जवळ्जवळ एक तप झालं असेल भारतात एक खूप मस्त राशींवरचं पुस्तक वाचलं होतं. ज्यात जीवात्म्याचा विकास प्रत्येक राशीत कसा होतो ते सविस्तर सांगीतलं होतं. आणि एका धाग्यात तो प्रवास सुंदर रीतीने ओवून दाखवला होता. जितकं आठवेल तितकं आणि तर्कशुद्ध इथे मांडायचा प्रयत्न करते.
मेष राशीत जीवात्मा नुकताच जन्मास आलेलं अर्भक असतो. स्वयंकेंद्रीत आणि मी म्हणेन तसच व्हावं अशी अपेक्षा असणारा. मनाविरुद्ध झाल्यास सगळं घर डोक्यावर घेणारा.
वृषभ राशीत तो ज्याला इंग्रजीत "टॉडलर" म्हणतात तसा होतो. या बाळाला प्रत्येक रंग , रूप, रस, गंध याचं आकर्षण वाटतं.