Skip to main content

१२ राशींमधला प्रवास

लेखक शुचि यांनी मंगळवार, 20/07/2010 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ्जवळ एक तप झालं असेल भारतात एक खूप मस्त राशींवरचं पुस्तक वाचलं होतं. ज्यात जीवात्म्याचा विकास प्रत्येक राशीत कसा होतो ते सविस्तर सांगीतलं होतं. आणि एका धाग्यात तो प्रवास सुंदर रीतीने ओवून दाखवला होता. जितकं आठवेल तितकं आणि तर्कशुद्ध इथे मांडायचा प्रयत्न करते. मेष राशीत जीवात्मा नुकताच जन्मास आलेलं अर्भक असतो. स्वयंकेंद्रीत आणि मी म्हणेन तसच व्हावं अशी अपेक्षा असणारा. मनाविरुद्ध झाल्यास सगळं घर डोक्यावर घेणारा. वृषभ राशीत तो ज्याला इंग्रजीत "टॉडलर" म्हणतात तसा होतो. या बाळाला प्रत्येक रंग , रूप, रस, गंध याचं आकर्षण वाटतं. प्रत्येक गोष्ट हातात घेऊन चाखून पहाणे , हाताळणे तिचा आनंद घेणे. मिथुन राशीत जीवात्म्याची ओळख पहील्यांदा पुस्तकांशी, शब्दांशी होते. नाना प्राकारचे शब्दखेळ, कोट्या त्याला मोहवतात. अनेक लेखक या राशीवर सापडतात. कर्क या राशीत बाळ थोडं अजून मोठं होतं. त्याला अवतीभवती कुटुंब आहे याची जाण पहील्यांदाच येते. कौटुंबीक जिव्हाळा कळू लागतो. या राशीवरचे स्त्री-पुरुष अतोनात कुटुंबवत्सल असतात खरे. सिंह ही रास म्हणजे पौगंडावस्था. सारखं आरशापुढे रममाण होण्याची वृत्ती. कन्या पहील्यांदा बाहेरच्या जगाची चाहूल लागते आणि कुणासाठी तरी काहीतरी करावं , मदत, सेवा करावी असं जीवात्म्यास वाटू लागतं. तूळ १८० अंशातून राशीचक्र फिरलं आणि स्वकेंद्रीत जीवात्मा प्रथमच बहीर्मुख झाला. त्याला जोडीदाराची निकड भासू लागली. लग्न, सोशल सर्कल (मित्र परीवार) ही अनुभवसंपन्नता या राशीत तो अनुभवतो. वृश्चिक विवाहोपरांत कामपूर्ती, अधिक गूढ गोष्टींकडे कल आदि चा अनुभव या राशीत येतो धनु धर्म, धार्मीकता, पर्यटन, देशाटन आदिची आवड जीवात्म्यास निर्माण होते. थोडं मी, माझं कुटुंब या पलीकडे जाणार्‍या या शेवटच्या ४ वैश्वीक राशी मकर बरचसं वैराग्यं कुंभ देशाटन उपरान्त लोकसंग्रह, लोकोपयोगी कार्य हे जीवात्म्याकडून होतं मीन मोक्ष, अंत, सर्व राशींचे गुण पहावयास मिळतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18043
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

आता या राशी चंद्रराशी आहेत कि सौरराशी आहेत? तसही राशी भविष्य हे सौरराशीचं आहे की चंद्रराशीचं हे कसं ओळखायचं? म्हणजे पेपरात येतात किंवा टीव्हीवर दाखवतात त्यातली माझी रास नक्की कोणती हे कसं कळेल?

In reply to by अभिषेक पटवर्धन

ज्यात जीवात्म्याचा विकास प्रत्येक राशीत कसा होतो ते सविस्तर सांगीतलं होतं.
शुचितै, आयड्यात्म्याचा विकास प्रत्येक राशीत कसा होतो यावरही काही लिहिता येईल का? -क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

'||विकास||' जिथे ह्या काड्या संपतात तिथे आयड्यात्म्याचा 'विकास' सुरु होतो! ;) (संबंधितांनी ह.घे.) (अविकसित)चतुरंग

In reply to by चतुरंग

गोठलेल्या अवस्थेत आयड्यांना काड्यांची गरज पडत नाही. ;) -क्रेमर (गोठलेला अक्षय पुर्णपात्रे ((गोठलेला कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

गोठलेला आणि गोठवलेला यात फरक असावा. --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

