Skip to main content

विडंबन

राखून ठेव दुधाचे थेंब तू

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 15/03/2019 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
राखून ठेव दुधाचे थेंब तू मज पाडसा पाजावया रक्त माझे शोषलेस काही नाही त्यास द्यावया घास देई तू मजप्रती दुध देते मी म्हणोनि अर्थ नाही, व्यर्थ आहे जीवन शिंगे असोनि कामधेनु, गोमाता नावे मज अनेक ती भाकड पैदा होता खाटीकास विकती निचाहूनी नीच तू तुझ्यासम कुणी नसे धर्माचे स्तोम फक्त अंतरी आत्माच नसे विकशील का मुलीला ? वांझ जर असेल ती जरा खरचटता तिला झोपही उडेल ती वळू नको, भाकड नको दुभती गाय पाहिजे माग तू याच जन्मी मग नरकात जायचे (( सिद्धेश्वर विलास पाटणकर ))

नकळत सारे घडले ४

लेखक शाम भागवत यांनी बुधवार, 06/03/2019 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!! दुसरा: सर, आपलं एफ१६ जरी पडलं असलं तरी त्या अगोदर आपल्या वैमानिकाने भारतात जाऊन तिथे मिझाईल डागलं याचा मला अभिमान वाटत होता. पण त्याचाही नेम चुकला. फुरफुर: कुठे धरला होता: दुसरा: धरला नव्हता. धरणार होता. फुरफुर: (जरा ओरडून) अरे पण कुढे? दुसरा: भारतीय ब्रिगेडच्या मुख्यालयावर. फुरफुर: पुढे दुसरा: ती मिग२१ अपेक्षेपेक्षाही लवकर आली. जणू भुताटकी झाली. फुरफुरः ????? दुसराः श्रीनगर विमान तळावरून सुखोई, मिराज व मिग२१ आली. आता सुखोई प्रथम यायला पाहिजे.

नकळत सारे घडले ३

लेखक शाम भागवत यांनी मंगळवार, 05/03/2019 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!! तिसरा: आणि.. फुरफुर: (हताश आवाजात पण कुतूहल मिश्रीत आवाजात): अजूनही काही सांगण्यासारखं आहे तुझ्याकडे? आता एका दमात सगळं सांगून टाक. माझ्या मनाची काहीही ऐकायची तयारी झाली आहे. तिसरा: मिग२१ ला एका एफ१६ ने मिझाईल मारले. पण ते त्याला लागलेच नाही. मिग२१ ने ते चपळाईने चुकवले. त्यामुळे.. फुरफुर: अरे बोल ना तिसरा: त्यामुळे ते... फुरफुर: अरे बोल ना. तिसरा: त्यामुळे ते भारताच्या हद्दीत जाऊन पडलंय. फुरफुर: बापरे. ही तर महाभयंकर बातमी आहे. भारताकडे आपल्याविरुद्ध भरभक्कम पुरावा जमा झालाय. ते मिझाईल फक्त आणि फक्त एफ१६ वरूनच सोडता येत हे सगळ्यांना माहीत आहे.

नकळत सारे घडले २

लेखक शाम भागवत यांनी मंगळवार, 05/03/2019 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!! पहिला: सर, वैमानिकांच्या संख्येबद्दल काय जाहीर करायचे? आपण तीन तर जाहीर करून बसलोय. दुसरा: होना. तिसरा: विमाने पण तिनांची दोन करायला लागली. पहिला: आपण आकडा फुगवून सांगतो व नंतर कमी करतो अस कोणाला वाटायला नको. दुसरा: पण आपण मुद्दामहून तसं थोडंच केलंय? पहिला: तेही खरंच म्हणा. फुरफुर: जे झाले ते झालं. त्या बद्दल ताबडतोब चर्चा बंद करा. आता काय जाहीर करायचे त्याबाबत सांगा. तिसरा: आपण एक सापडलाय तर एकच जाहीर करू. हातात जसजसे येतील तसतसे आकडे वाढवत जाऊ. फुरफुर: (स्वगत) खरंच की. असच करायला पाहिजे. मी जरा जास्तच उतावीळपणा केला.

