Skip to main content

कोडी-२

कोडी-२

Published on 19/11/2009 - 13:33 प्रकाशित मुखपृष्ठ
आमची प्रेरणा क्रान्तिताईंची सुरेख कविता कोडी ओळख करून देतो अमुची तुम्हास थोडी काढू नका कधी ही अमुची चुकून खोडी साधे, सरळ कधी ही जमते न बोलण्याला उद्धार खानदानी तोंडी नि लावण्याला भाष्या सदैव असते तोंडात शालजोडी बोलून संकटाला आमंत्रणे कशाला चिखलात दगड आधी अन् मारणे कशाला मग बोलता अता का "पळण्या भुईच थोडी!" उघडून तोंड तुमचे नुकसान फार झाले आम्ही म्हणून तुमच्या पाठीत वार केले आता कळेल तुम्हा मौना मधील गोडी तुमच्या फुल्या फुल्यांचे अर्थ काय होते? जावे जिथे, तिथे का लफड्यात पाय होते? घालू नका अम्हाला असली भिकार कोडी! "केश्या" मुळात तू हे खरडायला हवे का? निवॄत्त छान होता, सांगायला हवे का? नाहीच का मनाची तुज सांग लाज थोडी?
लेखनविषय:

याद्या 6652
प्रतिक्रिया 18

वाह वाह वाह.! वेलकम ब्याक केसुशेठ. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

वाह वाह वाह.! वेलकम ब्याक केसुशेठ. --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

साष्टांग दडवत तुम्हाला !!! साष्टांग दडवत तुम्हाला !!! साष्टांग दडवत तुम्हाला !!! साष्टांग दडवत तुम्हाला !!! साष्टांग दडवत तुम्हाला !!! सू हा स...

सुंदर!! फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

ओळख करून देतो अमुची तुम्हास थोडी काढू नका कधी ही अमुची चुकून खोडी
केसु गुर्जी लैच बेक्कार शॉट हो !! जबर्‍याच झालाय इडंबन. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

झकास केसुशेट ! जबर्‍याच झालाय इडंबन. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

श्री.श्री.श्री. अखिल विडंबनशिरोमणि केसुगुर्जी, वेलकम ब्याक!
उघडून तोंड तुमचे नुकसान फार झाले आम्ही म्हणून तुमच्या पाठीत वार केले आता कळेल तुम्हा मौना मधील गोडी तुमच्या फुल्या फुल्यांचे अर्थ काय होते? जावे जिथे, तिथे का लफड्यात पाय होते? घालू नका अम्हाला असली भिकार कोडी!
अग्ग्गाय्यायायायाया...... _/\_ -() ध.

फुल्या आणि लफडी अंमळ परिचयाचे वाटले. विडंबन झक्कासच!

मस्त ! -दिलीप बिरुटे

वृत्ताकडे अधिक लक्ष द्यायला हवे असे वाटते. नेहमीचे बाई, बाटली विषय टाळल्याबद्दल अभिनंदन. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

जबरदस्त केसुशेठ.. "केश्या" मुळात तू हे खरडायला हवे का? निवॄत्त छान होता, सांगायला हवे का? नाहीच का मनाची तुज सांग लाज थोडी? >> =)) =)) मनाची लाज सोडुन परत एकदा फार्म मधे --टुकुल

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)केशवसुमार.