मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेखाटन

ट्रिंग ट्रिंग !!!!!

बटाटा चिवडा ·
ट्रिंग ट्रिंग असा वाजतो जेव्हा Tone.. तेव्हा सर्वाना आठवतो तो "Telephone" १९९० च्या दशकात केलेला तो पहिला कॉल आजही आठवतो चाळमालकांच्या घरातला हॉल... हॉल मध्ये फोनचा "डब्बा" असायचा ठेवलेला येता-जाता निरखत असायचो आम्ही त्याला.. चाळीतले ते जोशी , नाडकर्णी , आणि पाटील सर्वांचे कॉल त्या डब्बा फोन वर यायचे.. अन कोणाचा फोन आला आहे हे सांगायला लहान मुलांनी घरोघरी पळायचे... काही वर्षांनी, आमच्याही घरी आला तो Landline चा डब्बा इतका आनद झाला जणू घरी आले गणपती बाप्पा... त्या फोनचीही निराळीच होती तऱ्हां ८ - ८ दिवस ‘Dead’ होऊन वाजायचे त्याचे बारा...

आईसक्रीम

तिमा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
‘टबुडी टबुडी’ चाच (http://www.misalpav.com/node/26051) हा पुढचा भाग आहे असे समजावे, म्हणजे पुन्हा सर्व पात्रांची ओळख करुन द्यायची आवश्यकता नाही. तो वेडा जागा सोडून गेल्यावर तिथे दुसरे एक श्रीमंत गुजराती कुटुंब रहायला आले. त्यांचा बहारिनला मोठा धंदा होता. कुटुंब मोठे, मुख्य मोटाभाई म्हणजे आसुभाई, दोन तीन महिन्यांनी कधी एखादा आठवडा घरी यायचे. त्यांचे धाकटे भाऊ, नवीन आणि खिमन, मुंबईतला बिझिनेस सांभाळायचे. एक बहीण, बायको आणि दोन मुली आणि तीन मुले, शिवाय एक म्हातारी दमेकरी आई. त्यांचा सर्वात धाकटा मुलगा माझ्या बरोबरीचा असल्यामुळे, आम्ही दोघं खूप खेळायचो.

इक बंगला मेरा न्यारा--२

तिमा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पूर्वसूत्रः- त्याची आई, गोंधळलेल्या नजरेने , त्याला बळेच घेऊन गेली. मी चुटकी वाजवली, हां, म्हणजे हा मुलगा 'श्यामलन' चे सिनेमे नक्की पहात असणार तर! अब आयेगा मझा!!! दोन दिवस नुसतेच गेले. तिसर्‍या दिवशी सकाळी मुंबईहून मुलगा आला. काम सोडून यावे लागल्यामुळे थोडासा त्रासलेला वाटला. कोचावर स्थानापन्न झाल्यावर घरातल्या कुटुंबप्रमुखाने विषयाला हात घातला. "तुम्हाला तसदी दिल्याबद्दल सॉरी, पण इथे हिला आणि माझ्या मुलाला जरा वेगळे अनुभव येत आहेत." "काय झालं ?" मुलाने विचारलं. " माझ्या मुलाला वरच्या खोलीत एक आजोबा दिसले, असं तो म्हणतो. पण आम्हाला काहीच दिसलं नाही." त्यामुळे, ही जरा अस्वस्थ झालीये.

इक बंगला मेरा न्यारा.

तिमा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तसे आम्ही या बंगल्यात अनेक वर्षं राहिलो आहोत. माझ्या वडिलांनी हौसेने चांगला प्रशस्त बंगला बांधला. तेंव्हापासून इथे रहाण्याची इतकी संवय लागली होती की चार दिवस कुठे गांवाला गेलो तरी आईला मी, परत कधी जायचं, असं सारखं विचारुन भंडावून सोडत असे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर, बाहेरगांवच्या कित्येक चांगल्या ऑफर्स मी नाकारल्या आणि आमच्या गांवातच नोकरी पत्करली. पगार थोडा कमी मिळायचा, पण मला ही जागा सोडायची नव्हती. आयुष्य तसं संथगतीने पण खाऊन्-पिऊन सुखी गेले. मुलं मोठी झाली, थोरला अमेरिकेला गेला आणि धाकटा मुंबईला गेला. थोड्याच दिवसांत त्याने मुंबईतल्या धंद्यात जम बसवला. मोठा फ्लॅट घेतला.

!!! ....सभा "Social Networking " ची.... !!!

बटाटा चिवडा ·
भरली होती एकदा 'Social Networking' ची सभा Twitter होता मध्यस्थानी, Facebook सोबत उभा.. चढ़ाओढ़ होती लागली, कोण Social Networking चा राजा Google Plus आणि Ibibo करत होते प्रसिद्धीसाठी गाजा - वाजा.. Orkut म्हणाले Facebook ला , तुझ्यामुळे गेली माझी खुर्ची Facebook च्या आगमनाने Orkut ला भलतीच लागली होती मिरची.. Linked IN म्हणाले आहे मी 'Professional', मलाच करा 'King' सगळे म्हणाले, "Timepass" की बात करो तो "LINKED IN is Nothing " .. Whatsapp म्हणाले गर्वाने, करतात मला सगळे Like काय माहित,देव जाणे, रूसून कोपऱ्यात का बसले Hike.. या सर्व गदारोळात.. Myspace, PerfSpot, BigAdda ओरडत होते 'आम्ही पण आह

!!...'मानवी भूकंप'...!!

बटाटा चिवडा ·
काव्यरस
गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची... असा काही झाला होता तिच्या मनावर आघात 'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात... भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'... प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का.. त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती.. मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले.. अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत

मकरंद बोरीकर

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमचा एक मोठा सॉफ्टवेअरचा प्रोजेक्ट चालू होता. आमचा क्लायंट होता,अमेरिकेचा. तिथला एक मोठा उद्योगसमूह त्यांचा होता. हा प्रोजेक्ट आमच्या कंपनीसाठी खूप महत्वाचा होता. त्यामुळे खूप मोठी टीम, ज्यात भरपूर डेव्हलपर, टेस्टर, डीबीए, इन्फ्रा, त्यांचे लीड्स, प्रोजेक्ट मॅनेजर, रिलीज मॅनेजर, व्हर्जन मॅनेजर, अशी सगळी मांदियाळी कामाला जुंपली होती. भारतात दोन तीन शहरात तर जोमात काम चालु होतच. पण तिकडे क्लायंटच्या ऑफिसमध्ये म्हणजेच साईटवरसुद्धा आमची मोठी टीम होती. त्या देशातल्या आमच्या कंपनीच्या ऑफिसमध्येसुद्धा काही लोक काम करत होते.

नेत्रसुखद - मनोरंजक - उत्कंठावर्धक.... (भाग १) - नांदी

चित्रगुप्त ·
मित्रहो, कधी सुंदर, मनमोहक -- "मृदु मंजुळ कोमळ" तर कधी " भव्य अद्भुत विशाळ" अश्या, विविध रसांचा अविष्कार करणाऱ्या प्रतिमा बघण्यासाठी हा धागा आहे. . यात वाचण्यासारखे फारसे काही असेल- नसेल, पण बघण्यातून आनंद मिळेल, मनोरंजन होईल, थोडीशी माहितीत भर पडेल अशी आशा आहे. वाचकांनीही विषयानुरूप आपापली भर इथे टाकली, तर सोन्याहून पिवळे. तर आगामी भागांतून इथे काय काय बघायला मिळेल, याची एक झलक या 'नांदी' मधून देतो आहे. १.

प्रेम....?

Bhagyashri satish vasane ·
लेखनविषय:
काव्यरस
भेटत....ती पण नाही, भेटत....मी पण नाही... निभवणे तिला जमत नाही, आशेवर ठेवणे मला पटत नाही. फसवत ती पण नाही, फसवत मी पण नाही... तिला रुसण्याचे दु:ख आहे, मला एकटेपणाची भीती आहे... समजत...ती पण नाही, रागवत... मी पण नाही... कुठल्यातरी वाटेवर भेट होत असते नेहमी बघत... ती पण नाही... थांबत... मी पण नाही... जेंव्हा पण बघतो तिला, ठरवतो काहीतरी बोलेन तिच्याशी... ऐकत... ती पण नाही, सांगत.. मी पण नाही... पण एक गोष्ट मात्र खरी आहे, प्रेम माझे आजही आहे तिच्यावर नाकारत.. ती पण नाही, सांगत.. मी पण नाही...!

तू आणि मी

Bhagyashri satish vasane ·
अशी एक फक्त कल्पना असावी. सोनेरी त्या क्षणाला एकांताची साथ असावी...! गुलमोहराचा बहर, आणि तिथेच आपली भेट असावी...! जसे एखाद्या पाखराची, गोड ड्रीम डेट असावी...! तू मात्र,,, आवडत्या आकाशी रंगाच्या, पोशाखात असावी...! आकाशालाही हेवा वाटावा, इतकी तू सुंदर दिसावी...! निरोप घेतांना डोळ्यांमध्ये, अश्रूची एक झलक असावी...! डोळ्यामधले भाव जाणूनी, नाजुकशी ती मिठी असावी...! जीव ओतला तुझिया पायी, आशा तुझीही हीच असावी...! एकमेकांची साथ अशी ही, दरवेळी रम्य असावी...!