नुकसान/ फायदा कोण ठरवणार? जनता? अंनिस? कायदा? सरकार? कोण?

तात्विक वादात मी नुकसान हा फायदा कसा व फायदा हे नुकसान कसे हे सिध्द करू शकते. कारण ते सापेक्ष आहेत.
पण ह्या नुकसान/ फायद्याची कायदेसंमत काही व्याख्या आहे काय? की केवळ त्याला तर्काचीच पुष्टी? जर फायदा-नुकसानीचीच भाषा करायची तर ते भौतिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक....नक्की कोणत्या पातळीवरील नुकसान/ फायदा?

ज्या श्रध्दा/ अंधश्रध्दा कायद्याने असंमत आहेत, गैर आहेत त्यांवर थेट कायदेशीर कारवाई करता येतेच की! मग त्यासाठी वेगळे प्रबोधन कितपत उचित आहे? फक्त अमुक अमुक गोष्ट ही कायद्याने गैर आहे, त्यात भाग घेतल्यास तुम्हाला कायदेशीर शिक्षा होऊ शकते एवढा प्रसार पुरेसा नाही काय?

आणि जिथे जिथे शोषण होत आहे, गैरफायदा घेतला जात आहे तिथे तिथे सप्रमाण तसे सिध्द केल्यास कायदा काहीच करू शकत नाही का ?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

6 Apr 2010 - 2:34 pm | प्रकाश घाटपांडे

१] प्राप्तीकरविषयक अटी, हिशेब, पावत्या, करभरणी इ. इ. पूर्तता नाडीग्रंथवाचक करतात काय? की करचुकवेगिरी करतात?

आमच्या माहितीप्रमाणे नाही. करचुकवेगिरी करत असावेत.

२] नाडीग्रंथातील स्वतःची पट्टी बघायला आलेला व फी भरून नाडीपट्टी वाचन करवून घेणारा माणूस भारतीय ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत येतात काय?

आमच्या माहितीप्रमाणे नाही. कायद्यातील तज्ञ अधिक उत्तरे देउ शकतील.

३] माहिती अधिकाराखाली ह्या सर्व व्यवसायाची पाळेमुळे खणून काढणे अशक्य आहे काय?

आमच्या माहितीप्रमाणे माहिती अधिकार येथे लागु होत नाही.

४] त्यांच्या 'उपाया'मध्ये जारण, मारण नसते तर मंत्र, तंत्र, उपचार, यंत्र इ. गोष्टी असतात ह्याकडे आपण लक्ष दिले आहेत काय?

आमच्या कुवतीप्रमाणे दिले आहे म्हणुनच परिहार दीक्षाकांडम मधे त्याचा अंतर्भाव आहे. खरा धंदा तिथेच असतो.एकदा का भय निर्माण केले कि तो पुजा विधि परिहार करायला तयार होतो.

५] नाडीवाचनाचा जर ''प्लासिबो'' इफेक्ट येणार असेल व त्याने वाचन करवून घेणार्‍यास मानसिक फायदा होणार असेल तर त्याला 'सायको थेरपी' म्हणावे काय?

होय. श्रद्धा मानसिक बळ देते. श्रद्धा - अंधश्रद्धा काथ्याकुट चालुच आहेत. फायद्या बरोबर तोटा झालेले लोक पण आहेतच.

उपस्थित केलेल्या प्रश्नांना वा मुद्द्यांना केवळ ' श्रध्देपुढे सर्व प्रश्न व्यर्थ असतात' म्हणून तुम्ही बगल देऊ शकत नाही. एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करावाच लागतो. अन्यथा तुम्ही त्या संदर्भात करत असलेले कार्य अपुरे राहते.

