मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्थिरचित्र

फोटोशॉपची किमया- फोटो धुरकटला ? नो प्रॉब्लेम !

चौकटराजा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपाकर मित्रानो, आपल्या कॅमेर्‍यात मॅन्यूअल कंट्रोल असतात. पण बर्‍याच वेळा वेळे अभावी व बरेच वेळा आळसाने वा काही वेळा " त्यापेक्शा आटो बरा , आयला डोक्याला कटकट नाही ! या हिशेबाने मॅन्यूअल कंट्रोल वापरण्याचे आपण सर्व जण ( त्यात मी ही आलो) टाळतो. आपला फोटो भुरकट येणे व धुरकट येणे या वेगवेगळ्या समस्या आहेत. आपल्याला फोकस जमला नाही की फोटो भुरकट येतो. पण फोटोत वातावरणातील दोषांमुळे एक धुरकट रंगाचा पातळ थर फोटोवर येतो. बहुतेक वेळा उन्हाकडे तोंड करून स्नॅप घेतला तर हा प्रकार घडतो. असा फोटो आपल्या डोळ्याला त्रासदायक वाटतो.

तुम इक गोरख धंदा हो

यकु ·
नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्‍या, नव्हे तसल्या गोष्‍टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्‍टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे.

अजून काही पक्षांचे फोटो...........

जयंत कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
चष्म्या / Oriental White Eye फ्लेमिंगो/रोहित ग्रेट इंडियन टीट मुनिया. चष्म्याची जोडी खंड्या/ Kingfisher तांबट/Coppersmit

पुन्हा एकदा गॅस बर्नर...

मदनबाण ·
हल्ली शहरात ग्राहक पेठ भरतात्,खरेदीच्या विविध वस्तु यात विक्रीस ठेवलेल्या असतात. अगदी लोणच्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंतं बरेच काही पहावयास मिळते. अशाच एका बाजार पेठेत माझे तिर्थरुप गेले आणि एक वस्तु त्यांना तिथे दिसली व उपयोगी वाटुन ती त्यांनी खरेदी केली. ती वस्तु म्हणजे एक जाळी असुन ती गॅस बर्नरवर ठेवतात, त्यावर वांगे,पापड इं. भाजणे सोपे जाते आणि बर्नरही खराब होत नाही. हाच बर्नर जाळी ठेवल्यावर कसा दिसतो, ते तुम्हाला दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे.