Skip to main content

नारी नारी (हिशम अब्बास) या गाण्याचं विडंबन

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 01/12/2015 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
नारी नारी (हिशम अब्बास) या गाण्याचं विडंबन भारी भारी ब्लॉग दुवा भारी भारी *३ भारी भारी; भारी आमचे भाऊ भारी भारी; बॅनर बिनर लावू रस्त्यारस्त्यावर आमच्या भाऊंची हवा भारी की नाय (हबीबी दा) दिसतो तो म्हणतो भाऊ तुम्हीच हवा भारी की नाय (हबीबी दा) भारी भारी; भारी आमचे भाऊ भारी भारी; बॅनर बिनर लावू भाऊंचा नाद कुण्णी करतो का बघा भारी की नाय (हबीबी दा) करतो तो करतो पण तो उरतो का बघा भारी की नाय (हबीबी दा) भारी भारी; भारी आमचे भाऊ भारी भारी; बॅनर बिनर लावू भाउंची गाडी ऑडी चमचमत्या चैनी रेबॅनचा गॉगल आणि तोंडात खैनी भाऊंना भेटायसाठी ह्या मोठ्या लैनी भाऊंची वाईफ अख्या गावाची वैनी भारी भारी; भारी आमचे भाऊ भारी भारी; बॅनर बिनर लावू नडला की तोडला भाऊ सॉलिड स्ट्रिक्ट चुकीला माफी नाही लाथच डायरेक्ट भारी भारी; भारी आमचे भाऊ भारी भारी; बॅनर बिनर लावू भारी भारी; भारी आमचे भाऊ भारी भारी; बॅनर बिनर लावू
लेखनविषय:

वाचने 1081
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया