(तेंडुलकर आणि गांगुली फालतु क्रिकेटर -मायकेल कॅस्प्रोविचचे मत)

चेतन's picture
चेतन in जनातलं, मनातलं
8 Mar 2010 - 11:27 am

रावसाहेबांचा हा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्‍या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा) ;)

असो...

इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते:

१. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही. भारतीय खेळाडुला पाश्चात्य देशातिल अंपायर मुद्दामुन दंड करतात / आउट देतात असे ब्रेनवॉशिंग बीसीसीआयने केले, पण प्रत्यक्षात भारतीय खेळाडुंना पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही बीसीसीआयने, आणि विशेषतः सचिन तेंडुलकरनी केले नाही. ज्या आयपीएल मध्ये बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना उचलून धरल्याचा दावा केला, त्या स्पर्धेत अभारतीय खेळाडूंची आजची संख्या दोन वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
२. गेल्या वीस वर्षात भारतातील खेळांच्या र्‍हासाचे प्रमुख कारण म्हणजे बीसीसीआय. बीसीसीआयने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ स्लेजींगचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा बीसीसीआयने भारताच्या क्रिकेट्मध्ये आणला. 'आयपीएल' मधील कित्येक चीअर गर्ल्सवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण सचिन तेंडुलकरला बाहेर करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी बीसीसीआयने भारतात प्रथम सुरु केली.
३. बीसीसीआयचे भारतीय कैवाराचे धोरण स्वतःला सोयीस्कर आणि धरसोडीचे आहे. भारतात भारतीय माध्यमातून सुरु झालेल्या काही क्रिकेट स्पर्धांना (आयसीएल) पहिला विरोध बीसीसीआयचा होता.
४. सौरव गांगुली बीसीसीआयची ताकद ओळखण्यात अपयशी ठरला. बीसीसीआयला ताब्यात ठेवणे त्यांला शक्य असूनही त्यानी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्याच्या जेंव्हा ते ध्यानात आले, तेंव्हा फार उशीर झाला होता.
५. 'एक लढाउ संघनायक' ही सौरव गांगुलीची ओळख फारशी खरी नाही. इतर क्रिकेट संघनायकांच्या मानाने त्यातल्या त्यात आक्रमक भाषा व काही स्पर्धांमध्ये उठबस एवढा फरक सोडला तर सौरव गांगुली आणि इतर क्रिकेट खेळाडु यांच्यात काही फरक नाही. 'अजित वाडेकर नंतरचा भारताचा उत्तम कर्णधार' हे सौरव गांगुलीचे वर्णन निरर्थक आहे.
६. धोनीला मिळणारा प्रतिसाद ही वीस वर्षे क्रिकेट पाहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. धोनी देखील सचिन तेंडुलकरप्रमाणेच उथळ आणि सवंग खेळ या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होताहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता वीस वर्षे थांबणारा नाहीत. ते लवकर हिशेब मागतील.
बीसीसीआयने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. जडेजा, अझरुद्दीनपासुन स्टीव बकनरपर्यंतची उदाहरणे आहेत. मायकेल कॅस्प्रोविच हा तर फार पूर्वीपासून बीसीसीआयच्या हिटलिस्टवर असणार्‍या. त्यांला सचिन तेंडुलकरनी ज्याला 'खास स्ट्रेट ड्राईव्ह' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'झोडपुन' घेतले आहे. मायकेल कॅस्प्रोविचच्या या मुलाखतीत सचिन तेंडुलकरचा राग (मला तरी) दिसला नाही. दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्‍या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.

डिस्क्लेमिअरः हे लिखाण काल्पनिक आहे. (पण फोर्थ अंपायर आणि निखील बगळे बघुन डोक फिरतं हे नक्की)

औषधोपचारविनोदसमाजराजकारणमौजमजाबातमीप्रतिक्रियावादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

8 Mar 2010 - 11:32 am | विसोबा खेचर

कोण मायकेल कॅस्प्रोविच??

