थोडी प्रस्तावना: पाऊस येणार असला तर त्याला एक घटनाक्रम असतो. प्रथम दाटून येते, मग हळूहळू गारठा जाणवायला लागतो, त्यानंतर पाऊस सुरू होऊन सगळं जलमय होत जाते, वाहायला लागते आणि वाहता वाहता विरघळायला लागते. या सर्व घटनाक्रमात क्रमाक्रमाने विरहात झुरणार्या नायकाच्या मनाची अवस्था आणि त्याचे विचार या रचनेत मांडायचा प्रयत्न आहे.
======================================
परत एकदा स्व:तास केले स्वप्नांच्या आधीन |
.......... काल रात्री ||
परत एकदा जीवास केले सखेच्या स्वाधीन |
.......... काल रात्री ||
या रिकाम्या घरात धडपडतांना |
सैरभैर तुझ्या शोधात फिरतांना |
खिडकीत बसून तुझी वाट पाहतांना |
कळले कि सारे सारे मेघ दाटून आले .......... काल रात्री ||
नुरली कुठलीही भानाची वस्त्रे |
थरारली शहारली देहाची गात्रे |
चालवली सांजवेळी वेदनेची सत्रे |
वाटले कि सारे सारे गारठून गेले .......... काल रात्री ||
खिडक्यांचे गज मजबूत काळे |
समोरील चाफ्याचे नाजूक फुल कोवळे |
अन् इथे माझे थकलेले हताश डोळे |
बघ सखे कसे सारे सारे जलमय झाले .......... काल रात्री ||
जळावर आरुढलेली, जमीन सोडलेली माती |
खिडकीबाहेर पडलेली सर्दून विझलेली पणती |
कठड्यावर उगवलेली काही आगंतुक गवताची पाती |
पाहिलेस कसे सारे सारे वाहून गेले .......... काल रात्री ||
या घराचे जीर्ण गळके छत |
पोपडे उडालेल्या भिंतींच्या रंगाचे पोत |
त्या पणतीची पोरकी झालेली वात |
समजलेच नाही कधी हे सारे सारे विरघळून गेले .......... काल रात्री ||
खूप आतून जाणवले सखे तुझ्या असण्याचे महत्व |
मी मात्र उगाच मिरवत होतो प्राक्तनावरचे स्वामित्व |
शेवटी विरघळलेल्या वातीत जाणवतेच ना कापसाचे अस्तित्व |
हेच ते हेच.... जे मला सारे सारे कळून गेले .......... काल रात्री ||
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२७/०४/२०११)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3437
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
या घराचे जीर्ण गळके छत
खुप आवडली कविता .. पाउस आनि
छान लिहिले आहे .
स्तुत्य..
स्तुत्य..
वा
अहो
In reply to वा by निनाद
विराम
In reply to अहो by मिसळलेला काव्यप्रेमी
चांगली कविता..!
कविता आवडली.
आवडली.
एकदम मस्त आहे
ओये मिका... खासच!! वेड...
छान...
आमा तुम तो बडे गजब के शायर निकले..
छान कविता!
छान रे गझल वाटतेय का ही.
हेच
In reply to छान रे गझल वाटतेय का ही. by मुलूखावेगळी
एवढं सगळं कसं सुचतं राव
सर्व