Skip to main content

मुक्तक

वीर चक्र

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 01/04/2020 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
वीर चक्र हि एक कहाणी आहे वीराची त्याच्या स्वतःच्या तोंडून ऐकलेली. १९९१ मध्ये मी एम डी करायला ए एफ एम सी मध्ये गेलो. तेथे आम्हाला असलेले सहयोगी प्राध्यापक(associate professor) कर्नल एन एन राव ( नळगोंडा नरसिम्ह राव) यांच्या खोलीच्या बाहेर पाटी होती COL N N RAO कर्नल एन एन राव Vr C , SM वीरचक्र सेना मेडल (associate professor) सहयोगी प्राध्यापक ते आमच्यासाठी व्याख्याते शिकवणारे प्राध्यापक आणि (थिसीस)प्रबंधासाठी माझ्या मित्राचे मार्गदर्शक (गाईड) होते त्यामुळे त्यांच्या खोलीत रोज जाणे येणे असेच.

(वळण)

लेखक माहितगार यांनी रविवार, 29/03/2020 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.) . . . . महापुरुष आणि तीर्थस्थाने बाप आणि आई डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस * देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते? पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस? भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?

शैलेंद्रच्या निमित्ताने...

लेखक मायमराठी यांनी रविवार, 29/03/2020 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
एका मुलाला ओळखता का? डोंबिवली शहराबाहेरील पाथर्ली गावात शंकराच्या देवळाजवळ एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रहायचा. खाली रस्त्याला लागून त्यांचे दुकान होते. ज्या शाळेला मैदान नाही, स्कुल बस नाही. ते कशाला शाळेला स्वतःची इमारतही नव्हती. शाळेची किल्ली नाही मिळाली म्हणून किंवा धो धो पावसात छत गळत असल्यामुळे सुट्टी देणाऱ्या शाळेत शिकला तो. ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती नाही, प्रज्ञा शोध परीक्षेचा शोध त्याला लागलाच नव्हता, होमी भाभा हे शास्त्रज्ञाचे नाव एवढीच माहिती होती, त्या नावाने परीक्षा बिरीक्षाही असतात हे काही त्याला ठावं नव्हते.

चिंब भिजलेली मुलगी

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 27/03/2020 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळी रात्र. आणि एक सिगारेट. मोकळा बसस्टॉप. छत्री. बाकड्यावर पसरलेले ईवलुशे पाण्याचे थेंब. आणि घोंघावता वारा. चिंब भिजलेली मुलगी कुठुणतरी पळत येते. 'माय गॉड' म्हणून म्हणून मान हलवते. तिची छाती धपापून जाते. आणि सिगारेटचं वलंय काढत मी तिथून चालू लागतो. छत्रीसोबत बरसत्या पाण्याच्या धारा घेऊन. खळाळत्या पाण्यातून वाट शोधत. चिंब भिजलेली मुलगी आता बसस्टॉपवर एकटीच अडकली आहे. रात्र पावसाळी आहे. ये जा करणाऱ्या मोटारींचे पुढचे दिवे तिची साथ करत आहेत. पर्समधल्या छोट्याश्या बाटलीतून ती पाणीही पिली आहे. तिच्या कपाळावर थोडा घामही जमा झाला आहे. ती स्वतःला सावरते. उशिरा का होईना पण ती घरी पोहोचते. रस्ता.

अनया.....

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 25/03/2020 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
एवढं सोपं नसतं आपल्या माणसाला दुस-याचं होताना पहाणं आणि तरीही त्याचं आपलंपण अबाधित ठेवणं.. त्यासाठी मत्सर, असूया, राग अशा अनंत फण्यांनी डसू पहाणा-या कालियाला सतत ठेचावं लागतं.. सहनशीलतेचा गोवर्धन उचलावा लागतो.. जिरवावे लागतात कढ अश्रूंचे, आतल्या आत आणि जगाला दर्शन होतं ते सुहास्यरुपाचं... हात बांधलेले असतात मायेनं, तरी तडफड धडपड होतेच मनाची, उन्मळून पडतात रुढी आणि परंपरांंचे वृक्ष आणि मोकळे होतात अपेक्षांचे आणि हक्कांंचे शापित गंधर्व.. अखंड पुरवत रहावं लागतं प्रेमाचं वस्त्र, उघड्या पडणा-या नात्याची लाज राखण्यासाठी.. अनया, खळखळणा-या धारेच्या खिजगणतीतही नसलेलं आपलं अस्तित्व स्विकारण्याचं बळ कुठू

एक व्हायरस साला आदमी को..

