लेखकपहाटवारायांनी शुक्रवार, 20/12/2019 04:18 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात.
लेखकप्रासयांनी बुधवार, 18/12/2019 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात. गाणी ऐकताना काहीकाही विचारतरंग उमटतात आणि तेच आपल्या आनंदाचं साधन बनतात.
कालपासून एक गाणं मनात गुंजी घालत होतं.
वर्ष 1960 मधला चित्रपट 'अनुराधा', दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्जी, गीतकार - शैलेन्द्र, संगीत दिग्दर्शक - पं. रविशंकर, गायिका - लता मंगेशकर. बघा, काय काॅम्बिनेशन आहे. अनेकदा दिग्गज एकत्र आले की सुसंवादाच्या अभावाने कार्यहानीच होताना दिसते पण इथेमात्र संगीतातलं जणू वरूळचं कैलास मंदिर उभं राहतं.
पं.
लेखकसिरुसेरियांनी शुक्रवार, 13/12/2019 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
यात्री ---- कथा ---- काल्पनीक -------
तो यात्री अनेक दिवस नर्मदा नदीच्या तीरावरील गावांमधून भटकत होता . आपण कुठुन आलो , कुठे चाललो आहोत याची त्याला काहिच सय राहिली नव्हती . अंगावरील एके काळचे भरजरी कपडे धुळीने माखुन गेले होते . पण तिकडेही त्याचे लक्ष नव्हते . तहान भुक हरपुन तो नुसताच दिसेल त्या वाटेने चालत होता .
वाटेतील काही गावांमधे त्याला परिक्रमावासी समजुन आदराने , भक्तीभावाने खाऊ पिउ घातले गेले . तर काही गावांमधे त्याला चोर , वेडा , भिकारी समजुन चोपही देण्यात आला . पण या कशाचीच तमा न बाळगता तो यात्री आपल्याच नादात चालतच होता .
लेखकसुधीर कांदळकरयांनी बुधवार, 04/12/2019 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर आला की येणार्या थंडीची चाहूल लागते. सहलींचे मनसुबे रचले जातात. त्याचबरोबर संगीत समारोहांचे देखील वेध लागतात. भारतात ठिकठिकाणी शास्त्रीय संगीत समारोह भरतात. गेल्या आठवड्यात केव्हातरी चित्रवाणीवर वाहिन्या चाळता चाळता एका समारोहातल्या मैफिलीचे दृश्य आले आणि अशा कार्यक्रमांच्या आठवणी जाग्या झाल्या. शास्त्रीय संगीत हे भारताच्या संस्कृतिक अस्मितेचे एक प्रतीक. गणेशोत्सवातील शास्त्रीय संगीताच्या मैफिलीवरून आठवले होते पं. गामेखां पुण्यतिथी, पं पलुस्कर पुण्यतिथी अशा निमित्ताने चालणारे शास्त्रीय संगीताचे समारोह, सोहळे. परंतु विस्तारभयास्तव ते लिहीले नव्हते. ते इथे सादर करतो.
लेखकसमीरसूरयांनी गुरुवार, 31/10/2019 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
सहजच युट्युब चाळता चाळता एका गाण्याचे सजेशन दिसले. "हम है मता-ए-कूचा-ओ-बाजार की तरह…". उत्सुकता चाळवली. मी गाणे लावले. एका दळभद्री, अंधार्या खोलीमध्ये रेहाना सुलतान जमिनीवर बसून हे गाणे गात आहे. अर्थातच, ती बैठकीमध्ये धनिक-शेठ लोकांचे मनोरंजन करणारी गायिका असावी हे लक्षात येते. तिचा चेहरा अश्रूंनी भिजलेला आहे. डोळ्यांमध्ये कमालीची असहायता आहे. कमल कपूर (जो अनेक जुन्या चित्रपटांमध्ये तर होताच पण 'जो जीता वही सिकंदर'मध्येदेखील कदाचित होता) एका बाकावर बसून गाण्याचा आस्वाद घेत आहे आणि संजीव कुमार संतापाच्या आगीत होरपळून निघतोय.