In reply to by अवलिया

सहमत. परंतु जुन्या मित्रांचे सय असे करवीत असावेत. पुण्याचे पेशवे येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

In reply to by अवलिया

गोठलेला गोटातला असतो. इतरांना गाठता गाठता ज्याला गाठले जाते तो गोठवलेला. :) -क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क)) सदस्य नाव कसे बदलायचे? मलाही काहीतरी भन्नाट घ्यावेसे वाटत आहे :)

In reply to by आमोद शिंदे

कर्क, अक्षय पुर्णपात्रे, क्रेमर ही एकाच सदस्याची (खात्याची) बदललेली सदस्यनामे नाहीत. ही एकाच व्यक्तिने तीन वेगवेगळी सदस्यत्वे घेऊन (खाती उघडून) घेतलेली नावे आहेत. एकाच खात्यावर सदस्यनाम बदलायचे असल्यास श्री नीलकांत यांना कळवावे. (अशा प्रकारे नाव बदलल्याचे आठवणारे उदाहरण : पुर्वीचे सदस्यनाम 'खराटा', आताचे सदस्यनाम 'नितीन थत्ते') -क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

In reply to by अवलिया

पाध्यांच्या राशीला लागलेला गोठवलेला असतो असे वाटते.

सिंह ही रास म्हणजे पौगंडावस्था. सारखं आरशापुढे रममाण होण्याची वृत्ती. हा हा हा! माझ्या मुलाची रास! आत्तातरी मजेशीर वाटतय वाचायला! रेवती

मकर राहिली की? तीचे काय दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

In reply to by हर्षद आनंदी

=)) मकर म्हणजे खरं म्हणजे करीअर. ते माहीत नाही आता कसं बसवायच? :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

ज्यांची मीन रास आहे त्यांनाच मोक्ष मिळणार म्हणजे...अरेरे मला उगीचच फार आशा होत्या इथून तिथून मिथून पुष्करिणी

पुष्करिणी, अहो, मिथून राशीच्या लोकाना सग्गळे शॉर्ट्कट्स शोधून काढता येतात! ;;) आपण मोक्षाचापण शोधू! ============ ( मिथून) माउ :))

क्रेमरच्या भाषेत , "चालू द्या !" :-)

In reply to by मुक्तसुनीत

साफ असहमत! बंद करा असला भोंगळपणा! स्वतःचं काम नाहीच, वर बारा वर्षांपूर्वी वाचलेलं पुस्तक, त्यातलं आठवतंय तेवढं लिहीलेलं, आणि ते पण काय तर जगाच्या लोकसंख्येला बारा गटांमधे विभागून, प्रत्येक गटातल्या प्रत्येक "जीवात्म्या"*चा प्रवास कसा हे दोन शब्द ते दोन ओळी एवढ्यात लिहून झालं? या असल्या धाग्यांसाठी "बाबागिरी", "भोंदूगिरी" किंवा "पेज थ्री गॉसिप" नावाचा नवीन सेक्शन मिपात तयार करावा आणि आमच्यासारख्यांना तो अजिबात दिसणार नाही, अशी निवड करता यावी, अशी नम्र सूचना. अदिती *ही जीवात्मा काय भानगड आहे? आणि त्याचा प्रवास म्हणजे नक्की कुठून कुठे होतो??

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत. असले अंधश्रद्धाळु धागे काढण्याचे प्रयोजन काय? वर ते 'तर्कशुद्ध' असल्याचा दावा काय? काहीही सुरु आहे. -Nile

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या असल्या धाग्यांसाठी "बाबागिरी", "भोंदूगिरी" किंवा "पेज थ्री गॉसिप" नावाचा नवीन सेक्शन मिपात तयार करावा आणि आमच्यासारख्यांना तो अजिबात दिसणार नाही, अशी निवड करता यावी, अशी नम्र सूचना.
विज्ञान विशारदा अदितीजी ह्या देवावर-भविष्यावर वगैरे विश्वास ठेवणार्‍या नसल्या तरी त्यांच्या विषयी आदर आहे. मात्र त्यांनी ह्या प्रकारांना भोंदूगिरी वगैरे म्हणुन आमच्या श्रद्धेला ठेच लागु देउ नये अशी त्यांना विनंती आहे. आमची श्रद्धा आहे, आम्ही वाचणार आणि बोध घेणार. अदिती ह्यांना अशी विधाने पुन्हा न करण्याबद्दल तंबी देण्यात यावी अशी संपादक मंडळाकडे नम्र विनंती आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

