मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संगीत

वृक्षवल्ली आम्हा सोयरी

नायकुडे महेश ·
काव्यरस
जसे वाळवंटी असे निर्जरा, जसे सागराच्या तळाशी धरा, तसा एक तू जीव या भूवरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।। कुणी वृक्षप्रेमी पुकारी तुला, तया जीवनी एक आधार तू, कुणी वृक्षवैरी न ठावे तुला, करी स्वप्न साऱ्यांचे साकार तू, जसा देव नांदे सदा अंतरी ... वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।।

बोनेदी बारीर पूजो

अनिंद्य ·
लेखनप्रकार
“महालय आच्छेन. आजे चॊक्खू दानेर दिन !” (पितृपंधरवडा संपतोय आज, आज देवीच्या मूर्तींना डोळे रेखण्याचा - चक्षु-दानाचा दिवस आहे) माझे मित्र राधामोहन बाबू उत्साहात बोलले आणि मी मनातल्या मनात जुन्या कोलकाता शहराच्या अरुंद रस्त्यावरून कुमारटोली (कुंभारवाडा) भागात फेरी मारून आलो सुद्धा. कोलकात्याच्या दुर्गापूजेची महती आणि मोहिनीच तशी आहे. चला तर, तुम्हालाही माझ्यासोबत थोडे फिरवून आणतो. 'दुर्गापूजा' (बंगालीत फक्त 'पूजो') असा नुसता शब्द जरी ऐकला तरी समस्त बंगालीजनांचे डोळे लकाकतात आणि चेहऱ्यावर हमखास स्मिताक्षरे उमटतात.

गीत - गँ गणपतये

कौस्तुभ आपटे ·
काव्यरस
॥श्री॥ गँ गण ण ण ण,गँ गण ण ण ण गँ गण ण ण ण, गँ गणपतये देवांमाजी, अग्रदेव तू, त्रिवार वंदन स्विकार अमुचे॥धृ॥ हे शिव-शक्तिच्या संगमा हे बुद्धि-युक्तिच्या अग्रजा त्या श्रुती-स्मृतिंचा पाठक अन तू वेदांची रे मंत्रणा ! विद्या-कला ठायी तुझ्या तू सर्वेश्वर तुज वंदना ॥१॥ तू श्रेष्ठ लिपीक तुजला गती हे देवांच्या सेनापती रविचंद्रधिनायक विश्वही तुजला सुर्याने ओवाळती सिद्धेश्वरा, विघ्नेश्वरा, हे करूणाकर , तुज मोरया ॥२॥ पदी मंजुळ घुंगुर नादतो कटिबंध भुजंगही शोभतो हे सुंडतुंड, गजगंड तिलंकीत मूषक वाहन वाहतो लंबोदरा, मनमोहना, तू दृष्टि राख, हीच कामना ॥३॥ गीत - कौस्तुभ गाणे इथे ऐकत येइल https://youtu.

आशाताई आणि आपलं भावगीत विश्व 

ज्योति अळवणी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आशाताई आणि आपलं भावगीत विश्व  आशाताईंच्या जन्मदिवसानिमित्त 'पिया तू अब तो आजा....' हा लेख लिहिला; त्याचवेळी मनात होतं की आशाताईंनी अजरामर केलेल्या मराठी भावगीत विश्वातल्या काही मोजक्या गाण्यांवर जर काही लिहिलं नाही तर आपल्यासारख्या रसिकांवर तो अन्याय असेल. म्हणून हा अगदी लहानसा प्रयत्न.... मानून घ्या! 'पिया तू......' या लेखात म्हंटल्या प्रमाणे हिंदी चित्रपटातील आशाताईंची गाणी ऐकताना आपल्या डोळ्यांसमोर ती अभिनेत्री उभी राहाते. मात्र मराठी भावगीतांच्या संदर्भात माझं मत थोडं वेगळं आहे. आशाताईंच्या गाण्यातून मला मीच त्या शब्दात विरघळताना दिसते....  'जिवलगा......