श्रद्धाळू माणुस चिकित्सेच्या भानगडीत पडत नाही. आमच्या मते अडचणीत असलेल्या माणसाला वरील प्रश्न पडत नाहीत. अंधश्रद्धा निर्मुलन होईल असे माझे मत नाही. आमचा केवळ जागृती / प्रबोधन करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तो अपुरा असणार आहे याची जाणीव अम्हाला आहे, जगात बहुसंख्य लोक श्रद्धाळु आहेत संशयवादी लोकांची संख्या अत्यल्प आहे. आपला जालावरील सदस्यत्वाचा कालावधी पहाता आपल्याला यात रुची व उत्साह असल्यानेच आपण हे प्रश्न विचारीत आहात हे आम्हाला माहित आहे. आम्ही पुरवलेले दुवे हे आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देतीलच असे नाही. कदाचित यातुन आपल्याला नवे प्रश्न पडतील. त्यांचे स्वागत आहे. जमल्यास उत्तरे देण्याचा प्रयत्न करु

प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

टारझन's picture

6 Apr 2010 - 4:44 pm | टारझन

प्रतिसाद पाहुन (वाचुन नव्हे) भोवळ आली ..

(शुद्धीत येत) ... च्यायला पब्लिकचा वेळ जात नाहीये काय ? काय हो घाटपांडे काका ? काय हो थत्ते काका ? ओकांचं ठिकाय ..त्यांचा फुलटाईम बिजनेस आहे ..

:)

नितिन थत्ते's picture

6 Apr 2010 - 6:43 pm | नितिन थत्ते

घाटपांडेकाकांचाबी फुलटाईम आहे.

आम्हाला उगाच खाज म्हणून. पूर्वी खराट्याने खाजवायचो. आता नाडीने. :)

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

संजा's picture

6 Apr 2010 - 5:04 pm | संजा

माननीय ओक साहेबांनी लीहीलेले ईतके अभ्यासपुर्ण लेख न वाचता केवळ टींगलटवाळी करण्याचे काही सिनीयर सदस्यांचे चाललेले ऊद्योग पहाता मन दुखावले.

ओक साहेबांचा प्रतीसाद सर्व समर्पक आहे.

संजा.

चित्रगुप्त's picture

6 Apr 2010 - 6:12 pm | चित्रगुप्त

ओक साहेबांनी केलेले पट्ट्या शोधून काढतानाचे रेकॉर्डिंग मिपावर प्रसिद्ध करावे.

