अर्थ आवर-Earth Hour

बेभान's picture
बेभान in जनातलं, मनातलं
26 Mar 2010 - 2:29 pm

उद्या, म्हणजे शनिवारी, २७ मार्च दिवशी, रात्रि ८:३० ते ९:३० हा एक तास Earth Hour (अर्थ आवर) म्हणुन पाळला जातो. या एक तासामध्ये सर्व उद्योगधंदे, सर्व संस्था आणि घरातील विनाकारण चालू असलेली विजेची उपकरणे बंद ठेवण्याचे अवाहन wwf- वर्ल्ड वाईल्डलाईफ़ फंड या संस्थेने केला आहे. होणा-या हवामानबदलाच्या परिणामाविषयीची जागरुकता वाढविण्याच्या दृष्टीने या संस्थेने २००७ पासुन हे पाऊल उचललेले आहे. आयफेल टॉवर, दिल्लीच्या लाल किल्ल्यामधे ही हा ’अर्थ आवर’ पाळला जातो. जास्तीत जास्त सुजाण नागरीकांनी या घटनेमधे सहभागी होवून सहकार्य करावे ही विनंती. (माझा आणि W.W.F.चा काहीही संबंध नाही.)

अवांतर: ’महावितरण’वर W.W.F. या संस्थेचा एवढा प्रभाव पडेल असे वाटले नव्हते.

धोरणप्रकटनविचार

प्रतिक्रिया

अरुंधती's picture

26 Mar 2010 - 5:56 pm | अरुंधती

माहितीबद्दल धन्यवाद बेभान!
माझ्यापुरते तरी मी उद्या रात्री ८:३० ते ९:३० ह्या वेळेत वीजेची उपकरणे बंद ठेवणार!
[ सध्या दिवसभरात इतक्या वेळा तसेही पॉवरकट्स होत असतात की आपोआप वीजबचत होते व पर्यावरणाला तेवढीच महावितरणतर्फे मदत होते!]

असो.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

बेभान's picture

26 Mar 2010 - 6:57 pm | बेभान

धन्यवाद अरुंधती.
बहुतेक बाकीचे मिपाकर ह्या धाग्याला प्रतिक्रिया न देता विजेची बचत करत आहेत असे समजुया..!! =D>
जागरुकता.. :?

शुचि's picture

26 Mar 2010 - 7:05 pm | शुचि

गेल्या वर्षी मी "मिट्ट" काळोख केला घरात तर माझ्या रूम्मेट नी दिवा लावला जबरदस्तीनी आणि फिल्मी अंदाजात म्हणाली "बाहर दूर दूर तक रौशनी और हमारे घरमे अंधेरा....यह नही हो सकता" [(

बाय द वे - फक्त अनावश्यक वीज उपकरणं बंद करायची का आवश्यक सुद्धा? मी ऐकलय दिवे सुद्धा बंद करा जे की आवश्यक असतात तरीही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:|
नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||

सुहास's picture

27 Mar 2010 - 4:38 am | सुहास

फक्त अनावश्यक वीज उपकरणं बंद करायची का आवश्यक सुद्धा?

सगळी विद्युत उपकरणे, पंखे, एसी, दिवे, इत्यादी... :-)

त्यामुळे वाईट वाटते एका चांगल्या उपक्रमाला आम्ही मुकणार.
वेताळ

समंजस's picture

26 Mar 2010 - 7:17 pm | समंजस

मला एक तास विज बंद करण्याची आवश्यकताच नाही....विज कंपनी ती काळजी स्वतःच घेते. :)

रेवती's picture

26 Mar 2010 - 7:22 pm | रेवती

कालच माझ्या मुलाने मला ही माहिती दिली.
आम्हीही एक तास वीज बंद ठेवू.

रेवती

राजेश घासकडवी's picture

27 Mar 2010 - 6:26 am | राजेश घासकडवी

भारतात दरडोई अमेरिकेसारख्या देशाच्या सुमारे पाच टक्के वगैरे वीज वापरली जाते (नक्की प्रमाण माहीत नाही, पण साधारण अंदाज). त्यातही जर आवश्यक वीज वजा केली तर अनावश्यक वीज वापराचं अमेरिकेत होणारं प्रमाण भारताच्या शेकडो पटीत जाईल. पुरेशी वीज नाही म्हणून लोडशेडींग भर उन्हाळ्यात दुपारी सहन करतोच आपण. पर्यावरणाचा प्रश्न निर्माण केला तो अमेरिकेसारख्या देशांनी भरमसाठ नैसर्गिक साधनसामुग्री वापरून. असं असताना भारतातल्या लोकांनी आणखीन स्वत:च्या जिवाचा कोंडमारा करून घेणं म्हणजे ज्या गरीब लोकांना लुटून श्रीमंत लोक श्रीमंत झाले त्यांच्यावरचा टॅक्स वाढवण्यासारखं आहे.