अ का पेला - A cappella

राघवेंद्र ·
अ का पेला - A cappella हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत नव्या पद्धतीने हा प्रकार प्रचलित झाले. या मध्ये शाळा -कॉलेजमधील विदयार्थी समुहात गाणी म्हणु लागली. वाद्याऐवजी टाळ्या, पायाचा ठेका याचा वापर सुरु झाला.

तुझे डोळे

कौस्तुभ आपटे ·
सागर पिंजुन रत्न बिलोरी असतील आणले अन जीवनाचे सार ओतुनी भरले चांदणे घडवूनी क्षणभर देव असावा अचंबित ज्यांपूढे तुझे डोळे ...तुझे डोळे ... हे असे ...तुझे डोळे ॥धृ॥ मुग्धता कधी सुमनांची, चारुता कधी चंद्राचि, नयनातुन ती सांडते. गुढता गहन कोड्याची, कल्पना नव्या कवीतेची, नजरेतुन ती मांडते. या तुझ्या लोचनी, खोल गेलो किती, तरीही त्रुप्ती मना ना मिळे. बाळ तान्हे कुणी, मधुरसे हासुनी, जैसे लळा लावते गोजीरे गोजीरे.. तुझे डोळे ..तुझे डोळे ...

केळीचे सुकले बाग ....

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मानवी आयुष्य हे अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. सुख-दुःख, आनंद-वेदना, उन्हाळा पावसाळ्याची अविरत आन्दोलने अनुभवत याची सतत वाटचाल चालू असते. म्हणूनच इथे संतुलनाचे मोल अतिशय महत्वाचे आहे. येणारा प्रत्येक सूर्य हा आनंदच घेवून येईल असे नाही, त्याला वेदनेची, दुःखाची किनारसुद्धा असु शकते. एखादी संध्याकाळ अतिशय मन प्रसन्न करुन टाकणारी असते. पण खुपदा एखादी शांत, निःशब्द संध्याकाळ काही वेगळाच् मुड घेवून येते. उगाचच खिन्नतेचा, उदासीचा परिवेष परिधान करुन येते. मग नाहकच मन जुन्या, भूतकालीन आठवणीत रेंगाळायला लागते.

माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की....

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मैना, तू तो गां, मेरा नाही तो कमसे कम अपना ही दिल बहलाँ …. प्राक्तनाच्या अदृष्य पिंजर्‍यात अडकलेली सलमा अतिशय आर्त स्वरात पौलादी पिंजर्‍यात बंदी असलेल्या मैनेला कळकळीने सांगते. आपण सुन्न झालेले असतो आणि त्यात वेदनेची परमावधी साधत लताबाईंचे प्रभावी सूर काळीज चिरत कानावर येतात. न तड़पने की इजाजत है न फरियाद की है, घुट के मर जाऊँ, ये मर्जी मेरे सैय्याद की है ! कै. अविनाश चव्हाण, मंदार काळे, अशोक पाटील यांच्यासारख्या काही स्नेह्यांच्या संगतीमुळे मलाही हिंदी सिनेसृष्टीत दुर्लक्षीत राहिलेले चित्रपट शोधायची सवय लागलेली आहे.

सायकोसोशल

वनफॉरटॅन ·
लेखनविषय:
Jason, you're too fucking metal man Too metal for your own good You guys want some more don't ya we're just getting warmed up now man कुठल्याही समाजाचे आखणीबद्ध नियम, संकेत, परंपरा ह्यांचा दरवेळी बऱ्याच लोकांना त्रास होत असतो. संगीताचंही तसंच आहे. आत्तापर्यंतच्या सर्वमान्य असलेल्या संगीतातले बरेचसे नियम पायदळी तुडवून एक प्रकार निर्माण झालेला आहे. रॉक नवीन होतं तेव्हाही तेच. रॅप, हिप-हॉप, फंक आणि ब्लूजचंंही बरचसं तसंच. फरक इतकाच, की समजाची 'अमान्यता' ह्यांनी फाट्यावर मारली.

दैवी आवाजाचे गायक - येशुदास!

उपयोजक ·
Yesudas कट्टासेरी जोसेफ येशुदास अर्थात पद्मविभुषण डॉ. K. J. येशुदास यांचा आज ७८ वा वाढदिवस!