कवितानागेश's picture

6 Apr 2010 - 8:51 pm | कवितानागेश

माझ्या मते BSNL काकांनी वापरलेली पद्धत अत्यंत 'अवैज्ञानिक' आहे.
(स्वैपाक्पाण्यातून थोडा वेळ मिळाला तर मीपण अशी लांबलचक प्रश्नोत्तरे लिहून काढेन;)
कुठलाही प्रयोग करताना निदान १०० बिंदू घ्यावेत!
इथे फक्त १च आहे, तोदेखील स्वतःचा = biased!
यांच्या विरुद्ध अनुभव असणारेही अनेक 'बिंदू' सापडतील, ( माझ्याकडे ३, ओकांकडे ५००-६००), त्यांचे काय?
(माझ्या माहितीतल्या एका MD डॉक्टरला तिच्या १८व्या वर्षीच तिची डिग्री आणि तिच्या नवऱ्याचे पूर्ण नाव सांगितले होते.)
शिवाय ते लोक जे काही सांगतील, त्या माहितीचे स्वतः, इतर नातेवाईक, भूत, वर्तमान, भविष्य अशी वर्गवारी करून त्यातील किती टक्के माहिती बरोबर आली याची 'खरी' नोंद करावी.
आम्ही घरातलेच ३ जण एका नाडीकेंद्रात गेले असताना, त्यानी फक्त अंगठ्याचे ठसे घेतले, नंबर्स दिले, नाव कधीही विचारले नाही!
आम्हाला भविष्य सांगणारे बुवा, हिंदी नीट येत असल्याने, फार प्रश्नांच्या भानगडीत पडले नाहीत.
१० दिवसांनी फोन करायला सांगितला, तेंवा देखील आधी स्वतःचे नाव विचारले नाही.
४-५ पत्त्यांपैकी कुठली जुळते, ते पाहण्यासाठी फक्त आई आणि वडलांच्या नावातील अक्षरांची संख्या विचारली!
त्यांनी माझ्या आईला पहिला प्रश्न विचारला, तुमच्या आईची २ नावे आहेत का? हो म्हटल्यावर विचारले, १ दोन अक्षरी आणि १ चार अक्षरी आहे का?
हो म्हटल्यावर दोन्हीही नावे त्यांनीच सांगितली, तीसुद्धा बरोबर. यावरून त्यांनी ४-५ पैकी १ पट्टी 'फायनल' केली.त्यानंतर
बुवा: वडिलांचे नाव ३ अक्षरी आहे का?
आई: नाही. ४ अक्षरी.
बुवा: नाही. ३ अक्षरीच आहे. पहिले जोडाक्षर आहे.
आई: ( कपाळावर आठ्या!) ( मनात: आगाउच आहे हा बुवा!)
बुवा: पहिले अक्षर त, न, म आहे का?
आई: हो . न.
बुवा: ३ अक्षरीच नाव आहे.
आई: (जास्त आठ्या)
मी: ( मध्येच तोंड खुपसून) दुसरे अक्षर काय?
बुवा: दुसरे स, तिसरे ह .
मी: बरोबर आहे. नृसिंह !
गम्मत म्हणजे, आम्ही सगळे आजोबांचे नाव नरसिंह असे सांगतो, आजोबा स्वतः मात्र, 'नृसिंह' असेच सांगायचे व लिहायचे.
थोडक्यात बुवांना /महर्षी ना जास्त नीट माहिती होती आमच्यापेक्षा !
पुढे..
बुवा: तुम्ही ८ भाऊ बहिणी, ४ भाऊ ४ बहिणी.
आई: ( आठ्या!) नाही.
बुवा: १ भाऊ गेला.
आई: ( मनात: कशाला रे मेल्या अभद्र बोलतोस!) नाही.
बुवा: तुमच्या आईची ८ बाळंतपणे झाली आहेत असे इथे लिहिलेय.
आई: खरेच की. (first son was still born!)
बुवा: तुम्हाला भावाबहिणींची खूप मदत आहे.. .....etc. etc.
आई: होय.होय........
-------------------------
सांगायचा मुद्दा हा, कि आपली स्वतःचीच स्वतःबद्दलची माहिती काही वेळेस कमी पडते.
कदाचित BSNL काकांच्या बाबतीतही असे झाले असेल,
तेंव्हा उत्सुक व्यक्तींनी ती नीट घेऊन मगच प्रयोग करायला जावे.
आम्हाला भविष्य सांगणारे बुवा, हिंदी नीट येत असल्याने, फार प्रश्नांच्या भानगडीत पडले नाहीत. त्यामुळे 'भविष्यकथन' मिळवणे सोपे झाले.
त्यांनी जो काही भूतकाळ आणि वर्तमान सांगितला तो तिघांच्याही बाबतीतला अगदी खरा ठरला,
भविष्य काल आईच ७० %, दादाचा ७० % आणि माझा ( माझ्या 'अक्कलहुशारीने'!!? ) ५० % इतकाच खरा ठरला.
त्यांनी १५ वर्षांनी परत याल, मग पुढचे वाचन करता येईल, आत्ता 'आज्ञा' नाही असे सांगितले.
याचा मात्र मला खूप राग आला!
मला स्वतःला तरी कुठेच फसवाफसवी जाणवली नाही
पण फी खूप घेतात असे मात्र वाटले.
आधीच अडचणीत असलेले लोक भविष्य बघायला येतात, त्यांच्याकडून पुन्हा २-४ हजार रुपये घेऊन व तितक्याच रुपयांच्या पूजा-अर्चा सांगून त्यांना अजून अडचणीत टाकणे योग्य नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते.
इथे सगळ्याच गोष्टी लिहिणे आत्ता शक्य नाही.
पण मी मारलेला १ स्टंट मात्र त्यांनी मला सांगितला. तो फक्त माझ्या एका मैत्रिणीला माहित होता, आणि त्यांनी मला, 'तू 'असे असे' केलास का बाळा, म्हणून प्रश्न विचारला असता तर मी सरळ 'अजिबात नाही' म्हणून खोटे सांगून मोकळी झाले असते.
पण एकदा पट्टीची खात्री झाल्यानंतर त्यानी एकही प्रश्न विचारला नाही, declare करायला सुरुवात केली.
आता मी बिनधास्त सांगते, कि मला नाही नाही ते जीवावरचे खेळ करायची सवय आहे, आणि त्यातून मी सहीसलामत वाचते!! ( ४ पायांवर,अलगद, माउसारखी!)
हे तिकडे कसे काय लिहून आले कुणास ठाऊक?
थोडक्यात मी नाडी शास्त्राला थोतांड म्हणण्याचा करंटेपणा कधीच करणार नाही.
पण पुन्हा ना जाण्याचा नक्कीच करेन!
कारण हे लोक पैशाचा अति हव्यास करून आणी हिंदी, इंग्लिश, भाषा नीट ना शिकून त्यांच्याच हातात असलेल्या एक अत्यंत उपयोगी शास्त्राचे नुकसान करत आहेत.