मी म्हणेन अमेरिकेतल्या लोकांनी तासाभराऐवजी एक तास एक मिनिट वीज बंद करावी... मग भारतातल्यांना काहीही करण्याची गरज नाही. भारतातले लोक वर्षभर खूप करत असतात. ही मॅसोचिस्टीक स्वबडवेगिरी (हा माझा आवडता शब्दप्रयोग आहे) प्रगत देशातल्यांनी करावी.

राजेश

Nile's picture

27 Mar 2010 - 6:47 am | Nile

असं असताना भारतातल्या लोकांनी आणखीन स्वत:च्या जिवाचा कोंडमारा करून घेणं म्हणजे ज्या गरीब लोकांना लुटून श्रीमंत लोक श्रीमंत झाले त्यांच्यावरचा टॅक्स वाढवण्यासारखं आहे.

भावनेशी सहमत आहे, पण ज्यांच्या सहज शक्य असेल (आणि जीवाचा कोंडमारा होत नसेल ;) ) त्यांनी एक तास बंद करायला काहीच हरकत नाही.

कोणतेही महत्त्वाचे काम सोडुन नुकसान होत असताना तुम्ही वीज बंद करुन बसलात तर ते नुकसान मोठे की त्या एक तास तुम्ही वीज सुरु ठेवुन होणारे नुकसान मोठे ह्याचा ही विचार व्हायला हवा.

सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सतत वीज (आणि इतरही साधनसंपत्ती) वाचवणे. त्या करीता 'अर्थ अवरचा' प्रसार म्हणुन एक तास वीज बंद ठेवणार असाल तर उत्तमच.

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Mar 2010 - 8:36 am | अक्षय पुर्णपात्रे

राजेशशी संपूर्ण सहमत. अमेरिकेत वीजेचे दरडोई भक्षण भारतापेक्षा २९००% जास्त आहे. (दुवा) तापमानासारखे घटक विचारात घेतल्यास अमेरिकेचे दरडोई भक्षण कमीत कमी २००० % पेक्षा जास्त असावे. शनिवार हा अमेरिकेतील ऑफ पिक (कमी भक्षण असलेला) दिवस आहे. अमेरिका व इतर विकसीत देशातील लोकांनी एक तास व काही मिनिटे वीज कमी वापरावी जेणेकरून कोळसा वापरून होणारे वीजोत्पादन होणार नाही. अमेरिकेत कोळशावर ४५ % तर २३ % वीजेचे उत्पादन नैसर्गिक वायूवर होते. (दुवा) हे उत्पादन कमी झाल्याशिवाय भारत व चीन सारख्या देशांकडून उत्पादन व भक्षण कमी करण्याची अपेक्षा फोल तर आहेच शिवाय अन्याय्यही आहे.

ज्या देशात खेड्यांमध्ये २२ तास वीजकपात असते त्या देशास एक तास वीज वापरू नका वगैरे प्रकार सांगणे हा शुद्ध नालायकपणा आहे.
...
शक्य असल्यास 'अर्थ अवर' दरम्यान अमेरिकेतील काही भागात (अमेरिकेतील मध्यपूर्वेतील १७ राज्ये व कॅनडातील २ परगणे) दरडोई वीजेचे भक्षण किती कमी झाले व त्याचा पर्यावरणावर दरडोई किती परिणाम झाला हे मोजून येथे ते आकडे देईन.

