Skip to main content

विडंबन

<मंजूर नाही>

लेखक उत्खनक यांनी मंगळवार, 24/12/2019 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
क्रान्तितैच्या कविता म्हणजे मेजवानी असते. कितीदा तरी वाचून झाल्या असतील. तरीही पुन्हा वाचतांना फ्रेशच वाटत असतं! तिची कविता नुसती वर काढूनही समाधान होत नाही. त्यासाठी हा एक विडंबनाचा प्रयत्न! यासाठीची प्रेरणा म्हणजे क्रान्तितैची एक अप्रतीम गझल..

ना देवेंद्र देव इथे , ना उद्धव आहे साव

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 26/11/2019 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
ना देवेंद्र देव इथे ना उद्धव आहे साव आजही बळीराजा भीक मागतो पण , त्याला काडीचा नाही भाव संगीत खुर्ची चालू झाली पवार वाजवतायत बिगुल हरेक पठ्ठ्या मग्रूर इथे पण आपलीच बत्ती गुल किती बघावं , काय बघावं कळत नाही काहीच जो तो आम्हाला नाग वाटतो आपला वाली कुणी नाहीच का लावला डाग नखाला ? डोक्याची झालीय भेळ कोण बसणार खुर्चीवरती यातच चाललाय वेळ लाज बाळगा जरा मनाची पुरे हि शोभायात्रा लोकप्रतिनिधी निवडून दिलेयत कि वेड्यांची भरलीय जत्रा कुणीही बसावे , काही करावे आता मेलेय माझे मन डाग पुन्हा कधी लावणार नाही हा करतोय आज मी पण सिद्धेश्वर विलास पाटणकर

मी पुन्हा येईन

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 11/11/2019 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल घेतले तू उधार पैसे आता देत नसशील करण्यास ते वसूल मी पुन्हा येईन जात असले मी माहेरी करू नका तुमची थेरं पाहण्या ते सारं मी पुन्हा येईन नाही लिहीता येत पेपर कॉपी जरी करशील काय ते तपासण्यास मी पुन्हा येईन मला न दाखवता व्हाटस अप मेसेज पाहता काय ते पाहता ते पाहण्यास मी पुन्हा येईन लेख वगैरे लिहीता येथे भारी पण या कवीतेला प्रतिक्रीया देतात की नाही ते पाहण्या मी पुन्हा येईन - पाषाणभेद ११/११/२०१९

मिसळपाव updates आणि त्या सोबत एक गोष्ट मोफत: कॉपी टू कॉपी - माशी टू माशी

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/10/2019 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
(कॉपी टू कॉपी - माशी टू माशी) बरेच लोक मिसळ खातात पण खाण्याच्या गडबडीत तर्री ऑर्डर करायची विसरून जातात म्हणून हा एक धागा तसेच ह्या वेळी सोलापूर मध्ये करमाळा येथे १० रुपयाला १ मसाला पाव आहे कोणी फीडबॅक देऊ शकेल? ह्या भागात ह्या वर्षी खाद्यजत्रा लागली होती का ? --------------------------------------- (अनेक बाबतीत लिहीता आले असते. पण टंकाळा केला. तुम्ही लिहा मात्र.) कॉपी टू कॉपी - माशी टू माशी - आजच्या पिढीसाठी गोष्ट (हेच नविन साहित्य आहे.) एका शाळेत वर्गशिक्षकांनी मुलांना गृहपाठ करायाला सांगितला होता. एका हुषार मुलाने तो करून आणला.

चार पाच प्लेट भाजी खरेदी

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 09/10/2019 04:36 या दिवशी प्रकाशित केले.
(हे या रेसेपीचे पुरस्कर्ते आहेत.) २०२० पर्यंत भाज्यांचे बरेच नॉर्म्स बदलणार आहेत, बिगर तेलाच्या भाज्या येणार आहेत तर आता भाजी घेणे किती सयुक्तिक आहे? रोज फारतर २५० किलोग्राम भाजी खरेदी करू शकते तर उकडलेली, तळलेली किंवा भाजलेली ह्यापैकी कशाने बनलेली भाजी सयुक्तिक आहे? अर्थात महिन्याभरात फारतर एखादे दुसरी भाजी महाराष्ट्रातील होवू शकते. शिवाय मंदीमुळे खरेच भाज्या जास्त किमतीला मिळत आहेत का किंवा त्यांच्या किमती अजून वाढतील का? नवीन नॉर्म्समुळे शिळ्या भाज्या आता घेणे फायद्यात ठरू शकते का?

चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 25/09/2019 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला तो झाला सोहळा तिहारात जाहली दोघांची तुरुंगात भेट मनातले थेट मना मध्ये मनो म्हणे, " चिद्या, तुझे घोटाळे थोर अवघाची inx खाऊन टाकला चिदू म्हणे, एक ते राहिले तुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी मनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले त्याने तडे गेले प्रामाणिकतेला मॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी माझी पाटी कोरी राज्य करोनिया चिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट प्रत्येकाची कोठडी वेगळाली वेगळीच ताटे वेगळीच वाटी जेवायला भेटे पुन्हा डाळ भात ऐक ऐक वाजे घंटा हि तुरुंगी जेलर बाहेर वाट पाहे दोघे निघोनिया गेले दोन दिशा कौतुक माध्यमा आवरेना #सॉरीविंदा

संध्याकाळचा पेग ..

लेखक चामुंडराय यांनी बुधवार, 28/08/2019 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचा पेग .. जगातली सर्वोत्तम सुखे अगदी स्वस्तात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच ( हा 'कोणीतरी' कोण म्हणून काय पुसता कीबोर्ड वर बोटे आपटूनी? मीच की तो !). तर स्वस्त मिळणाऱ्या सुखांपैकी "संध्याकाळचा पेग" ही गोष्ट मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. मस्त संध्याकाळ असावी. सूर्य क्षितिजाकडे झेपावत असावा. किंबहुना नुकताच क्षितिजा पल्याड गेलेला असेल तर अति उत्तम. हुरहूर लावणारी सांज असावी. पोट हलके असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत जाण्यास उत्सुक असावे. हलकेच एक लार्ज पतियाळा भरावा आणि सोबतीला चखना असावा. अहाहा .... फक्त अर्धा पाऊण तास!...

(रगेल पावट्याचे मनोगत)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 16/08/2019 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कवीता आशयसंपन्न आहे,हा फक्त साचा तिथून उचलला आहे... ******* नेहमीच मुदलातून वाचण्याची नाही हौस अफवा मूळ शोधण्याचा मज नाही सोस मूळ बातमी शोधण्यात कसली आलीय (?) मौज भरपेट मीठ मसाला सुद्धा मिळत नाही रोज सोसायटीत (मला)ओळखीत कुणीच नाही जालात तर नाव सुद्धा घ्यायचे नाही विधायक पाहण्यात तर मला रस नाही दिप पणती भेटण्याचा मला आनंद नाही विघ्नसंतोषी तरी प्रसिद्धीचा सुटेना वसा मंगल दाखवून तुम्हीच दिला घुस्सा अनुमान खालावले तर्कबुद्धी खुंटली आत्ता मात्र हाव सुद्धा प्रखर वाढली शोधतो वृत्तीला, जो प्रश्न वाढवेल शोधतो मताला, जिथे दुभंग सापडेल शोधतो जखमांना, तिथे खपली(च) निघेल शोधतो जागेला, जिथे शि

डोक्याला शॉट [द्वितीया]

लेखक गड्डा झब्बू यांनी मंगळवार, 06/08/2019 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: निवेदन आणि उपास (बटाट्याची चाळ) रताळ्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही! अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खणातून केव्हा काढल्या, गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंगमधल्या उकिडव्यांच्या घरी केव्हा नेल्या, ही गोष्ट पावशीण- काकूंना कळायच्या आत आमच्या कुंटुबाला कळली! एच्च.

शोले चित्रपट ,मिपा च्या नजरेतून ( शुद्धलिखित )

लेखक हस्तर यांनी शुक्रवार, 26/07/2019 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
१) शोले जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा चालला नव्हता ,तो किंवा गेला बाजार हम आपके हैं कौन पण प्रदर्शकानी लग्नाची कॅसेट म्हणून नाके मुरडली होती मिसळपाव वर पण बरेच धागे प्रदर्शित होतात एक दोन दिवस प्रतिसाद नाही मग अचानक रतीब सुरु होतो २) ठाकूर ची सून जया दिवसभर पणत्या मध्ये तेल टाकत असते तसे बरेच लोक जिलब्या टाकत असतात ३) कधी कधी संपादकानेमध्ये ठाकूर ( दुर्गा गोगटे फेम ) शिरतो व यह हाथ नाही फासी का फंदा म्हणून आयड्यांना उडवून टाकतात ४) मग त्या आयड्या ड्यू डाकू बनून धुमाकूळ घ