तात्या.

दिपक's picture

8 Mar 2010 - 11:50 am | दिपक

कोण मायकेल कॅस्प्रोविच??

सचिनने शारजाह मधे धु धु धुतलेला तोच तो.

झकासराव's picture

8 Mar 2010 - 11:53 am | झकासराव

हा तोच ज्याला तेंडुलकरने शारजात उचलुन उचलुन फेकले होते. :)

राजकारणी's picture

8 Mar 2010 - 11:53 am | राजकारणी

कॅस्प्रोविच .... ज्याच करीयर सच्याने सम्पवल शारजा मधे ...
परत कधी चेन्डू टाकायच्या लायकीचा ठीवला नाहि ... म्हनुन एवधी बडबड ...

:)) :)) :)) =)) =)) =))

आशिष सुर्वे's picture

8 Mar 2010 - 11:58 am | आशिष सुर्वे

सोमवारसारख्या 'रटाळ' दिवशी ह्या मजकूराने मनोरंजन केल्याने धन्यवाद..

=))

मायकेलने हातात 'बॉल'ऐवजी 'लेखणी' पकडून विनोदी लेखनाकडे अधिक लक्ष दिले असते तर्र कदाचित चार लोकांत नाव तरी (चांगले) झाले असते..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

चेतन's picture

8 Mar 2010 - 12:00 pm | चेतन

डिस्क्लेमिअर टाकलय उगाच गैरसमज नको
;)

चेतन

झकासराव's picture

8 Mar 2010 - 2:34 pm | झकासराव

आम्ही आधी हा लेख वाचला मग संजोपरावांचा तो लेख वाचला.
तो लेख वाचताना मनात म्हणल हायला देजावु देजावु मंग लक्षात आला तुमचा गनिमी कावा :)

चेतन's picture

8 Mar 2010 - 3:36 pm | चेतन

कसला गनिमी कावा हो पहिल्याच ओळीत लिहल आहे की.

आता तिच आयडिया वापरली म्हणुन गनिम म्हणत असाल तर ठिक आहे

(गनिम) चेतन

मी-सौरभ's picture

9 Mar 2010 - 12:50 am | मी-सौरभ

-----
सौरभ :)

शुचि's picture

9 Mar 2010 - 5:48 am | शुचि

>>बाष्कळ चर्चा करणार्‍या फोर्थ अंपायर>>>

हे लेखकाचे वैयक्तीक मत असू शकते.

बाकी ठाकरे आणि पवारांवरील लेख मला तरी बाष्कळ वाटला नाही. त्यातून मला "वागळे, भावे" यांसारख्या काही लो़कांचा दृष्टीकोन कळला.
विकास यांची संतुलीत आणि सविस्तर प्रतिक्रिया हे देखील या या लेखातून मिळालेले फळच आहे. उद्या अशा प्रकारच्या चर्चेत मी अधिक अत्मविश्वासाने बोलू शकेन.

व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने, मला सन्जोप रावांची भूमिका "मी आजपासून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्याशिवाय ती मान्य करणार नाही." अशी काहीशी वाटत आली आहे. त्यामुळे पण मला त्यांचे लेख आवडतात. असो.

चेतन आपले विडंबन देखील अतिशय मार्मीक आहे. मी २ ही लेखांचा आनंद लुटला.

**********************************
To repeat what others have said, requires education, to challenge it, requires brains.- Mary Pettibone Poole

चेतन's picture

10 Mar 2010 - 11:17 am | चेतन

सर्व प्रतिसादकांचे आभार.

अवांतरः शुचि बाष्कळ हा शब्द लेखावरील चर्चेपेक्षा मुलाखती संदर्भात होता. असो
प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहेच पणं...
असचं काही बाळासाहेब किंवा राज कोणा प्रसिध्द व्यक्तीबद्दल बोलले अस्ते तर वेगळी प्रतिक्रिया याच माणसांकडुन ऐकायला मिळाली असती असे वाटते.

चेतन