Skip to main content

विडंबन

(प्रार्थना!)

लेखक गड्डा झब्बू यांनी सोमवार, 13/05/2019 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
(मनमेघ यांची क्षमा मागून) स्वामि भेटो वा न भेटो येऊ दे हे मागता आतला मराठी माणूस माझ्या नित्य राहो जागता । लिहितो कुठल्या दिशेला हे न उमगे ज्या क्षणी एक ही साधी कसोटी नं आठवो लिहिताक्षणी दुःख वाचका देउनी सुख नं लाभे लेखका।। हासता यावे मला पाहून मिपाकरांना सुखी भावना माझी नसो सहवेदनेला पारखी या विचारांना कृतीही येऊ दे मज जोडता ।। कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी काय नाते या मिपाशी? हे असावे चिंतनी आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।। प्रेरना-प्रार्थना!

स्वामि धागे घेऊन येतात

लेखक सोन्या बागलाणकर यांनी बुधवार, 08/05/2019 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामि धागे घेऊन (का) येतात एकएक हट्टी जिलबी जिद्दीने पाडून ठेवतात, प्रत्येक जिलबीमध्ये अनेक बिनबुडाचे मुद्दे मनोरंजन म्हणून ठेवून जातात... स्वामि धागे घेऊन येतात अलंकारिक वाक्ये भिरकावून केवळ डोकेदुखी देऊन मिपाकरांच्या डोक्यात जातात ट्रोलबाजी करून मजा बघत अज्ञाताच्या अंधारात गुडूप होतात...... (दुसऱ्या दिवशी परत) स्वामि धागे घेऊन येतात.... - हे काव्यपुष्प स्वामिचरणी अर्पण

[माणसे इंजिनिअर होऊन येतात]

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 06/05/2019 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा माणसे इंजिनिअर होऊन येतात एकएक हट्टी सेमिस्टरे अटीतटीने लढवून ठेवतात, दोन वर्षांमध्ये एखादे ईयर डाऊन विसावा म्हणून ठेवून जातात... माणसे इंजिनिअर होऊन येतात ज्ञानबिन भिरकावून केवळ परीक्षार्थी होऊन रात्रभर GT मारत बसतात उजाडताना परत सिगरेटच्या धूरात गुडूप होतात...... माणसे इंजिनिअर होऊन येतात...
काव्यरस

(धागा काढण्याची तल्लफ)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 03/05/2019 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी चरणी समर्पित ... डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला वाचण्यातील साधेपणा संपू लागला तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच.... तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा आशयाची पातळी इतकी खोल इतकी खोल.... कि आतला हेतूच दिसेनासा झाला ! धागा काढल्यावर चर्चा होईलच हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले? डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा उगाचच हसे होताना, होउ द्यावे मुळातच धागा बदबदा काढू नये वाचकांना कष्ट देऊ नयेत ..... इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये आता, डोक्यातील जळमटांना तसेच ठेउ नये जाउ पाहणाऱ्या शब्दकचर्याला थोपून ठेवू नये..... धागा काढण्याची तल्लफ मात्र.....?? तल्लफ काही माझ्या आधी

दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/04/2019 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर आशाळभूत नजरेने. किती बाहेर ? मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर.. ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे... समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे, हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ... देतील का ते मला सिंहासन मिळवून ??? पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे. चुस्त, मस्त, व्यस्त .... चतुर, धाडसी, जबरदस्त ... नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत. चौकीदाराला मिठी मारून झाले ...

माणसे मित्र बनून येतात...... ( प्रेरणा :: माणसे कविता बनून येतात...)

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 26/04/2019 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
माणसे मित्र बनून येतात सदैव गाती मैत्रीचे गोडवे तोंडात जणू साखर ठेवतात, काही महिन्यांमध्येच एक जीवघेणी कळ देऊन पाठीत वार करून जातात ... माणसे मित्र बनून येतात मनातलं बाहेर काढून केवळ अर्थाचा अनर्थ घेऊन दिवसभर कानाशी बसतात आपली लागताना खोलून मैत्रीच्या अंधारात पुन्हा गुडूप होतात...... माणसे मित्र बनून येतात...

बियर

लेखक सोन्या बागलाणकर यांनी मंगळवार, 23/04/2019 04:28 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणा: पाणी इतक्या बियरचे पेग बनवताना विचार करायचा भावा, शरीराला इतके झोके देताना उसंत घ्यायची भावा.... उसळून पुन्हा फेसाळते बियर बर्फ द्यायचा भावा... दोन पाय पुरत नाहीत बॉडीचा भार पेलताना... भावा, आता बार बंद करा अन् पिण्यातून मुक्ती द्या....

(तू मतदार माझा)

लेखक नाखु यांनी रविवार, 21/04/2019 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - विळखा पाहू तू मतदार माझा भोट, भोंगळ अजीजी तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा मस्तवाल नेता मी .... घेऊन जमेस तुला निव्वळ उगी तुंबडी भरावी बोभाटा करावा मी एव्हढा की लाभावी मज(समोरची) वाटणी सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित. वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

तू ट्रोल माझा

लेखक चामुंडराय यांनी शुक्रवार, 19/04/2019 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
वरिज्नल प्रेर्ना क्र. १ https://www.misalpav.com/node/44410 प्रेर्ना क्र. २ https://www.misalpav.com/node/44413 प्रेर्ना क्र. ३ https://www.misalpav.com/node/44417 तू ट्रोल माझा गुप्त, मास्क्ड, चोम्बडा पिंक टाकण्या मज मागे उडणारा उठवळ टोळ तू .... करुनि ब्लॉक तुजला असुरी आनंद मनी भरावा दुर्लक्ष करावे मी एव्हढे की नामशेष व्हावी टोळधाड तुझी....

तू हमाल माझा

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 16/04/2019 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
तू हमाल माझा शांत , नेभळट , गरीब, बिचारा (?) तुझी मारण्या , तुज मागे धावणारी चंडिका , महामाया , तुझी कडक लक्ष्मी .... येऊन कामावर तुझ्या चोरून दुरून पाहावे पकडावे रंगेहाथ तुजला कि लाजावी मजसमोर बॉन्डपत्नी ... =============================== तुझी आणि फक्त तुझीच सातजन्म मारणारी चि सौ का ?