Skip to main content

विडंबन

डोक्याला शॉट [प्रतिपदा]

लेखक गड्डा झब्बू यांनी शुक्रवार, 12/07/2019 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
चिन्मय बेडवरुन उठला बेसिन जवळ जाऊन वोश घेतला... दाढी आणि अंघोळ करायचा कंटाळा आल्याने तोंड पुसून केस विंचरून वरचे कपडे उतरवून तसाच घराबाहेर पडला.... वरचे कपडे उतरवून म्हणजे रात्री झोपताना थंडी वाजत होती म्हणून हाफ टी शर्टवर फुल टीशर्ट आणि थ्रीफोर्थ वर जीन्स चढवली होती ते वरचे कपडे उतरवून... तर सांगायचा मुद्दा काय कि चिन्मय कपडे उतरवून घराबाहेर पडला आई काशी यात्रेला गेली होती ल्लोळत पडायचा कंटाळा आला म्हणून पडली स्वारी घराबाहेर ...

जाहिरातींची (लागली) "वाट"

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 11/07/2019 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
(टीव्हीवर नेहमी लागणाऱ्या काही जाहिरातींची मी लावलेली "वाट" मूळ जाहिराती पाहिलेल्या असतील तरच वाचतांना मजा येईल! हा प्रयोग कसा वाटला ते सांगा!) *** नवीन लग्न झालेल्या जोडप्याकडे नवऱ्या मुलाचा म्हणजे राहुलचा मित्र अजय भेटायला येतो. त्याला समोर एक बाळ रांगतांना दिसतं. अजय म्हणतो, "काय हो वाहिनी, हे कुणाचं बाळ? आणि राहुल कुठेय?" वाहिनी रडू लागते, "अहो भावजी! काय सांगू तुम्हाला? आम्ही किराण्यात आणलेला संतूर साबण ह्यांनी आताच चुकून ऑरेंज सोन पापडी समजून खाल्ला आणि ते क्षणार्धात बाळ बनले!" अजय म्हणतो, "आरं आरं वाहिनी! काय झालं हे!

उत्तरार्ध

लेखक गड्डा झब्बू यांनी मंगळवार, 09/07/2019 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा - किरण व संगीता --एक आंतर जातीय प्रेम कहाणी ) किरण राहत असलेला फ्ल्याट त्याची कन्या अनुच्या नावावर होता गाडी बंगला नोकर चाकर सत्ता सामर्थ्य सारे असलेल्या देवयानीला (सांगिताला) तिकडे राहणे मंजूर नव्हते नवविवाहित वधूचा अधिकार गाजवत तिने किरणला त्याचे चंबूगबाळे उचलून तिच्या बंगल्यावर राहायला यायचा आदेश दिला आता बाकी काहीच काम नसल्याने दोघांचा बराचसा वेळ बंगल्यातल्या भल्यामोठ्या बेडरूम मधे जात होता त्यामुळे संसाराच्या नव्यानवलाईत (आणि सांगिताला) दिवस पटापट गेले. एका प्रसन्न सकाळी किरणच्या छातीवर डोके टेकत लाडेलाडे ती म्हणाली (कवळी काढल्

(व्हिस्की पिऊन आलो...)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 29/06/2019 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्राची ताई, ज्ञानोबाचे पैजार व नाखु साहेबांची मनातल्या मनात क्षमा मागून भेटावयास गेलो, करून काय आलो ? बोलावलेत तुम्ही, व्हिस्की पिऊन आलो... ना थेंब दिला सोड्याचा चखना फुकट दिला... पाण्या सवेत केवळ, व्हिस्की पिऊन आलो... होते मित्र चार आणि... नव्हती कुणीही रमणी, बायकोस हे पटेना... व्हिस्की पिऊन आलो... प्याले जरी रिचवले... एका मागोमाग आठ, उलटी होऊ न देता... व्हिस्की पिऊन आलो...

(काय करून आलो)

लेखक नाखु यांनी शनिवार, 29/06/2019 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
वाचायला(च) गेलो, लिहून काय आलो? आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाजळून आलो .. ना अर्थ आशयाचा बोली.. लावून आलो . कावलेल्या समयी भडास काढून आलो .. होते कोण न कोण बघतोच मी कशाला ? बिना वातीचेच (मुद्दाम) कंदील लावून आलो ? धागे जरी भिकार डोके फिरवून आलो.. जाऊ मुळी न देता संधी साधून आलो . (जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)

धागा चालेना, धागा पळेना... धागा संथ चाली, काही केल्या पेटेना

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 23/06/2019 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
कवी " बी " यांना विनम्र अभिवादन धागा चालेना, धागा पळेना धागा संथ चाली, काही केल्या पेटेना गेलो ट्यार्पीच्या बनी म्हंटली ट्रोलांसवे गाणी आम्ही सुरात सूर मिळवून रे गेलो डू-आयडीच्या बनी डूख धरला मी मनी ट्रोलांसवे गळाले आयडीभान रे चल ये रे, ये रे ट्रोल्या टोचू उचकवू घालु काड्या टाकू पिंका पिंक पोरी पिंक पोरी पिंक हे मिपाचे अंगण अम्हां दिले आहे आंदण ट्रोलिंग करू आपण सर्वजण रे आयडी विषयाचे किडे यांची धाव प्रतिसादाकडे आपण करू शुद्ध "पिंक"पान रे धागा पेटला आला बहरून ट्रोलांनी दिला विषय भरकटून कोण मी - ट्रोल? कोठे डू-आयडी जण रे

कवित्व इथले संपत नाही

लेखक mrcoolguynice यांनी गुरुवार, 30/05/2019 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
कवित्व इथले संपत नाही रोज गळवं ठणकत राहते प्रोवक्ता अजुनही गातो पाठशाळेत शिकवीली गिते ते झरे भक्तीउमाळ्याचे ती उधारीची भगवी माया यांच्यात खपलो आपण फुकां पुन्हा उगवाया जोरात इंद्रिये अवघी भुणभुणायची दुःख सैनिकांचे आठवणार नाही आता स्मरण त्यांच्या त्यागाचे ती जळमटं मेंदुत विणलेली आयुष्य कुरवाळायां गेली बेरोजगारीच्या वनवासातील अनस्थेशिया जणु उरलेला
काव्यरस

वदनी कवळ.....

लेखक फुंटी यांनी बुधवार, 29/05/2019 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
वदनी कवळ घेता फोटो काढा प्लेटचे सहज हवन होते अपलोडता स्टेटसे व्हायरलं न होता नेटवरी अन्न हे अपूर्णब्रम्ह खाण्याआधी पोस्टणे जाणिजे आद्यकर्म
काव्यरस

(गफ)

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 27/05/2019 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
पेरना आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट)..

शूर दुचाकीस्वार श्रीमान अभिवंदनचे अरमान

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 20/05/2019 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरु काकासाहेब खोपोलीकर यांनी लिहिलेले १४(बहुतेक, जास्तकमी झाल्यास जबाबदार नाही) ओळींचे खंडकाव्य! (हे लिहिण्यास काकासाहेबांना अडिच दिवस लागले. तस्मात् वाचकांनी एक दिवस तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व फोनबुकमधील कुठल्याही मोबाईल नंबरवर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!) खंडकाव्य: अभिवंदन, अभिवंदन! वीस जून २०१८ रोजी आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन सोलापूरकर, पुणे देशातून पिंपरी चिंचवडास परतला.