Skip to main content

विडंबन

बघ ओततो कसा? "शॉट"ने घेत माप... सख्या ऑन द रॉक्स, आज ओत ओल्डमंक !

लेखक चामुंडराय यांनी सोमवार, 21/05/2018 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना : अर्थातच गायछाप बघ ओततो कसा? "शॉट"ने घेत माप... सख्या ऑन द रॉक्स, आज ओत ओल्डमंक ! सात वर्ष हि जुनी, मोहन मिकीनची रमा... हळूच ओत ग्लासात, एक शॉट ओल्डमंक ! नकोच व्हिस्की वा ब्रँडी, नसे कोणी या सम... उद्या पिऊ विलायती, आज ओत ओल्डमंक ! मंद व्हॅनिला हा गंध, "रम"तो सवे तुझ्या प्रिये... मम ओठी पहा कशी, मज प्रियरमा ओल्डमंक ! लार्ज पेग हा पतियाळा, कॉकटेल वा नीट... हलकीशी किक सुखद, सख्या ओत ओल्डमंक ! तन मन रोमांचित, पिसा समान वाटते... हळूच घे घोट घोट, एज्ड डार्क ओल्डमंक ! जय हो बुड्ढे बाबाकी, आम्ही तयाचे बंदे... गजर चिअर्स उंचावुनी, प्राशितो सखी ओल्डमंक !
काव्यरस

दूर देशी गेला बाबा....विडंबन

लेखक OBAMA80 यांनी रविवार, 20/05/2018 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय सलीलजी कुलकर्णी व संदीपजी खरे यांची माफी मागून, माझ्या एका अत्यंत आवडीच्या त्यांच्याच गाण्यावर माझे विडंबन सादर करत आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- गीतकार : संदीप खरे, गायक : सलील कुळकर्णी दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई नीज दाटली डोळ्यांत परी घरी कुणी नाही कसा चिमणासा जीव, कसाबसा रमवला चार भिंतीत धावून दिसभरं दमवला आता पुरे, झोप सोन्या कुणी म्हणतच नाही नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी कोणी बोलायाला ना

तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय

लेखक खिलजि यांनी सोमवार, 14/05/2018 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय माझं मन बी बोन्साय केलंय पयलं व्हतं त्ये धरणावाणी त्यात मॉप व्हतं पाणी रंगीत मासळी पवत होती मस्त लव्हाळं झुलंत होती दिवसा खोखो नि रात्री कबड्डी जल्ला स्पीड म्हणू कि जेट्टी चाबूक घेऊन खाली तू आली काय ठाऊक तू खाऊन आली ? फटक्यात जिंदगी स्मशान केली ती चमचमती दुनिया बी गेली त्या समद्यास्नी मारून टाकलंय मॉप पाणी बी आटवून टाकलंय समद्या भावनांना पेटवून टाकलंय माझं मन बी बोन्साय केलंय पयला होतो म्या ताडावाणी दिस रात एक मज होते मनी तारे लखलखत होते खायचो कोंडा अन प्यायचो पाणी चउत भाकरीने बाजार जो केला आत्ता जन्माचा उरलो अडाणी फगस्

सालं, आज जीव कासावीस झालाय

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 27/04/2018 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
सालं, आज जीव कासावीस झालाय तिकडं अकरा कळ्यांचा विनाकारण बळी गेलाय आज मी पण एक बाप आहे पण खरं सांगू मित्रानो या देशात बाप होणं , श्राप आहे केलं असेल त्यांनीही त्यांच्या मुलांना टाटा बाय बाय त्यांना थोडंच ठाऊक होतं पुढे होणार आहे काय ? त्या माउलींचा तीळतीळ तुटला असेल जीव पण इथे कोणालाच पडली नाही आहे त्याची जाणीव आजूबाजूच्या लोकांनी केली असेल चौकशी आपली मुलं कुठे आणि आहेत कशी ? जो तो आपापलं बघून सांत्वनाला गेला असेल थोडा वेळ रडेल तिथं आणि परत कामाला लागेल त्या मायबापाचे अश्रू असेच ओघळत राहतील बाराव्यानंतरही आणि भरणीलाही पुन्हा कुठे तरी अजून कळ्या खुरडल्या जातील बातम्

परत पेटेल मेणबत्ती

लेखक खिलजि यांनी सोमवार, 16/04/2018 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
परत पेटेल मेणबत्ती येईल नवा कायदा वणवा आता मंदिरात पोहोचलाय पुन्हा हवीय रक्तरंजित क्रांती षंढ अजून करणार तरी काय कायद्याच्याच गळ्यात पळवाटेचे पाय पहिली झाडं तोडली जायची नंतर रोपांवर आली हि भें_द जमात आता कळ्यांची खुडणी चालू आहे बुद्धी गेलीय सर्वांची जणू कोमात मथळे भरून येतील अजून काही दिवस असतील रकानेच्या रकाने लढा चालेल दोन्ही बाजूस न्याय मिळेल कैक युगाने तोवर पुन्हा कळ्या खुरडल्या जातील पुन्हा मेणबत्त्या पेटतील पुन्हा येईल नवा कायदा येतील नवीन पळवाटा षंढ असेच बघत राहतील ते तसंच असेल चित्र ..
काव्यरस

