Skip to main content

(थांब ना..)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 06/08/2009 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजु ताईंची सुंदर कविता " थांब ना " http://misalpav.com/node/8842 वाचुन हे सुचले सर्द आहे खाट माझी, तू जरासा थांब ना दाटले रे मूक मय हे, सोबतीला थांब ना साठली गर्दी दुचाक्यांची चहू बाजूस या सापडे एखाद 'घर' ते, पाहूनी तू थांब ना एवढाही रेट नाही सांग ते रे मजकडे पाहुनी तारुण्य माझे, आज थोडा थांब ना रात्रवेळा होत आली, झोपल्या या बावळ्या भास्कराची माय निजली, रात्र तू रे थांब ना राहिले सारेच व्यापारी जगी हे पाहिले सापडे "फंटूश" येथे, या ठिकाणी थांब ना रंगल्या खाणा खुणा या, थुंकणार्‍याच्या जरी मोगरा/घोगरा सांगेल सारी, ही कहाणी थांब ना चेतन
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1093
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया