बेघर

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
13 Mar 2010 - 1:06 pm

दरवर्षी नव्या पुस्तकांना घातलेल्या कव्हरसारखं
या पावसातही तुझ्या आठवणींना
लपेटून घेतलं मी कवितेत.
हळूच दुडले काही दिवस
एकमेकांसोबतचे
शाकारली स्वप्नांची कौलं
नि पडलो जरासा वाचत मजेत
नव्या छपराखाली त्याची वाट बघत
चवदार शब्दांचे घुटके घेत

पण वाचता वाचता डोळा लागताच
हा कोसळून गेला धबाधबा
माझी फिरकी घेत.

जाग येऊन बेघर झालो पुन्हा
नि फुटक्या कौलांचा तो ढीग
घेतला पुन्हा कवेत.

आता
आधी कौलं घालू की वाचन संपवू
इतकाच प्रश्न आहे.

पुन्हा बेघर व्हायची भीती वाटते ना!

करुणशांतरसकविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

13 Mar 2010 - 2:51 pm | विसोबा खेचर

आता
आधी कौलं घालू की वाचन संपवू
इतकाच प्रश्न आहे.

साक्षात कुसुमाग्रजही कौतुक करतील अशी कविता..! खूप आवडली..

जियो...!

तात्या.

श्रावण मोडक's picture

13 Mar 2010 - 4:31 pm | श्रावण मोडक

आवडली कविता. उत्तम!

जयवी's picture

13 Mar 2010 - 5:16 pm | जयवी

जबरदस्त कविता......!!
उच्च !!

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2010 - 5:30 pm | बिपिन कार्यकर्ते

बेलाशेठ...... जबरदस्त!!!!

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2010 - 5:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेलासेठ, आवडली कविता..!

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

13 Mar 2010 - 7:21 pm | चतुरंग

बेला, फार दिवसांनी मूड लागलेला दिसतोय!!

चतुरंग

प्रभो's picture

13 Mar 2010 - 9:01 pm | प्रभो

असेच म्हणतो.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

प्रशांत उदय मनोहर's picture

14 Mar 2010 - 4:12 pm | प्रशांत उदय मनोहर

येऊ द्या आणखी :)
आपला,
(वाचक) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

अनामिक's picture

13 Mar 2010 - 7:38 pm | अनामिक

जबरदस्त कविता!

-अनामिक

मदनबाण's picture

13 Mar 2010 - 7:41 pm | मदनबाण

वा. मस्त... :)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

प्राजु's picture

13 Mar 2010 - 10:33 pm | प्राजु

बेला..
सुरेख कविता!

जाग येऊन बेघर झालो पुन्हा
नि फुटक्या कौलांचा तो ढीग
घेतला पुन्हा कवेत.

क्लास!!

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

चित्रा's picture

13 Mar 2010 - 10:50 pm | चित्रा

सुरेख कविता.

रेवती's picture

13 Mar 2010 - 11:45 pm | रेवती

कविता आवडली रे बेला!
दरवर्षी नव्या पुस्तकांना घातलेल्या कव्हरसारखं
या पावसातही तुझ्या आठवणींना
लपेटून घेतलं मी कवितेत.
हे छानच!

रेवती

आशिष सुर्वे's picture

13 Mar 2010 - 11:53 pm | आशिष सुर्वे

आपली कविता अगदी बेसनाच्या लाडवासारखीच.. ग्वाड आणि पुन्हा पुन्हा आस्वाद घ्यावीशी वाटणारी!!

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

sur_nair's picture

14 Mar 2010 - 12:15 am | sur_nair

गुलजारच्या कवितेची आठवण होते.

धनंजय's picture

14 Mar 2010 - 1:12 am | धनंजय

जबरदस्त!

मुक्तसुनीत's picture

14 Mar 2010 - 4:07 am | मुक्तसुनीत

:-)

राघव's picture

14 Mar 2010 - 2:33 pm | राघव

काही कविता अशा असतात की ज्यांना प्रतिसाद दिल्यावाचून राहवत नाही!
आणिक काय लिहू? ब्येष्टेष्ट!

राघव

राजेश घासकडवी's picture

14 Mar 2010 - 4:01 pm | राजेश घासकडवी

आवडली

jaypal's picture

14 Mar 2010 - 5:18 pm | jaypal

आवडले ;-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

निरन्जन वहालेकर's picture

15 Mar 2010 - 8:00 am | निरन्जन वहालेकर

अतिशय छान ! खुप आवडली ! !

सुवर्णमयी's picture

16 Mar 2010 - 9:16 pm | सुवर्णमयी

मुक्तछंद अतिशय प्रभावी
(माझ्या कविता मात्र गद्याकडे झुकू लागल्या आहेत..)