मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मॅरेज लाईफ.....३

मस्त कलंदर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
परा कधी हो म्हणाला ते त्यालाही कळलं नाही... आता निखिलने एक कोरा कागद काढला. आणि पराला समजाऊन सांगु लागला. हा क्लीनिंग कूकिंग विथ सप्तपदीलेस मॅरेजचा कोर्स अटेंड करायचा... कोर्स सोबत क्लीनिंग एजंट किट आणि कूकिंग टीप्सचे पुस्तक मिळेल.. बदल्यात या प्रोग्रामचे प्रोमोशनल राईट्स मिळणार. आपण काही करायचे नाही फक्त लोकाना अशा सेमिनार ला घेऊन यायचे. आपल्या ओळखी मुळे एक नवीन नोंदणी झाली की काही टक्के कमिशनचे मिळणार होते. असे करून मी एकूण १० नोंदणी झाल्या तर आपण आपल्या गुंतवणूकीतून मोकळे होऊ. सगळॅ ट्रेनिंग जवळ जवळ फुकटात पडणार होते... किती सोप्पंय हे... लग्न ठरण्याची शक्यताही वाढेल... नि सोबत कमीशनही...!!--परा "यामध्येही एक लफडं आहे.."-- निखिल "आता आणी काय?"--अर्थातच परा.. "अरे या प्रोग्राम्सच्या डिस्कशनमध्ये मी खूप आधीपासून होतो... मी १५ नोंदणी आणल्यानंतर मला या बिझनेसमध्ये पार्ट्नरशिप मिळणार आहे.. निव्वळ नफ्याच्या ३०%.... हां त्यासाठी मला काही इव्हेंट्स हँडल करायला लागतील अर्थात.. मी काय म्हणतो..., कलंदरला या नोंदणी मी आणल्या काय नि तू आणल्या काय, त्याने काही फरक पडत नाही..!! आपण दोघे अधिकाधिक लोकांना इथे आणायचा प्रयत्न करू.. पहिल्या १५ माझ्या नावावर खपवू.. मला मिळणार्‍या नफ्यातून आपण आधी तुझी फी भरू.. पण आपल्याला त्यातून कायमस्वरूपी इन्कम येत राहिल... तो आपण दोघे वाटून घेऊ.. नि आणखी जर १० लोक मिळाले, तर प्रश्नच नाही... तुझं ट्रेनिंगही फुकट.. नि नफा ही आपल्याकडेच राहील.. कशी आहे आयडिया???" निखिलने एका दमात सगळं सांगून टाकलं.. "एकदम सॉलिड....पण प्रॉब्लेम आहे रे.." "आता काय??" "हे १५ + १० लोक मिळवायचे कुठून नि कसे???" "ते सोपे आहे. घरातली टेलिफोनची डायरी घेऊन बसूयात. नातेवाईक , मित्र ,ओळखीचे या सर्वांची नावे काढू. झालंच तर परवाच मास्तरांनी मिपावरच्या अविवाहितांची यादी दिलीय.. ती पण हाताशी घेऊ.. यातले कोण घेतील कोणाला परवडेल याचा विचार करायचा नाही.फक्त लिस्ट तयार करू". "आपल्याला असे वाटतय का की चार्/पाच लोकही आपण जमवु शकणार नाही म्हणून्?....तसे असेल तर चाळणीत पाणी घेऊन जीव देण्याचाच लायकीचे असू आपण". "म्हणजे मी नाही समजलो"--- पराला सगळंच नवीन.. त्यामुळे त्याचा मेंदूच काम देईनासा झाला होता ... "अरे, माणूस मेल्यावर त्याला खांदा द्यायला चार आणि पुढे मडके धरायला एक असे पाच, नि राम नाम सत्य है असे म्हणायला पाच-दहा लोक लागतात. एखाद्याला इतकेही जमवता येत नसेल तर तो माणूस कसला म्हणायचा????". पराला हे वाक्य फार बोचले. अर्थात निखिल जे बोलला त्यात चूक ते काहीच नव्हते. असं वाटत होतं जणू ते सगळे बहुतेक पराचेच विचार होते. आता परा चांगलाच भारावल्या सारखा झाला होता. "हा क्लीनिंग कूकिंग विथ सप्तपदीलेस मॅरेज कोर्स करायचा.. नि लग्न करायचे... निखिलला मदत करून पैसेही मिळवायचे... त्याचा सब-पार्ट्नर म्हणून!!. नुसते जगण्याची तयारी करत मरायचे नाही तर खरोखर आनन्दात जगायचे....