प्रेरणा अन माफी- मुळकविंची!
कामांना घरातल्या पटापट उरकत जा ना
बैलोबा नुसता; म्हणे नवऱ्याचा दर्जा द्या ना..!!
सवलती मला दे की, चालते भुणभूण रोज ती
तीच ती कारणे अन त्याच त्या फुसक्या गर्जना..
निस्तरतांना थकते मी चुका तुझ्या पुन्हा पुन्हा
करते का हे सहन मी हेच मला समजेना..
काय रे ते निर्वाणाचे बोललास काय नेमके
होणार नाही दुःख मला, तुला बाहेर काढतांना...
बोच दुखरी आहे तरी मनाला माझ्याही
ठोंब्या असला तरी नवराच माझा आहेसना..
एऽऽ, दुपारी थोडीशी विश्रांती तू घेशील ना
कामाला त्या नंतरच्या ताकद तर हवीना..
सुटकेची ती स्वप्ने पाहतोसच तू कशाला
व्यर्थ आहेत ती बरे, गाठ माझ्याशी आहेना..!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4564
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
बोच मनाला
बोच मनाला आहे तरी मनाला माझ्याही
ठोंब्या असला तरी नवराच माझा आहेसना..
=))
चुचु
बोच मनाला
In reply to बोच मनाला by पर्नल नेने मराठे
बोच मनाला आहे तरी मनाला माझ्याही
वरील ओळीतील टंकदोष काढला आहे- दोनदा "मनाला" येत होते.
बोच दुखरी आहे....
सुटकेची ती
सुटकेची ती स्वप्ने पाहतोसच तू कशाला
व्यर्थ आहेत ती बरे, गाठ माझ्याशी आहेना..!
:>
नवरे सगळे........
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
जैपालजी,
In reply to नवरे सगळे........ by jaypal
जैपालजी, तुमचे इतरही प्रतिसाद पाहिले. तुम्ही चित्रांचा वापर केल्यामुळे, तुमचे प्रतिसाद फारच बोलके होतात. [आणि कोणाला टिकाही करता येत नाही]
जयप्या
In reply to नवरे सगळे........ by jaypal
जयप्या लेका सही चित्रं शोधतोस रे पटकन..
- एक गाढव
लै वेळा
In reply to जयप्या by गणपा
लै वेळा सहमत आहे.
-दुसरा गाढव.
:T :T :T
अहो, हापिसातही भिती वाटायला लागली ना.... :(
-(एक बिच्चारा नवरा) ध.
बायकोला
बायकोला आश्या कवितांपासुन दुर ठेवाव म्हणतो.
-एक बैल
आलरेडा (डी)
In reply to बायकोला by गणपा
आलरेडा (डी) बैल असल्यावं काम्हून लपविता ह्या कवितेला बायकोपासून? :-)
लपवाछपवी
लपवाछपवी खेळायला मजा येते !!
सू हा स...
>>लपवाछपवी
In reply to लपवाछपवी by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
>>लपवाछपवी खेळायला मजा येते !!>>>
डोस्क्यात शिरलं न्हाय! काय सागायचं हाये तुम्हास्नी.
उलगडा
झाला ब्वॉ एकदाचा.
कशाचा?
In reply to उलगडा by विनायक प्रभू
कशाचा?