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 24/03/2020 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
ये व्हायरस साला आदमी को बहुत कुछ सिखाया.. मर्यादा- श्रध्देच्या, विज्ञानाच्या, स्वयंघोषित तज्ञांच्या अवघडपणा- जुन्या सवयी सोडण्यातला, सोप्या गोष्टी करण्यातला, जगण्याच्या वेगाला करकचून ब्रेक लावण्यातला, शांततेची सवय करण्यातला, अतर्क्याचा साक्षीदार होण्यातला, हतबलांच्या तांड्यातील एक असूनही.. विझू विझू आशेवर जगत राहाण्यातला न जाने ये व्हायरस साला आदमी को... और क्या क्या सिखायेगा
काव्यरस

दिवस... पक्ष्यांचा, आणि माणसांचा!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 22/03/2020 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ उजाडली, उन्हं अंगावर आली तरी आपापल्या घरट्यात आज पक्ष्यांना जागच आली नाही. कशी येणार? रस्त्यावर आणि आजुबाजूला कुठेही कसलाच आवाजही येत नव्हता. गाड्यांच्या आणि कर्कश्श आवाज करीत पहाटरंगी प्रकाशाला चिरत पळणाऱ्या मोटारसायकलींचा सवयीचा ध्वनी अजून कानावरही पडलाच नव्हता. कॅरियरला लटकावलेल्या दुधाच्या किटल्या सांभाळत सायकल चालविताना रस्त्यावरच्या खड्ड्यात सायकल आदळून होणारा किटल्यांचा आवाजही उजाडल्याची वर्दीच देत नव्हता.

वुई मीस 'यू'!

लेखक माहितगार यांनी सोमवार, 09/03/2020 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
भेटलेली संध्याकाळ स्मरणात असते न भेटलेल्या संध्याकाळचे काय ? त्या संध्याकाळी माझाही कृष्ण आलाच नाही योगा योगाने वेगळ्याच मळ्याच्या दिशेनी धावलेल्या राधेचा दुसराच कृष्ण त्याच तळ्याकाठी गवसला एकमेकांना आधार देत परतत असताना तुझं चाफ्याच्या फुलांच दुकान वाटेत लागलं त्यानी नजर चुकवलेलं मी पाहुन नाही पाहिलं त्याच्या कपाटात तुझ्या फुलपुडीचे कागद आणि गुंडाळून ठेवलेले दोर होते सोबतीला तुझी विसरलेली मोरपंखी बांधणीची ओढणी होती तुझा काचेचा बाऊल गुंडाळून ठेवलेली हातं लावून पहाता ओढणी ओलसर लागली म्हणून त्याचाही हात त्यावर ठेवून पुरुषांचे डोळे ओलावले तर चालतात म्हणून सांगितलं अजूनही त्या
काव्यरस

मेरा कुछ सामान...

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 09/03/2020 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
1 कविता वाचून तू म्हणालास, पण त्या संध्याकाळची तिरपी किरणं राहिली की लिहायची! राहणारच ना रे?? मुठीत घट्ट पकडून ठेवलीत मी ती! 2 तिरपी किरणं राहिली, तुझ्या चित्रामधली तिरपी रेघ राहिली.. अन् ती छोट्टीशी तिरपी काच पण राहिली.. अश्या तिरक्या कल्पना कुणाला सुचतात का? तिरपागडीच तू... 3 जगजीतची गझलसुद्धा राहिली.. कुठली होती रे ती??

मुंगूसाची गोष्ट- भाग २

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 07/03/2020 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
।। मुंगूसाची गोष्ट २ ।। ज्यांचे मांजे दिसत नाहीत अशा माना डोलावणाऱ्या पतंगांनी भरलेलं निळंशार आकाश पाहिलंय का? आणि मांजे दिसलेच तरी ते धरणाऱ्यांचे हात दिसत नाहीत. कोणीतरी फिरकी धरतं कोणीतरी उडंची ( पतंग हातात धरून लांब जाऊन योग्य वेळी वाऱ्याचा अंदाज घेऊन जागच्या जागी उंच उडी मारून हातातला पतंग आभाळात उडवणे) देतो; कोणीतरी कटलेल्या पतंगाला गोळा करायला धावतं. एकंदरीत पतंगाची पूर्ण काळजी घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. तर आम्ही एकत्र कुटुंबातले पतंग आसपासच्या सगळया अंगणात आणि आभाळात बागडत बागडत मोठे झालो.