उगाच नसती फॅडं.
एक दिवस उपवास करा, असा...आधीच उपाशी,अर्धपोटी असणार्‍यांना, अपचन होईस्तो बकाबक खाणार्‍यांनी केलेला हा बुर्झ्वा उपदेश आहे.
वर काहीजणांनी म्हटल्याप्रमाणे , खरंच ह्याबाबत ’ते’ लोक गंभीर असतील तर मी म्हणेन की...रोज किमान एक तास ’तिकडील’ सगळी विद्युत केंद्रे बंद ठेवावीत आणि मगच जगाला पर्यावरण वाचवणे वगैरेवर भाषणं द्यावीत.
इथली जनता काय,बोलून चालून अडाणी आणि अर्धवट...पश्चिमेकडून आदेश आला ना....म्हणजे तो पाळलाच पाहिजे...त्यातून भरीस भर म्हणजे ’त्यांना’च पर्यावरण वगैरे सगळं समजतं...असा समज करून घेणारी आणि करवून देणारी काही स्वत:ला खूप शहाणी समजणारी माणसे...असा सगळा सावळा गोंधळ आहे इथे.
तेव्हा म्हणा...ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!

नितिन थत्ते's picture

27 Mar 2010 - 8:53 am | नितिन थत्ते

आम्ही वीजबचतीसाठी खालील उपाय योजतो. त्यामुळे अर्थ अवरची गरज नाही.

घरात ए सी लावलेला नाही
कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरत नाही. याने थोडी रोजगारनिर्मितीसुद्धा होते.
पाणी तापवण्यासाठी गॅसचा गीझर वापरतो. *
हॅण्डशॉवरने आंघोळ करतो. त्यामुळे पाणीबचत होऊन पर्यायाने विजेचीही बचत होते.
सोलर वॉटर हीटर लावण्याच्या प्रयत्नात पण आशा नाही कारण स्वतःची गच्ची/अंगण नाही.
इन्व्हर्टर बसवलेला नाही. (इन्व्हर्टर बसवल्यामुळे तेवढ्याच उपभोगासाठी किमान दुप्पट वीज खर्च होते.-दोनदा होणार्‍या ऊर्जा रूपांतरणामुळे)

*याने प्रदूषण कमी होतेच हे मला माहिती आहे.

बाकी घासकडवींनी पश्चिमेतूनच मांडलेल्या मुद्द्याशी सहमत.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

II विकास II's picture

27 Mar 2010 - 9:19 am | II विकास II

>>सगळी विद्युत उपकरणे, पंखे, एसी, दिवे, इत्यादी... Smile
मी ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी भर दुपारचे ४ तास भारनियमन असते. त्यामुळे, 'वसुंधरा तास' व तत्सम गोष्टी आंधळेपणाने पाळण्यात रस नाही. असले तास ज्यांना कायम २४ तास वीज मिळते, त्यांनी करावेत. इतरांसाठी हे असल्या गोष्टी, 'आधीच दुष्काळ, त्यात अधिक महीना' असे होते.

Earth Hour is a global event organized by WWF (World Wide Fund for Nature, also known as World Wildlife Fund) and is held on the last Saturday of March annually, asking households and businesses to turn off their non-essential lights and other electrical appliances for one hour to raise awareness towards the need to take action on climate change. Earth hour was conceived by WWF and The Sydney Morning Herald in 2007, when 2.2 million residents of Sydney participated by turning off all non-essential lights.
http://en.wikipedia.org/wiki/Earth_Hour

ह्यात सरळ सरळ लिहीले आहे कि आवश्यक नसलेल्या वीजग्राहक गोष्टी बंद कराव्यात. कोणीही काम सोडुन, घरात/कचेरीत अंधार करुन 'वसुंधरा तास' चे पालन करायला सांगितले नाही. 'वसुंधरा तास' चा एकंदर उद्देश, वीजेची अनावश्यक नासाडी थांबावी आणि त्याबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे असा आहे. आणि आम्ही ते नेहमीच करतो. घरात अंधार करणे हा अतिउत्साही पणा वाटतो.
काही संकेतस्थळे ह्या 'वसुंधरा तासात' बंद राहणार आहेत, कदाचित ती अनावश्यक/निरुपयोगी संकेतस्थळे असावीत. ;)

सारांश हा की 'वसुंधरा तास' आंधळेपणाने पाळण्यापेक्षा वर्षभर अनावश्यक वीज उपयोग टाळावा.

---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट.
योग्य बोली सह संपर्क करावा.

इंटरनेटस्नेही's picture

27 Mar 2010 - 12:04 pm | इंटरनेटस्नेही

सारांश हा की 'वसुंधरा तास' आंधळेपणाने पाळण्यापेक्षा वर्षभर अनावश्यक वीज उपयोग टाळावा.

सहमत.