ओ परा, तुमची नक्की कशावर श्रद्धा आहे ते आधी विषद करा. ते जीवात्मा म्हणजे काय, त्याचा प्रवास म्हणजे काय हे मला कळलेलं नाही, मी त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. कोणत्यातरी पुस्तकात काहीतरी लिहीलं होतं, ते कोणालातरी बारा वर्षांनंतर आठवतं तसं ती आयडी 'तर्कशुद्ध' लिहीत आहे यावर तुमची श्रद्धा आहे का? या "कोणत्यातरी", "काहीतरी", "सुंदर" असल्या अधांतरी प्रकाराला माझा सगळ्यात पहिले विरोध आहे; तो तुम्हाला नीट समजला आहे का हरीकथेतील फेडपकुमार? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पराची श्रद्धा कशावर ते माहित नाही.. पण काल संध्याकाळी डेक्कन ला श्रद्धा नावाच्या मुली बरोबर फिरत होता असे राजेने सांगितले असं पुपे म्हणत होता हे सहजरावांनी व्यनीतुन कळवलं --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ओ परा, तुमची नक्की कशावर श्रद्धा आहे ते आधी विषद करा.
जगातील सर्वच सुंदर-पवित्र गोष्टींवर माझी श्रद्धा आहे.
ते जीवात्मा म्हणजे काय, त्याचा प्रवास म्हणजे काय हे मला कळलेलं नाही, मी त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. कोणत्यातरी पुस्तकात काहीतरी लिहीलं होतं, ते कोणालातरी बारा वर्षांनंतर आठवतं तसं ती आयडी 'तर्कशुद्ध' लिहीत आहे यावर तुमची श्रद्धा आहे का? या "कोणत्यातरी", "काहीतरी", "सुंदर" असल्या अधांतरी प्रकाराला माझा सगळ्यात पहिले विरोध आहे; तो तुम्हाला नीट समजला आहे का हरीकथेतील फेडपकुमार?
विरोध आहे हे समजले. आपल्या मताचा देखील आदरच आहे. पण तुमचा विरोध आहे म्हणुन हे असले धागे काही लोकांना दिसू नयेत अथवा वेगळ्याच सदरात टाकावेत ह्या सुचनांना विरोध आहे. उद्या एखाद्याला आवडत नाही म्हणुन धागेच टाकणे बंद व्हायला हवे अथवा दुसर्‍या सदरात हलवले जावेत हे चूक आहे ! ©º°¨¨°º© भक्त पराद ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

=)) =)) =)) 'अच्रत-बव्लत'पणाचा कहर आहेस तू! आणि धागा ... सभ्यतेच्या मर्यादेत आणि मिपाच्या धोरणात बसेल अशा शब्दांतला विरोध आधीच प्रकट करून झालेला आहे. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हॅ हॅ हॅ. धागा न वाचण्याच्या आपल्या मूलभूत व्यक्तीस्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर करून धागा उघडू नका. शिंपल. आमच्या सारख्या अशिक्षित लोकांना असले धागे वाचण्यात लई मजा येते. पुण्याचे पेशवे येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

In reply to by परिकथेतील राजकुमार

ओ बोधकथेतील फेककुमार =)) तुम्ही काय बोध घेतला ते सांगा बरं जरा इथे. आम्हाला पण कळुद्या. -Nile

In reply to by Nile

जीवात्म्याचा विकास कसा होतो त्याचा मला बोध झाला. पण आपण अतीशय बाळबोध असल्याने आपणाला तो होणार नाही ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

जीवात्म्याचा विकास कसा होतो त्याचा मला बोध झाला.
जगातील सर्वच अच्रत बाव्लत गोष्टींवर माझे प्रेम आहे.
पण आपण अतीशय बाळबोध असल्याने आपणाला तो होणार नाही
विरोध का आहे हे समजले नाही. आपल्या मताचा देखील अजिबात आदर नाही. पण तुमचा विरोध नाही म्हणुन हे असले धागे काही लोकांना दिसावेत अथवा टाकता येतात म्हणुन कुठल्यातरी सदरात टाकावेत ह्या सुचनांना विरोध आहे. उद्या एखाद्याला आवडतं म्हणुन सविता भाभीचे धागेच टाकणे सुरु व्हायला हवे अथवा ते दुसर्‍या सदरात हलवले जावेत हे चूक आहे ! (धागे म्हणजे काय मुखपृष्ठ वाटले काय तुम्हाला?) -Nile