============
माउ

फक्त १च आहे, तोदेखील स्वतःचा = biased!

म्हणजे "स्वतः अनुभव घेऊन बघा" असे पुन्हापुन्हा सांगितले जाते, त्याचे काय म्हणायचे?
;-)

राजेश घासकडवी's picture

7 Apr 2010 - 5:33 pm | राजेश घासकडवी

तुमच्याशी कोणी अनोळखी व्यक्तीने गप्पा मारल्या?

अशासाठी विचारतोय की नाडीचं माहीत नाही, पण अनेक 'बुवा' ही युक्ती वापरतात. अमेरिकेतल्या काही अशाच 'अंतर्ज्ञानी' माणसांचे खेळ स्केप्टिक सोसायटीने उघडकीला आणलेले आहेत. त्यात साधारण जादू अशी असते की बुवा स्टेजवर उभा असतो. त्याचा कार्यक्रम बघायला शेकडो लोक जमलेले असतात. तो एके ठिकाणी बोट दाखवतो आणि म्हणतो 'तुम्ही, निळ्या ड्रेसमधल्या - तुमची आई अत्यवस्थ आहे म्हणून तुम्ही आल्या आहात. अलाबामाहून, इतक्या लांबून आलात, पण तुमची फेरी व्यर्थ नाही जाणार. देवाचा तुम्हाला आशीर्वाद आहे असं त्याने मला सांगितलंय..' तो याहूनही अधिक माहिती सांगतो. असं अनेकांना करतो. ही सगळी माहिती लोक सभागृहात येण्यापूर्वी रजिस्ट्रेशनच्या लायनीत असताना त्याचे साथीदार गप्पा मारत मारत माहिती काढून घेतात, व त्याला ती बाई कुठे बसलेली आहे हे आधी सांगतात...

राजेश

प्रकाश घाटपांडे's picture

7 Apr 2010 - 5:47 pm | प्रकाश घाटपांडे

असेच प्रयोग हे नंदीबैलवाला देखील करतो. शंभराची नोट कुणाच्या जवळ आहे असे नंदीला विचारतो?
ज्याच्या खिशात शंभराची नोट आहे अशा व्यक्ति जवळ तो बैल उभा रहातो. जादुचे अनेक प्रयोग थक्क करणारे असतात.आपण ती जादुगारची कला मानतो. तेच प्रयोग बाबा बुवांनी केले तर ती सिद्धी! भोळी भाबडी जनता अलगद जाळ्यात अडकते.काही माणसांचा अदभुत गुढ गोष्टींकडे विश्वास ठेवण्याचा कल असतो. पुल देशपांडे नशिब मधे या विषयी काय म्हणतात ते पहा
http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/09/blog-post.html
अशाच प्रकारांविषयी १९३५ साली पुण्यात रा. ज गोखले यांनी एक पुस्तक लिहिल आहे. त्याचे नांव लोकभ्रम हे पुस्तक आमच्या फलज्योतिष चिकित्सा मंडळाच्या ई ग्रंथालयात आहे. डोकावुन पहा हे दुर्मीळ पुस्तक वाचायला मिळेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

