Skip to main content

स्थिरचित्र

टेलिफोनची ट्रॅजेडी !!

लेखक जयवी यांनी शनिवार, 28/01/2012 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
कुठलीही गोष्ट नसते तेव्हाच तिची खरी किंमत कळते…… असं कोणीतरी म्हटलंय ना……… ते अगदी मनापासून पटलं गेल्या काही दिवसात. ह्म्म्म्म……. आणि ती गोष्ट म्हणजे आमचा फोन. आमची Land Line. गेल्या दोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽन महिन्यापासून आमचा हा फोन अक्षरश: मृतवत पडला होता. अगदी बघवत नव्हतं हो…….. कधी मधी त्याच्या छातीला कान लावून थोडी तरी धुगधुगी उरलीये का………. हे बघत होतो आम्ही आळीपाळीने. पण कसलं काय…….. ! शेवटी चक्क कोमातच गेला !! कोमात गेला तो आणि मरणप्राय अवस्था झाली आमची. आमच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस झाला आणि अगदी त्याचीच वाट बघत असल्यासारखा फोन २ दिवसानंतर गेला……… गेला म्हणजे…….मेलाच !

प्रचंड गारठा

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी सोमवार, 23/01/2012 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
------ भाग १: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! बर्फ़च घेऊन जणु बाहेर वाहतोय सुसाट वारा ! सूर्यकिरणांनी चकाकतोय दवबिंदू... की पारा? निसर्गाने उघडलाय बघ! सौंदर्याचा गाभारा.... माझ्या हातात तुझा हात उबदार जरा... तुझ्यासवे चालत चालत सरावा जन्म सारा.... प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! तुझ्यासह घालवलेला क्षण क्षण न्यारा....! ------ भाग २: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! झोपावे जरा, अजून कामाचा शीण नाही गेला सारा.... पहाटे पहाटे पेपरवाल्याने बेल वाजवली कराकरा.. सकाळी सकाळी "ही" का आवरतेय आज घरातला पसारा? आज रविवार!

मुंबई - सुपर कार शो २०१२

लेखक पुश्कर यांनी रविवार, 22/01/2012 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
महालक्ष्मी रेसकोर्स ला आज सकाळी सुपर कार्स चा शो आयोजित केला होता ......त्याची ही काही निवडक छायाचित्रे....

स्वर्गमंडप...........खिद्रापूर !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 14/01/2012 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदीर बुधवारी खिद्रापूरला जायचे ठरले आणि नाही म्हणणार्‍या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले. खिद्रापूर का ? कारण साधे. खिद्रापूरचे मुर्तीकाम हे फार प्राचीन कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. या देवळाचे वास्तूशास्त्र हे आगळेवेगळे आणि अचूकतेचा एक मापदंड ठरावा असे आहे. पुण्याहून इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूरला पोहोचलो. जयसिंगपूरला हॉटेल शांभवीत मुक्काम टाकला. गाडी चालवून दमल्यामुळे जेवायच्या अगोदर अपेयपानाचा कार्यक्रम उरकून ताणून दिली.

कॅमेरा vs कॅमेरामन

लेखक सौरव जोशी यांनी गुरुवार, 12/01/2012 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोग्राफी हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय, स्वतःला जरी तांत्रिक ज्ञान आणि त्यातली कला अवगत नसली तरी चांगल्-वाईट कळण्या इतपत फोटोग्राफी कळते (असा माझा अंदाज). National Geography, Discovery अशा संस्थाळांवर नियमित फोटो पाहणे, तसेच आंतरजालावर विविध निष्णात फोटोग्राफर्स चे काम पहाणे याचा तर व्यासंगच जडलाय. मिपावर देखील बरीच गुणी फोटोग्राफर मंडळी आहेतच, त्यांच्या "कलादालन" या विभागात मी नित्यनियमाणे भेट देत असतो.

मी काढलेली काही निसर्गाची छायाचित्रे.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 29/12/2011 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
नाखव्याचा ह्रदयभंग........ शहरी उदास पाऊस....... ही वाट दूर जाते..............कोकणातील गावा... क्षितिज आणि मी...