मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फसू नका तुम्ही फसू नका

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
फसू नका तुम्ही फसू नका
विज्ञानाची कास धरा तुम्ही ज्योतिषांच्या नादी लागू नका फसू नका तुम्ही फसू नका ||धृ|| लांब दाढी कपाळी टिळा बोटात अंगठ्या गळ्यात माळा समोर पोपट चिठ्ठी काढतो त्यावरचे भविष्य ज्योतिषी वाचतो गद्य: जो दुसर्‍यांचे भविष्य वाचतो त्याला त्याचे भविष्यतरी ठावूक असते काय? अशा ज्योतिषासमोर बसू नका, बसू नका फसू नका तुम्ही फसू नका ||१|| देई गंडा ताईत दोरा अंगार्‍या धुपार्‍यांचा करी उतारा राशी ग्रह नक्षत्र कामाला लावी पोट भरण्या तुम्हाला फसवी गद्य: अशा भोंदूला त्याच्या जीवनात समस्या नसतात का? अशा भोंदूकडे तुम्ही जावू नका, जावू नका फसू नका तुम्ही फसू नका ||२|| कुणी तळहात भविष्यासाठी पाहतो कुणी तळपायाकडे त्यासाठी जातो कुणी चेहेरा पाहून भविष्य सांगे कुणी त्यासाठी कुंडली मांडे गद्य: अहो ज्योतिष पाहण्याच्या कितीतरी अजब ह्या तर्‍हा? अशा लफग्यांच्या नादी तुम्ही लागू नका फसू नका तुम्ही फसू नका ||३|| कुणी घरी येवून भविष्य सांगे कुणी आजारपणावर उपाय सांगे कुणी हॉटेलात ऑफीस काढी कुणी आंतरजाळावरी घागा सोडी गद्य: ज्योतिष हा 'धंदा' आहे अन 'धंद्यात' फसवणूक चालते, ग्राहकराजा जागा हो! अशा व्यापार्‍यांच्या दुकानी तुम्ही जावू नका फसू नका तुम्ही फसू नका ||४|| विज्ञानाची कास धरा तुम्ही ज्योतिषांच्या नादी लागू नका फसू नका तुम्ही फसू नका ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १६/०९/२०१०

वाचन 2170 प्रतिक्रिया 2