कवितानागेश's picture

7 Apr 2010 - 6:08 pm | कवितानागेश

तुमच्याशी कोणी अनोळखी व्यक्तीने गप्पा मारल्या?
...>>>>>>>>>>>
अजीबात नाही.
मी 'कोण' हे त्या बुवा लोकाना महितच नव्हते, अनोळखी माणूस माझ्यासारख्या 'यःकश्चित' मुलिच्या मागावर सोड्णार कसे?
आनि अनोळखी माणसाला मी माझ्या वडीलान्चे, आजोबान्चे, आनि आजीची नावे कशाला सान्गेन?
त्या लोकानी फक्त अन्ग्ठ्याचा ठसा आनी ज न्मतारिख घेतली.
आणी जन्मतारखेवरुन, नक्शत्रावरुन फार तर आमच्या नावाचे पहिले अक्शर ओळखता येइल.
त्यानी आमची नावे एकदाही विचारली नहीत, योग्य पट्टी सापडल्यावर, पट्टीत वाचून 'सान्गितली.'
...
============
माउ

अरुंधती's picture

7 Apr 2010 - 4:26 pm | अरुंधती

१ किंवा २ व्यक्तींच्या नाडीपट्टी पाहून फक्त त्यावरून काढलेले निष्कर्ष तोटके व त्रुटीपूर्ण आहेत. नाडीपट्टी हुडकून काढताना जे प्रश्न विचारले गेले [उदा आई-वडील हयात, भावंडे इ.इ.] हे व त्यांची उत्तरे नाडीवाचकाने रेकॉर्ड केली होती काय? जर तसे नसले तर सुमारे १५० पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे त्यांनी कशी ''लक्षात'' ठेवली ह्या गूढ-रहस्याबद्दल त्यांचा सत्कारच करावा लागेल! [मला समोरच्या व्यक्तीचे नाव ती व्यक्ती नवीन असेल तर १५ मिनिटांनी लक्षातही राहात नाही... आणि इथे आई-बापाचे नाव, भावंडांची संख्या - लिंग - विवाहित्/अविवाहित, मृत्/जिवंत, जातकाचे नाव - वय - जन्मतारीख-साल, शिक्षण, विवाहित्/अविवाहित, व्यवसाय, पत्नीचे नाव, शिक्षण, व्यवसाय/नोकरी, अपत्ये, संख्या, लिंग, राहते घर, इस्टेट, जमीन-जुमला, कोर्ट कचेरी इ. इ. इ. सर्व तपशील एका झटक्यात लक्षात ठेवले म्हणताय?] आहे बुव्वा! कोठे आहेत ते नाडीवाचक? त्यांचे जरा पाय धरावे म्हणते मी! :-)

नाडीपट्ट्यांचे ओंकार पाटील यांच्या नाडीवरून काढलेले निष्कर्ष संपूर्ण नाडीग्रंथांवर अन्यायकारक वाटतात. केवळ एका नाडीपट्टीवरून तुम्ही हजारो लोकांच्या नाडीपट्टीत आलेले कथन खोटे ठरवणार?

त्यासाठी, सप्रमाण सिध्द करण्यासाठी नमुना म्हणून किमान ५० ते १०० नाडीपट्ट्यांचे, त्यांतील किती टक्केवारी भविष्य/भूत्/वर्तमान हे बरोबर्/चूक निघाले इत्यादी सरासरी/आलेख काढलात तर त्या आकडेवारीने आपल्या वक्तव्यास पुष्टी येईल. अन्यथा चमत्कृतीपूर्ण कथाकथनासारखेच आपले निष्कर्षही एकाच व्यक्तीच्या नाडीपट्टीसाठी लागू होतात असे सखेद म्हणावे लागेल.

