(विडंबनी खेळ..)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
21 Dec 2009 - 9:39 pm

प्राजुतैंचा 'अनंताचा खेळ..' बघता बघता पूर्वस्मृतीतले अनेक खेळ फसफसून जागे झाले! ;)

चला रे बसूया | कातर सांजेला |
पहिल्या धारेला | आम्ही बद्ध ||

तळले पापड | चखणाही खात |
सोडुनिया साथ | शुद्ध गेली ||

तोंडी एकेकाच्या | इमले सहस्र |
ढोसती एकत्र | समदु:खी ||

काचबिंब नेत्री | ढापण देखणे |
ग्लास चाचपणे | इथेतिथे ||

चंदेरी हा बार | सावळा वेटर |
बाटल्यांच्या पार | दिसे शेट्टी ||

वितळला बर्फ | सोडा फसफसे |
व्हिस्कीचे रे पिसे | लागे मला ||

भिजली पहाट | अशी दारवांत |
चला पटापट | घराकडे ||

बेवडे येऊनी | ढेरलास झाले |
घोरणे रंगले | बिछान्यात ||

कवितेची ओळ | वारंवार छळ |
विडंबनी खेळ | म्हणे "रंगा" ||

चतुरंग

हास्यअद्भुतरसकविताविडंबन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

21 Dec 2009 - 9:51 pm | मदनबाण

चंदेरी हा बार | सावळा वेटर |
बाटल्यांच्या पार | दिसे शेट्टी ||

व्वा...
इडंबन लयं आवडले... :)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

jaypal's picture

21 Dec 2009 - 10:07 pm | jaypal

मज पामराला आसरा द्या.
कौतुक सोहळा / देखियेला डोळा /
रंगा सावळा/ वाचता वाचता //


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्राजु's picture

21 Dec 2009 - 10:16 pm | प्राजु

धन्य आहात!!
सह्हीये एकदम!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Dec 2009 - 10:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही हा हा हा ... रंगाशेट, लै भारी!! "दारवा" हा शब्द हृदयाला भिडला आणि डोळे अंमळ ओले झाले.

अदिती

टुकुल's picture

21 Dec 2009 - 11:07 pm | टुकुल

कुठे असता तुम्ही? पत्ता द्या..
चरण स्पर्श लाभु द्या आम्हाला..

--टुकुल

श्रावण मोडक's picture

22 Dec 2009 - 12:39 am | श्रावण मोडक

ढेरलास नाही; ढेर (हा वेगळा शब्द) आणि ल्हास (हाही वेगळा शब्द) झालो...
बाकी कडव्यांचा क्रम अगदी तंतोतंत कसा जुळवता आला? नाही, म्हणजे तुम्ही बऱ्याच काळापूर्वी दारवांपासून दूर झालात असे वाचून होतो. तरीही याद बरीच ताजी दिसते. ;)

चतुरंग's picture

22 Dec 2009 - 3:12 am | चतुरंग

आणि ल्हास हे वेगळे शब्द आहेत हे माहीत होते पण कवितेसाठी जोडून घेतले - लास की ल्हास ह्याबद्दल खात्री नव्हती - चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद!
(बाकी कडव्यांचा क्रम जुळव्यासाठी स्वतः घ्यावीच लागते असे नाही, निरीक्षणाने बरेच काही साधते असा अस्मादिकांचा अनुभव आहे! उपयुक्त माहिती आम्हाला कुठून मिळाली ह्यासाठी दुबईच्या शेखांना भेटा! ;))

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Dec 2009 - 9:13 am | llपुण्याचे पेशवेll

बाकी कडव्यांचा क्रम जुळव्यासाठी स्वतः घ्यावीच लागते असे नाही, निरीक्षणाने बरेच काही साधते असा अस्मादिकांचा अनुभव आहे! उपयुक्त माहिती आम्हाला कुठून मिळाली ह्यासाठी दुबईच्या शेखांना भेटा!

सहमत आहे, अन्यथा आम्हाला सदर चालवणे मुश्किल होते.
बादवे रंगाशेठ विडंबन झक्कास.

पुण्याचे पेशवे

रेवती's picture

22 Dec 2009 - 2:12 am | रेवती

दारू, बायका इ. वरची विडंबने वाचून कंटाळा आला आहे.
हे ही ठिकच. दुसर्‍यांच्या ताज्या कवितेचा भुस्सा पाडायला कितीसा वेळ लागतो? (हा प्रश्न नाही).:(

रेवती

चतुरंग's picture

22 Dec 2009 - 3:15 am | चतुरंग

हे ही बरोबरच आहे म्हणा! :(

चतुरंग

टारझन's picture

22 Dec 2009 - 9:06 am | टारझन

हॅहॅहॅ .. मला तर बॉ इडंबणा पेक्षा रेवती तैंची कमेंट आवडली =))
आणि दारू नव्हे गं .. "दारवा" =)) जसा शब्द..गारवा .. तसा दारवा :)

बाकी चालुन द्या भौसाहेब ;)

- नि:शब्द टारवा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Dec 2009 - 9:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मान्य आहे, पण बर्‍याच दिवसांनी दारूवरचे विडंबन आलं आहे हे ही मान्य! रेवतीताई, कवितेला दाद देण्याकरता आता तूही 'लेखन करा'वर टिचकी मारत जा! पहिल्या विडंबनातच तू कौशल्य दाखवलेलं आहेसच.

अदिती

पाषाणभेद's picture

22 Dec 2009 - 7:24 am | पाषाणभेद

छान..
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

sneharani's picture

22 Dec 2009 - 11:42 am | sneharani

रेवतीताई सारखच म्हणेन!

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2009 - 11:56 am | परिकथेतील राजकुमार

शब्ददारवा लैच भारी.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रकाश घाटपांडे's picture

28 Dec 2009 - 9:42 am | प्रकाश घाटपांडे

बघता बघता पूर्वस्मृतीतले अनेक खेळ फसफसून जागे झाले

ह्ये बाकी बेस झालं. स्मृतीतील पुर्वरंग असेच फसफसुन जागे झाले कि असा इडंबनी खेळ व्हतोय.
रंगाशेटनी अजुन बी काई रंग गुलदस्त्यात ठेवले हायेत अस भाकीत आमी सांगतो
अवांतर- हे भाकीत आहे कोलीत नाही
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.