धो धो बरसणाऱ्या पावसातही
मन माझं भिझत नाही...
तुझ्या विरहाने मनात लागलेली आग
काही केल्या विझत नाही ।।
तुझ्या सहवासातील
प्रत्येक क्षण...
मन अजून जगतय
तु आता नाहीस
तरी वेड्या सारखं वागतय ।।
अनेक वेळा प्रश्न विचारला
मी मनाला...
का विसरू शकत नाही मी तुला ?
मन म्हणाल वेड्या
विसरत का कुणी स्वतःला ।।
प्रेमा मध्ये आपली
का स्वतंत्र अस्तित्व उरली नाही ...
आणि तुझी साथ मला
जन्मभर का पुरली नाही ।।
नियतीनी रचलेल्या चितेवर
संपल का आपलं नातं
मग तरीही का उरलय
मनात प्रेम...
कधी संपणार हा
नियतीचा क्रूर खेळ ।।
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1501
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली... लिहित रहा..
अतिशय सुन्दर कविता
आवडली कविता
आवडली कविता