मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जन उडाण संपाचे

कौतुक शिरोडकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मायेच्या हिरव्या वाढीने मिटते, वाट्यांच्या मोहात धुंद ओसरते जन उडाण संपाचे, नित्य पावसाते, का होते बेफाम, कसे चळवळते ! आवाजी नेत्यांच्या हरपून भान उठती, गुरगुरत्या हाकेला कधी रोखठोकच भिडती बोंबलती, कोकलती, उडती, धडपडती का लढती ? कधी आयोगी मागण्यांवर जन हे वेडे झुलती जन सवंग होऊन रस्त्यावरती फिरती अन्‌ गळ्यात फलका आवर्जूनी धरती ! जन उडाण संपाचे, नित्य पावसाते, का होते बेफाम, कसे चळवळते ! गडगडती, बडबडती, कधी फोडती, अडवती कधी धरणे मोर्च्याच्या नादात पार चिडती वळवळती सारखे शासना सहजच ना ते भुलती कधी मोक्याच्या चार अटींना जन हे अडून बसती ! जाणती परी ते नित्य नेमे का पिडती ? त्रासवी तरी त्यागाचा आव ही वरती जन उडाण संपाचे, नित्य पावसाते, का होते बेफाम, कसे चळवळते ! (कुणाकुणाची माफी मागू.... ???)

वाचने 1714 वाचनखूण प्रतिक्रिया 4

विकास 06/08/2009 - 19:50
माफी कसली मागताहात! वास्तव दाखवले आहेत. याला विडंबन म्हणवत नाही.

प्राजु 06/08/2009 - 21:53
वास्तव आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विशाल कुलकर्णी 07/08/2009 - 10:25
कौतुका, किती करु कौतुका.... (कशी करु स्वागता..च्या चालीवर!) :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...