नकळत सारे घडले

लेखक शाम भागवत यांनी सोमवार, 04/03/2019 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!! (पाक प्रवक्ता हे मुख्य पात्र आहे. त्याचे नाव आहे फुरफुर. त्याने वॉररूम सारखी ट्विटररूम बनवली आहे. त्यात तो स्वत: व त्याचे तीन दुय्यम सहकारी बसलेले आहेत. सर्वाच्या पुढे फोन, मोबाईल, लॅपटॉप वगैरे सगळी अत्याधुनिक साधने आहेत. याच रूमला जोडून फुरफुरची एक साऊंडफ्रुफ केबीन आहे.) भाग १ पहिला: सर, भारताची तीन विमाने पडली आहेत. दुसरा: नक्कीच आपण पाडलेली असणार. आपण २४ पाठवली होती. त्यांची सगळी मिळून अशी किती असतील? फुरफुर: १९९१ च्या गल्फ वॉरनंतर एवढं मोठ्ठ २४ विमानांच फॉरमेशन जगात प्रथमच होतंय. हेच तर आपलं धक्कातंत्र आहे.

खेळ राजकारणी असा रंगला....

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 14/02/2019 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
गदिमा आणि सुलोचना चव्हाणांची माफी मागून, मूळ गीत - फड सांभाळ तुर्‍याला ग आला.... खेळ राजकारणी असा रंगला.... काका लागला काड्या घालायला || धृ || मूळ बारामतीचं बेणं.... हळूहळू यानं गिळलं पुणं.... धोका देण्यात अति प्रवीण.... घेतलं कडेवर जनता पार्टीला.... दिला धक्का वसंतदादांला.... बाईने हाकललं याच्या सरकारला.... परतून धरले राजीवच्या पायाला…. काका लागला काड्या घालायला || १ || पाळले कलानी आणि ठाकूर.... खाल्ले मुद्रांक तेलगीबरोबर.... पोरगी - पुतण्या आणले वर.... गोवारींवर काठ्या बरसल्या.... करुन विरोध गोर्‍या बाईला.... काढला पक्ष दुकान चालवायला.... परी सरकारी जोडीने नांदला…. काका लागला काड्या घाला

सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी....

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 12/02/2019 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
कवी संजीव यांची क्षमा मागून मूळ गीत - सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी देशाला मिळून लुटाया... वेड्या बहिणीची रे वेडी माया || धृ || माया माहेराची बोफोर्स दलालीची... 'इकडून' घातली भर पाचशे कोटींची... गिळलेल्या जमिनीची झाली चौकशी तयार आम्ही नाटक कराया... वेड्या बहिणीची रे वेडी माया || १ || येता निवडणूक साडी नेसावी... आई - भावासाठी मते मागावी... चमचांचा सागर नाचतो समोर आपली निष्ठा दाखवाया... विमानातून काही हाती आले नाही, कोकलतो भाऊराया रे... वेड्या बहिणीची रे वेडी माया || २ || - यतिन भट

एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 09/02/2019 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
हे दामोदरच्या सुता तुला कमळाचं वरदान एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान दिव्य तुझी संघभक्ती धन्य दाढी काया बालपणी गेलासी तू शाखेसी धराया हादरली ती जननी, थरथरले घरचे जन भाजपास येई मुर्छा लागे इलेक्शन अडवानीच्या रथावरती तुझे कलाकाम मंदिर प्रश्न उठवला, मिळे कमळा पंचप्राण मेक इंडियाच्या नावे रोम कधी लंका कुठे पिप्पाणी वाजवी, ड्रम कधी डंका सेल्फीची भरवी जत्रा अन हसती सर्व जन कोट तुला नऊ लाखांचा कुणी कधी घातला ? मश्रूमाचे सूप पिऊनी, झोला कुठे टाकला? खिशामध्ये अंबानी, अन अडाणी हे भगवान आले किती गेले किती संपले भरारा नेहरू गांधी सोडून काही उच्चारी चकारा गुलाबी आणल्या नोटा आम

सोनियाच्या सुता तुला खानदानी वरदान....

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 09/02/2019 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
दादा कोंडकेंची माफी मागून मूळ गीत - अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान सोनियाच्या सुता, तुला खानदानी वरदान.... एकमुखाने चमचे, गाती राहुल आख्यान || ध || माता किरीस्ताव तुझी, पिता पारशी बावा... जानवेधारी ब्राह्मण म्हणूनी, कैसा तू खपावा? पन्नाशीला आला, बुद्धी बालकासमान.... || १ || चहुकडे ऐसे ज्ञान, पाजळशी राया... सकाळच्या रात्री उठीसी, ऐसी तुझी माया... खुळावले शिंदे, झाले मनमोहन हैराण... || २ || देशद्रोह्यांसाठी घेतलीस, विद्यापीठी धाव.... करा देशाचे तुकडे, हम आए तुम्हें बचाव... चाचा दिग्वीजय, कन्हैया बंधूसमान...