मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मै हर इक पल का शायर हूँ ----- साहिर लुधयानवी

अमर विश्वास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
. दिवाळीची खरेदी दिवाळी पहाट च्या कार्यक्रमाच्यावेळी पुस्तकांचा स्टॉलला भेट देताना ही पुस्तके सापडली... अचानक धनलाभ यालाच म्हणत असावेत अर्थातच साहिरचे पुस्तक सर्वप्रथम वाचायला घेतले साहिर बद्दल वाचताना त्याच्या नज्म, गज़ल आणि चित्रपटातील गाणी आठवताना एक गोष्ट जाणवली... हा अथांग सागर आहे .. दरवेळी नवीन रत्न सापडतच ... अशाच काही रचना मांडण्याचा हा प्रयत्न ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अशाच एका नज्म (कवितेविषयी) साहिर चा राजकीय रंग लाल होता. पण लाल रंगात त्याने प्रेमाचा गुलाबी रंग होरपळु दिला नाही. तरीही त्याचे बंडखोर मन उफाळून यायचेच. आता हेच पहा ना ... ताजमहाल जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक. "बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल .. यमुना काठी ताजमहाल" असं हे प्रेमाचे प्रतीक. गजानन वाटावेंनी अजरामर केलं आहे. सुंदर ओळी आहेत या गाण्यात .. हळूच या रसिकांनो येथे नका वाजवू पावलांते दिव्य दृष्टीला होईल तुमच्या मंगल साक्षात्कार .. यमुना काठी ताजमहाल तर शकील (बदायुनीच्या) शब्दात सांगायचं तर ताज इक ज़िन्दा तसव्वुर है किसी शायर का इसक अफ़साना हकीकत के सिवा कुछ भी नही इसके आगोश मे आकर ये गुमां होता है ज़िन्दगी जैसे मुहब्बत के सिवा कुछ भी नही ताज ने प्यार की मौजों को रवानी दी है एक शहन्शाह ने बनवा के हसीं ताजमहल सारी दुनिया को मुहब्बत की निशानी दी है इसके साये मे सदा प्यार के चर्चे होंगे खत्म जो हो ना सकेगी वो कहानी दी है पण या सगळ्यांपेक्षा साहिर वेगळा होता ... तो गाण्यातून आपल्या प्रेयसीला सांगतो .. कि आपण दुसरीकडे कुठेतरी भेटूया कारण .... ताज तेरे लिये इक मज़हर-ए-उल्फ़त ही सही तुम को इस वादी-ए-रंगीं से अक़ीदत ही सही मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से । ताजमहाल तुझ्यासाठी प्रेमाचे प्रतीक असेल, इथले सौन्दर्य तुला आवडत असेल (अक़ीदत - भक्ती) पण आपण दुसरीकडे भेटूया बज़्म-ए-शाही में ग़रीबों का गुज़र क्या मानी सब्त जिस राह पे हों सतवत-ए-शाही के निशाँ उस पे उल्फ़त भरी रूहों का सफ़र क्या मानी | मेरी महबूब.... शाही दरबारात सामान्यांच्या येण्याची काय किंमत ? जिथे राजेशाहीची मोहोर उमटली आहे तिथे प्रेमिकांचे (उल्फ़त भरी रूह) काय काम ? अनगिनत लोगों ने दुनिया में मुहब्बत की है कौन कहता है कि सादिक़ न थे जज़्बे उनके लेकिन उनके लिये तश्हीर का सामान नहीं क्यूँकि वो लोग भी अपनी ही तरह मुफ़लिस थे या जगात अनेकांनी प्रम केलंय ... त्यांच प्रेम काय खर (सच्च) नाही ? पण ते आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करू शकत नाहीत (तश्हीर का सामान) कारण ते आपल्यासारखेच गरीब आहेत (मुफ़लिस - गरीब) आणि यानंतर येतो तो खास साहिर टच ... सरळ काळजाला भिडणारा मेरी महबूब ! उन्हें भी तो मुहब्बत होगी जिनकी सन्नाई ने बख़्शी है इसे शक्ल-ए-जमील उन के प्यारों के मक़ाबिर रहे बेनाम-ओ-नमूद आज तक उन पे जलाई न किसी ने क़ंदील ज्यांच्या कारिगरीमुळे (सन्नाई) इतके सुंदर शिल्प (शक्ल-ए-जमील) उभे राहिले त्यांनी पण प्रेम केलं असेलच की .. पण त्यांची आज कोणाला आठवण तरी आहे का ? (मक़ाबिर - कबर) (बेनाम-ओ-नमूद - जलाई न किसी ने क़ंदील : नाही चिरा नाही पणती) आणि शेवटी ये चमनज़ार ये जमुना का किनारा ये महल ये मुनक़्क़श दर-ओ-दीवार, ये महराब ये ताक़ इक शहनशाह ने दौलत का सहारा ले कर हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक यमुना नदीचा रम्य किनारा, ही बाग (चमनज़ार ) या नक्षीदार (मुनक़्क़श ) भिंती या कमानी हे झरोखे ... ताजमहाल सुंदर आहे हे खरेच ... पण ... पण ........ इक शहनशाह ने दौलत का सहारा ले कर हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक.. हे शब्दच इतके चपखल आहेत कि त्याचे रूपांतर होऊच शकत नाही ... असा हा साहिर ... एक वेगळा दृष्टिकोन दाखवणारा ... ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- पुस्तक वाचताना साहिरच्या अनेक रचना डोक्यात घोळायला लागल्यात त्याच्याच शब्दात सांगायचं तर आप आये तो खयाल-ए-दिला-ए -नाशाद आया कितने भूले हुये जख्मों का पता याद आया त्यामुळें अशाच काही रचनांबद्दल पुढच्या भागात

वाचने 2384 वाचनखूण प्रतिक्रिया 3

मनिष 05/11/2019 - 15:34
आप आये तो खयाल-ए-दिला-ए -नाशाद आया कितने भूले हुये जख्मों का पता याद आया त्यामुळें अशाच काही रचनांबद्दल पुढच्या भागात
साहिर? आने दो...

राघव 27/09/2023 - 14:25
क्या बात अमरशेठ! साहिर आणि गदिमा दोन्ही अत्यंत आवडते! साहिर काही वेळेस मात्र अक्षरशः अंगावर येतो. उदा: "औरतने जनम दिया मर्दों को.." - तशी बरीच कडवी आहेत मूळ रचनेत.. चित्रपटात ३-४ च घेतली आहेत. पण चित्रपटातलं शेवटचं कडवं कातडी सोलून काढतं. "ये महलों ये तख्तों ये ताजों की दुनिया.." - सगळी रचनाच अंगावर येते..

जुइ 03/10/2023 - 19:16
नुकतेच एका मुलाखतीत ताजमहाल वरील साहीर यांची रचना ऐकली. दुवा देते आहे. १९:२७ पासून पुढे पहा. नझम