आपण लोकाना मदत करतोय. हे एक पुण्यकर्मच आहे..........", असं मनात आणी उघड "चल असं नुसतं बोलून काही व्हायचं नाही.. आपण लगेच यादी करायला लागू" असं म्हणून त्याने निखिलला उठवलं... दोघे जाऊन "विसावा" मध्ये विसावले.. टेबलावरचा टीपकागद घेतला.. पेन सरसावले.. नि पराने निखिलला प्रश्न केला.. "सुरूवात कुठून करायची?? मास्तरांच्या यादीपासून???" "हो.. नि अर्थातच राजे पासून" "आयला हो रे... प्रकरण डोहाळेजेवणापर्यंत आलं... मी तर म्हणायचं गाणंपण पाठ केलं.. अर्धा-अधिक नाचपण बसवला कोपर्‍यावरच्या तैंच्या मदतीने... नि अजून आर्याच्या मम्मीचा पत्ता नाही म्हणजे काय??" "हो.. तो तर नक्कीच पट्कन तयार होईल... आणि तुला माहिती आहे का?? त्याच्याकडे घरी प्रॅक्टीस करण्यासाठी भरपूर भांडी पण पडलीयेत.... चुचु तैंच्या परिक्षेत जैनांचं कार्टं पैल्या लंबरानं पास हुईल!!" "ठीक आहे.. राजे नक्की.."---------------चला सुरूवात तर चांगली झाली----------- काऊंट = १ पुढे? "तात्या..?" "हो.. पण ते भांडी घासायला तयार होतील?? स्वयंपाक करायचं एकवेळ मनावर घेतील पण भांडी....??? जिथे पंचपक्वान्ने जेवलो तिथे खरकटे उचलणार नाही असं म्हणून सगळ्या कोर्सवाल्यांना अनवाणीच बाहेर काढतील.... नि जाऊन स्वतःचा 'खाद्य व लग्न संस्कृती' नावाचा प्रोग्राम काढतील. आपल्याकडे काळं कुत्रं फिरकायचं नाही मग... आपल्याला काँपिटीशन नाय पायजे...!!" "खरंच की... तात्या कटाप!!!" "मग अवलियाला खोपच्यात घेऊया"??? "अरे तो माणूस काळा की गोरा हे माहित नाही... .. अजून त्याला कुणी पाहिलं नाही.. तो बाई की बाप्या इथून प्रश्न आहे.. सोड रे त्याला तू" "ठीक आहे.. अवलिया पण कट!!!" ------------------------------- काउंट तसाच :( "मिथुन काशिनाथ भोईर ?" "चालेल... पण साला तो एक आख्खा दिवस खाईल.... लग्नातही सुख असतं हे त्याला पटायला वेळ लागेल.. " "का?? "सुख म्हणजे सुख म्हणजे सुख असतं.. पण त्याचं नि आपलं सेम नसतं!! " परा यावर निरूत्तर!!------------- चला आणखी एक बकरा तरी मिळाला... ---------------------- काऊंट=काउंट+१ "टार्‍या??"