तू मेरे रुबरु है

लेखनप्रकार
आजही विदर्भ मराठवाड्यात बुंग फिरणारी कालिपिली जिप असो की फाट्यावरची पानटपरी तिथे मोठ्या आवजात धडकन मधलं 'दुल्हे का चेहरा सुहाना लागता है' वाजतंच वाजतं. नुसरत ची पहिली वहिली ओळख हिच. धडकन पाहताना पहिल्यांदा तार स्वरात वाटणारं हे गाणं नंतर खूप आवडायला लागलं सोबत नुसरत ही. मग तो थेट भेटला ते 2015-16 मध्ये, आतशः नेट ची स्पीड पण वाढली होती आणि गाणी शोधणं फार फार सोप्पं झालं होतं, तू नळी वर तो पुन्हा भेटला 'साँसों की माला सिमरू' च्या रूपाने. त्यानंतर आजतागायत त्याने साथ सोडली नाही.

आनंदाचे डोहीं आनंद तरंग।

स्वतः आनंदी, हसतमुख राहणे आणि आसपासच्या सर्व व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद, हास्य पाहणे कोणाला नाही आवडत? पण नेहमीच आनंदी, हसतमुख राहणे इतके सोपे नाही.

देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा

#टिचभर_गोष्ट देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा ती दर शनिवार रविवारी पार्कातल्या एका कोपऱ्यात बसे. हाताशी ए फोर साईझचे कागद, दोनचार पेन्सिली, शार्पनर आणि इरेझर. (इरेझर लागत नसेच.) हौशी जोडपी येत, एकमेकांचे स्केच करून घेत. आईबाप मोठ्या कौतुकाने आपल्या लेकराबाळांची छबी रेखाटून घेत. आरशात पाहून कंटाळलेले कुणी स्वत:ला कागदावर उतरवून घेत. दहा ते पंधरा मिनिटात कोऱ्या कागदावर ती समोरच्याचा नाकनक्शा तंतोतंत रेखाटे. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमे. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य असे, कौतुक असे. घेणारा स्वत:च्याच रूपावर खुश असे. अंधार पडू लागला की ती पैसे मोजी.

शूर दुचाकीस्वार श्रीमान अभिवंदनचे अरमान

लेखनप्रकार
पेर्णा आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरु काकासाहेब खोपोलीकर यांनी लिहिलेले १४(बहुतेक, जास्तकमी झाल्यास जबाबदार नाही) ओळींचे खंडकाव्य! (हे लिहिण्यास काकासाहेबांना अडिच दिवस लागले. तस्मात् वाचकांनी एक दिवस तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व फोनबुकमधील कुठल्याही मोबाईल नंबरवर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!) खंडकाव्य: अभिवंदन, अभिवंदन! वीस जून २०१८ रोजी आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन सोलापूरकर, पुणे देशातून पिंपरी चिंचवडास परतला.

श्यामरंग.. त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!- निमंत्रण

लेखनप्रकार
मंडळी, नमस्कार! श्यामरंगच्या ठाण्यातील दोन यशस्वी प्रयोगानंतर आता मुंबईत येत आहोत. सर्व मिपाकरांना आग्रहाचं निमंत्रण! "मटा कल्चर क्लब" सोबत, सादर करीत आहोत.... श्यामरंग...त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण! तो सावळा, श्रीरंग..! त्या श्यामरंगात रंगलेल्या.. काय वाटलं असेल त्यांना कृष्णाबद्द्ल? काय प्रश्न विचारतील त्या कृष्णाला? प्रत्येकीचा कृष्ण निराळा.. प्रत्येकीचा प्रश्न निराळा.. त्या प्रश्नांचा रंग... श्यामरंग... त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण! एक आगळावेगळा नाट्य संगीत नृत्याविष्कार! अंतर्नाद निर्मित, अपूर्वा प्राॅडक्शन्स प्रस्तुत सारस्वत को.ऑ. बँक प्रायोजित "श्यामरंग...