<< श्रद्धा -अंधश्रद्धा यांचा विचार करताना खरा प्रश्न येतो ते विधायक अथवा विघातक श्रद्धा याचा. ज्या श्रद्धा बाळगल्याने समाजाचे काही नुकसान होत नाही अशा श्रद्धा बाळगल्यास त्यास हरकत नसते. (अर्थात तात्विक पातळीवर वाद-संवाद घडताना त्याला देखील हरकत असते असे मात्र आढळते) >>

ही हरकत कोणाची? भारतीय संविधानाची? कायद्याची? की अजून कोणाची?

हे नुकसान/ फायदा कोण ठरवणार? जनता? अंनिस? कायदा? सरकार? कोण?

तात्विक वादात मी नुकसान हा फायदा कसा व फायदा हे नुकसान कसे हे सिध्द करू शकते. कारण ते सापेक्ष आहेत.
पण ह्या नुकसान/ फायद्याची कायदेसंमत काही व्याख्या आहे काय? की केवळ त्याला तर्काचीच पुष्टी? जर फायदा-नुकसानीचीच भाषा करायची तर ते भौतिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक....नक्की कोणत्या पातळीवरील नुकसान/ फायदा?

ज्या श्रध्दा/ अंधश्रध्दा कायद्याने असंमत आहेत, गैर आहेत त्यांवर थेट कायदेशीर कारवाई करता येतेच की! मग त्यासाठी वेगळे प्रबोधन कितपत उचित आहे? फक्त अमुक अमुक गोष्ट ही कायद्याने गैर आहे, त्यात भाग घेतल्यास तुम्हाला कायदेशीर शिक्षा होऊ शकते एवढा प्रसार पुरेसा नाही काय?

आणि जिथे जिथे शोषण होत आहे, गैरफायदा घेतला जात आहे तिथे तिथे सप्रमाण तसे सिध्द केल्यास कायदा काहीच करू शकत नाही का ?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अनेक वर्षांपूर्वी तांबरम मधील नाडीकेंद्रात श्री. ओक यांना आमची नाडी सापडली होती....
त्यावेळी आम्ही तेथे हजर नसल्याने पट्टी शोधताना कोणकोणती माहिती दिली गेली, हे ठाऊक नाही.
त्यात जी नावे "लिहून" आली होती, त्यात आईचे नाव चूक होते (आईचे व पत्नी चे नाव एकच आले होते)

पट्टीत भूतकाळ व भविष्य काळ काहीही लिहिलेला नव्हता.
पूर्वजन्मीच्या पापकॄत्यांमुळे या जन्मी त्रास, बदनामी होईल, वगैरे होते. त्यासाठी परिहार व दीक्षा कांडम वेगळी फी भरून काढवावे लागणार होते, ते आम्ही केले नाही.

याशिवाय ज्ञान-कांडम काढवले होते, त्यातील मजकूर पोरकट होता, थक्क होण्यासारखे काहीही सांगितले गेले नव्हते.
यासाठी घेतली गेलेली फी त्या काळच्या मानाने खूपच जास्त वाटली होती.
या गोष्टीला फार वर्षे झाली..... ती वही व कॅसेट (यात पट्टी शोधतानाची प्रश्नोत्तरे नव्हती) सापडल्यास मिपावर देऊच.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Apr 2010 - 6:26 pm | प्रकाश घाटपांडे

पूर्वजन्मीच्या पापकॄत्यांमुळे या जन्मी त्रास, बदनामी होईल, वगैरे होते. त्यासाठी परिहार व दीक्षा कांडम वेगळी फी भरून काढवावे लागणार होते, ते आम्ही केले नाही.

१)आपल्या अनुपस्थितीत पट्टी निघाली होती.
खरी भानगड / शोषण हे परिहार कांडम मधे असते. आपल्याकडच्या नारायण नागबली व त्रिपिंडी श्राद्ध सारखे. मागचे हिशेब चुकते करु . आत्ता ज्या अडचणी येताहेत त्या माग्चे हिशेब राहिल्याने येताहेत. परिहार करुन ते चुकते करा म्हणजे पुढे अडचण येणार नाही असा काहीसा प्रकार.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.