सलमान भाईचे तुरुंगातील गाणे

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 06/04/2018 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
(सलमान भाई चे तुरुंगातील आज रात्रीचे गाणे) केव्हा तरी पहाटे निसटून निज गेली सुजले रडून डोळे रडवून रात गेली कळले मला न केव्हा सुटली गोळी जराशी कळले मला न तेंव्हा सोडोनी 'साथ' गेली सांगू तरी कसे मी वय माझें झाले लग्नाचे उसवून शर्ट माझा फसवून कैफ गेली उरलें कर्णात काही ते नाद का ळविटाचे आवाज काजव्याचे, डसून डांस गेली दिसल्या मला न तेंव्हा माझ्याच दंत पंक्ति मग आस जामीनाची सूचवून रात गेली

असा पिझ्झा बेस द्या मज आणुनि सजविन मी जो चीझ टॉपिंगज् ने

लेखक चामुंडराय यांनी मंगळवार, 03/04/2018 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
असा पिझ्झा बेस द्या मज आणुनि सजविन मी जो चीझ टॉपिंगज् ने बेक करुनि त्यास ओव्हन मध्ये खाईन मी तो आनंदाने थिन क्रस्ट वा थिक असो वा मिट असो वा मिटलेस असो वा शर्करावगुंठित सोडयासंगे खाईन मी तो आनंदाने हाय कॅलरी लो फायबर तयाला एक्स्ट्रा चिजचा थर पोषणमूल्ये असो नसो वा खाईन मी तो आनंदाने मिट लव्हर्स वा मार्गारिटा वरती एक्स्ट्रा चीझ मारा नानाविध टॉपिंग्ज संगे खाईन मी तो आनंदाने चीज असो वा व्हेजि असो वा स्मॉल मीडियम लार्ज असो वा चिकन टिक्का वा चिकरोनी खाईन मी तो आनंदाने चीज-न-कॉर्न, मार्गारिटा पेरी-पेरी अथवा फियेस्टा पॅराडाईज वा पनीर मखानी खाईन मी तो आनंदाने पनीर तंदुरी, चिकन विंग्ज अन गार्ल

(बार हो)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 22/03/2018 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : यारहो ... दादाश्रींची विनम्र माफी मागुन ..... अर्ज़ किया है .... ह्या उन्हाचा जोर आहे वाढलेला यारहो शोधुया नजदीक साधा एक बियर बार हो ड्रॉट ज्या त्या ब्रॅन्ड्ची तिथलीच बॉटल चांगली पण अता चालेल काही फक्त असु दे गार हो मागवा चकली चना अन हाफ चीकन तंदुरी कावळ्यांना भूक आहे लागलेली फार हो ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले दावले "जमवून" मग "ठरवून" वारंवार हो एकदा केसांस वेडे मोकळे सोडून बघ नेत्रसुख असती गडे हे झाकले उभार* हो कोण तो चु$@ भिकारी पेग अर्धा सांडतो वाटते होईल ह्याचा आज युनुस वकार हो माँक कुठला? कोण मल्ल्या?

गारवा - विडंबन

लेखक OBAMA80 यांनी शुक्रवार, 02/03/2018 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या प्रोफेशनल आयुष्याची सुरूवात ज्या डोंबिवलीमध्ये राहून झाली तेथून सकाळची जलद लोकल पकडणे हे एक मोठ दिव्यच. त्या दिव्य अनुभवावरूनच खालील विडंबनाची कल्पना सुचली. मूळ कवी सौमित्र व गायक मिलींद इंगळे यांची माफी मागून सादर करतो....गारवा चे विडंबन. मूळ कविता - गद्य भाग- ऊन जरा जास्त आहे दर वर्षी वाटतं भर उन्हात पाउस घेउन......
काव्यरस

काळ्या पिशवीत पिशवीत

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 26/02/2018 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
काळ्या पिशवीत पिशवीत (श्री विठ्ठल वाघांची क्षमा मागून) काळ्या पिशवीत पिशवीत बॉटल हालते बॉटल हालते बॉटल हालते बाईल थयथया नाचते दोस्त घरी बोलवितो घरी बोलवितो दोस्त घरी बोलवितो घरन बाबा हाकलतो छंदी फंदीच्या जोडीला जिभे सरसती नाचे घोट जाताच पोटाला तरतरी मना येते मती न्हाती धूती होते रंगीत पान्याच्या वासाची चाहूल आवशीला जाते भय जिवाला पडते वाट दोस्ताची लागते दोस्त बॉटल झाकतो मी चकना लपवितो दोस्ता र आता कलटी र आता पळूया र माझ्या राज्या पानी खिडकीतन वोतून वाट गुत्त्याची चालूया तिथे उधार चालेना नगद लागते अन्ना शेट्टीच्या गूत्त्यात चाल 'पेया'च पूजन तिथ डोलकर हालती जनू करती भजन जवा रंगीत पान्यात स
काव्यरस