आठवणीतील गीत रामायण...

लेखनविषय:
लेखनप्रकार
रवींद्र दत्तात्रय तेलंग 1983 साल आठवणीत घर करुन आहे कारण त्यावर्षी क्रिकेटचा वर्ल्ड कप कपिलच्या चमू ने जिंकला होता... ते उन्हाळ्याचे दिवस होते... दुसरं कारण जास्त महत्वाचं कारण या दिवसांमधेच मी गीत रामायणाचं पारायण केलं... माझ्या चुलत भावाचं इलेक्ट्रिकचं दुकान होतं. साउंडबाक्स, ढीग भर कैसेट्स...त्याच्या कडे गीत रामायणाचा 10 की 12 भागांचा सेट होता.

टिंग्डि टिडिडिडि

लेखनविषय:
लेखनप्रकार
टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिंग्डिटिंग. . 1994 सालची गोष्ट आहे. अर्थात हे सर्व समजण्याचं वयही नव्हतं तेव्हा. फारतर चवथ्या इयत्तेत असेन. आमची आवड त्याकाळी 'हम आपके है कौन' टाइप सिनेमा पुरती मर्यादित होती. आणि आवडते गाणे माइ नी माइ. (किंबहुना तेच दाखवले जात असल्यामुळे आमचा व्यासंगही इतका विस्तृत नसेल.

उधर कूछ देखोगे तो कहना नही...

लेखनविषय:
लेखनप्रकार
कला आणि अध्यात्म यांचा पूर्वीपासून सबंध आहे. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना जसा दैवी साक्षात्कार झाला होऊन देवाचे वरदान लाभले होते. त्याबाबतची प्रचलित कथा अशी आहे कि लहानपणी उस्ताद बिस्मिल्लाह खान त्यांच्या मामांकडून (उस्ताद अलिबक्ष खान) सनईची तालिम घेत असत तेंव्हा ते गंगा नदीच्या काठावरील एका हवेली मध्ये रियाज करीत असत. एके दिवशी मामांची तब्येत ठीक नसल्यामुळे उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना दुसऱ्या खोलीमध्ये रियाझ करण्यास सांगितले. त्यांच्या रियाजाची खोली त्या हवेलीच्या चौथ्या मजल्यावर होती आणि त्या खोलीच्या एका बाजूला खिडकी जी गंगेकडे उघडत होती आणि त्या खिडकीच्या विरुद्ध दिशेला पायऱ्या होत्या.

तबला -विविध तालांची गंमत

लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळी पहिलेच सांगतो की हा लेख जरासा विस्कळीत होणार आहे. समजुन घ्याल अशी अपेक्षा. तबला शिकायला लागल्यापासुन अनेक गाणी मनात रुंजी घालत असतात, मनात विविध प्रश्न येत असतात आणि मग कधीतरी युरेका!! असा क्षण येउन त्यांची उत्तरे मिळत असतात.

गाये तो गाये कहा

लेखनविषय:
लेखनप्रकार
गाये तो गाये कहा मला गाण शिकायच आहे खर पण आवाज साथ देत नाही. तस लहानपणी मुलीला झोपोवताना अंगाई गीत म्हणून तीला झोपवले होते नाही अस नाही पण त्यातही ती जास्त गाण ऐकायला नको म्हणून कदाचित लवकर झोपी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता विचारल तर सांगेल ही एखाद वेळेस. माझी गाण म्हणण्याची हौस मी गणपतीच्या आरती म्हणतात तेंव्हा भागवून घेतो. भक्त संकटी नानाSS म्हणताना आमच्या सोसायटीतल्या नाना नाडकर्णीना बघत नाना तला ना (पहीला ना नाही दूसरा ना ) ओढ़त ओढ़त म्हणतो. तो इतरांच्या आवाजात आवाज मिसळून म्हटल्या मुळे चालून जातो. आरती म्हणताना आपली गायनाची हौस भागवून घ्यावी या स्पष्ट मताचा मी आहे.
Subscribe to संगीत