--- परा "वेड लागलं काय तुला? त्याने भांडं घासलं तर त्या भांड्याच्या 'बिफोर' आणी 'आफ्टर' आकाराचा काही संबंध राहणार नाही... पैसे मि़ळणं दूर... आपल्याकडून वसूल करतील ते लोक.. असलं झेंगाट घेऊन आल्याबद्द्ल.. " "आपण मास्तरांना त्याचं समुपदेशन करायला सांगू.... त्यांचं क्रिप्टीक नि त्यांच्या क्लायंटांच्या गोष्टी सांगून इतके हैराण करायला सांगू की त्यानं लग्न करतो पण समुपदेशन आवर म्हणायला पाहिजे... जेन जर आत्ताच लग्नाला तयार नसेल तर मास्तरांना तिचंपण बौद्धिक घ्यायला सांगू... "----------------------ढॅणटॅढाण----------------------------------- काऊंट=काउंट+१ "बअअअअरं... मग छोटा डॉन???" "अरे तो तर रिसोर्स पर्सन आहे ना.. त्याने १० लेक्चर्स दिली की त्याला फुकट ट्रेनिंग मिळणार आहे.. वर क्लीनिंग एजंट्चं गिफ्ट हँपर लाईफटाईम दर महिन्याला फ्री!!! त्याने नंतर या रेसिपीचं पेटंट/कॉपीराईट घेऊ नये म्हणून थोडं गोडीगुलाबीनं एक कॉन्ट्रॅक्ट पण करून घ्यायचंय.. त्याच्याशी नोंदणीबद्द्ल बोलून आधीची बोलणी फिसकटवायची नाहीत!! " "काय हुशार आहेस रे तू..... पूरा बिझनेस माईंड!!!" पराचा निखिलबद्दल वाटणारा आदर दुणावला होता!! "मदनबाणचं पण लग्न व्हायचंय ना रे अजून?"-- निखिल "हो रे.. सायकोच्या तावडीतून सुटला.. पण अजून धड"पड"तोच आहे... नुसतं शुभ्रा शुभ्रा म्हणून काही होत नाही.... खरी शुभ्रा मिळवायला प्रयत्न करायला लागतात.. त्याला पण खोपच्यात घेऊ.. ..." ----------पराचं सगळं लक्ष काउंट कसा वाढतोय याकडेच!!--------------------पुन्हा एकदा------------- काऊंट=काउंट+१ "सही जारेलेहो भिडू" "टिंग्या.....??" "त्याला कसे विसरलो? अजूनतरी पुरूषांनी कपडे धुण्याचा कायदा झाला नाही.. हा भांडी घासेल.. स्वयंपाक करेल.. नि त्याची बायको कपडे धुवेल... निदान तेव्हातरी चारचौघांत स्वच्छ कपडे घालून येईल.... चल चल.. काउंट वाढव.." --------------------- काऊंट=काउंट+१ :D आता दोघांनाही पटापट नावे सुचत होती... "अरे आपला दोस्त राहिला ना...सुहास..."--- परा "ऋषिकेशचं पण नांव लिही... त्याला एकदा का नातिचरामि म्हटलं की पटकन तयार होईल रजिस्ट्रेशनला"--- पुन्हा पराच!! "Nile..?"-- पराच्या डोकं मस्त चालू लागलं... "अरे त्याने हात मोडून घेतलाय... जमत नाही तर उगाच कशाला पालथे धंदे करायला गेलं कुणास ठाऊक?"-- निखिल "म्हणजे हात मोडला नसता तर तो आला असता??? [स्वगतः देवा वाचव रे बाबा] कैच्या कैच तुझं.... अरे तो उसगावात र्‍हातो..." "त्याला करस्पॉन्डन्स कोर्स देऊ..... तेवढीच फॉरेन करन्सी मिळेल.... आपण डॉलर नि पौंडात कमवू" "अरे हो की... चल मग आणखी नावं अ‍ॅड कर.. नंदन.. घाटावरचे भट... अनामिक...!!!" परा नि निखिल यादी वाढतच चालली होती. "मम्मी ओ मम्मी तू कब सास बनेगी..." हे त्यांच्या नव्या अवस्थेचे नाव होते. नि बर्‍याच बकर्‍यांच्या मनात हे गाणे ऐकू येण्याची व्यवस्था करण्यात हे दोन शैतान दिमाग बुडून गेले होते.... [समाप्त]

वाचन 13262 प्रतिक्रिया 0