पैलतिरी..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
7 Nov 2009 - 7:27 pm

पुन्हा पुन्हा तू नको विचारू! प्रीत आपुली जन्मांतरी
सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी..

इतुके ओझे अपेक्षांची खांद्यावरती असे भारी
किंचित हसूनी जगतानाही कळ उठते हृदयांतरी
थोडी होईल गती कमी पण नसेल काही जबाबदारी
सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी..

किती संपले किती राहिले, हिशोब सारा यथातथा
मनांस वरले मनानेच मग काय कथा अन काय व्यथा?
शितल छाया मनांस भावेल, रखरखणार्‍या उन्हापरी
सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी..

नको विचारू कधी, कुठे तू! प्रेमाने ही भर झोळी
जाऊ तरूनी संसारातून आणिक भेटू सायंकाळी
हात घेऊनी हातामध्ये, सांज आपुली करू साजिरी..
सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी..

- प्राजु

शांतरसकविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

7 Nov 2009 - 7:34 pm | मदनबाण

व्वा. सुंदर कविता... :)

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

अवलिया's picture

7 Nov 2009 - 7:34 pm | अवलिया

छान ! आवडली कविता !!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मनीषा's picture

7 Nov 2009 - 9:46 pm | मनीषा

सुरेख कविता..

विष्णुसूत's picture

9 Nov 2009 - 7:25 am | विष्णुसूत

छान

ऋषिकेश's picture

9 Nov 2009 - 10:07 am | ऋषिकेश

सुरेख.. आणि सुनिताबाईंच्या जाण्यामुळे समयोचितही

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

मीनल's picture

9 Nov 2009 - 7:32 pm | मीनल

ठिक आहे.
इतर कवितांसारखी खास वाटली नाही .
मीनल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2009 - 8:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किती संपले किती राहिले, हिशोब सारा यथातथा
मनांस वरले मनानेच मग काय कथा अन काय व्यथा?

अहाहा ! मस्त ओळी.

और भी आने दो.

-दिलीप बिरुटे

अविनाशकुलकर्णी's picture

16 Nov 2009 - 8:18 pm | अविनाशकुलकर्णी

आवडली..नादबध्ध आहे

या मुक्तछंदा"तल्या कवितेत आर्त भाव-भावना छान उमटल्या आहेत!
वृत्तानुसार केली असती तर जास्त "घोटीव" झाली असती. माझ्या मते वृत्त हे कवितेच्या सौंदर्याचं मुख्यांग असतं.
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!