In reply to by Nile

हा धागा माझ्याच राशीला का आलाय म्हणणारी रास कुठली आणी हा कंपू माझ्या राशीला आलाय म्हणणारी रास कुठली हा बोध! (बोधीसत्व) सहज

In reply to by सहज

साधु साधु.... पपु हभप व्यनीखरडखेचरसम्राट मादकपाचकवीर सहजराव यांचा विजय असो.... --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

In reply to by सहज

धाग्याला रास असते का? म्हणजे ठराविक राशींचेच धागे उडतात म्हणुन विचारतोय. बाकी गर्दीला चेहरा नसतो म्हणतात, तर मग कंपुला रास कशी? सत्वद्वेष्टा -Nile

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ही जीवात्मा काय भानगड आहे? आणि त्याचा प्रवास म्हणजे नक्की कुठून कुठे होतो??
ट्वायलाईट सिरिजमध्ये मानव आणि रक्तपिपासू यांचे मूल जन्माला आले आहे. जीवात्मा म्हणजे मानवी जीव + मानवी आत्मा (आमचे लाडके भूत) यांचे मूल असावे. कसें? ;)

In reply to by प्रियाली

=)) =)) या जीवात्मांवर एक प्रायलाईट, आपलं प्रियाली-गोष्ट होऊन जाऊ देत! अदिती

In reply to by प्रियाली

=)) =)) =)) भारी विश्लेषण.... दिपाली :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भोंगळपणा असेल तर "राशी" वगैरे वर्गवारी काढून टाका मिपावरून. वाचायचं तर वाचा नाही तर दुसरा धागा उघडा. फार वाटलं तर संपादक मंडळी धागा उडवू शकतात. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

फार वाटलं तर संपादक मंडळी धागा उडवू शकतात. थोडं वाटलं तर तुम्ही स्वतःच उडवता की नाहीतरी ! ;-)

In reply to by मुक्तसुनीत

अदिती आणि परा दोघांच्याशी सहमत. लिखाण अंधश्रद्धा पसरवणारे आहे, पण ते न वाचायचा अधिकार आपल्याला आहेच.

In reply to by आमोद शिंदे

कशावरून अंधश्रद्धा आहे? अजून ज्योतीष हे शास्त्र आहे हे सिद्ध झालं नाहीये पण ते तसं होणारच नाही हे कशावरून? सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

तुमची अंधश्रद्धेची व्याख्या काय आहे?
अजून ज्योतीष हे शास्त्र आहे हे सिद्ध झालं नाहीये पण ते तसं होणारच नाही हे कशावरून?
झालं की म्हणू त्याला विज्ञान. तो पर्यंत काय?

:P धागा कसा मऊ मऊ आहे. :P राशीचक्राला ब्रेक कोण मारणार बरे? :P आहे का कुणाकडे रिकामटेकडा वेळ, वरील मुद्दे खोडायला?

मकर बरचसं वैराग्यं
वाचुन अगदी 'फेडअप' व्हायला झालय मला. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

हरिकथेतील कीर्तनकार ...असा वगैरे घ्या आय्.डी. आता :) पुष्करिणी

In reply to by परिकथेतील राजकुमार

+१ उद्यापासून सोनाली ऐवजी सन्याशी आयडी घेईन म्हणते =)) सोनाली

पुस्तकाचे नाव सांगाल का? लिंडा गुडमनच्या "सन साईन्स" मध्ये अशी वर्णने आहेत . ते पुस्तक इंग्रजी भाषेच्या सौंदर्यासाठी वाचावे इतकी सुंदर भाषा असते लिंडा गुडमनची. अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे http://www.sdphadnis.com/sdphadnis_img_002.gif" width="202" height="100" al

मकर वैराग्य 8>

धर्म, धार्मीकता, पर्यटन, देशाटन आदिची आवड जीवात्म्यास निर्माण होते. थोडं मी, माझं कुटुंब या पलीकडे जाणार्‍या या शेवटच्या ४ वैश्वीक राशी :O ~X( #o =)) :''(

रा रा श्री आदरणीय प रा आणि ३_१४ यांच्याशी +१ सहमत वरील चर्चा वाचून मला तुम्हा दोघांबद्दल आदर निर्मान झालाय मुम्बैची गर्दीभरी लोकल हे सत्य असेल तर पुण्याची पी एम टी हा मोक्ष आहे.... http://www.sdphadnis.com/sdphadnis_img_002.gif" width="202" height="100" al

मेष राशी बद्दलचे सर्वच पटलं. चांगले लेखन. -- (मेष)इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

वृश्चिक विवाहोपरांत कामपूर्ती, अधिक गूढ गोष्टींकडे कल आदि चा अनुभव या राशीत येतो म्हणजे ह्या राशीत जन्माला येणारे मुल लग्नाचीच वाट बघत बसते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? वेताळ

In reply to by वेताळ

म्हणजे ह्या राशीत जन्माला येणारे मुल लग्नाचीच वाट बघत बसते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
कोणाच्या लग्नाची याबद्दल कृपया खुलासा करावा! :D

In reply to by वेताळ

=)) =)) >>म्हणजे ह्या राशीत जन्माला येणारे मुल लग्नाचीच वाट बघत बसते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? नाय नाय..लग्न होईपर्यंत वाट बघत असते असे म्हणायचे असेल. >>अधिक गूढ गोष्टींकडे कल आदि चा अनुभव या राशीत येतो खरंय! एकदा लग्न झालं की 'तिच्यायला! ह्यापेक्षा आणखी गुढ काय अस्णार? ' असा विचार प्रत्येकाच्या डोक्यात येत असणारच, पण वृश्चिक रास मात्र ते गुढ सोडवण्याच्या भानगडीत आणखी गुंतत जाते. ;) @शुचि, मजा आली. असेच आणखी मजेदार निरिक्षणं, राशींवरचं लेखन येऊ दे. :) -(वृश्चिक) ध.

In reply to by धमाल मुलगा

नाय नाय..लग्न होईपर्यंत वाट बघत असते असे म्हणायचे असेल. किंवा लग्नं होईपर्यंत वाट बघत नाहीत असं म्हणायचे असेल. मजा आली. असेच आणखी मजेदार निरिक्षणं, राशींवरचं लेखन येऊ दे. +१ . आपण लिखाणाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भरपूर वापर करा. ;) जोपर्यंत लिखाणाला पंख नाहीत तोवर ते उडणार नाही. पुण्याचे पेशवे येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

फारच छान... मजा आली / आला धागा आणि प्रतिसाद वाचुन. येवु द्या अजुन असेच मस्त लेखन... :) --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

वृषभ राशीतली पाखरे शोधा आता...कारण....वृषभ या बाळाला प्रत्येक रंग , रूप, रस, गंध याचं आकर्षण वाटतं. प्रत्येक गोष्ट हातात घेऊन चाखून पहाणे , हाताळणे तिचा आनंद घेणे. लागा कामाला आता...

In reply to by पुष्करिणी

बहुधा सगळ्याच राशींचा असावा मी..

बरं, कर्क आणि सिंह ह्या राज (ठाकरेंच्या नव्हेत, राजकारणीही नव्हे, तर राजेशाही) राशी आहेत असं मी वाचलं होतं, हे खरय का?

In reply to by यशोधरा

बरं, कर्क आणि सिंह ह्या राज (ठाकरेंच्या नव्हेत, राजकारणीही नव्हे, तर राजेशाही) राशी आहेत असं मी वाचलं होतं, हे खरय का?
राज माहीत नाही पण कर्क या राशीचा खाजेशी संबंध असावा. -क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या. खाज

In reply to by क्रेमर

ईक्स! :O अवांतरः इतकी का म्हणे नावं बदललीत? तुमची रास मिथून का?

In reply to by यशोधरा

इतकी का म्हणे नावं बदललीत?
स्टंटबाजी.
तुमची रास मिथून का?
मिथून नाही, वृषभ. -क्रेमर (पुर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पुर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

In reply to by यशोधरा

सिंह असावी ( राशीस्वामी सूर्य , हेड ऑफ द डिपार्टमेंट ) कर्क नसावी ( राशीस्वामी चंद्र ). पुष्करिणी

In reply to by यशोधरा

म्हणूनच 'राज' नाही... राजाला निर्णयक्षम / अ‍ॅथोरिटी असणं महत्वाचं, भावनाशील नाही पुष्करिणी

गेले काही दिवस आता जीवनात काही 'राम' राहिला नाही असं वाटतंय खरं... राजकुमारसाहेबांच्या दुकानात वैराग्य मिळतं का थोडं?